हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळा
इयत्ता
८ वी ते १० वी
माध्यम
सेमी इंग्रजी व मराठी
शाळेची वेळ
सोमवार ते शुक्रवार
दुपारी १२.३० ते ५.३०
शनिवार: सकाळी
७.१५ ते ११.००
पालकांसाठी शाळेत भेटण्याची वेळ
१२:०० ते १२:३०
शाळेचा पत्ता
हुजूरपागा कात्रज माध्यामिक शाळा
राजस सोसायटी, कात्रज
फोन नं
०२०-२६९६०२२३
ईमेल आयडी
hujurpagakatraj@yahoo.in
शाळेत शिकविले जाणारे विषय
मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, शारिरीक शिक्षण, संगणक, चित्रकला, शिवण, गाईड, समाजसेवा, व्यक्तिमत्त्व विकास, पर्यावरण, कार्यानुभव.
मुख्याध्यापिका
श्रीम. केतकी किशोर पेंढारकर
(एमए. बीएड)
विशेष उपक्रम २०२४ - २५
इयत्ता १० वी एस.एस.सी. बोर्ड निकाल २०२३ - २०२४
शिष्यवृत्ती
विविध शालेय उपक्रमांबाबत विद्यार्थिनी आणि पालकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. |
शिष्यवृत्ती
इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थिनी
अ.क्र. |
विद्यार्थिनीचे नाव |
गुण |
शहर गुणवत्ता |
1 |
कु. अनुष्का दिनकर रोडे |
208 |
189/410 |
2 |
कु. लेखा कमलाकर गोमाटे |
196 |
326/410 |
३ |
कु. श्रद्धा गणेश जाधव |
194 |
349/410 |
शाळेचा इतिहास व उद्देश
महाराष्ट्र गर्ल्स एज्यूकेशन सोसायटीने पुण्याच्या भोवतालच्या उपनगरीय भागातील मुलींच्या शिक्षणाची गैरसोय लक्षात घेऊन कात्रज येथील राजस सोसायटी मध्ये १९९१ साली हुजूरपागा कात्रज शाळा सुरु केली. ही शाळा राजस सोसायटी मधील बंगल्यामध्ये भरत होती.
२६ जानेवारी १९९५ साली याच जागेवर शाळेची इमारत बांधली.
जून १९९६ पासून ५ वी व ८ वी चे वर्ग सुरु झाले.
१९९७ - मध्ये शाळेची दुसरी इमारत बांधून पूर्ण झाली
१९९९ - इयत्ता १० वी एस.एस.सी. परीक्षा पास होऊन पहिली बॅच बाहेर पडली.
२००४ - ११ वी वाणिज्यचे वर्ग सुरु करण्यात आले.
२०११ - उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) चे ११ वी चे वर्ग सुरु करण्यात आले.
एस. एस. सी. बोर्ड निकाल २०२३-२४
महाराष्ट्र राज्याचा निकाल |
95.81% |
पुणे विभागाचा निकाल |
96.44% |
हुजूरपागा कात्रज शाळेचा निकाल |
100% |
परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थिनी |
269 |
उत्तीर्ण विद्यार्थिनी |
269 |
९०% व ९०% पेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थिनी |
22 |
विशेष योग्यता |
124 |
प्रथम श्रेणी |
95 |
द्वितीय श्रेणी |
43 |
पास श्रेणी |
07 |
एकुणात प्रथम पाच क्रमांक
क्रमांक |
विद्यार्थिनीचे नाव |
एकूण गुण |
टक्के |
पहिला |
कु. अवंती अनिल चव्हाण |
488/500 |
97.6% |
दुसरा |
कु. अक्षदा राजेंद्र थिटे |
479/500 |
95.8% |
तिसरा (विभागून) |
कु. जिज्ञासा हनुमंत जराड |
472/500 |
94.4% |
तिसरा (विभागून) |
कु. आर्या किरण मरळ |
472/500 |
94.4% |
चौथा |
कु. सृष्टी शाम बोगम |
468/500 |
93.6% |
पाचवा |
कु. दुर्वा सुर्यकांत पाटील |
467/500 |
93.4% |
विषयवार प्रथम क्रमांक
मराठी
क्रमांक |
विद्यार्थिनीचे नाव |
गुण |
प्रथम (वि) |
