शिशुमंदिर
प्रवेश २०२५ - २०२६
अर्ज वाटपाची तारीख: गुरुवार दिनांक २ जानेवारी २०२५ पासून
प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण: हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर शाळा, राजस सोसायटी, कात्रज, पुणे ४६.
अर्ज मिळण्याची वेळ: सकाळी ९.३० ते ११.३०
प्रवेशासाठी मुलीचा जन्म खालील कालावधीत झालेला असावा:
शिशुरंजन गट - १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२
छोटा गट - १ ऑक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२१
मोठा गट - १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२०
प्रवेश अर्ज घेण्यास येताना सोबत मुलीच्या जन्मदाखल्याची मूळ प्रत आणणे आवश्यक आहे.
शाळेचा दूरध्वनी क्रमांक: ९८९०६१९५४६
प्रवेशासंदर्भात माहिती घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर दिलेल्या वेळेमध्ये संपर्क साधावा.
वेळ-सकाळी ९. ०० ते संध्या. ६. ००
वैशिष्ट्यपूर्ण शालेय उपक्रम
पालकांसाठीचे उपक्रम
शिक्षक व शिक्षकेतरांसाठीचे उपक्रम
विविध शालेय उपक्रमांबाबत विद्यार्थिनी आणि पालकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. |
मुख्याध्यापिका - श्रीमती नम्रता नंदकुमार मेहेंदळे
एकूण कार्यरत शिक्षिका संख्या - १२
वर्गशिक्षिका - ९ , सहायक शिक्षिका - १
शाळेची वेळ :
शिशुरंजन आणि छोटा गट
- सकाळी ८. ३० ते ११. ३०
मोठा गट
- सकाळी ८ ते ११. ३०
विद्यार्थिनींसाठी वैशिष्ट्यपूर्ण शालेय उपक्रम
शाळेत संस्कृत व इंग्रजी हे विषय शिकवले जातात.
लहान मुलींच्या लहान-मोठया स्नायूंचा विकास होण्यासाठी शाळेत खास प्रयत्न केले जातात. यात प्रामुख्याने लहान स्नायूंचा विकास होण्यासाठी मुलींना चित्रकला, रंगकाम, मातीकामातून रचना इत्यादी कृती घेतल्या जातात. त्यामुळे याची आवड निर्माण होते व अक्षर लेखनाचा पूर्व सराव म्हणूनही या कृती उपयोगी ठरतात. या कृतींमुळे एकाग्रता वाढते. ह्स्तनेत्र समन्वय साधण्यास मदत होते.
दैनंदिन जीवन व्यवहारातूनही लहान स्नायूंचा विकास होण्यास मदत होते. या कृती मुली आनंद घेत करतात. तसेच मोठ्या स्नायूंचा विकास घडवताना विविध खेळ घेतले जातात. कला-क्रीडा सप्ताह घेतला जातो. उदा- १) बोगद्यातून जाणे २) कोलांटी उडी मारणे ३) सायकल चालवणे.
रंगाची दुनिया जाणून घेण्यास, कृतिशीलता व निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी रंगदिन साजरे होतात.
मुले प्रत्यक्ष अनुभवातून खूप शिकत असतात त्यासाठी प्रत्येक प्रकल्प विषय शिकवताना विषयानुसार स्थळ भेटींचे आयोजन केले जाते.
व्यवसायिक लोक, त्यांची कामे यांचे आपल्या आयुष्यातले महत्व जाणून घेण्यासाठी शाळेमध्ये व्यवसायिक लोकांना बोलावले जाते. तसेच व्यवहार ज्ञानाची शिकवण लहानपणापासून अंगी बाणवली जावी आणि सामाजिक जाणीव व्हावी यासाठी उपक्रम राबवले जातात.
शाळेत सर्वधर्मीय सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. त्यातून घडणाऱ्या संस्कारांतून सर्वधर्म समभावाची भावना रुजते.
मुलींचा सभाधीटपणा वाढवा, मुक्त व्यासपीठ मिळावे यासाठी फळ प्रकल्पाला अनुसरून फळाच्या वेशभूषेचे आयोजन केले. पक्षी प्रकल्पाला अनुसरून नाटुकल्याद्वारे पक्षी संवर्धन संदेश दिला. स्नेहसंमेलन व त्यासाठी सुत्रसंचलन असे उपक्रम राबवले. मुलींमधे आत्मविश्वास निर्माण व्हायला याची मदत होते.
पूरक आहार व आरोग्य:
शिक्षणासोबत मुलींच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
पूरक आहार - ऋतूमान, पोषणमूल्य, स्वच्छता चव याचा विचार करून शाळेत दर बुधवारी विद्यार्थिनींना शाळेत बनवलेला खाऊ दिला जातो.
पालकांसाठीचे उपक्रम
शाळेतल्या अध्ययन पद्धतीची माहिती पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रकल्प विषयांचे मार्गदर्शनपर शैक्षणिक प्रदर्शन भरविले जाते. या प्रात्यक्षिकांतून विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजतो. कुटुंब प्रकल्प अंतर्गत आमच्या पालकांनी वर्गात येऊन गोष्टी सांगितलेल्या.
आजी आजोबा संमेलन, शाळेचा वर्धापन दिन, वसंतोत्सव, एक उनाड दिवस (स्वयं अध्ययन) इत्यादी उपक्रमही शाळेमध्ये घेतले जातात. ज्यामध्ये पालक, विद्यार्थिनी व शिक्षक सर्वांच्या विकासाचा, आनंदाचा विचार केलेला असतो.
शिक्षक व शिक्षकेतरांसाठीचे उपक्रम
एक प्रशिक्षित शिक्षक हा शाळेची शान आसतो. त्यासाठी शिक्षकांच्या उतरोत्तर प्रगतीसाठी सतत ज्ञान ग्रहणाचे कामं चालू असते. त्यामुळे शिक्षकांचा बौद्धिक दर्ज्यासोबत शाळेचा दर्जा वाढतो.
शिक्षक प्रबोधन शिबिर.
श्री. बाळकृष्ण मुजुमले सरांनी घेतलेले सुलेखन शिबिर.
श्रीम. जवळेकर यांनी घेतलेले सुलभ वाचन पद्धती.
श्रीम. गंभीर यांनी शिकवलेले विज्ञानातील सोपे प्रयोग.
श्रीम. अनुजा साठे यांनी शिकवलेले संस्कृत विषयाचे मार्गदर्शन.
श्री. पंकज मिठभाकारे यांनी शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यावर घेतलेले शिबीर.
याशिवाय सामुहिक पुस्तक वाचन घेतले जाते. मुलांना शिकवताना जी अध्ययन पद्धती वापरली जाते त्याच्याशी निगडीत पुस्तके वाचली जातात. उदा. १) प्रिय बाई २) बिनभिंतीची उघडी शाळा ३) फुलोरा.
कल्पकता दिन - शिक्षकांनी बनवलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवले जाते.
शाळा भेट हा त्यातील एक अध्ययनाचा भाग. दरवर्षी दोन शाळांना भेट देऊन तेथील वेगळ्या अध्ययन पद्धतीचे निरीक्षण केले जाते.
आतापर्यंत भेट दिल्या गेलेल्या शाळा -
१ निमकर बाल भवन (फलटण)
२ रानडे बालक मंदिर (पुणे)
३ शि. प्र. मंडळींची शिशुमंदिर. (पुणे)
४ अक्षरनंदन (पुणे)
५ ग्राममंगल (पुणे)
६ अब नॉर्मल स्कूल.
७ फुलोरा (कोल्हापूर)
पालकशाळा - पालक व शिक्षकांच्या सहाय्याने मुलींचा विकास होत असतो. त्यामुळे पालकांना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पालकशाळेमधून केले जाते. खेळ व कृतींद्वारे हे मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी तज्ञ व्यक्तींना बोलावण्यात येते.
१) मा. श्रीम. शोभाताई भागवत. – संचालिका गरवारे बालभवन. पुणे
२) मा श्रीम. उमा बापट – एम. ए. मानसशास्त्रज्ञ
३) श्री. पंकज मिठभाकारे – एम. ए. मानसशात्रज्ञ
४) श्रीम. अनुपमा देसाई – B.sc. child development. & clinical psychology
५) डॉ. आगरखेडकर
६) डॉ. जोग - M.D. बालरोगतज्ञ
७) डॉ. प्रफुल्लता सुरु
८) डॉ. दुष्यंत कोठारी – M. M एम. डीबालरोगतज्ञ
मावशी दिवस व मावशी प्रशिक्षण
आपल्या सेविकांबाबतची कृतज्ञता आपल्या विद्यार्थिनींनी मावशी दिनातून व्यक्त केली. मा. शोभाताई भागवत यांनी खेळ व कृतीद्वारा मावशींचे प्रशिक्षण घेतले.
शालेय उपक्रमांची प्रातिनिधिक क्षणचित्रे
चिकटकाम
जोडकाम
पाणी प्रकल्प व झाडे प्रकल्पाला अनुसरून स्थळभेट, सहल श्री. ल. म. कडू (ग. म. भ. न. प्रकाशन) यांच्या फार्मवर
शैक्षणिक प्रदर्शन
करमणुकीतून शिक्षण गोष्टी, माहिती व गाणी
सी डी बघताना मुली
डॉ. दुष्यंत कोठारी – MM MD बालरोगतज्ञ.
मावशींचे प्रशिक्षण. मार्गदर्शक - शोभा भागवत.
आई बाबा व मी सॉलिड टीम
विशेष उपक्रम व क्षणचित्रे
कोजागरी पौर्णिमा आणि पांढरा रंग दिन
गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली.चंद्राच्या विविध कलांची नावे विद्यार्थिनींनी सांगितली . चांदोमामा ह्या गाण्यावर विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले.सर्व विद्यार्थिनी पांढरा पोशाख परिधान करून आल्या होत्या.मोठ्या गटाचा पांढरा रंग दिन सुद्धा त्याच दिवशी साजरा करण्यात आला.पांढऱ्या रंगाच्या विविध वस्तूंची मांडणी करण्यात आली होती.घरी जाताना कागदाची हसरी चांदणी चा मुकुट तयार करून देण्यात आला .कोजागरी निमित्त मसाले दुध देण्यात आले.
गुड टच बॅड टच प्रशिक्षण
सोमवार ७ ऑक्टोबर २०२४ रोजी शिशुमंदिर मधील सर्व विद्यार्थीनीना बालविकास आणि महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या ग्रविटस फौंडेशन तर्फे गुड टच बॅड टच प्रशिक्षण देण्यात आले. शिशुमंदिर मधील विद्यार्थिनी ह्या अतिशय लहान असतात.बाह्यजगामध्ये शाळेच्या निमित्ताने प्रथम पाऊल टाकतात. बाहेरील जगामध्ये विद्यार्थिनी सुरक्षित रहाव्या तसेच त्यांनी स्वतःचे स्वतः संरक्षण करावे ह्या उदिष्टाने शिशुमंदिर विभागात प्रशिक्षण देण्यात आले. शिशुमंदिर मधील विद्यार्थिनींच्या वयास समजतील अश्या पद्धतीने चित्राद्वारे आणि फिल्मद्वारे छान माहिती सांगण्यात आली.
दसरा
शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी दसरा हा सण साजरा करण्यात आला.विद्यार्थिनी आवडीच्या पोषाखामध्ये आल्या होत्या.विद्यार्थीनींनीनृत्याद्वारे देवीचा जागर सादर केला.तसेच खंडेनवमी निमित्त शस्त्रांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनीच्या विविध साधनखेळांचे आणि सरस्वतीचे पूजन मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे ह्यांचा हस्ते करण्यात आले.विद्यार्थीनींनी पाटीचे पूजन करून प्रार्थना केली.तसेच नवरात्रउत्सवामध्ये गहू पेरून घेण्यात आले होते.ते गव्हांकुर विद्यार्थीनींना खाण्यास दिले.त्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व पटवून सांगितले.
दिवाळी
बुधवार दिनांक २३ऑक्टोबर २०२४ रोजी शिशुमंदिर विभागात दिवाळी साजरी करण्यात आली.विद्यार्थीनींनी मातीचा किल्ला तयार केला.शाळेच्या परिसरामध्ये सजावट करण्यात आली होती.रांगोळी पणत्या,आकाशकंदील लावण्यात आला .त्यामुळे शाळेचा सर्व परिसर उजळून निघाला.दिवाळीच्या प्रत्येक दिवशी काय करतात हे वस्तूंच्या मांडणीद्वारे दाखवण्यात आले. सर्व विद्यार्थीनी आवडीच्या पोशाखात आल्या होत्या. दिवाळीच्या निमिताने जिव्हाळा फाउंडेशन ह्या अनाथ मुलांच्या शाळेला भाजी मंडई प्रकल्पाच्या निधीतून धान्य भेट देण्यात आले.दिवाळीच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले.मोठ्या गटाच्या विद्यार्थीनींनी दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व सांगितले,फटाक्याविना दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला.घरी जाताना प्रत्येक विद्यार्थिनीलात्यांनीच रंगवलेली पणती आणि भेटकार्ड भेट म्हणून देण्यात आले.खाऊ म्हणून लाडू चिवडा पाकीट देण्यात आले, अशाप्रकारे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली.
पालक स्पर्धा
शनिवार २८ सप्टेंबर २०२४ रोजी पालक आणि विद्यार्थिनींसाठी (जोडी तुझी माझी ) वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे परीक्षण मा. श्रीमती ज्योत्स्ना पवार (शिक्षिका -प्राथमिक विभाग ) आणि श्रीमती हेमलता गोरे ( शिक्षिका – प्राथमिक विभाग ) यांनी केले. पालकांनी आपल्या पाल्यासोबत जिजाऊ आणि बाल शिवाजी,राणी लक्ष्मी बाई ,यशोदा कृष्ण तसेच पर्यावरणावर आधारित विविध विषयांवर सादरीकरण केले.स्पर्धेमध्ये खालील पालक यशस्वी ठरले.
प्रथम क्रमांक - कु. प्रिशा आकाश जाधव , सौ.प्रियांका आकाश जाधव
द्वितीय क्रमांक - कु श्राव्या सुनील पांचाळ, सौ हर्षदा सुनील पांचाळ
तृतीय क्रमांक - कु किमया गौतम चोगुले , सौ मनाली गौतम चौगुले
उत्तेजनार्थ - कु जिजा प्रतिक जोशी, कु.संयमी प्रगती जोशी
भाजी मंडई
गुरुवार १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्व गटाच्या आहार प्रकल्पांतर्गत भाजी मंडई भरवण्यात आली आर्थिक व्यवहाराचे ज्ञान होणे आणि भाज्याची माहिती होण्याच्या उद्देशाने भाजी मंडई भरवण्यात आली होती.छोट्या गटाच्या विद्यार्थिनी भाजीवालीच्या पोषाखामध्ये आल्या होत्या.’भाजी घ्या भाजी’ अशा आरोळ्या देत विद्यार्थिनी विविध भाज्यांची विक्री केली. मोठ्या आणि शिशुरंजन गटामधील विद्यार्थिनी पालकांसोबत भाजी खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. भाजी विकून मिळालेल्या निधीमधून गरजू संस्थेला वस्तू भेट देण्यात आली.
