हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळा


इयत्ता - १ ली ते ७ वी (प्रत्येकी ४ तुकड्या)

माध्यम - मराठी.
इ. १ ली पासून सेमी इंग्रजी.

शाळेची वेळ:
इ. ५ वी ते इ. ७ वी - ७. १० ते १२. २०
इ. १ ली ते इ. ४ थी - १२. ३० ते ५. ४०

मुख्याध्यापिका: श्रीम. ज्योती राजमणी

शिक्षक: ३४. शिक्षकेतर: लेखनिक १. सेवक: ४. सफाई कामगार: २.

एकूण विद्यार्थिनी संख्या: १७८५

पालकांना शाळेत भेटण्याची वेळ:
इ. ५ वी ते इ. ७ वी - गुरुवार आणि शनिवार ११ ते १२
इ. १ ली ते इ. ४ थी - गुरुवार ११. ४५ ते १२. ३० आणि शनिवार ११. ०० ते ११. ३०

२०२४ - २५ मधील विशेष उपक्रम व क्षणचित्रे


प्रवेश प्रक्रिया

  • एप्रिल मध्ये हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागातील विद्यार्थिनींचे इ. १ ली मध्ये प्रवेश केले जातात.
  • मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वार्षिक निकालानंतर नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु होते. इ. २ री ते ७ वी मधील प्रवेश उपलब्ध जागांनुसार होतात. बाहेरील प्रवेशांबाबत प्रशालेच्या बोर्डवर उपलब्ध जागांनुसार सूचना लावल्या जातात.

शासनाच्या धोरणानुसार व नियमानुसार प्रवेश प्रक्रिया होते.



उल्लेखनिय घटना व उपक्रम

बाह्य स्पर्धा

आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा :- मराठी विज्ञान परिषद ' आयोजित आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धेमध्ये आपल्या शाळेने उत्कृष्ट सादरीकरण करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. मा. मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी यांनी याकरीता मार्गदर्शन केले.

मार्गदर्शक शिक्षक -
श्रीमती मोनाली तनपुरे
श्रीमती सुचिता सावंत
श्रीमती नूतन गोलांडे
श्रीमती हेमलता गोरे
श्रीमती तृप्ती खैरे
श्रीमती सारीका झावरे
श्रीमती शीतल वनवे

संपूर्ण प्रदर्शन स्पर्धेकरिता तसेच इतर शाळांमध्ये प्रदर्शन भरविण्याकरिता श्रीयुत दीक्षित सर श्रीमती गोगावले व श्रीयुत महाजन सर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले !!

महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पुणे महानगर पालिका आयोजित शालेय जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग क्रीडा स्पर्धा २०२४-२५ – कु. आर्या जयदेव ताठेले इ. ४ थी – तिसरा क्रमांक

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेने* आयोजित केलेल्या आशिष चांदोरकर स्मृती करंडक आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेत आपल्या शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व फिरती ढाल व चषक प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत २० शाळांनी सहभाग घेतला होता. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनयाचे मानांकन इयत्ता चौथी धरित्रीची विद्यार्थिनी कु. ऋजुल धुमाळ व सांघिक सर्वोत्कृष्ट नाट्य वाचनाचे पारितोषिक कु. राजनंदिनी तामखेडे (४थी क्षितिजा) अशी भरघोस बक्षिसे मिळाली आहेत.

दिग्दर्शन व नाट्यसंहितेचे स्वलेखन करणाऱ्या शिक्षिका - श्रीम. कविता हडवळे

सहाय्यक शिक्षिका - श्रीम. मोहिनी वाघ

क्षेत्रभेट

दिनांक १९/१०/२०२४ रोजी इयत्ता पहिलीच्या चारही वर्गातील विद्यार्थींनी निरंजन सोसायटी येथील महादेव मंदिर येथे क्षेत्रभेट दिली. या क्षेत्रभेटीत मुलींनी आजूबाजूच्या परिसरातील अनेक झाडे,झुडुपे,घरांचे विविध प्रकार, मंदिराच्या परिसरात लावलेली झाडे,परिसरातील छोटे पाळीव प्राणी तसेच मंदिराची रचना या विविध गोष्टींचे निरीक्षण केले.प्रत्येक मुलीने महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.तसेच परिसरातच झाडाखाली बसून वनभोजनाचा आनंदही घेतला.मुलींना शाळेचा खाऊ देण्यात आला. मंदिराच्या परिसरात स्वच्छता करून शाळेचा घोषणा देत पहिलीच्या मुली अतिशय आनंदाने क्षेत्रभेट करून पुन्हा शाळेत व्यवस्थितरीत्या आल्या.