कु. अवंती अनिल चव्हाण |
95/100 |
प्रथम (वि) |
कु. आर्या किरण मरळ |
95/100 |
द्वितीय(वि) |
कु. जिज्ञासा हनुमंत जराड |
94/100 |
द्वितीय(वि) |
कु. दिव्या प्रदीप रांजणे |
94/100 |
इंग्रजी
क्रमांक |
विद्यार्थिनीचे नाव |
गुण |
प्रथम |
कु. अक्षदा राजेंद्र थिटे |
94/100 |
द्वितीय(वि) |
कु सिद्धी राजेंद्र जाधव |
93/100 |
द्वितीय(वि) |
कु. मानसी बालाजी डोंगरे |
93/100 |
विज्ञान
क्रमांक |
विद्यार्थिनीचे नाव |
गुण |
प्रथम |
कु. अक्षदा राजेंद्र थिटे |
98/100 |
द्वितीय(वि) |
कु. श्रावणी नवनाथ जाधव |
97/100 |
द्वितीय(वि) |
कु. अवंती अनिल चव्हाण |
97/100 |
गणित
क्रमांक |
विद्यार्थिनीचे नाव |
गुण |
प्रथम |
कु. सृष्टी अनिल जाधव |
96/100 |
द्वितीय |
कु. दुर्वा सुर्यकांत पाटील |
94/100 |
हिंदी
क्रमांक |
विद्यार्थिनीचे नाव |
गुण |
प्रथम |
कु. अक्षदा राजेंद्र थिटे |
39/40 |
द्वितीय(वि) |
कु. श्रावणीनवनाथ जाधव |
38/40 |
कु. वैभवी हेमंत बहिरट |
38/40 |
|
कु. अवंती अनिल चव्हाण |
38/40 |
|
कु. दिव्या प्रदीप रांजणे |
38/40 |
संस्कृत
क्रमांक |
विद्यार्थिनीचे नाव |
गुण |
प्रथम (वि) |
कु. अवंती अनिल चव्हाण |
40/40 |
कु. ऋचा वीरेंद्र कुलकर्णी |
40/40 |
|
द्वितीय(वि) |
कु. आदिती नितीन ब्राम्हणकर |
39/40 |
कु. आर्या किरण मरळ |
39/40 |
|
कु. दुर्वा सुर्यकांत पाटील |
39/40 |
|
कु. अक्षदा राजेंद्र थिटे |
39/40 |
|
कु. अक्षदा नितीन यादव |
39/40 |
|
कु. तेजल नरसिह शल्ले |
39/40 |
|
कु. समीक्षा शैलेश भंडारे |
39/40 |
|
कु. संजना लक्ष्मण भोंग |
39/40 |
|
कु. अस्मिता सुनील शिळीमकर |
39/40 |
|
कु. श्रावणी नवनाथ जाधव |
39/40 |
|
कु. भाविका बाळू धाईंजे |
39/40 |
|
कु. भाग्यश्री योगेश चव्हाण |
39/40 |
|
कु. सृष्टी शाम बोगम |
39/40 |
|
कु. श्रुती हनुमंत वाघ |
39/40 |
|
कु. विभावी हेमंत बहिरट |
39/40 |
|
कु. सिद्धी संतोष राजीवडे |
39/40 |
|
कु. दीपिका राजेंद्र जाधव |
39/40 |
|
कु. पौर्णिमा अमित किरवे |
39/40 |
|
कु. सानिया सुलतान शेख |
39/40 |
|
कु. सेजल जनार्दन खुटवड |
39/40 |
|
कु. निकिता विनोद गायकवाड |
39/40 |
|
कु. समीक्षा संदीप रांजणे |
39/40 |
|
कु. तनिष्का राजेंद्र भिलारे |
39/40 |
|
कु. प्रीती गोरख खैरनार |
39/40 |
|
कु. पूर्वा उत्तम पानसरे |
39/40 |
|
कु. साक्षी देवानंद जाधव |
39/40 |
|
कु. वैष्णवी विश्वास जाधव |
39/40 |
|
कु. श्रावणी सुधाकर शिळीमकर |
39/40 |
|
कु. तेजस्विनी चंद्रकांत पाटील |
39/40 |
|
कु. कौशल्या दत्तात्रय शिंपले |
39/40 |
|
कु. सृष्टी अनिल जाधव |
39/40 |
|
कु. ईश्वरी महादेव आनंदे |
39/40 |
|
कु. आर्या हनुमंत नेवासे |
39/40 |
|
कु. रिया नागराज गायकवाड |
39/40 |
|
कु. अनन्या प्रकाश लोहार |
39/40 |
|
कु. जिज्ञासा हणमंत जराड |
39/40 |
इतिहास
क्रमांक |
विद्यार्थिनीचे नाव |
गुण |
प्रथम(वि) |
कु. अक्षदा राजेंद्र थिटे |
39/40 |
प्रथम(वि) |
कु. अवंती अनिल चव्हाण |
39/40 |
द्वितीय |
कु. रिया नागराज गायकवाड |
38/40 |
भूगोल