भोंडला
बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी शिशुमंदिरमध्ये सर्व गटांचा भोंडला साजरा करण्यात आला.फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणण्यात आली.मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे ह्यांच्या हस्ते हत्तीची पूजा करण्यात आली. तसेच खिरापत म्हणून विद्यार्थिनींना डोसा ,बटाटयाची भाजी,चटणी,जिलेबी खिरापत म्हणून देण्यात आला.
लाल आणि निळा रंग दिन
शिशुरंजन गटामध्ये बुधवार दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी लाल रंग दिन आणि गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी निळा रंग दिन साजरा करण्यात आला. वर्गामध्ये लाल आणि निळ्या रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली. रंग दिना दिवशी त्या रंगाचा पोशाख विद्यार्थिनी परिधान करून आल्या होत्या लाल रंग दिनानिमित्त लाल रंगाचा कागदी हेअर बॅंड तसेच खाऊ म्हणून डाळींबाचे दाणे आणि सफरचंद खाऊ म्हणून देण्यात आला तर निळ्या रंग दिना दिवशी निळ्या रंगाचा कागदी पंखा आणि खाऊ म्हणून निळ्या रंगाचे सिटरस सरबत देणात आले.
हिरवा रंग दिन
मंगळवार ८ ऑक्टोबर २०२४ रोजी छोट्या गटाचा हिरवा रंग दिन साजरा करण्यात आला.विद्यार्थिनींनी हिरव्या रंगाच्या वस्तु आणल्या होत्या त्याची मांडणी वर्गांमध्ये करण्यात आली. कागदी पोपटाचे स्टिक पपेट तयार करून देण्यात आले. खाऊ म्हणून हिरवे वाटाणे घातलेला मसाले भात खाऊ म्हणून देण्यात आला.
वर्षाविहार
सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या गटाची सहल पानशेत येथे विद्याविहार रिसोर्ट येथे नेण्यात आली होती.पाणी आणि झाडे विषय प्रकल्पांर्गत मोठ्या गटाच्या ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.पानशेत, खडकवासला ,वरसगाव धरणे दाखवण्यात आली.तसेच विद्याविहारचे प्रमुख आणि जेष्ठ बालसाहित्यिक माननीय श्री.ल.म.कडू ह्यांनी विविध औषधी वनस्पतींबद्दल माहिती दिली.प्रत्यक्ष पावसाळ्यातील कीटक जसे खेकडा ,गांडूळ,गपपई मासे दाखवून ह्याची माहिती सांगितली.प्रत्यक्ष बैलासोबत शेत नांगरण्याचा अनुभव विद्यार्थीनिनी घेतला..दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेऊन वर्षाविहार करत पानशेत सहल पार पडली.
गणेशोत्सव
रोजी छोट्या विद्यार्थीनींचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला विद्यार्थीनींना मातीचे गणपती तयार करण्यास देण्यात आले होते. गणपतीची पालखीमधून वाद्ये आणि ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गणपती स्तोत्र, श्लोक,भजन तसेच आरती म्हणण्यात आली. मोठ्या गटाच्या विद्यार्थीनींनी गणपती स्तोत्र म्हणून दाखवले आणि गणपतीची गोष्ट सांगितली . तसेच विद्यार्थीनींना शाळेजवळील गणेश मंदिरात नेण्यात आले होते. गणपतीसाठी सजावट विद्यार्थीनींनी केली आणि रोज आरती सुद्धा करण्यात येत होती. तसेच प्रसाद म्हणून तळणीचा मोदक देण्यात आला.
बैलपोळा
सोमवार दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी शाळेमध्ये बैल पोळा साजरा करण्यात आला.बैल पोळा ह्याबद्दल माहिती विद्यार्थींनीना सांगण्यात आली.तसेच शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींनी शेतकरी नृत्य सादर केले.ह्यावेळी मातीच्या बैलांची पूजा करण्यात आली.
शैक्षणिक प्रदर्शन
गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शिशुमंदिर अभ्यासक्रमामध्ये विविध प्रकल्प विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साधनांची पालकांना माहिती व्हावी ह्यासाठी शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन म. ग. ए. संस्थेच्या सभासद मा. श्रीमती अरुण तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. ह्यावेळी लक्ष्मी रोड शिशुमंदिर मुख्याध्यापिका मा श्रीमती अनघा रानडे ,इंग्लिश मिडियम लक्ष्मी रोड मुख्याध्यापिका श्रीमती सविता अंकाइकर, माजी मुख्याध्यापिका मा. श्रीमती उमा गोसावी उपस्थित होत्या इतर विभागातील शिक्षिकांनी सुद्धा प्रदर्शनाला भेट दिली.पालकांनी प्रदर्शन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.
राखी पौर्णिमा
शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली.विद्यार्थिनींमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने राखी बांधण्यासाठी पी. सी. एम. टी. च्या वाहक कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. पी. सी. एम. टी. च्या वाहक कर्मचारी यांना विद्यार्थिनींच्या हस्ते सन्मानपत्र आणि फूल देण्यात आले.विद्यार्थीनीना राखीपौर्णिमेची माहिती सांगण्यात आली.तसेच विद्यार्थिनिंनी कोळी नृत्य सादर केले.विद्यार्थिनींना खाऊ म्हणून नारळाची बर्फी देण्यात आली.
गोकुळ अष्टमी
सोमवार दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी शिशुमंदिर विभागात गोकुळ अष्टमी आणि दहीहंडी साजरी करण्यात आली. कृष्णाची गाणी म्हणण्यात आली. तसेच मोठ्या गटामधील विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थिनी राधाकृष्णाचे पोशाख करून आल्या होत्या. दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी न फोडता त्यामध्ये विविध झाडांच्या बिया जमा केल्या विद्यार्थिनींकडून बियांचे सिडबॉल तयार करून घेण्यात आले आणि घराच्या परिसरामध्ये टाकण्यासाठी देण्यात आले. प्रसाद म्हणून दहीपोहे देण्यात आले. अशाप्रकारे अतिशय उत्साहामध्ये गोकुळ अष्टमी सण साजरा झाला.
नागपंचमी
गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी शिशुमंदिर मध्ये नागपंचमी साजरी करण्यात आली. नागपंचमी निमिताने सर्पमित्र मा. श्री श्रीराम शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी विविध प्रकारचे साप आणि नागाची माहिती सांगितली. त्यांनी विद्यार्थिनींना मातीचे नाग सुद्धा करण्यास शिकविले मातीचे वारूळ आणि नाग विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर कल्पनेने तयार केले.नृत्य,गाणी,माहिती झिम्मा फुगडी खेळून उत्साहामध्ये नागपंचमी सण साजरा करण्यात आला.तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींनी छोट्या मैत्रिणींच्या हातावर मेंदी काढली.विद्यार्थिनीना खाऊ म्हणून पुरण देण्यात आले.
केसरी वाडा आणि पुणे ग्रंथालय भेट
सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी शिशुमंदिर विभागातील मोठ्या गटाच्या विद्यार्थिनींनी केसरी वाडा आणि पुणे ग्रंथालय येथे पालकांसमवेत भेट दिली. टिळक पुण्यतिथि निमित्त सहलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींना लोकमान्य टिळकां बद्दल माहिती संगण्यात आली. तसेच तेथे असणाऱ्या साहित्याचे प्रदर्शन दाखवण्यात आले. केसरी वर्तमानपत्र छपाई कारखाना दाखवण्यात आला. विद्यार्थिनींना पुस्तके वाचनाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने पुणे ग्रंथालय येथे भेट देण्यात आली. त्या ठिकाणी पुस्तकाचे महत्व सांगणारी फिल्म दाखवून विविध बालसाहित्य हाताळण्याचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला.
दिव्या दिव्या दिपत्कार
प्रकाश देणाऱ्या दिव्याचे पूजन शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट २०२४ रोजी शिशुमंदिर विभागात करण्यात आले.शाळेमध्ये असणाऱ्या विविध दिव्यांची पूजा मुख्याध्यापिका मा. श्रीमती नम्रता मेहेंदळे यांच्या हस्ते करण्यात आली. छोट्या गटातील विद्यार्थिनींनी दिव्यांचे महत्व नाटीकेमधून सांगितले.लामणदिवा,समई पणती,दगडी दिवा,दीपमाळ,कंदील,मशाल अशा विविध दिव्यांची मांडणी करण्यात आली.दिव्यांची माहिती देण्यात आली.विद्यार्थिनींनी वर्गात कणकेचे अतिशय आकर्षक असे दिवे तयार केले.दिवे खाऊ म्हणून देण्यात आले. अशा पद्धतीने पारंपारिक पद्धतीने दिव्यांची अमावस्या साजरी करण्यात आली.
टिळक पुण्यतिथि आणि शाळेचा वर्धापन दिन
गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती ज्योती राजमणी यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थिनींना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याची माहिती सांगण्यात आली. तसेच ‘ या चला लोकमान्या,वंदू या टिळका ‘ हा श्लोक म्हणण्यात आला. १ ऑगस्ट २०२४ ह्या दिवशी कात्रज शिशुमंदिर शाळेचा वर्धापन दिन सुद्धा साजरा करण्यात आला. शाळेची विविध चित्रा द्वारे सजावट करण्यात आली. विद्यार्थिनींना पूर्ण शाळेची सफर घडवून आणली. शाळेमध्ये मोठ्या ताईंच्या वर्गात बाकावर बसण्याचा आनंद घेत ग्रंथालय,प्रयोग शाळा,संगणक खोली या ठिकाणी भेटी दिल्या. अशा पद्धतीने उत्साहाने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
डॉक्टरांचे पालकांना मार्गदर्शन
मंगळवार दिनांक २३ जुलै आणि बुधवार दिनांक २४ जुलै २०२४ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विद्यार्थिनींचा शारीरिक विकास आणि वाढ योग्य रीतीने होणे गरजेचे असते त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर योग्य उपाय व्हावे ह्या दृष्टीने विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यासाठी बालरोगतज्ञ मा,डॉ. राहुल कुलकर्णी आणि दंत चिकित्सक मा. डॉ. अंजली जठार यांना निमंत्रित करण्यात आले होते, शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थिनींचा आहार आणि आजार ह्यांबद्दल डॉ कुलकर्णी यांनी पालकांना मार्गदर्शन सुद्धा केले. ह्यावेळी गरवारे बालभवनच्या मार्गदर्शिका मा. विदुला म्हैसकर यांना निमंत्रित करण्यात आले होते त्यांनी सुद्धा पालकत्व कसे असावे? ह्यांबद्दल मार्गदर्शन केले.
गुरुपौर्णिमा
सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी शिशुमंदिर शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेसाठी कात्रज प्राथमिक शाळेतील शिक्षिका प्रमुख पाहुण्या श्रीमती प्रिया गोगावले तसेच पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती अनुराधा जावळे उपस्थित होत्या. महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षिका व सेविकांचा सत्कार मा. मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे यांच्या हस्ते करण्यात आला. मोठ्या गटाच्या विद्यार्थीनींनी गुरू शिष्याच्या गोष्टी सांगितल्या. प्रिया ताईंनी मुलींना गोष्टीतून मार्गदर्शन केले. शिक्षिका श्रीमती शुभांगी गुरव यांनी सूत्रसंचालन केले. गुरुपौर्णिमेदिवशी संस्थेतर्फे दिला जाणारा कार्यतत्पर सेविका हा पुरस्कार शिशुमंदिर कात्रज सेविका श्रीमती प्रमिला मोरे यांना मिळाला .
पालकसभा
शाळेमध्ये राबवण्यात येणारे विविध प्रकल्प तसेच शिकवण्यात येणारे विषय ह्याबद्दल पालकांना माहिती व्हावी ह्या उद्देशाने शनिवार दिनांक २९ जून २०२४ रोजी शिशुरंजन ,छोट्या गटाची आणि शनिवार दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी मोठ्या गटाची पालक सभा आयोजित केली. पालकांना प्रात्यक्षिकाद्वारे अध्यापनाच्या विविध पद्धतींची माहिती देण्यात आली.अक्षरवळण,अंकओळख,गाणी,गोष्ट,जीवनव्यवहार,इंद्रिय विज्ञान,गणिती संकल्पना अशा विषयांची साधनाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले .
आरोग्य तपासणी
शिशुमंदिर विभागामध्ये गुरुवार दिनांक १८ जुलै २०२४ ते सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यासाठी बालरोगतज्ज्ञ मा. डॉ. श्री. राहुल कुलकर्णी आणि दंत चिकित्सक डॉ. अंजली जठार उपस्थित होते. विद्यार्थिनीना असणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी शोधून त्याबद्दल शिक्षकांना काही मार्गदर्शक सूचना पालकांना देण्यासाठी सांगण्यात आल्या. त्याप्रमाणे पालकांना विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या तक्रारी सांगून त्यावर फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगण्यात आले.
स्वच्छता दिंडी
चला जाऊ पंढरी
स्वच्छ सुंदर आपली नगरी
मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी शिशुमंदिर मध्ये पालखी सोहळयानिमित्त "स्वच्छता दिंडी" काढण्यात आली. मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले . विद्यार्थीनींना पालखी विषयी माहिती सांगण्यात आली. विद्यार्थींनी वारकऱ्यांचा पोशाख करून उपस्थित होत्या. पारंपारिक वारकरी पोशाखामध्ये विद्यार्थीनींनी स्वच्छते विषयी घोषणा दिल्या . विठ्ठल नामाच्या गजरात भक्तीपूर्ण वातावरणात पालखी सोहळा संपन्न झाला.
स्वागत समारंभ
बुधवार दिनांक ३ जुलै २०२४ रोजी स्वागत समारंभ करण्यात आला. शिशुरंजन आणि छोट्या गटातील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे स्वागत मोठ्या गटातील विद्यार्थीनिनी केले. मोठया गटांमधील शिक्षिकांनी पपेट शो द्वारे गोष्ट सादर केली. ऋतुची माहिती देणारा तक्ता तयार करून शिशुरंजन आणि छोट्या गटातील विद्यार्थीनीना भेट म्हणून देण्यात आला . मोठ्या गटातील विद्यार्थिनीनी नृत्य सादर केले. तसेच शिरा खाऊ म्हणून देण्यात आला.