पाटी पूजन

हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत खंडे नवमी निमित्त सरस्वती पूजन, पाटी पूजन व शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात आले. इ. पहिलीच्या विद्यार्थिनींनी पाटीवर देवी सरस्वती काढून आपल्या परंपरेनुसार पूजन केले इ. पहिलीच्या विद्यार्थिनींनी झेंडूच्या फुलांचे हार तयार करून सर्व वर्गांना तोरणं लावून वर्ग सजवले. खंडे नवमी व दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

भोंडला

विद्यार्थिनींनी आवडता पोशाख घालून फेर धरून विविध भोंडल्याची गाणी म्हणत भोंडल्याची खिरापत ओळखली व खिरापतीचा आस्वाद घेतला

आदिवासी दिन

समाजाभिमुख भावी पिढी घडवितांना गौरवशाली परंपरेचे जतन करण्याचा वारसा तसेच, सामाजिक न्याय वारसा तसेच सामाजिक न्याय, समानता याचे बीज विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा झाला. पर्यावरणाचा संदेश देत स्वच्छतादुतांसमवेत हुजूरपागेत श्रावणी शुक्रवार साजरा दि. ३० ऑगस्ट रोजी कात्रज येथील हुजूरपागा प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी पर्यावरणाचा संदेश देत पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या तसेच राखी पौर्णिमेनिमित्त कायम स्वच्छतेचा संदेश देणारे स्वच्छता दूत यांना पर्यावरणपूरक राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. माननीय मुख्याध्यापक ज्योती राजमणी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योत्स्ना पवार यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे नियोजन शितल वनवे, हेमलता गोरे , सारिका झावरे यांनी केले.पर्यावरण पूरक राख्या बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला. तसेच श्रावणी शुक्रवार निमित्त इयत्ता पहिली ते चौथी मध्ये निसर्ग पूजा या माध्यमातून आकाश ,वायू जल ,पृथ्वी व अग्नी या पंचतत्वांची पूजा मुख्याध्यापक व सर्व शिक्षकां द्वारे करण्यात आली व त्याचे महत्त्व मुलींनी माहितीतून आपल्या मैत्रिणींना सांगितले. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आम्ही वहीची पाने फाडणार नाही ,पाणी वाया जाऊ देणार नाही अशी शपथ घेतली. तसेच श्रावणी शुक्रवारच्या कथेतून स्वावलंबन आणि स्वयंशिस्तीचा वसा घेण्याचे वचन देखील मुलींनी दिले. माननीय मुख्याध्यापिका ज्योती राजमणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व माहिती श्रीमती शुभांगी दोडवाड यांनी सांगितली आणि गोष्ट व आभार श्रीमती पूजा परदेशी यांनी केले तसेच माननीय मुख्याध्यापिका राजमणी बाई व श्रीमती वैद्य बाई यांनी मुलींना पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.

योग दिन

नागपंचमी

बाह्य स्पर्धा - लोकनृत्य स्पर्धा

वाचनाचा संदेश देत हुजूरपागेत फोडली पुस्तकहंडी

सोमवार दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये पुस्तकहंडी फोडण्यात आली.

यावेळी विद्यार्थिनींना गोकुळाष्टमी , दहीहंडी विषयी माहिती सांगण्यात आली. वाचनाविषयी आवड निर्माण करण्याकरिता पुस्तक हंडी बांधण्यात आली होती व ती विद्यार्थिनींनीच फोडली. पुस्तक हंडीचा प्रसाद म्हणून प्रत्येक विद्यार्थिनीला एक पुस्तक शाळेकडून भेट म्हणून देण्यात आले मा. मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मोनाली तनपुरे यांनी केले. श्री. प्रसाद दीक्षित यांनी विद्यार्थिनींना श्रीकृष्ण जीवनावर आधारित कथा सांगितली. श्रीमती ज्योत्स्ना पवार, श्रीमती प्रिया गोगावले व श्री. वासुदेव महाजन , श्रीमती रूपाली बंदुके यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

गुरुवार दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या निमित्ताने विद्यार्थिनींनी भाषणे व पोवाडा असे विविधरंगी कार्यक्रम सादर केले. काही विद्यार्थिनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांची वेशभूषा परिधान करून आलेल्या होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या व अध्यक्षा म्हणून शाळेतील विद्यार्थिनी स्वराज्यसभा मंत्रिमंडळाच्या अध्यक्षा कु. मंजुश्री राऊत व पंतप्रधान कु. देवयानी भगत या उपस्थित राहिलेल्या होत्या. सूत्रसंचालन कु. मिथाली पाटील व कु. अशमी अडसूळ या विद्यार्थिनींनी केले. तर कु. रुचिता शेवते या विद्यार्थिनीने आभार मानले. हा कार्यक्रम शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला.