क्रमांक |
विद्यार्थिनीचे नाव |
गुण |
प्रथम (वि) |
कु. अक्षदा राजेंद्र थिटे |
39/40 |
कु. रिया दत्तात्रय मरळ |
39/40 |
|
कु. जिज्ञासा हणमंत जराड |
39/40 |
|
कु. वैष्णवी हणमंत जाधव |
39/40 |
|
कु. अवंती अनिल चव्हाण |
39/40 |
|
कु. सृष्टी शाम बोगम |
39/40 |
|
कु. प्रीती गोरख खैरनार |
39/40 |
|
कु. पूर्वा उत्तम पानसरे |
39/40 |
|
द्वितीय (वि) |
कु. तेजस्विनी चंद्रकांत पाटील |
38/40 |
कु. वैभवी हेमंत बहिरट |
38/40 |
|
कु. नंदिनी बाळू स्वामी |
38/40 |
|
कु. अनिशा मधुसूदन पेडणेकर |
38/40 |
|
कु.पूजा सोमनाथ आंधळे |
38/40 |
उल्लेखनिय घटना व उपक्रम
विज्ञान मंडळ उद्घाटन
शुक्रवार दि . १९ जुलै २०१४ रोजी हुजुरपागा कात्रज माध्यमिक शाळेत 'विज्ञान मंडळ' उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग उपाध्यक्ष माननीय विनय आर. आर. हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
विज्ञान कथाकथन कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सरांनी मार्गदर्शन केले .
या प्रसंगी प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती केतकी पेंढारकर यांनी वैज्ञानिकांची माहीती विद्यार्थिनींना सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आदिती वग्गु या विद्यार्थिनीने केले .कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान शिक्षिका श्रीम. माधुरी पन्हाळे, श्रीम. सुप्रिया भोसले, श्रीम. सारिका पाटील, श्रीम. सुप्रिया केंजळे, व श्रीम. वैष्णवी किंद्रे यांनी केले.
WAGGS discovery day program
१६ जुलै २०२४ रोजी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी संगम वर्ल्ड सेंटर येथे WAGGS discovery day program निमित्त STEM (Science Technology Engineering Mathematics) या कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींनी सक्रीय सहभाग घेतला. येथे विद्यार्थिनींनी विविध वैज्ञानिक प्रयोग तसेच Working models स्वतः तयार केली. येथे विद्यार्थिनींना विज्ञान विषयातील करियर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
२१ जून योगदिन
शुक्रवार २१ जून २०२४ रोजी हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक योगदिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाभरतीचे संस्थाचालक व प्रसिद्ध योगतज्ज्ञ मा. श्री. मनोज पटवर्धन सर उपस्थित होते.
सूत्रसंचालिका आणि क्रीडा शिक्षिका श्रीमती वाघमारे बाईंनी प्रमुख पाहुणे व शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती केतकी पेंढारकर यांचे स्वागत केले.
मा. श्री. मनोज पटवर्धन सरांनी योग म्हणजे काय? योगशास्त्र कसे विकसित झाले? व योग आपल्या शारीरिक, मानसिक ब बौद्धिक विकासासाठी कसा उपयुक्त आहे ह्याचे सुंदर विवेचन केले. आसनांची साखळी असणारा योग व सूर्यनमस्कार यांचे अतिशय सुंदर प्रात्यक्षिक इयत्ता ९ वी च्या विद्यार्थिनींनी सादर केले. मा. श्री पटवर्धन सरांनी विद्यार्थिनींकडून पवनमुक्तासन, ताडासन, भुजंगासन या सारखी आसने करूवून घेतली.