शिशुमंदिर शाळेत विद्यार्थीनींचे उत्साहात स्वागत
शिशुमंदिर मधील शिशुरंजन गटाची शाळा मंगळवार दि. १८ जून २०२४, छोट्या गटाची शाळा शुक्रवार दि. २१ जून २०२४ आणि मोठया गटाची शाळा सोमवार दि. २४ जून २०२४ रोजी सुरू झाली. शाळेत आकर्षक पद्धतीने चित्रे व फुगे लावून सजावट करण्यात आली. मा. मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे यांनी फुलांच्या पाकळ्यांनी तसेच औक्षण करून विद्यार्थीनींचे स्वागत केले. शाळेचे नियम व शिस्त याबद्दल माहिती सांगितली. शिशुरंजन आणि छोट्या गटांमध्ये पालकांच्या सहकार्याने विद्यार्थिनींनी वॉटरकलरच्या सहाय्याने हाताच्या ठसेकामातून उपस्थिती दर्शवली. मोठ्या गटांमध्ये पालक व विद्यार्थीनींकडून औषधी वनस्पतीचे रोप लावून घेतले, कागदाची फुले चिकटवून मुलींनी उपस्थिती नोंदवली. गोष्टीचे पुस्तक ही भेटवस्तू व शेंगदाण्याची चिक्की खाऊ देण्यात आला. ‘माझ्या शाळेचा पहिला दिवस’ या सेल्फीपॉईट जवळ विद्यार्थीनींचे पालकांनी फोटो काढले. अशाप्रकारे शाळेचा पहिला दिवस आनंदात व जल्लोषात पार पडला.
पदवी प्रदान समारंभ
बुधवार दिनांक १०एप्रिल २०२४रोजी हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर शाळेमध्ये पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या गटामधून इयत्ता पहिली मध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थिनींची शाळेच्या परिसरात रॅली काढण्यात आली होती. समारंभासाठी म. ग. ए. संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती शालिनी पाटील,सचिव मा. श्रीमती रेखा पळशीकर,सभासद मा. श्री. सोनवणी,सभासद मा. श्रीमती अरुणा तिवारी,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती केतकी पेंढारकर उपस्थित होत्या. संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती शालिनी पाटील आणि सभासद श्रीमती अरुणा तिवारी यांनी विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी विद्यार्थिनी आणि पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींना खाऊ सुद्धा देण्यात आला. पालक शिक्षक संघाच्या सभासदांनी यावेळी शाळेला भेटवस्तू म्हणून चटई दिली. मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. शिक्षिका श्रीमती पूजा आगलावे आणि श्रीमती अरुंधती जगदाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
गुढी पाडवा
शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी शिशुमंदिर विभागात गुढी पाडवा हा सण साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आवडीचा पोशाख करून आल्या होत्या. मुख्याध्यापिका नम्रता मेहेंदळे ह्यांनी गुढीचे पूजन केले. खाऊ म्हणून विद्यार्थिनींना साखरेच्या गाठी देण्यात आल्या होत्या.
शिक्षक उद्बोधन शिबिर
विद्या विकास व्यासपीठ अंतर्गत शिशुमंदिर शिक्षकांसाठी उद्बोधन शिबिर आयोजित करण्यात आले होते. ‘विद्यार्थिनींना शिकवताना शिक्षकांची मानसिकता’ ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन करण्यासाठी मा. श्रीमती उमा बापट (मनोसोपचारतज्ञ, लेखिका) यांना निमंत्रित करण्यात आले होते. ह्यावेळी म. ग. ए. संस्थेच्या सचिव मा. श्रीमती रेखा पळशीकर , शिशुमंदिर विभागाच्या सर्व शाखेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती अनघा रानडे (लक्ष्मी रोड), मा. श्रीमती नम्रता मेहेंदळे (कात्रज), मा. श्रीमती सविता अंकाईकर (लक्ष्मी रोड इंग्लिश मिडियम), मा. श्रीमती दीप्ती कुलकर्णी (कात्रज इंग्लिश मिडियम) उपस्थित होत्या .
तळजाई पठार सहल
गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पक्षी प्रकल्पांतर्गत छोट्या गटाची सहल तळजाई पठार येथे नेण्यात आली. तेथे विविध झाडे आणि पक्षी विद्यार्थिनींना बघण्यास मिळाले. बदक,मोर,बुलबुल,कावळा,लांडोर असे पक्षी बघितले. तसेच पुस्तकातील पक्षी बघून प्रत्यक्ष पक्षी बघण्याचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला. दुर्बिणीद्वारे दूरवर असणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण विद्यार्थिनींनी केले. शेंगदाण्याचा लाडुचा आस्वाद विद्यार्थिनींनी घेतला.
जांभळा रंग दिन
बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी छोट्या गटाचा जांभळा रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. जांभळ्या रंगांच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थिनींना भेट म्हणून जांभळ्या रंगाचे फुलपाखरू तयार करून देण्यात आले.
विज्ञान दिन
बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी शिशुमंदिर विभागात विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले,विद्यार्थिनीनी सूक्ष्मदर्शक ,लोहचुंबक,तरंगणे बुडणे, ज्वलनास हवेची गरज असते अशा विविध प्रयोगाची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली. तसेच विविध शास्त्रज्ञाची आणि त्यांनी लावलेल्या प्रयोगाची माहिती सांगितली.
मराठी भाषा दिन
मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थिनिना भाषा दिनाची माहिती सांगण्यात आली. विविध अक्षराचे आणि शब्दांचे खेळ खेळून घेण्यात आले. अशा पद्धतीने उत्साही वातावरणामध्ये भाषा दिन साजरा करण्यात आला.
बालसाहित्य संमेलन
गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी हुजूरपागा कात्रज शाळेच्या शिशुमंदिर विभागामध्ये चिमुकल्यांचे बाल साहित्य संमेलन पार पडले. लहानपणापासूनच विद्यार्थिनींना वाचनाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी म. ग. ए. संस्थेच्या कोषाध्यक्ष आणि शिशुमंदिर कात्रज शालेय समिती अध्यक्ष मा. डॉ. सुषमा केसकर ,प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मा. श्रीमती ज्योती राजमणी,शिशुमंदिर लक्ष्मी रोड मुख्याध्यापिका श्रीमती अनघा रानडे,इंग्लिश मिडियम मुख्याध्यापिका मा. श्रीमती दीप्ती कुलकर्णी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बालसाहित्यकार मा डॉ. संगीता बर्वे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थिनींना वाचनाचे महत्व सांगितले. ह्यावेळी विद्यार्थिनींची ग्रंथदिंडी काढण्यात आली. विद्यार्थिनींनी डॉ. संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या अभिनयगीताचे सादरीकरण केले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनींनी विविध बालसाहित्यकारांनी लिहिलेली गाणी सादर केली. या दिवशी चिकू पिकू प्रकाशन तर्फे लहान मुलांची पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.
दुकान जत्रा
शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये दुकान जत्रा भरवण्यात आली. मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी विविध खेळणी,स्वच्छतेच्या वस्तू,स्टेशनरीच्या वस्तू,स्वतःचे आवरण्याच्या वस्तू,खाऊ यांची दुकाने थाटली. छोट्याआणि शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींनी पालकांच्या समवेत विविध वस्तू खरेदी केल्या. तसेच शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती ज्योती राजमणी आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी दुकान जत्रेला भेट देऊन वस्तू खरेदी केल्या. दुकान जत्रेच्या माध्यमातून जमा झालेल्या रकमेतून गरजू संस्थेला वस्तू रूपामध्ये भेट देण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना खरेदी विक्री व्यवहाराचे ज्ञान मिळण्याच्या उद्देशाने दुकान जत्रा प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते.
कला क्रीडा सप्ताह
मंगळवार दिनांक २३ जानेवारी ते शुक्रवार दिनांक २७ जानेवारी २०२४ पर्यंत शिशुमंदिर विभागामध्ये कला क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. २३ जानेवारी २०२४ रोजी शाळेची माजी विद्यार्थिनी आणि क्रिकेटपटू कुमारी प्रियांका जयवंत कुंभार हिच्या हस्ते कलाक्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. मशाल पेटवून शाळेच्या परिसरामध्ये फिरवून आणण्यात आली. विविध खेळांची माहिती विद्यार्थिनीना सांगण्यात आली. कुमारी प्रियांका कुंभार हिने क्रिकेटचे साहित्य दाखवून क्रिकेट खेळाची माहिती संगितली, तसेच गोष्टीमधून खेळाच्या स्पर्धेचे महत्व समजावून सांगितले. पळणे,लंगडी,अडथळा शर्यत ह्यासारख्या क्रीडा स्पर्धा त्र चित्र रंगवणे,चिकटकाम,कोलाज काम ह्यासारख्या कलाकृती घेण्यात आल्या.
शेकोटीची धमाल
शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी शिशुमंदिरच्या छोट्या विद्यार्थिनींसाठी हिवाळ्यानिमित्त शेकोटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेकोटीसाठी सर्व विद्यार्थिनींना शाळेमध्ये संध्याकाळी बोलावण्यात आले होते. विद्यार्थिनींना हिवाळा ह्या ऋतूची माहिती सांगण्यात आली. हिवाळ्यात वापरण्यात येणारे कपडे ,हिवाळ्यात येणाऱ्या भाज्या,फळे,धान्ये यांची माहिती प्रत्यक्ष वस्तू दाखवून सांगण्यात आली. शेकोटीच्या निमित्ताने करमणूक म्हणून ‘जादूचे प्रयोग ‘दाखवण्यात आले. जादुगार संजय रघुवीर यांना ‘जादूचे प्रयोग’ दाखवण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे यांच्या हस्ते शेकोटी पेटवण्यात आली. विद्यार्थिनींनी शेकोटी भोवती गाणी म्हणून नृत्य सुद्धा केले. शेकोटी झाल्यानंतर विद्यार्थिनींनी गरम डाळखिचडी आणि उडीद पापडाचा आस्वाद घेतला.
शिवरकर उद्यान सहल
गुरुवार दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या गटाची सहल एम्प्रेस गार्डन येथे नेण्यात आली होती. झोका ,जंगलजीम ,घसरगुंडी ह्या खेळांचा मनमुराद आनंद विद्यार्थिनीनी लुटला. विविध प्रकारच्या झाडे आणि फुलांची माहिती देण्यात आली. विद्यार्थीनींना इडली चटणी आणि गुलाबजाम खाऊ देण्यात आला.
एम्प्रेस गार्डन सहल
बुधवार दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी शिशुरंजन आणि छोट्या गटाची सहल एम्प्रेस गार्डन येथे नेण्यात आली होती. झोका ,जंगलजीम ,घसरगुंडी ह्या खेळांचा मनमुराद आनंद विद्यार्थिनीनी लुटला. विविध प्रकारच्या झाडांची माहिती देण्यात आली. विद्यार्थीनींना इडली चटणी आणि गुलाबजाम खाऊ देण्यात आला.
संक्रांत आणि बोरन्हाणं
मंगळवार दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी संक्रांत सणानिमित्त शिशुमंदिर शाळेच्या शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींचे बोरन्हाणं करण्यात आले. विद्यार्थिनी काळ्या रंगाचा पोषाख आणि हलव्याचे दागिने परिधान करून आल्या होत्या. मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे आणि सर्व शिक्षिकांनी सर्व विद्यार्थिनींचे औक्षण केले. त्यानंतर बोरन्हाणं करण्यात आले. संक्रांत सणाची माहिती सांगण्यात आली. मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी 'तिळगुळ घ्या गोड बोला' गाण्यावर नृत्य सादर केले. खाऊ म्हणून गुळाची पोळी देण्यात आली.
काळा रंग दिन
शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी शिशुमंदिर मध्ये मोठ्या गटाचा काळा रंग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. विविध काळ्या रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थिनिना भेट म्हणून काळ्या रंगाचा कागदी पक्षी तयार करून देण्यात आला.
आजी आजोबा संमेलन.
आज शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी शिशुमंदिर मध्ये ‘आजीआजोबा संमेलन’ आयोजित केले होते. आजीआजोबांशी विद्यार्थिनींचे नाते दृढ होण्याच्या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्येने आजीआजोबा संमेलनाला उपस्थित होते. त्यांचे स्वागत अत्तर लावून व चाफ्याच फुल देऊन करण्यात आले. संमेलनासाठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती राजमणी, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती भूमकर उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती ज्योती राजमणी यांनी आजीआजोबांशी संवाद साधला. विविध खेळाद्वारे आजीआजोबांचे मनोरंजन करण्यात आले. अल्पोपहार घेऊन एक सेल्फी फोटो काढून संमेलनाची सांगता झाली. संमेलनानिमित्त विशेष उपक्रम घेण्यात आला होता. आजीआजोबांनी नातीसाठी पत्र लिहून दिले होते. पत्रामध्ये ख्यालीखुशाली बरोबरच एक छान संदेश सुध्दा द्यायला सांगितले होते. भरपूर प्रमाणामध्ये पत्रे लिहून आजीआजोबांनी नातीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा प्रकारे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आजीआजोबा संमेलन पार पडले.
गुलाबी रंग दिन
बुधवार दिनांक ६ / १२ / २०२३ रोजी मोठ्या गटाचा गुलाबी रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी गुलाबी रंगाचा पोषख परिधान करून आल्या होत्या तसेच खाऊ म्हणून गाजराची कोशिंबीर देण्यात आली. गुलाबी रंगाचे फूल तयार करून देण्यात आले.
बाग प्रकल्प (शिशुरंजन गट)
सोमवार दिनांक ४ / १२ / २०२३ रोजी बाग प्रकल्पांतर्गत शिशुरंजन गटाची सहल पु. ल. देशपांडे उद्यान सिंहगड रोड येथे नेण्यात आली होती. विविध खेळ जसे घसरगुंडी ,झोका,जंगलजीम ह्यांचा आनंद विद्यार्थींनीनी घेतला. तसेच भटकंतीचाही अनुभव विद्यार्थिनींनी घेतला. क्रीमरोल खाऊसुद्धा देण्यात आला.
पिवळा रंग दिन
बुधवार दिनांक २९ / ११ / २०२३ रोजी शिशुरंजन गटाचा पिवळा रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी पिवळ्या रंगाचा पेहराव करून आल्या होत्या पिवळ्या रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. ‘मका भेळ’ खाऊ म्हणून देण्यात आली,पिवळ्या रंगाचा स्माइली टॅटू हातावर काढण्यात आला. मक्याचे कणीस चिकटकामामधून तयार करणे. हि कृती करून घेण्यात आली.
नाताळ
शुक्रवार दिनांक २२ /१२ / २०२३ रोजी शिशुमंदिर विभागात नाताळ सण साजरा करण्यात आला. ख्रिसमस ट्री सजवण्यात आला. नाताळ सणाची माहिती सांगण्यात आली. शिक्षकांनी पपेट शो द्वारे गोष्ट सांगून विद्यार्थिनींचे मनोरंजन केले. तसेच जिंगलबेल गाण्यावर नृत्य सुद्धा करण्यात आले. विद्यार्थिनींना भेटण्यासाठी सांताक्लॉज आला होता. खाऊ म्हणून विद्यार्थिनींना केक देण्यात आला.
