कात्रज उच्च माध्यामिक

वाणिज्य विभाग

इयत्ता
११वी व १२वी

माध्यम
मराठी व इंग्रजी

 

वेळ

सोमवार ते शुक्रवार
सकाळी ७.१५ ते ११.४५

शनिवार : दुपारी
११.२० ते ३.५०

 

पालकांसाठी भेटण्याची वेळ
दुपारी १२:०० ते १२:३०

पत्ता
हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा राजस सोसायटी, कात्रज
फोन- ८०८७४०२३८९
ईमेल आयडी- hujurpagakatraj@yahoo.in

मुख्याध्यापिका
श्रीम. केतकी किशोर पेंढारकर
(एमए. बीएड)

शालेय उपक्रम २०२४ - २५

वार्षिक निकाल २०२३ - २४

इतिहास व उद्देश

कात्रज सारख्या उपनगरीय भागातील सर्वसामान्य मुलींना १० वी नंतरच्या शिक्षणाची संधी मिळावी या हेतूने कात्रज येथे २००४ साली उच्च माध्यमिक वाणिज्य विभागाची सुरुवात करण्यात आली.

उच्च माध्यमिक वाणिज्य विभागात शिकविले जाणारे विषय

इ. ११वी

  • मराठी
  • इंग्रजी
  • अर्थशास्त्र
  • जमाखर्च (Account)
  • वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
  • चिटणीसांची कार्यपद्धती
  • शारिरीक शिक्षण, पर्यावरण

इ. १२वी

  • मराठी
  • इंग्रजी
  • अर्थशास्त्र
  • जमाखर्च (Account)
  • वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
  • चिटणीसांची कार्यपद्धती
  • शारिरीक शिक्षण
  • पर्यावरण
 

HSC Board इ.१२ वी परीक्षा निकाल 2023-24

एकूण पट

76

परीक्षेस बसलेल्या

76

उत्तीर्ण विद्यार्थिनी

76

अनुत्तीर्ण विद्यार्थिनी

00

अनुपस्थित विद्यार्थिनी

00

शेकडा निकाल

100%

एकुणात प्रथम क्रमांक

क्रमांक

विद्यार्थिनीचे नाव

टक्के 

प्रथम 

कु. सिद्धी गोपाल सूर्यवंशी

83.33%

द्वितीय 

कु. सुकन्या अनिल भिलारे 

83.17%

तृतीय 

कु. हार्दिका संतोष पानसरे 

82.17%

विषयवार प्रथम क्रमांक

मराठी

क्रमांक

विद्यार्थिनीचे नाव

टक्के 

प्रथम 

कु. सिद्धी गोपाल सूर्यवंशी

91/100

द्वितीय 

कु. श्रावणी संजय काशीद 

90/100

विषयवार प्रथम क्रमांक

इंग्रजी 

क्रमांक

विद्यार्थिनीचे नाव

टक्के 

प्रथम 

कु. प्रतीक्षा गणेश बलकवडे 

80/100

द्वितीय(वि)

कु. हार्दिका संतोष पानसरे

73/100

कु. सानिया अहमद शेख

73/100

 

अर्थशास्त्र

क्रमांक

विद्यार्थिनीचे नाव

टक्के 

प्रथम 

कु. सिद्धी गोपाल सूर्यवंशी

95/100

द्वितीय 

कु. सुकन्या अनिल भिलारे

92/100

वाणिज्य संघटन

क्रमांक

विद्यार्थिनीचे नाव

टक्के 

प्रथम 

कु. सुकन्या अनिल भिलारे

85/100

द्वितीय 

कु. हार्दिका संतोष पानसरे

82/100

चिटणीसाची कार्यपद्धती

क्रमांक

विद्यार्थिनीचे नाव

टक्के 

प्रथम 

कु. सिद्धी गोपाल सूर्यवंशी

97/100

द्वितीय 

कु. श्रावणी संजय काशीद

91/100

BOOK KEEPING AND ACCOUNTANCY

क्रमांक

विद्यार्थिनीचे नाव

टक्के 

प्रथम 

कु. श्वेता सतिश श्रीखंडे

85/100

द्वितीय 

कु. सुकन्या अनिल भिलारे

83/100

 
 