मा. मुख्याध्यापिका श्रीमती पेंढारकर बाईनी प्रमुख पाहुण्यांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
स्वराज्यसभा वर्गप्रतिनिधी निवडणूक
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील स्वराज्यसभा वर्गप्रतिनिधींची निवडणूक सोमवार
दिनांक ८ जुलै २०२४ रोजी घेण्यात आली.
विद्यार्थिनींना लोकशाही मूल्यांचे शिक्षण देण्यासाठी व गुप्त मतदान पद्धतीने योग्य उमेदवारीची निवड कशी करावी या सर्व बाबींची माहिती मिळावी तसेच त्यांना सामजिक कार्याची प्रेरणा लहानपणापासून मिळावी या उद्देशाने ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली. अतिशय उत्साहात व शिस्तपूर्ण वातावरणात शालेय मंत्रीमंडळ निवडणूक पार पडली.
“सुजाण पालकत्व”
शनिवार दिनांक ६/७/२०२४ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींच्या पालकांच्यासाठी “सुजाण पालकत्व” या विषयावर शालेय मानसोपचार तज्ज्ञ मा.श्रीमती मेघा विनेश नगरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्रीमती मेघा विनेश नगरे या स्वरूपवर्धिनी या संस्थेत बावीस वर्षे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असून या क्षेत्रातील यांच्या कार्याबद्दल २०२२ मध्ये त्यांना माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कडून सन्मानित करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती केतकी पेंढारकर यांनी शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मा. नगरे मॅडम यांचे स्वागत केले.
श्रीमती मेघा नगरे यांनी ppt, व्हिडीओज तसेच विविध खेळ या माध्यमातून पालक आणि पाल्य यांचे नातेसंबंध उलगडून दाखविले. मुलांकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा, मुले आणि पालक यांच्यातील ताणताणाव यासंबंधी नगरे मॅडम यांनी पालकांचे समुपदेशन केले.
इयत्ता १० वी च्या विद्यार्थिनी देखील व्याख्यानास उपस्थित होत्या. पालकांशी सवांद साधल्यानंतर मा. मेघा नगरे यांनी विद्यार्थिनींसाठी घेण्यात येणाऱ्या “संयम” कार्यशाळे अंतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींशी सवांद साधला. विद्यार्थिनींनी उस्फुर्त प्रतिसाद देट आपल्या समस्या,अडचणी आणि ताणतणाव मा. नगरे मॅडम यांच्यापुढे मांडल्या. विद्यार्थिनींसाठी “संयम” कार्यशाळेचे पुढील सत्र प्रशालेत आयोजित करण्यात येणार आहे.
इयत्ता १० वी शालान्त परीक्षा २०२३-२४ कौतुक सोहळा
मंगळवार ११ जून २०२४ रोजी शाळेत १०वी च्या शालान्त परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींचा “कौतुक सोहळा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रीमती महाले बाईंनी श्रीमती पेंढारकर बाई, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती राजमणीबाई, जेष्ठ शिक्षक श्री. मानेकर व श्रीमती घोडके बाई व सर्व उत्सवमूर्ती विद्यार्थिनी व उपस्थित पालकांचे स्वागत केले.
त्यानंतर उच्च माध्यमिक विभागाच्या श्रीमती मराठे बाईनी दहावीच्या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना इयत्ता ११ वीच्या प्रवेशप्रक्रीयेबाबत आवश्यक माहिती दिली. मा. मुख्याध्यापिका श्रीमती पेंढारकर बाईनी शालान्त परीक्षेचे निकालवाचन केले. यावर्षीही धवल यशाची परंपरा कायम राखित शाळेचा १००% निकाल लागला. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
परीक्षेस प्रविष्ट एकूण विद्यार्थिनी |
२६९ |
विशेष योग्यता प्राप्त विद्यार्थिनी |
१२४ |
प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थिनी |
९५ |
द्वितीय श्रेणी प्राप्त विद्यार्थिनी |
४३ |
पास विद्यार्थिनी |
०७ |
प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींची नावे
१) |
कु. अवंती अनिल चव्हाण |
९७.६% |
२) |
कु. अक्षता राजेंद्र थिटे |
९५.८% |
३) |
कु. जिज्ञासा हनुमंत जराड |
९४.४% |
४) |
कु. आर्या किरण मरळ |
९३.६% |
४) |
कु. सृष्टी शाम बोगम |
९३.६% |
५) |
कु. दुर्वा सुर्यकांत पाटील |
९३.४% |
निकाल वाचना नंतर विषयानुसार प्रथम, द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींचे जोरदार टाळ्यांच्या गजरात कौतुक करण्यात आले. मा. मुख्याध्यापिका पेंढारकर बाईनी पहिल्या पाच क्रमांकप्राप्त विद्यार्थिनींचा पेढे, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार केला. त्यानंतर श्रीमती थिटे या पालकांनी व इयत्ता १०वी च्या वर्गप्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षकांतर्फ श्री राजेंद्र मानेकर सरांनी आपले मनोगत केले. विद्यार्थी दशेतील कठोर मेहनत व चिकाटीचे महत्त्व सांगून विद्यार्थीनींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मा. मुख्याध्यापिका श्रीमती पेंढारकर बाईनी आपले विचार मांडताना “ आव्हानांना समोर जाताना सदैव सकरात्मक आशावाद बाळगून कठोर प्रयत्न करा.” अशा संदेश देऊन शुभेच्छा दिल्या.