दिवाळी
शिशुमंदिर विभागामध्ये शुक्रवार दिनांक ३ / ११ / २०२३ रोजी दिवाळी सण साजरा करण्यात आला. शाळेमध्ये विवध चित्रे,आकाशकंदील लावून सजावट करण्यात आली. सर्वत्र पणत्या लावण्यात आल्या. रांगोळी काढण्यात आल्या. विद्यार्थिनींनी मातीचा किल्ला केला होता. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व सांगणाऱ्या चित्रांची मांडणी करण्यात आली. मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी दिवाळीच्या गाण्यावर नृत्य सादर केले. मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे यांच्या हस्ते लक्ष्मी प्रतिमेची पूजा करण्यात आली. दिवाळी निमित्त ‘स्वच्छ’ संस्थेच्या कर्मचारी श्री वैभव साबळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थिनींना घरी वापरत नसणारे कपडे. खेळणी आणण्यास सांगण्यात आले. जुन्या वस्तु स्वच्छ संस्थेच्या कर्मचा-यांना देण्यात आल्या. तसेच त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. दिवाळीनिमित्त विद्यार्थिनींना भेट म्हणून पणत्या आणि लाडू चिवडा देण्यात आला.
पांढरा रंग दिन
शुक्रवार दिनांक ३ / ११ / २०२३ रोजी मोठ्या गटाचा पांढरा रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी पांढरा पोशाख परिधान करून आल्या होत्या. पांढऱ्या रंगाच्या विविध वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. पांढऱ्या रंगदिना निमित्त मसाले दुध देण्यात आले. सश्याचे फिंगर पपेट तयार करून देण्यात आले.
विद्यार्थिनींना चांगल्या आणि वाईट स्पर्शाचे प्रशिक्षण*
शुक्रवार दिनांक २७ / १० / २०२३ रोजी हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर शाळेतील विद्यार्थिनी आणि पालकांसाठी चांगल्या आणि वाईट स्पर्शाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. बाललैंगिकशोषणा पासून ३ ते ६ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींचे संरक्षण व्हावे ह्या उद्देशाने शाळेने विद्यार्थिनींसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिसक्षणासाठी संस्थेच्या मा. डॉ. अश्विनी पंडित, श्रीमती शिवानी कुलकर्णी तसेच ग्राविट्स फौंडेशन चे श्रीमती अनुराधा भोरे उपस्थित होते. त्यांनी विविध चित्रे आणि खेळ गोष्टी मधून चांगला आणि वाईट स्पर्श म्हणजे काय?हे समजावून सांगितले. तसेच पालकांना मा. डॉ . अश्विनी पंडित यांनी पालकांची बाललैंगिक शोषण संरक्षणामध्ये महत्वाची भूमिका ह्याबद्दल माहीती सांगितली. कार्यक्रमाची संकल्पना मा. मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती मेधा देशपांडे यांनी केले तर नियोजन शिक्षिका श्रीमती पूजा आगलावे यांनीं केले.
दसरा
सोमवार दिनांक २३ / १० / २०२३ रोजी दसरा हा सण साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी आवडीच्या पोषाखामध्ये आल्या होत्या. विद्यार्थीनींनी नृत्याद्वारे देवीचा जागर सादर केला. तसेच खंडेनवमी निमित्त शस्त्रांचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थिनीच्या विविध साधनखेळांचे आणि सरस्वतीचे पूजन मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे ह्यांचा हस्ते करण्यात आले. विद्यार्थीनींनी पाटीचे पूजन करून प्रार्थना केली. तसेच नवरात्र उत्सवामध्ये गहू पेरून घेण्यात आले होते. ते गव्हांकुर विद्यार्थीनींना खाण्यास दिले. त्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व पटवून सांगितले.
पालक स्पर्धा
शनिवार दिनांक २१ / १० / २०२३ रोजी शिशुमंदिर शाळेतील पालकांसाठी “ ठिपक्यांची रांगोळी “ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पालकांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन अतिशय आकर्षक रांगोळ्या काढल्या . स्पर्धेचे परिक्षण शाळेच्या माजी मुख्याध्यापिका मा. श्रीमती उमा गोसावी आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती ज्योती राजमणी यांनी केले. स्पर्धेची संकल्पना मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे यांची होती.
कात्रज दूध डेअरी भेट
गुरुवार दिनांक १९ / १० / २०२३ रोजी मोठ्या गटाच्या विद्यार्थिनींनी आहार या प्रकल्पांतर्गत कात्रज येथील दूध डेअरीला भेट दिली. डेअरीमध्ये दूध आल्यानंतर केल्या जाणा-या विविध प्रक्रियांची माहिती देण्यात आली. गाय आणि गोठा प्रत्यक्ष दाखवण्यात आला. दुधाचे पदार्थ तयार कसे करतात? हे प्रत्यक्ष पाहता आले. विद्यार्थिनीचे आवडीचे आईस्क्रीम त्यांना देण्यात आले.
भोंडला
बुधवार दिनांक १८ / १० / २०२३ रोजी शिशुमंदिरमध्ये सर्व गटांचा भोंडला साजरा करण्यात आला. फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणण्यात आली. मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे ह्यांच्या हस्ते हत्तीची पूजा करण्यात आली. तसेच खिरापत म्हणून विद्यार्थिनींना डोसा, बटाटयाची भाजी, चटणी, जिलेबी खिरापत म्हणून देण्यात आला.
हिरवा रंग दिन
बुधवार दिनांक ११ / १० / २०२३ रोजी छोट्या गटामध्ये हिरवा रंग दिन साजरा करण्यात आला. हिरवा रंगाच्या विविध वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. सर्व विद्यार्थिनी हिरव्या रंगाचा पोशाख करून आल्या होत्या . हिरव्या रंगाचा बेडूक असलेल्या चित्राचा हातातील बॅण्ड देण्यात आला. ठसेकामातून हस्तव्यवसायाच्या विविध कृती करून घेण्यात आल्या.
निळा रंग दिन
बुधवार दिनांक १ / १० / २०२३ रोजी साजरा करण्यात आला. निळ्या रंगाच्या विविध वस्तूंची मांडणी वर्गांमध्ये करण्यात आली होती. सर्व विद्यार्थिनी निळ्या रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या,निळ्या रंगाचे सरबत देण्यात आले. ठसेकामामधून मोराचे चित्र तयार करणे हि हस्तव्यवसाय कृती करून घेण्यात आली.
लाल रंग दिन
शिशुरंजन गटाचा लाल रंग दिन बुधवार दिनांक १ / १० / २०२३ रोजी साजरा करण्यात आला. लाल रंगाच्या विविध वस्तूंची मांडणी वर्गांमध्ये करण्यात आली होती. सर्व विद्यार्थिनी लाल रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या,लाल रंगाचे सफरचंद खाऊ म्हणून दिले,स्ट्रॉबेरी चित्र काढून ते विद्यार्थिनिंना केसाच्या पिने ला लावण्यात आले.
रेल्वे म्युझियम सहल (छोटा गट)
सोमवार दिनांक ४ / ०९ / २०२३ रोजी वाहने प्रकल्पांतर्गत छोट्या गटाची सहल कोथरूड येथील जोशी रेल्वे म्युझियम येथे नेण्यात आली होती. तेथे रेल्वेचे कामकाज कसे चालते? ह्याची माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष धावणाऱ्या रेल्वे पाहून विद्यार्थिनीना खूप आनंद झाला. रेल्वेच्या विविध नियमांची माहितीसुद्धा देण्यात आली. तसेच कोथरूड येथील तात्यासाहेब थोरात उद्यान मधील खेळांची मजा विद्यार्थिनीनी लुटली. सोबत शेंगदाण्याचा लाडूचा आस्वाद सुद्धा घेतला.
शिक्षक उद्बोधन शिबिर
शिशुमंदिर विभागामध्ये मराठी आणि इंग्लिश मिडीयम शिक्षिकांसाठी ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ विषयावर शिबिर घेण्यात आले. शिबिर घेण्यासाठी वक्ते म्हणून समुपदेशक मा. डॉ. श्रीमती अश्विनी पंडित यांना निमंत्रित करण्यात आले होते. दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना स्त्रीयांना येणारे ताणतणाव आणि त्यावरचे उपाय ह्याची माहिती विविध उदाहरणे आणि कृतीद्वारे शिक्षिकांना देण्यात आली. शिबिरासाठी मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे आणि इंग्लिश मिडियम प्रीप्रायमरी मुख्याध्यापिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी उपस्थित होत्या .
गणेशोत्सव
बुधवार दिनांक २० / ९ / २०२३ रोजी छोट्या विद्यार्थीनींचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणपतीची पालखीमधून वाद्ये आणि ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गणपती स्तोत्र, श्लोक, भजन तसेच आरती म्हणण्यात आली. शिशुरंजन गटाच्या विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले. गणपतीच्या गोष्टींची सी डी दाखवण्यात आली. तसेच विद्यार्थीनींना शाळेजवळील गणेश मंदिरात नेण्यात आले होते. वर्गामध्ये गणपतीसाठी सजावट विद्यार्थीनींनी केली आणि रोज आरती करण्यात आली. विद्यार्थीनींना मातीचे गणपती तयार करण्यास देण्यात आले होते. तसेच प्रसाद म्हणून उकडीचा मोदक देण्यात आला.
बैलपोळा
गुरुवार दिनांक १४ / ९ / २०२३ रोजी शाळेमध्ये बैल पोळा साजरा करण्यात आला. बैल पोळा ह्याबद्दल माहिती ppt द्वारे विद्यार्थींनीना सांगण्यात आली. बैलाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. तसेच छोट्या गटातील विद्यार्थिनींनी शेतकरी नृत्य सादर केले. अशा पद्धतीने बैलपोळा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.
शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
शिशुमंदिर विभागात मोठ्या, छोट्या आणि शिशुरंजन गटाच्या अभ्यासक्रमानुसार प्रकल्प, गणित, भाषा व खेळ या विषयांचे विविध शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन शनिवार दिनांक २ / ९ / २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाले. शाळेमध्ये असणाऱ्या शैक्षणिक साधनाबद्दल पालकांना माहिती देण्यासाठी प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले, प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कात्रज प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती ज्योती राजमणी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती भूमकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सदरचे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
राखीपौर्णिमा
मंगळवार दिनांक २९ / ८ / २०२३ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये राखीपौर्णिमा सण साजरा करण्यात आला. राखीपौर्णिमेनिमित्त भारती आणि ससून रुग्णालयातील परिचारिकांना निमंत्रित करण्यात आले होते. ह्यावेळी आजारी व्यक्तींची सेवा करणाऱ्या परिचारिकांना शाळेमध्ये राखी बांधून सन्मानित करण्यात आले. विद्यार्थींनीनी नारळीपौर्णिमा आणि राखी पौर्णिमा सणाची माहिती सांगितली. मोठ्या गटामधील विद्यार्थिनींनी कोळीनृत्य सादर केले. सर्व विद्यार्थीनीना राखी बांधून ओल्या नारळाची करंजी खाऊ म्हणून देण्यात आला. अशा पद्धतीने अतिशय उत्साही वातावरणामध्ये राखीपौर्णिमा सण साजरा करण्यात आला.
नागपंचमी
शुक्रवार दिनांक १८ / ८ / २०२३ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये नागपंचमी साजरी करण्यात आली. नागपंचमी निमित्त सर्पमित्र श्री. श्रीराम शिंदे आणि अक्षय शेलार यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विविध प्रकारचे साप आणि नाग यांची माहिती ppt द्वारे सांगितली, तसेच नागपंचमी निमित्त नागाला त्रास देऊ नये. तसेच दुध किंवा लाह्या देऊ नये तर त्याऐवजी मातीचे नाग करून पूजन करावे. असा संदेश विद्यार्थीनीना दिला. तसेच त्यांनी विद्यार्थिनींनी मातीचे नाग करायला शिकवले. विद्यर्थिनिनी नागाच्या प्रतिमेचे पूजन केले. मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. विद्यार्थींनीनी फुगड्या आणि झिम्मा ह्या पारंपारिक खेळाचा आनंद लुटला. तसेच प्राथमिक विभागामधील विद्यार्थिनींनी छोट्या मैत्रिणींच्या हातावर मेंदी काढली. खाऊ म्हणून पूरण खाण्यास देण्यात आले.
पालकांनी गोष्ट सांगणे
छोट्या गटाच्या कुटूंब प्रकल्पांतर्गत पालकांना विद्यार्थिनींना गोष्ट सांगण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. छोट्या गटामध्ये पालकांनी विविध प्राणी, पक्ष्यांच्या, पौराणिक गोष्टी सांगितल्या. गोष्टी सांगण्यासाठी पालकांनी चित्रे, पपेट अशा विविध साहित्याचा वापर सुद्धा केला होता. पालकांच्या कलागुणांना वाव देणे आणि शाळा आणि विद्यार्थिनींशी नाते दृढ करण्याच्या उद्दिष्टाने गोष्टी सांगणे ह्या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते.
दिव्याची अमावास्या
‘ दिव्या दिव्या दिपत्कार, दिव्याला पाहून नमस्कार’ असे म्हणत शिशुमंदिर मधील छोट्या विद्यार्थिनींनी सोमवार दिनांक १७ / ०७ / २०२३ रोजी दिव्याची अमावास्या साजरी केली. शाळेमध्ये विविध प्रकारच्या दिव्यांची चित्रे लावून सजावट करण्यात आली. मोठ्या गटामधील विद्यार्थिनींनी दिव्याची अमावास्येची माहिती सांगितली तसेच नृत्य सादर केले. विद्यार्थिनींनी विविध पारंपारिक दिवे घरून आणले होते. त्याचे प्रदर्शन मांडण्यात आले. दिव्यांचे प्रदर्शन बघण्यासाठी पालकांना निमंत्रित करण्यात आले. मा. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या हस्ते दिव्यांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींकडून कणकेचे दिवे करून घेतले. ते दिवे वाफवून प्रसाद म्हणून खाण्यास देण्यात आले.
आरोग्य तपासणी
शिशुमंदिर विभागामध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींची मंगळवार दिनांक ११ / ७ / २०२३ ते शुक्रवार दिनांक१४ / ७ / २०२३ ह्या कालावधीमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी साठी बालरोगतज्ञ मा. डॉ. श्री. राहुल कुलकर्णी आणि दंत चिकित्सक मा. डॉ. श्रीमती जठार यांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी मा. डॉ. कुलकर्णी यांनी शिक्षिकांना विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत काही सूचना सांगितल्या. तसेच डॉक्टरांनी पालकसभेमार्फत पालकांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये लोह, प्रथिने, कर्बोदके शरीराला वाढीसाठी आवश्यक असतात ते आणि जीवनसत्वे कोणत्या पदार्थातून मिळतात ह्याबाबत माहिती सांगितली. तसेच पालकांचे पाल्याच्या आरोग्याच्या तक्रारीबाबत शंका निरसन केले. डॉ. जठार यांनी दातांची नियमित घ्यावयाची काळजी आणि चांगल्या सवयी ह्याबाबत मार्गदर्शन केले. ह्या उपक्रमाची संकल्पना मुख्याध्यापिका मा. श्रीमती उमा गोसावी यांची होती तर नियोजन शिक्षिका श्रीमती अमृता पाटील आणि श्रीमती पूजा आगलावे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती सोनाली कुल यांनी केले.