शालेय उपक्रम २०२४ - २५

स्वराज्यसभा वर्गप्रतिनिधी निवडणूक

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १२ वी च्या वर्गप्रतिनिधींची निवडणूक सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी सकाळ सत्रात घेण्यात आली. लोकशाही म्हणजे काय व लोकशाही पद्धतीने निवडणूक कशी घेतली जाते याचे महत्त्व विद्यार्थिनींना समजविण्यासाठी तसेच लोकशाही पद्धतीचे मूल्य व गुप्त पद्धतीने मतदान करून, योग्य उमेदवारीची निवड कशी करावी यासाठी निवडणुकीचे आयोजन करण्यात आले.आधुनिक भारताच्या भावी जागरूक नागरिक म्हणून मतदानाचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून देण्यासाठी निवडणूक घेण्यात आली. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये शिक्षक व विद्यार्थिनीच्या मदतीने स्वराज्यसभा वर्गप्रतिनिधी निवडणूक योग्य रीतीने पार पाडली गेली.

Swarajya Sabha Swarajya Sabha Swarajya Sabha Swarajya Sabha

आंतरराष्ट्रीय योगदिन

“योग असे जेथे
आरोग्य वसे तेथे”

२१ जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हे १० वे वर्षं. या निमित्ताने हुजूरपागा कात्रज उच्च माध्यमिक विभागामध्ये २१ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त श्रीमती प्रीती महांगरे यांनी योग दिनाची माहिती व योगाचे महत्त्व याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. श्रीमती पूनम बडदे यांनी ककाही विद्यार्थिनींच्या मदतीने सर्व विद्यार्थिनींकडून योगाची प्रात्यक्षिके, सूर्यनमस्कार व मेडीटेशन करून घेतले. आंतरराष्ट्रीय योगदिनाची सांगता पसायदानातून करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय योगदिन आंतरराष्ट्रीय योगदिन आंतरराष्ट्रीय योगदिन आंतरराष्ट्रीय योगदिन

इयत्ता १२ वी उत्तीर्ण कौतुक समारंभ

सोमवार दिनांक ३ मे २०२४ रोजी हुजूरपागा कात्रज उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता १२वी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी हुजूरपागा माहिला वाणिज्य महाविद्यालयाचे श्रीयुत अरणेसर, हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती राजमणी बाई, हुजूरपागा कात्रज माध्यमिक विभागाच्या जेष्ठ शिक्षिका श्रीमती वाघमारे बाई इयत्ता १२ वी च्या विद्यार्थिनींचे कौतुक करण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. प्रथम आलेल्या पाच विद्यार्थिनींना पेढे आणि पेनड्राईव्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अश्विनी मराठे यांनी केले.

12th result 12th result 12th result 12th result 12th result

शालेय उपक्रम २०२३ - २४

स्वयंसिद्धा

मंगळवार दिनांक ७/११/२०२३ रोजी हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींसाठी “स्वयंसिद्धा” हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात इयत्ता ८वी, ११वी व १२वी च्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमधील कला कोशल्य, संभाषण, मार्केटिंग या सारख्या कौशल्याचा विकास साधून नवनिर्मितीचा आनंद मिळविणे हा होता. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना भांडवल उभारणे, अंदाजपत्रक ठरविणे, विक्रीच्या वस्तूंची किमंत ठरविणे, वस्तूंचे पॅकिंग करणे , जमाखर्चाचा हिशोब ठेवणे या गोष्टी प्रत्यक्ष कृतीतून अनुभवण्यास मिळाला. विद्यार्थिनींनी पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, रंग , विविध दागिने, पर्स या सारख्या वस्तू, तसेच भेळ, पाणीपुरी, विविध चाटचे प्रकार, चॉकलेट, सॅँडविच या सारखे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते. विक्री करून मिळालेल्या नफ्यातून ५०% टक्के नफा विद्यार्थिनींनी शाळेसाठी दिला. अर्थार्जन करणे, सामजिक बांधिलकी जपणे आणि स्वत: मधील सुप्त गुण ओळखून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना मिळाली.