सूत्र संचालिका श्रीमती वैशाली महालेबाईनी, उत्सवमूर्ती विद्यार्थिनी, उत्साही पालक,गुणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे कौतुक करून आभार मानले. व मा. मुख्याध्यापिकांच्या अनुमतीने कौतुक सोहळा संपन्न झाल्याचे जाहीर केले.
स्वयंसिद्धा
मंगळवार दिनांक ७/११/२०२३ रोजी हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींसाठी “स्वयंसिद्धा” हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात इयत्ता ८वी, ११वी व १२वी च्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमधील कला कोशल्य, संभाषण, मार्केटिंग या सारख्या कौशल्याचा विकास साधून नवनिर्मितीचा आनंद मिळविणे हा होता. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना भांडवल उभारणे, अंदाजपत्रक ठरविणे, विक्रीच्या वस्तूंची किमंत ठरविणे, वस्तूंचे पॅकिंग करणे , जमाखर्चाचा हिशोब ठेवणे या गोष्टी प्रत्यक्ष कृतीतून अनुभवण्यास मिळाला. विद्यार्थिनींनी पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, रंग , विविध दागिने, पर्स या सारख्या वस्तू, तसेच भेळ, पाणीपुरी, विविध चाटचे प्रकार, चॉकलेट, सॅँडविच या सारखे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते. विक्री करून मिळालेल्या नफ्यातून ५०% टक्के नफा विद्यार्थिनींनी शाळेसाठी दिला. अर्थार्जन करणे, सामजिक बांधिलकी जपणे आणि स्वत: मधील सुप्त गुण ओळखून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना मिळाली.
स्वयंसिद्धा या उपक्रमाचे नियोजन मा. मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती साधना घोडके आणि श्रीमती अश्विनी मराठे यांनी केले, वर्गशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
पुस्तक अभिवाचन उपक्रम
बालदिनानिमित्त गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी हुजूरपागा कात्रज माध्यमिक च्या माध्यमिक शाळेत लेखिका माननीय डॉक्टर संगीता बर्वे यांच्या उपस्थितीत तसेच माननीय श्री सुजित जगताप माननीय श्री शिवाजी कामठे तसेच मा. श्री.हरिश्चंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत लेखिका संगीता बर्वे यांचे माझे आजोळ या पुस्तकाचे अभिवाचन करण्यात आले यासाठी प्रियांका सोनकांबळे या विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे स्वागत तसेच श्रीनिधी हुद्दार पाहुण्यांची ओळख माननीय मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता भूमकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर लेखिकांच्या अभिवाचनात सहभागी विद्यार्थ्यांनी सुंदर रीतीने काव्य वाचून कार्यक्रमाला प्रारंभ केला शुद्ध मराठीचे गुणगान जाताना तिला कधी ना अंतर द्यावे या गीताचे सुरेल आवाजात माय मराठीचे कौतुक प्रांजली बर्वे यांनी केले. लेखिका संगीता बर्वे यांनी विद्यार्थिनींची सुसंवाद साधला महाराष्ट्रात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अशा अभिवाचनाचे प्रयोग होणे गरजेचे आहे भाषेमुळेच आपण घडतो तसेच ऐकण्याचे बघण्याचे व वाचनाचे संस्कार व्हावे या योगे आपली मातृभाषा आपणच जिवंत ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याची आज नितांत गरज आहे असा संदेश त्यांनी दिला.
