ज्योत्स्ना सुरेश डोळ, शिशुमंदिर, हुजूरपागा

अर्ज वाटपाची तारीख: २ जानेवारी २०२५ पासून

प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण: ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर, हुजूरपागा लक्ष्मी रोड, पुणे.

वेळ: सकाळी १०.३० ते १२

प्रवेशासाठी मुलीचा जन्म खालील कालावधीत झालेला असावा

शिशुरंजन गट - १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२

छोटा गट - १ ऑक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२१

मोठा गट - १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२०

प्रवेश अर्ज घ्यायला येताना सोबत मुलीच्या जन्मदाखल्याची मुळप्रत सोबत आणणे आवश्यक आहे.

संपर्क साधा

शालेय उपक्रम २०२४ - २५


विविध शालेय उपक्रमांबाबत पालकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

 

विद्यमान शिशुमंदिर कार्यकारिणी

मुख्याध्यापिका - श्रीमती अनघा रानडे
शिक्षिका- १३
सेविका- १२
३ गट शाळेत आहेत.
शिशुरंजन – ५५ विद्यार्थिनी
छोटा गट – १३२ विद्यार्थिनी
मोठा गट – २०१ विद्यार्थिनी

 

शिशुमंदिरची मुहूर्तमेढ

१ जून १९८७ रोजी संस्थेचे तेंव्हाचे सचिव मा. श्री. मो. द. रावेतकर यांनी पुढाकार घेऊन शिशुमंदिरची मुहूर्तमेढ रोवली.

त्यावेळी श्रीमती पुष्पा जोशी, श्रीमती लीला सोहनी, श्रीमती शकुंतला कटककर हे सदस्य कार्यकारणीवर कार्यरत होते.

सुरवातीला प्रचंड आत्मविश्वास, परस्पर संघटीत भावनेने प्रेरीत असलेल्या, एकमेकींच्या सहकार्याने व जिद्दीने कार्यरत असलेल्या ५ शिक्षिका व ४ सेविका असा शिशुमंदिरचा कर्मचारीवर्ग होता.

सन १९८७ पासून ते सन २०१६ पर्यंत शिशुमंदिरने यशस्वी वाटचाल करीत संस्थेच्या नावलौकिकात भरच टाकली. नुकतेच शिशुमंदिरने आपले रौप्यमहोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखात साजरे केले. वर्षभरात पालकांसाठी, विद्यार्थिनींसाठी, शिक्षिका, सेविकांसाठी व माजी विद्यार्थिनींसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.


शिशुमंदिर शाळेचा नामकरण समारंभ ...

'ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर, हुजूरपागा'

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्था, हुजूरपागा लक्ष्मी रोड येथील शिशुमंदिर विभागाचा नामकरण समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. ठाणे येथील सुप्रसिद्ध उद्योगपती मा .श्री. सुरेश डोळ यांच्या दिवंगत पत्नी तसेच हुजूरपागेची माजी विद्यार्थिनी असलेल्या श्रीमती ज्योत्स्ना सुरेश डोळ यांच्या स्मरणार्थ शिशुमंदिर विभागाचे नाव 'ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर, हुजूरपागा' असे करण्यात आले.

या नामकरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट कमिशनर मा. श्री.माधवराव जगताप पुणे, महानगरपालिका यांना निमंत्रित केले होते. तसेच दुसरे पाहुणे ज्येष्ठ गांधीवादी नेते मा.उल्हास दादा पवार हे आम्हाला लाभले. या दोन्ही पाहुण्यांच्या शुभहस्ते शिशुमंदिरच्या नवीन नावाच्या ताम्रपटाचे व नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मा. श्री. सुरेश डोळ व त्यांचे कुटुंबीय यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी मा .माधवराव जगताप, मा. उल्हास दादा पवार व मा. सुरेश डोळ यांनी मनोगत व्यक्त केले. शिशु मंदिरच्या विद्यार्थिनींनी नाट्यछटा सादर केल्या. संस्थेचे चॅरिटीचे वकिल श्री पराग एरंडे यांचा सत्कार या संमारंभात करण्यात आला. संस्थेच्या सचिव मा. रेखा पळशीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कात्रज प्राथमिक येथील शिक्षिका श्रीमती मोनाली तनपुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.संस्थेच्या अध्यक्ष मा. शालिनी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिशुमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती अनघा रानडे यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे माननीय पदाधिकारी,व नियामक मंडळ सदस्य, सर्व विभाग प्रमुख, शिशुमंदिरच्या माजी मुख्याध्यापिका व शिक्षिका तसेच सर्व विभागातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या मा.पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . शिशुमंदिर परिवाराच्या सहकार्याने हा नामकरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर, हुजूरपागा ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर, हुजूरपागा ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर, हुजूरपागा ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर, हुजूरपागा ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर, हुजूरपागा

 

उल्लेखनीय बाबी

सांस्कृतिक कार्यक्रम

विद्यार्थीनींना आपल्या उज्ज्वल भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून वर्षभर शिशुमंदिरामध्ये पालखी, गुरुपौर्णिमा, लो. टिळक पुण्यतिथी, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, स्वातंत्र्यदिन, दहीहंडी, गणेश उत्सव, दसरा, दिव्याची अमावस्या, दीपावली, संक्रांत, प्रजासत्ताक दिन, शिवजयंती, रंगपंचमी गुढीपाडवा असे सांस्कृतिक सण मोठ्या धुमधडाक्यात, जल्लोषात साजरे केले जातात.