स्वागतसमारंभ
बुधवार दिनांक ०५ / ०८ / २०२३ रोजी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या गटामधील विद्यार्थिनींनी छोटा आणि शिशुरंजन गटामधील विद्यार्थिनींसाठी नृत्य सादर केले. मोठ्या गटामधील विद्यार्थिनींनी शाळेमध्ये करण्यात येणाऱ्या विविध गोष्टींची माहिती सांगितली. तसेच आदल्या दिवशी मोठ्या गटामधील विद्यार्थिनींनी विविध विषयांचे तोरण तयार केले आणि ते छोट्या गटातील, शिशुरंजन गटामधील विद्यार्थिनींना भेट म्हणून देण्यात आले. मोठ्या गटामधील ताईंनी पुरीचाट हा खाऊ वर्गशिक्षिकांच्या मदतीने तयार करून आपल्या छोट्या मैत्रीणींना वाढला.
गुरुपौर्णिमा
सोमवार दिनांक ३ / ७ / २०२३ रोजी शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. ह्यावेळी गुरु ऋषी व्यासांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ह्यावेळी पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते. शिक्षिका श्रीमती अरुंधती जगदाळे यांनी गुरुपौर्णिमेची माहिती सांगितली. मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी गृरू शिष्यांच्या विविध गोष्टी सांगितल्या. ह्याच दिवशी म. ग. ए. संस्थेतर्फेसर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेतर्फे देण्याट येणारा कै. श्रीमती शकुंतला नवाथे ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा "कल्पकशिक्षिका" पुरस्कार शिक्षिका श्रीमती सुनीता लोंढे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
अभ्यासक्रम पालकसभा
शिशुरंजन, छोटा आणि मोठ्या गटातील विद्यार्थिनींच्या पालकांची अभ्यासक्रमा संदर्भात पालक सभा शनिवार दिनांक २४ / ६ / २०२३, शनिवार दिनांक ०१ / ०७ / २०२३, शनिवार दिनांक ०८ / ०७ / २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. शाळेमध्ये घेण्यात येणारा अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या विविध पद्धती पालकांना समजावून सांगण्यात आल्या. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांनी प्रस्तावना केली. तसेच विषयाला अनुसरून विविध शैक्षणिक साधने पालकांना दाखवण्यात आली. भाषा, गणित, विज्ञान, इंद्रियविज्ञान, जीवनव्यवहार, हस्तव्यवसाय, गाणी, गोष्टी, खेळ, प्रकल्प विषय ह्या विविध विषयावर शिक्षिकांनी पालकांना मार्गदर्शन केले तसेच पालकांच्या शंकाचे सुद्धा निरसन केले.
पालखीसोहळा
"विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषामध्ये शिशुमंदिर विभागातील विद्यार्थिनींनी सोमवार दिनांक २६ / ०६ / २०२३ रोजी पालखी काढली. विद्यार्थिनी आकर्षक अशा वारकरी पोशाख परिधान करून आल्या होत्या. सोबत छोट्या सजवलेल्या पालख्या, पताका, टाळ, सुद्धा घेऊन आल्या होत्या. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. शिक्षिका श्रीमती मेधा देशपांडे यांनी पालखीची माहिती PPT द्वारे सांगितली. मोठ्या गटामधील विद्यार्थिनींनी पालखी माहिती सादर केली. "हरित क्रांती" असा विषय घेऊन दिंडी काढण्यात आली. "झाडे लावा झाडे जगवा" हा संदेश विद्यार्थिनींना देण्यात आला. त्यासाठी परिसरातील नागरिकांना तुळशीचे रोप व विविध झाडांच्या बिया भेट देण्यात आले. प्रसाद म्हणून साखर फुटाणे देण्यात आले.
योगादिन
बुधवार दिनांक २१ / ६ / २०२३ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये योगादिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींना योगाचे विविध प्रकार दाखवण्यात आले. प्राणायाम, सूर्यनमस्कार. ओंकार असे योगाचे प्रकार घेण्यात आले. त्याप्रमाणे विद्यार्थिनींनी योगासने केली. योगासानवर व्हिडीओ दाखवून त्याची माहिती दिली. व्यायामाचे महत्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने योगा दिन साजरा करण्यात आला.
शाळेचा पहिला दिवस
हुजूरपागा कात्रज शाळेच्या शिशुमंदिर विभागातील मोठ्या गटाची शाळा गुरुवार दिनांक १५ / ६ / २०२३ रोजी, छोट्या गटाची शाळा सोमवार दिनांक २२ / ६ / २०२३ आणि शिशुरंजन गटाची शाळा गुरुवार दिनांक २२ / ६ / २०२३ रोजी आनंदमयी वातवरणामध्ये सुरु झाली. विद्यार्थिनींचे स्वागत मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी आणि शिक्षिकांनी टाळया वाजवून केले. विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी शाळा चित्रे लावून आणि आकर्षक फुग्यांची आरास करून सजवण्यात आली होती. प्रवेशद्वाराजवळ खेळांची रचना करण्यात आली होती. पालकांना विविध शाळेच्या नियमांची माहिती देण्यात आली. पालक शिक्षक संघामधील प्रतिनिधींची प्रत्येक वर्गामध्ये मतदान पद्धतीने निवड करण्यात आली. तसेच पालक आणि पाल्य यांनी मिळून एक हस्तव्यवसाय कृती केली. त्यामध्ये एक कापडी पिशवी ठसेकामामधून सजवण्यात आली, जीचा विद्यार्थिनींना शाळेमधील स्वतःचे साहित्य ठेवण्यासाठी उपयोग केला जाणार आहे. शाळेतर्फे विद्यार्थिनींना खाऊ म्हणून खजुरचा पौष्टिक लाडू आणि भेटवस्तू म्हणून छोटा नॅपकिन देण्यात आला. अशा अतिशय उत्साही वातावरणामध्ये शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली.
पदवीदान समारंभ
मोठ्या गटातून पहिलीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या पदवीदान समारंभाचे नियोजन मा. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मोठया गटातील विद्यार्थिनीं शिशुमंदिर विभागातून प्राथमिक विभागात प्रवेश करतात, ह्या विद्यार्थिनींच्या पुढील शैक्षणिक वाटचालींना शुभेच्छा देण्यासाठी पदवीदान समारंभाचे आयोजन केले. मोठ्या गटाच्या विद्यार्थिनींची शाळेच्या परिसरात पदयात्रा काढण्यात आली. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलिका नियतकलिकेचे प्रकाशन करण्यात आले. पदक व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थीनींचे कौतुक करण्यातआले. छोट्या गटातील विद्यार्थिनींनी मोठ्या गटातील विद्यार्थिनींसाठी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या तसेच समूहगीत सादर केले. मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी तसेच पालकांनी शाळेबद्दल मनोगत व्यक्त केले. तसेच मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
म. ग. ए. संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती शालिनी पाटील
म. ग. ए. संस्थेच्या सचिव मा. श्रीमती रेखा पळशीकर
म. ग. ए. संस्थेच्या सभासद व कात्रज शिशुमंदिर शालेय समितीच्या अध्यक्ष मा. डॉ सुषमा केसकर
म. ग. ए. संस्थेचे सभासद मा. श्री रमाकांत सोनावणी
म.. ग. ए. संस्थेच्या सभासद तसेच कात्रज शिशुमंदिर शालेय समितीच्या सभासद मा. श्रीमती अरुणा तिवारी, कात्रज हुजूरपागा शाळेचे सर्व विभागाचे मुख्याध्यापक या पदवीदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलन
शिशुमंदिर विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णाभाऊ साठे सभागृहात करण्यात आले. यावर्षी स्नेहसंमेलनाचा विषय 'विविधेतील एकता'घेण्यातआला होता. यावेळी कात्रज शिशुमंदिर विभागाच्या अध्यक्षा मा. श्रीमती सुषमा केसकर, मा. श्रीमती उमा पळसुले, मा. श्रीमती जयश्री बापट, मा. श्रीमती अरुणा तिवारी, श्री. रमाकांत सोनावणी तसेच सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या, विद्यार्थींनींनी आत्मविश्वासाने सूत्रसंचालन करून विविध भाषेच्या गाण्यावर नृत्य सादर केले, विद्यार्थीनींचे उपस्थित मान्यवर व पालकांनी शाबासकी देऊन कौतुक केले.
हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागात भाषा, गणित, इंद्रिय विज्ञान जत्रा उत्साहात साजरी
विद्यार्थिनींना घरी खेळण्यास योग्य असे भाषा, गणित, इंद्रिय विज्ञान, संकल्पना शैक्षणिक खेळ मांडण्याचे नियोजन मा. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थीनींना हसत खेळत, सोप्या पद्धतीने अंक, अक्षर, शब्द, गणिती संकल्पना समजण्यासाठी विविध प्रकारच्या शैक्षणिक खेळ साहित्याची मांडणी करण्यात आली, पालकांनी सर्व खेळ समजावून घेऊन मुलींकडून उत्साहात व आनंदात खेळून घेतले, पालकांनी उपस्थित राहून व सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दर्शवला. विद्यार्थीनींचा घरी खेळातून सराव घेण्यासाठी पालकांना या शैक्षणिक खेळांचा उपयोग होणार आहे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या जत्रेचे आयोजन करण्यात आले. कात्रज प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी तसेच रामभाऊ म्हाळगी शाळेच्या शिक्षिका विविध खेळ बघण्यासाठी उपस्थित होत्या.
हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागात पालकांची कार्यशाळा
शिशुमंदिर विभागात मा. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाने पालकांसाठी शैक्षणिक साधने तयार करणे ही कार्यशाळा घेण्यात आली. शिशुमंदिर मध्ये घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमावर आधारित घरामध्ये असणारे विविध साहित्य वापरून शिक्षिकांनी काही साधने करून दाखविली त्याप्रमाणे पालकांनी शैक्षणिक साधने तयार केली, या कार्यशाळेचा उपयोग पालकांना विविध विषयांचा विद्यार्थिनींचा सराव घेण्यासाठी होणार आहे. पालकांनी कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच छोट्या गटाच्या भाजी प्रकल्पांतर्गत भरवलेल्या भाजी मंडईमधून जमा झालेल्या रक्कमेतून 'साधना व्हिलेज ' ह्या संस्थेला मिक्सर भेटवस्तू म्हणून देण्यात आले. पालकांच्या वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर करून बक्षिसे वितरण करण्यात आली. यावेळी 'साधना व्हिलेज' संस्थेच्या सदस्य व निवासी विश्वस्त मा. श्रीमती मेधा टेंगशे, मा. श्रीमती विजया कुलकर्णी तसेच कात्रज माध्यमिक शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती मंगला वाघमोडे, कात्रज प्राथमिक शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी उपस्थित होत्या.
पालक सभा (शिक्षण तज्ञ)
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे सदस्य व शिक्षणतज्ञ मा. डॉ. श्री. दिनेश नेहेते यांनी मूल कसे वाढते, मूल खेळण्यात मग्न असते म्हणजे ते काहीतरी शिकतं असते, मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास हा आजूबाजूच्या व घरातील वातावरणातून होत असतो, मुलांच्या वाढीचे विकासाचे टप्पे याबाबत पालकांना शास्त्रीय दृष्टीकोनातून मोलाचे मार्गदर्शन केले. पालकसभेचे नियोजन कात्रज शिशुमंदिर विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी व कात्रज इंग्रजी विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती अर्पिता कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. पालकसभेला अनेक पालकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पापड घालणे प्रकल्प
उन्हाळा ऋतु चालू झाल्यानंतर घरोघरी पूर्वीच्या काळी वाळवण कामे केली जात असत आता पापड घालणे हा अनुभव विद्यार्थिनींना प्रत्यक्ष शाळेमध्ये मिळाला. शाळेच्या गच्चीवर विद्यार्थिनींनी साबूदाण्याचे पापड ताई आणि मावशी यांच्या मदतीने घातले. वाळल्यानंतर पापड विद्यार्थिनींना तळून खाण्यास दिले. स्वावलंबन, टिकाऊ पदार्थ याबद्दल माहिती होणे, हस्तनेत्र समन्वय, आनंद अशा अनेक उद्देशाने ह्या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले.
आजी-आजोबा संमेलन
प्रत्येक कुटूंबामध्ये आजी आजोबा आणि नातवंडे यांचे अतिशय वेगळे असे आदराचे, आपुलकीचे आणि प्रेमाचे नाते असते. कात्रज शिशुमंदिर विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेतील गुणी चिमुकल्यांच्या आजी आजोबांसाठी आजी आजोबा संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनामुळे आजी आजोबांना नातीची शाळा बघून काही काळ आनंदात घालवता येणार आहे. आजी-आजोबाचे शाळेच्या प्रवेशद्वारात अत्तर लावून चाफ्याचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. तसेच फोटो काढण्याचा आनंद घेतला. आजी-आजोबांनी चित्रांवरून, शब्दांवरून, हावभावांवरून गाणी म्हणून अंताक्षरीचा आनंद घेतला. कृष्ण-मारुती तसेच विविध बॉलचे खेळ आजी-आजोबा उत्साहाने खेळले. नातीबरोबरचा आठवणीतला प्रसंग नाटय रूपाने सादर केला. या संमेलनाच्या विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन, मोकळेपणाने संवाद साधून आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला तसेच आजी आजोबांनी अल्पोपाहाराचा आनंद घेतला. पसायदान म्हणून आजी-आजोबा संमेलनाची सांगता करण्यात आली.
मदतनीस आपल्या भेटीला
हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागात मदतनीस कुंभार यांनी येऊन प्रात्यक्षिक करून मातीच्या वस्तूसाठी आवश्यक लागणाऱ्या साहित्याची माहिती सांगितली. कप-बशी, माठ, ताट, ग्लास, चूल, फुलदाणी, पणती, कढई, पातेले, खलबत्ता वस्तू करून दाखवल्या, तसेच मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी प्रत्यक्षपणे मातीच्या वस्तू बनविण्याचा आनंद घेतला, श्री. प्रदीप प्रजापती यांनी विद्यार्थीनींच्या प्रश्नांची उत्तरे देऊन मार्गदर्शन केले यामुळे विद्यार्थीनींना कुंभाराच्या मातीकामाची कलाकुसरीची माहिती सहजपणे समजली.