स्वयंसिद्धा या उपक्रमाचे नियोजन मा. मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती साधना घोडके आणि श्रीमती अश्विनी मराठे यांनी केले, वर्गशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha

वाचन प्रेरणा दिन

सोमवार दिनांक १६/१०/२०२३ रोजी हुजूरपागा कात्रज शाळेतील उच्च माध्यमिक विभागात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठी भाषा साहित्यातील कथा , कादंबरी , अभंग नाट्यछटा इ.प्रकारांचे विद्यार्थिनी व शिक्षकांच्याकडून प्रकट वाचन केले गेले. विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यसाठी हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. यावेळी वाचनाचे महत्त्व श्रीमती नगीने यांनी सांगितले.

Wachan-prerana

हुजूरपागा कात्रज उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधन सण साजरा

दिनांक 31 ऑगस्ट, गुरुवार रोजी हुजूरपागा उच्च माध्यमिक प्रशाला कात्रज येथील इयत्ता 11वी, 12वी च्या विद्यार्थिनींनी बिबवेवाडी पोलीस चौकीत पोलीस बांधवांना राखी बांधून 'राखीपौर्णिमा' हा सण साजरा केला. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या उक्तीप्रमाणे सदैव सर्वांच्या रक्षणासाठी सज्ज असणारे पोलीस बंधूच प्रथम राखीचे हक्कदार आहेत, हे जणू या कार्यक्रमातून विद्यार्थिनींनी दाखवून दिले व पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

त्याचप्रमाणे शाळेचा आवारातील वृक्षांना राखी बांधून या विद्यार्थिनींनी सामाजिक पर्यावरण रक्षणाचा जणू वसाच घेतला. यावेळी विद्यार्थिनींनी सामुहिक पर्यावरण रक्षण प्रतिज्ञा ही म्हटली.

Rakshabandhan Rakshabandhan

करियर गायडन्स

मंगळवार दिनांक २९/८/२०२३ रोजी उच्च माध्यमिक विभागात करियर गायडन्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोस्टकार्डमॅन म्हणून प्रसिद्ध असणारे मा. श्रीयुत प्रदीप लोखंडे यांनी विद्यार्थिनींबरोबर सवांद साधला. शालेय विद्यार्थिनींनी शालेय पाठ्यपुस्तकांच्या बरोबर इतर पुस्तकांचे अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. शालेय जीवनातील महत्वाचा काळ अभ्यासासाठी व अवांतर वाचन करण्यासाठी दिल्यास तो भावी आयुष्यात उपयुक्त ठरतो असे बहुमोल मार्गदर्शन सरांनी केले. वाचा, लिहा, बोला, ऐका व खेळा ही पंचसूत्री आमच्या विद्यार्थिनींना सांगितली.

श्री. प्रदीप लोखंडे सरांनी या कार्यक्रमात इयत्ता ११वी व १२वी च्या सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षक यांना “छत्रपती शिवाजी महाराज व पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळातील व्यवस्थापन तत्त्वे” हे पुस्तक भेट म्हणून दिले . या पुस्तकात सर्वाना पोस्टकार्ड देण्यात आले होते. या पोस्टकार्ड वर सर्व विद्यार्थिनीनी आपला अभिप्राय व मनोगत व्यक्त केले. सरांनी भेट स्वरुपात दिलेल्या पुस्तकाचा व मार्गदर्शनाचा आमच्या विद्यार्थिनीना नक्कीच उपयोग होणार आहे.

Career guidance Career guidance Career guidance Career guidance