स्नेहसंमेलन

मुलींचा आत्मविश्वास वाढावा, ताला-सुराचे ज्ञान पक्के व्हावे, आई बाबांची कौतुकाची थाप पाठीवर पडावी म्हणून मोठ्या संख्येने मुली स्नेहसंमेलना मध्ये सहभागी होतात. स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुली अल्पोपहाराचा आस्वाद घेतात, त्याचप्रमाणे मुलीसाठी शिक्षिकांद्वारे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ केला जातो.

सहल

वर्षभरात पावसाळी सहल, पायी सहल व बागेतील सहल काढली जाते.
छोटा गट व शिशुरंजन गटासाठी एकत्र मोठी व मोठ्या गटासाठी स्वतंत्र मोठी सहल काढली जाते.

शेकोटी

हिवाळ्यात एखाद्या शनिवारी संध्याकाळी मुली शाळेच्या मैदानावर नाच व गाणी म्हणून शेकोटीचा आनंद लुटतात, नंतर गरम खिचडीचा आस्वाद घेतात.

आनंद मेळावा

फेब्रुवारी महिन्यात ४ ते ५ दिवसांचा मुली, पालक, शिक्षिका, सेविकांचा आनंद मेळावा साजरा केला जातो. यामध्ये मुलींसाठी गम्मत जत्रा तर पालकांसाठी विविध स्पर्धा, पालकांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम तसेच शिक्षिकांसाठी, सेविकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात, आजी आजोबांचा मेळावा भरवला जातो. पालकांसाठी विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते.

पोलीस मैत्री

समाजात वावरताना मुलींच्या मनात पोलीसांबद्दल सकारात्मक भावना निर्माण व्हावी म्हणून मुद्दाम शाळेत पोलिसांना बोलवले जाते . मुलींकडून पोलिसांना राखी बांधली जाते.

शैक्षणिक साहित्य प्रदर्शन

वर्षातून एकदा पालकांसाठी सर्व साधनांचे शाळेत प्रदर्शन मांडण्यात येते.

वार्षिक नियतकालिक

'अंकुर ' नावाचे एक नियतकालिक दरवर्षी निघते. या मध्ये पालकांचे व शिक्षिकांचे विविध विषयांवर आधारीत असलेले योग्य ते लेख छापले जातात.

पालकशाळा

उद्याचे सुजाण नागरीक निर्माण करण्यासाठी मुलींचे योग्य संगोपन कसे करावे यासाठी शाळेत पालकांना विविध तज्ञांचे मार्गदर्शन लाभते.

आंतरशालेय स्पर्धा

दरवर्षी मोठ्या संख्येने विध्यार्थिनी, शिक्षिका व सेविका विविध स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभागी घेतात व हमखास यश मिळवतात.

शालेय उपक्रमांची प्रातिनिधिक क्षणचित्रे


स्नेहसंमेलन


सहल


सहभोजन


आनंद मेळावा


लो. टिळक पुण्यतिथी कार्यक्रम


पालकशाळा


पौष्टिक खाऊ

शालेय उपक्रम

“या चला लोकमान्या..”

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या, ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर हुजूरपागा या विभागाने गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून लोकमान्य टिळकांची कर्मभूमी असलेल्या केसरी वाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मोठ्या गटातील मुलींनी लोकमान्य टिळकांची ‘या चला लोकमान्या ...’ ही प्रार्थना म्हंटली. मुलींनी लोकमान्य टिळकांच्या शालेय जीवनातील प्रसंगावर एक नाटुकले मुलींनी सादर केले. याप्रसंगी शिशु मंदिरची माजी विद्यार्थिनी समृद्धी महादेव शिंदे हिने टिळकांचा पोशाख करून बाल सभेचे अध्यक्ष पद भूषविले. तिने मुलींशी, पालकांशी उत्तम संवाद साधला. या कार्यक्रमाला संस्थेच्या सभासद माननीय अरुणा तिवारी, कै. सौ. अश्विनी अरुण देवस्थळे इ इंग्रजी माध्यम प्री प्रायमरी हुजूरपागेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता अनकाईकर, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती मंजिरी मराठे तसेच लोकमान्य टिळकांच्या पणतु सून व केसरी वर्तमान पत्राच्या संपादिका माननीय कल्पना खरे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला पालकही बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व कार्यक्रम झाल्यावर सर्व गटातील पालकानी व मुलींनी केसरी वाड्यातील लोकमान्य टिळकांचे जतन केलेल्या गोष्टी चे संग्रहालय पाहिले.