शिक्षक उद्बोधन शिबिर
मंगळवार दिनांक २५ / ४ / २०२३ रोजी शिक्षकांसाठी उद्बोधन शिबिर घेण्यात आले शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माननीय उमा पळसुले यांना निमंत्रित करण्यात आले होते. स्वयंअध्ययन या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेसाठी शिशुमंदिर कात्रज विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी आणि लक्ष्मी रोड विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनघा रानडे उपस्थित होत्या. तसेच कात्रज आणि लक्ष्मी रोड विभागाच्या शिक्षिका सुद्धा उपस्थित होत्या .
शुभेच्छा समारंभ
बुधवार दिनांक ३ / ४ / २०२३ रोजी मोठ्या गटाचा शुभेच्छा समारंभ साजरा करण्यात आला होता. छोट्या गटातील आणि शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. तसेच मोठ्या गटातील विद्यार्थिनी साठी शुभेच्छापत्र आणि नाती तक्ता तयार केला. छोट्या गटातील विद्यार्थिनीनी मोठ्या गटातील विद्यार्थिनीसाठी लिंबाचे सरबत तयार करून करून दिले
शिक्षकांची कार्यशाळा
शिशुमंदिर विभागामध्ये शिक्षकांची शैक्षणिक साधने तयार करणे ही कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थिनींचा सराव घेण्यासाठी शिक्षिका विविध शैक्षणिक साधनांचा उपयोग करत असतात. हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी यांनी शिक्षिकांना कमीत कमी साहित्य वापरून साध्या सोप्या पद्धतीने आकर्षक असे शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले, या कार्यशाळेतून शिक्षिकांना साधन तयार करणे, साधनांचा उपयोग कसा करावा ही मोलाची माहिती समजली.
गुढीपाडवा
शुक्रवार दिनांक २१ / ३ / २०२३ रोजी शिशुमंदिर विभागात गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आवडीचा पोशाख करून आल्या होत्या. छोट्या गटामधील विद्यार्थिनींनी माहिती सांगितली आणि नृत्य सादर केले. मुख्याध्यापिका उमा गोसावी ह्यांनी गुढीचे पूजन केले. खाऊ म्हणून विद्यार्थिनींना साखरेच्या गाठी देण्यात आल्या होत्या.
मधुमक्षिका केंद्र भेट
शनिवार दिनांक ४ / ३ / २०२३ रोजी मोठ्या गटाची सहल कीटक प्रकल्पांतर्गत मधुमक्षिका पालन केंद्र, शिवाजी नगर येथे नेण्यात आली. विद्यार्थिनींना मधमाशीचे प्रकार, पोळे, मध हयाबद्दल माहिती सांगण्यात आली. मधमाशी पालन कसे आणि का केले जाते, मधमाशी पोळे, मध गोळा करायची पद्धत, पोळ्यातून मध काढताना घ्यावयाची काळजी तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. विद्यार्थिनींनी मधुमक्षिका पालन करण्यासाठी आवश्यक वस्तूंचे प्रदर्शन तसेच प्रत्यक्ष मधमाशी आणि पालनासाठी आवश्यक पेटी दाखवण्यात आली खाऊ म्हणून केळ् देण्यात आले.
होळी आणि रंगपंचमी
शुक्रवार दिनानाक १० / ३ / २०२३ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये होळीआणि रंगपंचमी हा सण साजरा करण्यात आला. शिशुरंजन गटाच्या विद्यार्थीनींनी रंगाच्या गाण्यावर खूप छान नृत्य केले. मोठ्या गटाच्या विद्यार्थीनीने रंगपंचमीची माहिती आत्मविश्वासाने सांगितली, तसेच नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी कशी साजरी करावी हे नाटक सादरीकरणातून दाखवले. हळद, बीट, पालक, झेंडूची फुले यापासून नैसर्गिक रंग तयार करून एकमेकींना रंग लावून रंगपंचमी सण साजरा करण्यात आला. प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थीनींना रंगाची गोष्ट दाखवण्यात आली, रंगपंचमी निमीत्त पुरक आहार म्हणून बदाम पुरीचा आस्वाद विद्यार्थीनींनी घेतला.
संभाजी उद्यान सहल
शनिवार दिनांक ४ / ३ / २०२३ रोजी छोट्या गटाची सहल पाण्यातले प्राणी प्रकल्पांतर्गत संभाजी उद्यान येथे नेण्यात आली. तेथे विद्यार्थिनींनी मत्स्यालयाला भेट दिली विविध प्रकारचे मासे, कासव ह्यांची माहिती घेतली. तसेच घसरगुंडी, झोका, जंगलजीम या खेळांचा आनंद घेतला. खाऊ म्हणून विद्यार्थिनींना खजूर लाडू देण्यात आला.
पुरंदरे शेत सहल
शनिवार दिनांक ४ / ३ / २०२३ रोजी शिशुरंजन गटाची सहल पुरंदरे फार्म, भोर येथे नेण्यात आली. विद्यार्थिनींनी शेतामध्ये फिरण्याचा आनंद लुटला. तसेच आंबा आणि पेरू ची झाडे बघितली. गाईचा गोठा आणि वासरू बघितले श्री आणि सौ पुरंदरे आजी आजोबा यांच्याशी गप्पा मारून शेताबद्दल माहिती जाणून घेतली.
शिवजयंती
शिशुमंदिर विभागामध्ये मध्ये शुक्रवार दिनांक १७ / २ / २०२३ रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पालखीत ठेवून ढोल ताशाच्या गजरात, फुलांच्या वर्षावात, जय शिवाजी-जय भवानी या घोषणांनी मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराजांचा जन्म व कार्य चित्रफितीद्वारे विद्यार्थीनींना दाखवण्यात आले. विदयार्थीनींनी शिवाजी महाराजांची माहिती सांगून पोवाड्याचे गायन आत्मविश्वासाने केले. 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत ही गायिले.
जांभळा रंग दिन
बुधवार दिनांक १ / २ / २०२३ रोजी शिशुमंदिर मध्ये जांभळा रंग दिन साजरा करण्यात आला. छोट्या गटामध्ये जांभळ्या रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. लाल आणि निळा रंग एकत्र करून जांभळा रंग तयार होतो हे प्रत्यक्ष दाखवण्यात आले. सर्व विद्यार्थिनी जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. विद्यार्थिनींना जांभळ्या रंगाचे कागदी चष्मे करून दिले . तसेच त्यांन ब्लॅक करंट सरबत देण्यात आले व जांभळ्या रंगाची कृती करून घेण्यात आली.
जिजामाता पर्यटन स्थळ् सहल
मोठ्या गटाची सहल मंगळवार दिनांक ३१ / १ / २०२३ रोजी जिजामाता पर्यटन स्थळ, पिंपरी येथे नेण्यात आली. विद्यार्थिनींनी घसरगुंडी, झोका, जंगलजीम ह्या खेळांचा आनंद घेतला. विविध प्राण्यांचे पुतळे बघितले. झाडाच्या सावलीमध्ये बसून मेथी पराठा, सॉस आणि पौष्टिक असा कणकेचा लाडू या पदार्थांचा आस्वाद घेतला.
तळजाई पठार सहल
पक्षी प्रकल्पांतर्गत मोठ्या गटाची सहल तळजाई पठार येथे नेण्यात आली. तेथे विविध झाडे आणि पक्षी विद्यार्थिनींना बघण्यास मिळाले. बदक, मोर, बुलबुल, कावळा, लांडोर असे पक्षी बघितले. तसेच पुस्तकातील पक्षी बघून त्याची माहिती जाणून घेऊन प्रत्यक्ष पक्षी बघण्याचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला. दुर्बिणीद्वारे दूरवर असणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण विद्यार्थिनींनी केले. खजूर लाडुचा आस्वाद विद्यार्थिनींनी घेतला.
एम्प्रेस गार्डन सहल
सोमवार दिनांक ३० / १ / २०२३ रोजी शिशुरंजन आणि छोट्या गटाची सहल एम्प्रेस गार्डन येथे नेण्यात आली होती . झोका, जंगलजीम, घसरगुंडी ह्या खेळांचा आनंद विद्यार्थिनीनी लुटला. विविध प्रकारच्या झाडांची माहिती देण्यात आली. खाऊ म्हणून विद्यार्थीनींना कोथिंबीर पराठा सॉस, पौष्टिकलाडू देण्यात आला.
प्रजासत्ताक दिन
बुधवार दिनांक २५ / १ / २०२३ रोजी शिशुमंदिर मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मा. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थिनीनी राष्ट्रध्वजाची माहिती सांगितली. तसेच कवायतीचे प्रकार करण्यात आले. ppt द्वारे प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगण्यात आली.
काळा रंग दिन ( मोठा गट)
बुधवार दिनांक १५ / १ / २०२३ रोजी मोठ्या गटामध्ये काळा रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. विविध काळ्या रंगांच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. दोरीवर चढणार कागदी कोळी मुलींनी बनवला . तो त्यांना भेट म्हणून देण्यात आला.
मकर संक्रांत
शुक्रवार दिनांक १३ / १ / २०२३ रोजी शिशुमंदिर विभागात मकर संक्रांत साजरी करण्यात आली. सर्व विद्यार्थिनी काळ्या रंगाचे पोशाख परिधान करून आल्या होत्या. शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींचे बोरन्हाणं करण्यात आले. छोट्या विद्यार्थिनींना हलव्याचे दागिने घालण्यात आले होते. गोळ्या, बिस्कीट, चुरमुरे, बोर असे विविध पदार्थ एकत्र करून मोठ्या उत्साहात बोरन्हाण करण्यात आले. तसेच ऊस, रेवडी, बोर, गुळाची पोळी हा खाऊ विद्यार्थिनींना देण्यात आला.
शेकोटी
शिशुमंदिर विभागातशुक्रवार दिनांक २ / १२ / २०२२ शेकोटीचे आयोजन करण्यात आले. चित्रे लावून सजावट करण्यात आली. विद्यार्थींनीना शाळेत संध्याकाळी बोलवण्यात आले होते. बालगीते, कार्टून्स सी. डी. द्वारे विद्यार्थीनींना दाखवण्यात आले, वॉटर कलरने मुलींच्या हातावर टॅटू काढले, बैलगाडीच्या सफरीचा आनंद मुलींना देण्यात आला, शेकोटी करताना हिवाळ्याची गाणी म्हणण्यात आली, कच्छी दाबेलीचा आस्वाद मुलींनी घेतला.
बाग प्रकल्प (शिशुरंजन गट)
शनिवार दिनांक १९ / ११ / २०२२ रोजी बाग प्रकल्पांतर्गत शिशुरंजन गटाची सहल पु. ल. देशपांडे उद्यान सिंहगड रोड येथे नेण्यात आली होती. विविध खेळ जसे घसरगुंडी, झोका, जंगलजीम ह्यांचा आनंद विद्यार्थींनीनी घेतला. तसेच भटकंतीचाही अनुभव विद्यार्थिनींनी घेतला. क्रीमरोल खाऊसुद्धा देण्यात आला.
बाल साहित्य संमेलन
विद्यार्थिनींना लहानपणापासून वाचनाची आवड लागावी ह्या उद्देशाने कात्रज शिशुमंदिर विभागात बालसाहित्य संमेलनाचे आयोजन मा. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. चित्रे लावून रांगोळी काढून, रॅक वर पुस्तके ठेवून सजावट करण्यात आली, मोठ्या गटाच्या विद्यार्थींनींची ग्रंथ दिंडी काढून पुस्तक वाचन, पुस्तकाचे फायदे याबद्दल घोषणा देण्यात आल्या. बालसाहित्य संमेलनासाठी विद्यार्थींनीचा सहभाग घेऊन गटानुसार चित्रमय गोष्टी रंगवून पुस्तक तयार करून घेण्यात आले, त्या पुस्तकांचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, वक्त्या व म. ग. ए. संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका मा. श्रीमती आश्लेषा महाजन, वक्त्या मा. श्रीमती वासंती काळे, म. ग. ए. संस्थेचे मा. पदाधिकारी यांनी विद्यार्थीनींना, पालकांना मनोरंजनात्मक पद्धतीने पुस्तकाचे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थीनींनी 'चिंटू' तसेच पालक व विद्यार्थिनींनी मिळून 'वाचाल तर वाचाल 'हे नाटक सादर केले. पालकांनी उपस्थित राहून व सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दर्शवला. मा. मुख्याध्यापिका, लेखनिक शिक्षिका, सेविकेंनी काव्यवाचन केले. पालकांनी हस्तव्यवसायाच्या कलाकृती, गाणी, गोष्टीचा आनंद घेतला, विविध पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली, पालकांनी पुस्तके खरेदी करण्याचा आनंद घेतला.
नाताळ
शुक्रवार दिनांक २३ / १२ / २०२२ रोजी शिशुमंदिर विभागात नाताळ सण साजरा करण्यात आला. ख्रिसमस ट्री सजवण्यात आला. नाताळ सणाची माहिती दृक माध्यमातून सांगण्यात आली. तसेच जिंगलबेल गाण्यावर नृत्य सुद्धा करण्यात आले. विद्यार्थिनींना भेटण्यासाठी सांताक्लॉज आला होता. खाऊ म्हणून विद्यार्थिनींना केक देण्यात आला.
गुलाबी रंग दिन
बुधवार दिनांक १४ / १२ / २०२२ रोजी मोठ्या गटामध्ये गुलाबी रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षिका गुलाबी रंगाचा पोशाख परिधान केऊन आल्या होत्या. विविध गुलाबी रंगाच्या वस्तूची मांडणी करण्यात आली होती. गुलाबी रंगाचे घडिकामामधून फुलपाखरूचे फिंगर पपेट विद्यार्थिनींकडून तयार करून घेण्यात आले. गुलाबाचे सुगंधी दूध देण्यात आले.
कला क्रीडा सप्ताह
सोमवार दिनांक ५ / १२ / २०२२ ते शुक्रवार दिनांक ९ / १२ / २०२२ हा कला क्रीडा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या हस्ते कला क्रीडा सप्ताहाचे मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आले. त्यादिवशी खेळाचे महत्व सांगणाऱ्या आरोळ्या विद्यार्थिनींनी दिल्या. विविध मैदानी खेळ आणि कलाकृतींचे आयोजन करण्यात आले होते. मैदानी खेळामध्ये अडथळ्यांची शर्यत, लंगडी, तीन पायांची शर्यत, बटाटा शर्यत, संगीत खुर्ची अशा विविध मैदानी खेळांचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला. तसेच चित्रे रंगवणे, कोलाज काम, रांगोळीमध्ये रंग भरणे, भेटकार्ड तयार करणे, ख्रिसमस ट्री तयार करणे अशा विविध कलाकृती विद्यार्थिनींनी केल्या.