वाचन प्रेरणा दिन
हुजूरपागा कात्रज शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जेष्ठ साहित्यिका मा. श्रीमती दीपा देशमुख यांचे व्याख्यान झाले. मा. श्रीमती देश्मुख म्हणाल्या की “भारताची खरी शक्ती ही युवा शक्ती असून डॉ. कलाम यांचे लेखन या पिढीला संस्कारक्षम आणि सुजाण नागरिक बनविण्यास सक्षम आणि प्रेरणादायी आहे.” या प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता भूमकर यांनी स्वागत करत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीमती वैशाली महाले यांनी केले तर श्रीमती विद्या कीर्दत यांनी आभार मानले.
लेखक आपल्या भेटीला
शुक्रवार दिनांक 24 /11 /23 रोजी 'लेखक आपल्या भेटीला' हा कार्यक्रम हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत उत्साहात पार पडला. यावेळी प्रसिद्ध लेखिका, भाषाभ्यासक व कवयित्री डॉक्टर नीलिमा गुंडी या उपस्थित होत्या. मराठीच्या जतनासाठी व संवर्धनासाठी अविरत कार्य करणाऱ्या आपल्या साहित्या निर्मिती आणि लेखनाने मराठीला समृद्ध करणार बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व पाहुणे म्हणून लाभले होते .या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली श्रीमती महाले बाई यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. 'माझे भाषा प्रेम ' या विषयावर श्रीमती नीलिमा गुंडी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या लहानपणापासूनच आई आजी यांच्या दैनंदिन बोलीभाषेतूनच म्हणी मधून आमच्यावर संस्कार झाले व भाषेतील गंमत त्यामागील गर्भित अर्थ समजायला लागले. ते त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे सांगितले . मराठी भाषेतील गंमत आपण शिकली पाहिजे त्यासाठीची मार्मिक दृष्टी आपल्याकडे यायला हवी. विविध भाषा केवळ शब्द वाचायला शिकवत नाही तर भाषा मन वाचायला शिकवते आणि त्यातूनच हळूहळू माणसही वाचायला शिकतात. शब्दाची व्युत्पत्ती शब्दाच्या विविध अर्थछटा ही भाषे ची खरी श्रीमंती आहे असा संदेश मुलींना देतानाच विविध विषयांवरील पुस्तके आपण वाचली पाहिजे त्यानेच आपण घडतो असे त्या म्हणाल्या.यावेळी दोन विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त कविता सादर केली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती किर्दत, पाहुण्यांची ओळख श्रीमती महाले तर आभार श्रीमती खान यांनी मानले.
उपक्रम: पुस्तक भेट प्रकल्पांतर्गत (रद्दीतून वर्ग ग्रंथालय)
उद्घाटक: मा.दीपा देशमुख
मा. मुख्याध्यापिका हेमलता भुमकर
मार्गदर्शक: श्रीमती घोडके, श्रीमती खान
सहभाग:-आठवी ब च्या सर्व विद्यार्थिनी
उद्दिष्टे: १)विद्यार्थिनींमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे.
२) विद्यार्थिनींना वाचनासाठी सहजासहजी पुस्तके उपलब्ध होणे.
३)विद्यार्थिनींच्या वाचन कौशल्याबरोबरच लेखन कौशल्य विकसित होणे.
४) विद्यार्थिनींमध्ये व्यवस्थापन कौशल्य विकसित करण्यास मदत करणे
विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी वर्गाच्या ग्रंथालयास पुस्तके भेट दिली. विद्यार्थिनींनी पुस्तक देवघेव रजिस्टर तयार केले.15 ऑक्टोबर वाचन दिनानिमित्त विद्यार्थिनींनी विद्यार्थिनींसाठी तयार केलेल्या वर्ग ग्रंथालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या माननीय दीपा देशमुख व शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय भुमकर यांच्या हस्ते झाले.