“या चला लोकमान्या..” “या चला लोकमान्या..” “या चला लोकमान्या..” “या चला लोकमान्या..” “या चला लोकमान्या..” “या चला लोकमान्या..” “या चला लोकमान्या..” “या चला लोकमान्या..” “या चला लोकमान्या..” “या चला लोकमान्या..”

जय जय विठोबा रखुमाई ...

मुली वारकऱ्यांचे पारंपारिक पोशाख करून आल्या होत्या. शिशुमंदिर मध्ये पालखीची मांडणी केली होती . वारकरी, विठ्ठलाचे मंदिर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या मूर्ती, तुळशी वृंदावन हे मांडण्यात आले होते. प्रार्थना, भजन, श्लोक, नाच हे घेण्यात आले तसेच संताच्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या. मुलीनी वेगवेगळ्या आरोळ्या दिल्या.. संत ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज कि जय, पांडुरंग वर दे हरी विठ्ठल . दरवर्षी पालखीसाठी एखादा विषय घेऊन त्या अनुसरून मांडणी केली जाते. या वर्षी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हा विषय घेऊन दिंडी काढण्यात आली. यानिमित्ताने संतुलित आहार खाण्याचे महत्व, जंक फूड खाल्ल्याने होणारे त्रास या विषयी माहिती सांगण्यात आली . शाळेच्या परिसरात मुलींनी संतुलित आहाराविषयी विविध घोषणा दिल्या.

कांदा, मुळा ,भाजी अवघी विठाई माझी...
जो घेईल सकस आहार
त्याला कधी न होई आजार...
अन्न हे पूर्णब्रह्म ...

या या निमित्तने वर्गात तसेच मुलींना विविध कृती देण्यात आल्या. मुलींनी घरून पालकांच्या मदतीने पालखी तयार करून सजवून आणण्यास सांगितली होते, तसेच काही मुलीनी झेंडे तयार करून आणले,. शाळेत मुलींनी पताका चिकटवल्या. मुलीना तुळशीचे महत्व सांगून तुळशीचे पान खाण्यास देण्यात आले. अत्यंत उत्साहाने पालखी सोहळा शिशुमंदिर मध्ये साजरा झाला

जय जय विठोबा रखुमाई ... जय जय विठोबा रखुमाई ... जय जय विठोबा रखुमाई ... जय जय विठोबा रखुमाई ... जय जय विठोबा रखुमाई ... जय जय विठोबा रखुमाई ...

शाळेचा पहिला दिवस

शिशुमंदिर शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष १८ जून २०२४ पासून सुरु झाले. सर्व प्रथम १८ जूनला शिशुरंजन गट, छोट्या गटाची शाळा २० जून, तर मोठ्या गटाची सुरुवात २४ जूनपासून झाली. मुलींच्या स्वागतासाठी निसर्ग थीम वापरून शाळा सजविण्यात आली होती. प्रातिनिधिक स्वरूपात काही मुलींना मा मुख्याध्यापिका श्रीमती अनघा रानडे यांनी औक्षण केले. मुलींच्या स्वागतासाठी कमान ढग, इंद्रधनुष्य ,झाडे,विविध प्राणी लावून सजवली होती. प्रत्येक गटात वर्गाबाहेर selfie point तयार केले होते. वर्गात सर्व मुलीना औक्षण करण्यात आले. वाचनाची आवड मुलींमध्ये निर्माण व्हावी यासाठे शाळेकडून प्रत्येक मुलीला गोष्टीचे पुस्तक व पौष्टीक लाडू देण्यात आले. पालकंच्या मदतीने मुलीनी विविध कृती केल्या. शिशुरंजन गटाने कागदाचे तुकडे जोडून गाडी तयार केली छोट्या गटाने कागदी बेडूक तयार केला. तर मोठ्या गटाने घोटीव कागदाची फोटोफ्रेम तयार केली आणि त्यात मुलीचा फोटो चिकटवला. प्रत्येक कृती पालक व मुलींनी उत्साहाने केली. वर्गात प्रार्थना, गाणी , गोष्टी घेतले. शाळेची ओढ, शाळेत येण्याची प्रचंड उत्सुकता मुलींच्या चेहऱ्यावर दिसत होती. मुली आनंदी, उत्साही होत्या ... शिशुमंदिर शाळेचा परिसर मुलींच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा गजबजून गेला..

First day of school First day of school First day of school First day of school First day of school First day of school First day of school First day of school First day of school First day of school First day of school

 

मागील वर्षांचे शालेय उपक्रम

 

विविध शालेय उपक्रमांबाबत पालकांचा अभिप्राय