कात्रज दूध डेअरी भेट
शनिवार दिनांक १९ / ११ / २०२२ रोजी मोठ्या गटाच्या विद्यार्थिनींनी दूध व दुधाचे पदार्थ या प्रकल्पांतर्गत कात्रज येथील दूध डेअरीला भेट दिली. डेअरीमध्ये दूध आल्यानंतर केल्या जाणा-या विविध प्रक्रियांची माहिती देण्यात आली. दुधाचे पदार्थ तयार कसे करतात? हे प्रत्यक्ष पाहता आले. विद्यार्थिनीचे आवडीचे आईस्क्रीम त्यांना देण्यात आले.
रेल्वे म्युझियम सहल (छोटा गट)
शनिवार दिनांक १९ / ११ / २०२२ रोजी वाहने प्रकल्पांतर्गत छोट्या गटाची सहल कोथरूड येथील जोशी रेल्वे म्युझियम येथे नेण्यात आली होती. तेथे रेल्वेचे कामकाज कसे चालते? ह्याची माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष धावणाऱ्या रेल्वे पाहून विद्यार्थिनीना खूप आनंद झाला. रेल्वेच्या विविध नियमांची माहितीसुद्धा देण्यात आली. तसेच कोथरूड येथील तात्यासाहेब थोरात उद्यान मधील खेळांची मजा विद्यार्थिनीनी लुटली. सोबत शेंगदाण्याचा लाडूचा आस्वाद सुद्धा घेतला.
पालकस्पर्धा वेशभूषा
हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागात पालक व शाळा संबंध दृढ व्हावे ह्या उद्देशाने पालकस्पर्धेचे नियोजन करण्यात आले. पालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, पालकांसाठी वेशभूषा ही पालकस्पर्धा आयोजित करण्यात आली. दैनंदिन शालेय शिक्षणाबरोबरच पालकांचा आपल्या पाल्याच्या शाळेतील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पालकांनी पालकस्पर्धेत सहभाग घेऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला. पालकस्पर्धेचे परीक्षण हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागाच्या शिक्षिका श्रीमती सुचिता सावंत यांनी केले.
बांधकाम भेट
घर प्रकल्पांतर्गत शाळेच्या परिसरातील बांधकाम चालू असणाऱ्या इमारतीला छोट्या गटाच्या विद्यार्थिनींनी भेट दिली. त्याठिकाणी गवंडी काम करणाऱ्या लोकांना विद्यार्थिनींनी प्रश्न विचारले. बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती प्रत्यक्ष साहित्य व काम दाखवून विद्यार्थिनींना देण्यात आली.
विद्यार्थीनींची वैदयकीय तपासणी
विद्यार्थीनींच्या सर्वांगीण विकासामध्ये म्हणजे शारीरिक विकास व आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिशुमंदिर विभागामध्ये सोमवार दिनांक १९ / ३ / २०२२ ते गुरुवार दिनांक २२ / ३ / २०२२ कालावधी मध्ये वैदयकीय तपासणीचे नियोजन करण्यात आले. मा. डॉ. बालरोग तज्ञ श्री. राहुल कुळकर्णी व मा. डॉ. दंतरोगतज्ञ श्रीमती मिताली जठार यांनी शिशुमंदिर विभागातील विद्यार्थींनीची आरोग्य तपासणी करून त्यांना उपचाराबाबत योग्य असे मार्गदर्शन केले.
भोंडला
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
शिशुमंदिर विभागात गुरुवार दिनांक २९\९\२०२२ रोजी नवरात्रीच्या निमित्ताने भोंडला पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. आश्विन महिन्यात हस्तनक्षत्रापासून सुरू होणाऱ्या भोंडला या सणाला 'हादगा' असेही म्हटले जाते. मुलींनी हत्तीच्या चित्राची, प्रतिमेची पूजा केली, फेर धरून भोंडल्याची गाणी म्हटली. मुलींना खिरापत ओळखण्यास सांगितले, खिरापत म्हणून मुलींनी पावभाजीचा आस्वाद घेतला.
भाजी मंडई
शिशुमंदिर विभागात छोट्या गटाच्या भाजी प्रकल्पांतर्गत भाजी मंडई भरवण्यात आली. छोट्या गटाच्या विद्यार्थींनी भाजीवालीचा पोशाख करून आल्या. मोठ्या गटातील व शिशुरंजन गटातील विद्यार्थींनीनी पालकांबरोबर भाजी खरेदी करण्याचा आनंद घेतला. पालेभाज्या, फळभाज्या, वेलीवरच्या भाज्या, जमिनीखालील भाज्या ह्यासारख्या भाज्या विकण्यासाठी ठेवण्यात आल्या, त्यामुळे विद्यार्थीनींना भाजी ओळख तर झालीच तसेच आर्थिक व्यवहार कसे चालतात, सभाधीटपणे संवाद कौशल्य कसे करावे ह्याबद्दल माहिती मिळाली. भाजी मंडईचे नियोजन मुख्याध्यापिका श्रीमती उमाताई गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. भाजी मंडईमध्ये उपस्थित राहून पालकांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला तसेच पालेभाज्या, फळभाज्या, मूळ व खोड भाज्या अश्या भाज्यांचा भाजी सप्ताह घेण्यात आला. सप्ताहामुळे विद्यार्थींनीना सर्व भाज्या खाण्याची सवय लागली, लोह, कॅल्शिअम व जीवनसत्त्वे मिळून हाड मजबूत होण्यासाठी, रक्तवाढीसाठी उपयुक्त पोषक मूल्ये शरीराला मिळण्यास मदत होते ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली.
बालदिन
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त शिशुमंदिर विभागात बालदिन साजरा करण्यात आला. या बालदिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. फुगे व चित्रे लावून सजावट करण्यात आली. विद्यार्थींनीना चाचा पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती सांगितली तसेच पपेटद्वारे गोष्ट सांगून दाखवण्यात आली. वर्गामध्ये फनी गेम्स ठेवले होते त्याचा विद्यार्थिनींनी उत्साहाने खेळून आनंद घेतला. बालदिनानिमित्त विद्यार्थीनींना शेंगदाण्याची चिक्की खाऊ दिला.
पालकस्पर्धा
शिशुमंदिर विभागात पालक व शाळा संबंध दृढ व्हावे यासाठी पालकस्पर्धा नियोजन करण्यात आले. पालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, पालकांमधील कौशल्ये जाणून घेण्यासाठी 'आकाशकंदील बनवणे'ही पालकस्पर्धा आयोजित करण्यात आली. अनेक पालकांनी पालकस्पर्धेत सहभाग घेऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला. पालकस्पर्धेचे परीक्षण रामभाऊ म्हाळगी शाळेच्या कलाशिक्षिका श्रीमती दिपाली दगडे व हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागाच्या शिक्षिका श्रीमती मोनाली तनपुरे यांनी केले. यावेळी प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती राजमणी याही उपस्थित होत्या.
पानशेत विद्याविहार शैक्षणिक सहल
हुजुरपागा कात्रज शिशुमंदिर विभागातील मोठया गटातील विद्यार्थीनींची मा. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाने पानशेत 'विद्या विहार' येथे शैक्षणिक सहल काढण्यात आली. बालसाहित्यकार आणि विद्याविहार निसर्गशाळेचे मा. संचालक श्री. ल. म. कडू यांनी खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण प्रत्यक्ष दाखवून विद्यार्थींनीना माहिती सांगितली. विविध प्रकारची झाडे, झाडांची पाने, गवत, वेली निरीक्षण करण्यास सांगून माहिती सांगितली तसेच गांडूळ, कोंबडीला स्पर्श करण्याचा आनंदही विद्यार्थीनींना मिळाला. गप्पी मासे, खेकडा दाखवून बैलांच्या सहाय्याने नांगरणी व पेरणी विद्यार्थीनींकडून करून घेतली. श्री. जयदीप कडू यांनी सीडबॉल कसे व का तयार केले जातात याची माहिती मुलींना दिली व सीडबॉल दरीत टाकायला दिले, मुली घसरगुंडी, झोका, सिसाँ ही खेळल्या.
दिवाळी
आली दिवाळी, उजळला देव्हारा, पणत्यांचा पहारा, आनंदी आनंद दिवसागणिक वाढावाआनंद, उत्साह घेऊन येणारा दिवाळी सण असा हा दिवाळी सण शिशुमंदिर विभागामध्ये मंगलमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. छोटया विद्यार्थींनी छान पोशाख परिधान करून आल्या होत्या. दिवाळीचे महत्वाचे दिवस म्हणजे वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज अशा महत्त्वपूर्ण दिवसामध्ये काय केले जाते? याची वस्तू रुपात मांडणी करण्यात आली. शाळेच्या परिसरामध्ये चित्रे, आकाशकंदिल लावून सजावट करण्यात आली. मुलींनी किल्ला बनवला. रांगोळी, पणत्यांनी शाळेचा परिसर उजळून निघाला होता. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व विद्यार्थिनींनी सांगितले. दिवाळी आली या गाण्यावर आकर्षक पद्धतीने मोठ्या गटाच्या विद्यार्थींनींनी नृत्य सादर केले. तसेच 'फटाके विना दिवाळी' हा महत्त्वपूर्ण संदेश मुलींनी नाटुकल्याद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवला. या कार्यक्रमासाठी प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी उपस्थित होत्या. शिशुमंदिर विभागामध्ये दिवाळीनिमित्त दरवर्षी आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येतो, ह्यावर्षी बांधकाम करणाऱ्या कामगारांना भेटवस्तू म्हणून पणत्या देण्यात आल्या, विद्यार्थीनींना भेटवस्तू म्हणून रांगोळीचे रंग देण्यात आले. तसेच विद्यार्थीनिंनी छोले-पुरी, श्रीखंड या अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.
आपल्याकडील जुन्या वस्तू योग्य मार्गाने पुनर्वापर व रीसायकलिंग करण्यात येते यासाठी दिवाळीच्या निमित्ताने जुन्या वस्तू, कपडे शाळेत जमा करण्याचे अवाहन पालकांना करण्यात आले, शिक्षिकांनी, पालकांनी, सेविकांनी जुने कपडे, वस्तू खूप प्रमाणात जमा करून सहकार्य केले, या सर्व वस्तू पुणे महानगपालिकेच्या 'स्वच्छ व्ही कलेक्ट' या उपक्रमासाठी देण्यात आल्या. आपल्याकडील जुन्या वस्तू स्वस्त दरात गरजूंपर्यंत पोहचवण्याचे काम स्वच्छ, पुणे ह्या उपक्रमातून करते. यामधून सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य दिवाळीच्या निमित्ताने केले.
दसरा
शिशुमंदिर विभागामध्ये मंगळवार दिनांक ४ / १० / २०२२ रोजी दसरा सण साजरा करण्यात आला. ह्यावेळी शाळेमधील विविध शैक्षणिक साधने व शस्त्राची पूजा करण्यात आली. मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी देवींची वेशभूषा करून देवीच्या विविध रुपाची माहिती सभाधीटपणे खूप छान सांगितली. मुख्याध्यापिका श्रीमती उमाताईंनी आपट्याच्या पानांची गोष्ट सांगितली. तसेच झाडे तोडू नका, झाडे लावा हा महत्वपूर्ण संदेश विद्यार्थीनींना दिला. घटस्थापनेच्या दिवशी मुलींकडून मातीत गहू पेरून घेतले होते, त्याचे गव्हांकुर मुलींना खायला दिले. विद्यार्थींनीकडून पाटीपूजन करून घेतले, प्रसाद म्हणून शेंगदाण्याचा लाडू देण्यात आला.
बालरोगतज्ज्ञ व दंतरोगतज्ञाचे मार्गदर्शन
मा. डॉ. बालरोगतज्ञ श्री. राहुल कुलकर्णी यांनी बालकांचा आहार, वजन, उंची, लसीकरण, चांगल्या सवयी तसेच शरीरारला योग्य फायबर, प्रथिने, कॅल्शियम, प्रोटीन, आर्यन मिळावे यासाठी कोणते पदार्थ आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. मा. डॉ. दंतरोगतज्ञ श्रीमती मिताली जठार यांनी दातांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले, पालकसभेचे नियोजन मा. मुख्यध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. पालकसभेला अनेक पालकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, पालकसभेला प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी, माध्यमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती मंगला वाघमोडे, इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती कीर्ती पंडित, प्राथमिक विभागाच्या शिक्षिका श्रीमती मोनाली तनपुरे उपस्थित होत्या.
झाड प्रकल्प
हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागात प्रकल्पाला अनुसरून विद्यार्थीनींना शिकवले जाते, मोठ्या गटातील झाड या प्रकल्पांतर्गत पानशेत' विद्याविहार'येथे शैक्षणिक सहल काढण्यात आली, झाडांचे महत्त्व समजण्यासाठी झाडांच्या अवयवांच्या विविध उपयोगी वस्तू पालकांकडून मागवण्यात आल्या, वर्गात पालकांनी मुलींना दिलेल्या वस्तू व शाळेतील वस्तूंची मांडणी मा. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. झाडांच्या उपयोगी वस्तूंची मांडणी विद्यार्थीनींना दाखवून माहिती सांगितली, नाविन्यपूर्ण उपक्रमातून सोप्या पद्धतीने मुलींना झाडांचे उपयोग समजले.
गुड टच बॅड टच प्रशिक्षण
शिशुमंदिरमधील विद्यार्थींनी ह्या लहान असतात, शाळेच्या निमित्ताने बाह्य जगामध्ये प्रथम पाऊल टाकतात, बाहेरील जगामध्ये विद्यार्थींनी सुरक्षित रहाव्या तसेच त्यांनी स्वतःचे स्वतः संरक्षण करावे ह्या उदिष्टाने विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले. शिशुमंदिर मधील विद्यार्थींनीच्या वयास समजतील अशा पध्दतीने चित्रांद्वारे, फिल्मद्वारे ग्रॅव्हीटी फॉन्डेशनच्या श्रीमती अश्विनी पंडित, श्रीमती आशा खेडेकर, श्रीमती मुक्ता खेडेकर तसेच श्रीमती राधिका गांगल यांनी छान माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे नियोजन शिशुमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले.
कोजागिरी पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा शिशुमंदिर विभागामध्ये शुक्रवार दिनांक ०७ / १० / २०२२ रोजी साजरी करण्यात आली. कोजागिरी पौर्णिमेची तसेच चंद्राच्या कलेची आणि त्यानुसार तिथींबद्दल माहिती विद्यार्थीनीनीं सांगितली, मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी चंद्रावरील गाण्यावर नृत्य सादर केले, तसेच आज मोठ्या गटात पांढऱ्या रंगांच्या वस्तूंची मांडणी करून विद्यार्थीनींना पांढऱ्या रंगांच्या वस्तूंची नांवे सांगितली. मुलींकडून पांढऱ्या रंगाच्या कागदापासून बदकाचे फिंगर पपेट तयार करून घेतले. तसेच मसाले दूधाचा आस्वाद मुलींनी घेतला.