10th October - World Mental Health Day
हुजूरपागा कात्रज माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधन सण साजरा
गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पेशवे तलाव व राजस सोसायटी आरोग्य कोठी येथील सफाई कामगार बंधू भगिनींना, हुजूरपागा कात्रज माध्यमिक विभागातील विद्यार्थिनी व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती साधना घोडके आणि श्रीमती सुप्रिया मेरवाडे यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला. पुणे महानगरपालिकेतील सर्व नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यामध्ये सफाई कामगारांचा सर्वात मोठा वाटा आहे. ही जाणीव विद्यार्थिनींमध्ये निर्माण व्हावी व कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सफाई कामगारांनी केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, वरील कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी आरोग्य निरीक्षक माननीय श्री प्रशांत कर्णे यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला उपस्थित श्री. सोमनाथ गायकवाड, श्री चव्हाण, आणि इतर सर्व सफाई कामगार बंधू-भगिनींनी रक्षाबंधन उपक्रमाचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले.
इतिहास संशोधक आपल्या भेटीला
शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव पूर्तता समारंभ, तसेच क्रांती सप्ताह व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा सोहळ्यास 350 वर्षे या निमित्ताने, हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्र व्याख्याते, पुरातत्त्ववेत्ते, दुर्ग अभ्यासक, श्री. पांडुरंग बलकवडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना भारतातील प्राचीन वैभवशाली शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, धातुशास्त्र ,वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, वेद याविषयी तसेच प्राचीन इतिहास ते आधुनिक इतिहास याविषयी अत्यंत ओघवत्या आणि रसाळ भाषेत प्रेरणादायी माहिती सांगून विद्यार्थिनींमध्ये देशाभिमान निर्माण केला व देश कार्याची प्रेरणा दिली.
शोध माझ्या करिअरचा
8 जुलै 2023 रोजी 'शोध माझ्या करिअर चा या अभिनव उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थिनी प्रियंका जगनगडा आणि शशिकला दांगट यांनी अनुक्रमे कला क्षेत्र, शेती आणि शेतीवर आधारित व्यवसाय याबद्दल विद्यार्थिनींना माहिती सांगितली. त्याचबरोबर या क्षेत्रासाठी आवश्यक असणारी कोणती कौशल्य, कशाप्रकारे विकसित केली पाहिजे. त्याबद्दलही मार्गदर्शन केले.
शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी
भविष्यातील महाशक्तिशाली भारत साकारण्यासाठी शालेय वयातच नेतृत्त्व, आत्मविश्वास, संस्कार व मूल्य शिक्षणाची बीजे रुजवून कर्तव्यदक्ष नागरिक घडविण्याचा प्रयत्न हुजूरपागा शाळेत सतत सुरु असतो. या शाळेत माझ्या अंगी ही मुल्ये रुजवली गेली. त्यामुळे मी यश मिळवू शकले, असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधिकारी मा. श्रीमती वरदा रांजणे यांनी केले. हुजूरपागा कात्रज शाळेत शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी उपक्रम पार पडला. त्यावेळी रांजणे बोलत होत्या. या वेळी प्राथमिक विभागाच्या मंत्रिमंडळाला मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी, तर माध्यमिक विभागाच्या मंत्रिमंडळाला श्रीमती साधना घोडके यांनी शपथ दिली. यावेळी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मा. श्रीमती शालिनी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेच्या उपाध्यक्षा मा. श्रीमती हिमानी गोखले यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या साचींव मा. श्रीमती रेखा पळशीकर, शालेय समिती अध्यक्ष व संस्थेचे सहसचिव श्री. विलास पाटील, सभासद श्री. रमाकांत सोनवणी, डॉ. सुनील जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सारिका पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख श्री. प्रसाद दीक्षित यांनी करून दिली. श्रीमती शांभवी सावंत यांनी आभार मानले.
सामाजिक उपक्रम
सोमवार दिनांक २६ जून २०२३ रोजी येथील मा. दादा जाधवराव विद्यालय जेजूरी येथील विद्यार्थ्यांना समाजिक प्रकल्पाच्यामाध्यमातून हुजूरपागा कात्रज शाळेतील इयत्ता ९ वी व १० वी पास झालेल्या विद्यार्थिनीची पुस्तके तसेच माजी विद्यार्थिनीहिच्याकडून मिळालेल्या वह्या आणि कात्रज येथील समाजिक कार्यकर्ते मा श्री विकासनाना फाटे यांचे कडून सॅक देण्यात आल्या. याकार्यक्रमाचे नियोजन श्री राजेंद्र मानेकर यांनी केले.