आंतरविभागीय कथाकथन स्पर्धा
कात्रज आणि लक्ष्मी रोड शाखेच्या सर्व पूर्वप्राथमिक विभागामध्ये कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी मुलींच्या स्पर्धा घेतल्या जातात. यामधे लक्ष्मीरोड व कात्रज शिशुमंदिर आणि प्री प्रायमरी इंग्लिश मिडीयम हे चारही विभाग सहभागी होतात. चारही विभागात मिळून मुलींना बक्षिसे दिली जातात. स्पर्धेकरीता शिशुरंजन व छोट्या गटासाठी हितोपदेशाच्या गोष्टी* (पंचतंत्राच्या गोष्टी) आणि मोठ्या गटाला स्वातंत्र्य सैनिकांच्या गोष्टी हा विषय देण्यात आला होता. स्पर्धेमध्ये कात्रज विभागातील विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवले.
बक्षिसे मिळविलेल्या विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे :
मोठा गट
कु प्रेरणा स्वप्नील जावळे – द्वितीय क्रमांक
कु. सर्वज्ञा पप्पू गुजर – तृतीय क्रमांक
कु. आरोहि रोहित हसबनिस – उत्तेजनार्थ
शिशुरंजन गट
कु. भक्ति सचिन धोत्रे – प्रथम क्रमांक
कु. इंद्रायणी सौरभ जठार – द्वितीय क्रमांक
कु. श्रुती शिवाजी फडतरे – तृतीय क्रमांक
केसरी वाडा आणि पुणे ग्रंथालय भेट
विद्यार्थीनींची पुणे ग्रंथालय व केसरीवाडा ऐतिहासिक वास्तू स्थळभेट
शिशुमंदिर विभागाच्या मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी गुरुवार दिनांक ४ / ०८ / २०२२ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त केसरीवाडा या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. ’लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ यांचे देशकार्य व सामाजिक कार्याची माहिती केसरीवाडा प्रत्यक्ष बघून विद्यार्थीनाना मिळाली, तसेच लहान वयापासून पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुणे मराठी ग्रंथालयात विद्यार्थींनीना नेण्यात आले, विद्यार्थीनींना वाचनासाठी पुस्तके दिली, गोष्टीची चित्रफीत दाखवण्यात आली, विद्यार्थीनींसमवेत पालकांनीही स्थळभेटीचा आनंद घेतला. विद्यार्थिनींना खाऊसुद्धा देण्यात आला.
गणपती तयार करणे कार्यशाळा
शाडू मातीपासून गणपती बनविणे कार्यशाळा
विद्यार्थीनींच्या कल्पनाशक्तीचा विकास व्हावा, क्रियाशीलतेला वाव मिळावा, पर्यावरणविषयक जागृती निर्माण व्हावी म्हणून हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागात मोठ्या गटाच्या विद्यार्थीनींची पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवणे ही कार्यशाळा घेण्यात आली. मोठया गटातील विद्यार्थीनीचे शिल्पकार पालक श्री. योगेश विष्णु गोमासे व त्यांचे बंधू श्री. राजेश गोमासे यांनी शाडू मातीपासून गणपती कसे तयार केले जातात याचे मार्गदर्शन केले, त्याप्रमाणे बघून विद्यार्थीनींनी गणपती बनवले, तसेच साच्यापासून गणपती बाप्पाची मूर्ती कशी तयार केली जाते हे प्रत्यक्ष दाखवले, स्वतः शाडू मातीची मूर्ती केल्यामुळे विद्यार्थीनींना नवनिर्मितीचा आनंद घेता आला.
गणेशोत्सव
शिशुमंदिर विभागात गुरुवार दि. १ / ०९ / २०२२ रोजी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणपती बाप्पाची मूर्ती पालखीत ठेवून गणपती बाप्पा मोरया व ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली, गणपती स्थापनेची माहिती विद्यार्थीनींना सांगण्यात आली, मा. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी, शिक्षिका तसेच सेविकांनी आरती केली, शिशुरंजन गटातील विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले,, गणपतीला आवडणाऱ्या व वहाण्यात येणाऱ्या कमळ, केवडा, दुर्वा, शमी, जास्वंद याची माहिती विद्यार्थीनिंनी सर्वांना सांगितली. वर्गात सजावट करून गणपती बाप्पाची स्थापना करून विद्यार्थीनींच्या हस्ते आरती केली, प्रसाद म्हणून विद्यार्थींनीना मोदक देण्यात आला.
गुरुपौर्णिमा
बुधवार दिनांक १३ / ७ / २०२२ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये गुरुपौर्णिमा असल्याने महर्षी व्यास प्रतिमा पूजन करण्यात आले, मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी आणि पालक शिक्षक संघ प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छोट्या विद्यार्थिनींनी विविध गुरुशिष्यांच्या गोष्टी सांगितल्या. शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, लक्ष्मी रोड तर्फे सर्व गुरुजनांना वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमे निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, त्यानिमित्ताने दरवर्षी गुणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ह्यावर्षी श्रीमती शकुंतला नवाथे यांच्यातर्फे दिला जाणारा ' उपक्रमशील पुरस्कार' आपल्या शाळेच्या शिक्षिका श्रीमती अमृत पाटील यांना देण्यात आला आणि कार्यतत्पर सेविका पुरस्कार श्रीमती श्रुतिका साळुंखे यांना देण्यात आला.
गोकुळाष्टमी आणि दहीहंडी
शिशुमंदिर विभागात गुरुवार दिनांक १८ / ०८ / २०२२ रोजी गोकुळअष्टमी आणि दहीहंडी हा सण साजरा करण्यात आला. विद्यार्थीनीं राधा-कृष्णाच्या पोशाख करून आल्या होत्या. विद्यार्नीनींना गोकुळ अष्टमीची माहिती सांगण्यात आली, छोटया गटातील विद्यार्थीनींनी 'यमुनेच्या तीरी'या गाण्यावर नृत्य केले, दहीहंडी फोडण्यात आली, विद्यार्थीनींमध्ये सामाजिक जागृती आणि मदतीचे मूल्य रुजण्यासाठी गहू व तांदूळ मागवण्यात आले होते हे धान्य विद्यार्थिनींना हंडीमध्ये भरण्यास सांगण्यात आले. वनवासी कल्याण गरजू आश्रमाला धान्य देण्यात आले. असा आगळावेगळा उपक्रम हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागात गोकुळाष्टमी निमित्त राबवण्यात आला. विद्यार्थिनींना खाऊ म्हणून दहीकाला देण्यात आला.
दिव्याची अमावस्या
शिशुमंदिरमध्ये गुरुवार दिनांक २८ / ०७ / २०२२ रोजी विविध प्रकारचे दिवे मांडून मा. मुख्याध्यापिका उमा गोसावी यांच्या हस्ते दुर्वा, आघाडा, फुले वाहून पूजा करण्यात आली. विद्यार्थीनींना दिव्यांची माहिती सांगून दिपपूजनाचे महत्व सांगितले. मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी दिव्याच्या अमावस्येची माहिती सांगितली, 'शुभंकरोती म्हणा'या गाण्यावर विद्यार्थीनींने नृत्य केले. विद्यार्थीनींकडून कणकेचे दिवे तयार करून घेतले., विदयार्थीनींना लाह्या-बत्तासे तसेच दिवे उकडून प्रसाद म्हणून खायला दिले.
नागपंचमी
शिशुमंदिरमध्ये नागपंचमी हा सण उत्साहात साजरा झाला. नागपंचमीनिमित्त विद्यार्थीनींकडून वारूळ व मातीपासून नाग करून घेतले. बुधवार दिनांक ३ / ०८ / २०२२ रोजी शाळेत नागपंचमी साजरी करण्यात आली, मा. मुख्याध्यापिका उमा गोसावी यांच्या हस्ते नागाची व वारुळाची पूजा करण्यात आली, मोठ्या गटाच्या विद्यार्थीनींनी नागपंचमीची माहिती सांगितली,'छुमछूम छनछन' या गाण्यावर नाच केला. पुरक आहार म्हणून पुरण खायला दिले. तसेच कातरकाम आणि घडीकामातून कागदाचे नाग विद्यार्थिनींनी तयार केले. इयत्ता ६वीमधील ताईंनी विद्यार्थिनींच्या हातावर मेंदी सुद्धा काढली.
पालकासभा
शिशुमंदिर विभागात शनिवार दिनांक २० / ०८ / २०२२ रोजी पालकसभा आयोजित कऱण्यात आली. पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी बालमानसोपचार तज्ञ मा. श्रीमती अनुपमा देसाई व त्यांच्या सहकारी श्रीमती अमृता तिखे यांना आंमत्रित करण्यात आले. मा. श्रीमती अनुपमा देसाई यांनी'सुजाण पालकत्व'या विषयावर मार्गदर्शन केले, शिक्षण म्हणजे काळानुसार बदलणे, तडजोड करणे हे होय. प्रत्येक मुलांमध्ये वेगळी क्षमता असते ती जाणून घेणे गरजेचे आहे, विविध कौशल्ये आत्मसात करणे म्हणजे शिक्षण आहे, असे मोलाचे मार्गदर्शन अनुपमा देसाईयांनी केले. तसेच पालकांच्या शंकाचे ही निरसन त्यांनी केले.
राखीपौर्णिमा
शिशुमंदिर विभागात विद्यार्थीनींनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
१५ ऑगस्ट २०२२ च्या स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागात बुधवार दिनांक १० / ०८ / २०२२ रोजी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले, त्यांचे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. लष्करी अधिकाऱ्यांनी देशाबद्दल कायम अभिमान बाळगण्याचा संदेश विद्यार्थीनाना दिला, तसेच खजुराचा लाडू सगळ्या विद्यार्थीनींनी खाऊ म्हणून दिला. आपल्या विद्यार्थीनिंनी त्यांना राख्या बांधल्या. विद्यार्थीनींनी राखी व नारळी पौर्णिमेची माहिती सांगितली, मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी कोळी नृत्य सादर केले, विद्यार्थीनींनी एकमेकींना राखी बांधून, नारळाची कारंजीचा खाऊ खाऊन रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा झाला.
लाल रंग दिन
कात्रज शिशुमंदिर विभागात लाल रंगदिन विद्यार्थीनींचे रंग दृढिकरण व रंग ओळख होणे हे उद्दिष्ट डोळ्या समोर ठेवून साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थींनी, मुख्याध्यापिका, शिक्षिका, सेविका लाल रंगाचा पोषाख परिधान करून आल्या होत्या, शिशुरंजन गटात लाल रंगाच्या वस्तूंची मांडणी करून विद्यार्थींनींना लाल रंगाची व लाल रंगांच्या वस्तूंची ओळख करून देण्यात आली, शिशुरंजन गटातील विद्यार्थींनीकडून सफरचंद व स्ट्रॉबेरीच्या चित्राच्या आकारात लाल रंगाने बोटांचे ठसेकाम ही कृती घेण्यात आली. लाल रंगदिनानिमित्त विद्यार्थीनींना'टोमॅटो सूप'पुरक आहार तसेच लाल रंगाचा मुगूट भेटवस्तू म्हणून देण्यात आला.
शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
शिशुमंदि रविभागात मोठ्या, छोट्या आणि शिशुरंजन गटाच्या अभ्यासक्रमानुसार प्रकल्प, गणित, भाषा व खेळ या विषयांचे विविध शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन शनिवार, दि. २३ / ०७ / २०२२ आणि दि. ३० / ७ / २०२२ रोजी उत्साहात संपन्न झाले. शाळेत कशा प्रकारे शिक्षण दिले जाते?तसेच, घरी आपल्या पाल्याचा विविध शैक्षणिक साहित्य वापरून हसत खेळत कसा सर्वांगीण विकास साधता येईल?ह्याबद्दल माहिती देण्यासाठी प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले, प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सदरचे प्रदर्शन पाहण्यासाठी संस्थेचे सभासद मा. श्री. रमाकांत सोनावणी सर, लक्ष्मी रोड शिशुमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद, सेविका, लक्ष्मी रोड प्री प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिन
हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागात शुक्रवार दिनांक १२ / ०८ / २०२२ रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले, विद्यार्थीनींना स्वातंत्र्यदिनाची माहिती सांगण्यात आली. विद्यार्थिनी विविध क्रांतिकारकांच्या पोषाख करून आल्या होत्या, तसेच त्यांनी राजगुरू, वीरसावरकर, सुखदेव, राणीलक्ष्मीबाई यांची माहिती सांगितली. कवायत करण्यात आली, अशा प्रकारे स्वातंत्र्यदिन शाळेत साजरा करण्यात आला.
योगा दिन
मंगळवार दिनांक २१ / ६ / २०२२ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये योगादिन साजरा करण्यात आला. विद्यार्थीनिंना योगाचे महत्व व्हिडीओ आणि ppt द्वारे सांगण्यात आले. तसेच सर्व शिक्षिकांसोबत विद्यार्थीनिंनी योगासने केली. योगासने आणि त्यांचे प्रकार, शरीराला होणारे फायदे सांगण्यात आले. अशाप्रकारे शाळेमध्ये योगा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
शाळेचा पहिला दिवस
बुधवार दिनांक १५ / ६ / २०२२ रोजी पालक सभा घेऊन शाळेची सुरुवात झाली. शाळेच्या विविध नियम आणि उपक्रमांची माहिती ह्यावेळी पालकांना देण्यात आली. बुधवार दिनांक १५ / ६ / २०२२ रोजी मोठ्या गटाची आणि शुक्रवार दिनांक १७ / ६ / २०२२ रोजी छोट्या गटाची, सोमवार दिनांक २० / ६ / २०२२ रोजी शिशुरंजन गटाची शाळा सुरु झाली. चित्रे आणि फुगे लावून शाळेची सजावट करण्यात आली. विद्यार्थिनींचे रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. पालक आणि विद्यार्थिनी मिळून हस्तव्यवसाय कृती करून घेण्यात आल्या. मोठ्या गटामध्ये फिंगर पपेट तयार करून घेण्यात आले व त्यावर गाणे म्हणून घेण्यात आले.. छोट्या गटामध्ये पाल्याचा आवडीचा रंग पालकांनी लिहून विद्यार्थीनिंनी फुलदाणीमध्ये फुले चिकटवणे आणि शिशुरंजन गटामध्ये कुंडीमध्ये मुलींच्या हाताचे ठसे घेणे व वाटॅरबॅग व डब्यावर पाल्याची नावे लिहिणे ही कृती घेण्यात आली. सुकामेवा खाऊ म्हणून देण्यात आला. सर्व गटातील विद्यार्थिनीना कार्टून चित्रे असलेली मेलामाईन डिश भेट म्हणून देण्यात आली. सर्व वर्गामधून पालक-शिक्षक संघाच्या निवडणुका घेण्यात आल्या तसेच मुलींसाठी शाळेचा ‘पहिला दिवस’ या सजवलेल्या फ्रेममध्ये सेल्फी पॉइंट फोटो काढण्यात आले. अशाप्रकारे अतिशय उत्साहामध्ये शाळेची सुरुवात झाली.