स्वराज्य सभा शपथ विधी समारंभ

शालेय जीवनातील शिस्तीने रचला यशस्वी वाटचालीचा पाया

'शाळेत असताना जी उत्तम शिस्त लागली, खेळ खेळले , वर्गाचे प्रतिनिधित्व केले त्यामुळेच मी आज जिथे उभी आहे तिथपर्यंत पोहोचू शकले. ' हे शब्द आहेत हुजूरपागा कात्रज शाळेची माजी विद्यार्थिनी असणाऱ्या व सध्या मुंबई येथे पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर काम पाहणाऱ्या श्रीमती रोहिणी जगताप यांचे. हुजूरपागा कात्रज शाळेतील विद्यार्थिनी स्वराज्य सभेच्या शपथविधी समारंभावेळी त्या बोलत होत्या.

स्वराज्यसभा उपक्रमांतर्गत शालेय गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या निवडणुकीतील नवनिर्वाचित सदस्यांना यावेळी शपथ देण्यात आली.

शाळेमधील अनेक आठवणींना उजाळा देत श्रीम. जगताप यांनी विद्यार्थिनींसोबत मनमोकळा संवाद साधला . हुजूरपागेची विद्यार्थिनी म्हणून शिकत असताना खेळातील व्यायाम, पौष्टिक खाण्याची सवय, अभ्यासातले सातत्य, हार न मानता प्रयत्न करत राहणे हे गुण आपोआपच रुजवले गेले व त्यांच्यामुळेच स्पर्धा परीक्षा पास होऊन पोलीस सब इन्स्पेक्टर पदापर्यंत पोहोचू शकले असं त्या म्हणाल्या. भरपूर शिका, स्वावलंबी व्हा , माघार घेऊ नका, प्रयत्न सोडू नका यश नक्की मिळेल असे त्यांनी यावेळी विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले

यावेळी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती शालिनी पाटील , सचिव मा. श्रीमती रेखा पळशीकर , विश्वस्त मा. श्री. दुष्यंत घाटगे हे मान्यवर उपस्थित होते. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती ज्योती राजमणी व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. केतकी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.  

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रिया गोगावले यांनी केले, प्रमुख पाहुण्यांची ओळख श्रीमती संगीता वाघमारे यांनी करून दिली तर आभार श्रीमती नूतन गोलांडे यांनी मांडले.

पालखी सोहळा

विठूनामाच्या गजरामध्ये रंगली हुजूरपागा नगरी !

वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणामध्ये ८ जुलै रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थिनींचा रिंगण सोहळा रंगला. शाळेतील विद्यार्थिनी विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा करून आल्या होत्या. तसेच अभंगाच्या तालावर ठेका धरून, फुगडी खेळून अगदी भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती.

विद्यार्थीनींच्या हातामध्ये भगवे झेंडे, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि गळ्यात टाळ हे पाहून जणू पंढरपूरच्या वारीलाच निघाल्याचा भास होत होता. स्वच्छता दिंडी, पर्यावरण दिंडी, पुस्तक दिंडी हे या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. विद्यार्थिनींनी विठ्ठल नामाचा गजर करीत पर्यावरण पूरक घोषवाक्यांचा संदेश आसपासच्या नागरिकांना दिला. ओल्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण, छोट्या रोपांचे वाटप, पुस्तक भेट इत्यादी महत्त्वाचे उपक्रम या दिवशी राबविण्यात आले. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रिया गोगावले यांनी केले.

नवागतांचे स्वागत 

१५ जून रोजी सकाळी शाळा ७. १० वा. भरली तेव्हा इ. १ली च्या विद्यार्थिननींचे स्वागत इ. ४थीच्या मोठ्या ताईंनी औक्षण करुन केले. शिक्षकांनी सेल्फी point तयार केले त्याठिकाणी मुलींचे फोटो काढले. शाळेच्या गेटवर तसेच वर्गावर्गामध्ये फुग्याची सजावट केली होती. मुलींना खाऊ देण्यात आला. श्रीम. गीतांजली कडू (master of Arts ) यांनी पहिलीच्या मुलीना गोष्ट सांगून त्याच गोष्टीवर आधारित चित्र काढून घेतले मुलीनी छान छान चित्रे काढून मजेशीर रंग हि भरले.  

 

राष्ट्रीय विज्ञान दिन

दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपल्या हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमधील इयत्ता सहावी व सातवी मधील विद्यार्थिनी राष्ट्रीय स्तरावर विज्ञान शिक्षण व संशोधन या क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था म्हणजेच आयसर (IISER) येथे विज्ञानाचे सादरीकरण करण्यासाठी गेल्या होत्या.

मराठी राजभाषा दिन

२७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त... हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेस.. लेखक आपल्या भेटीला.. या कार्यक्रमांतर्गत मा. श्री. अनिल दीक्षित दिग्गज हास्य कवी यांनी मराठी भाषिक खेळ या दालनाला भेट दिली. अनेक हास्यपर कविता सादर केल्या. आज मराठी भाषा गुणगौरव दिनानिमित्त रँ. र. पु. परांजपे हुजूरपागा प्राथमिक शाळा आयोजित आंतरशालेय काव्यवाचन स्पर्धेत इ. ४थी धरित्री या वर्गातील कु. मृगनयन जगताप या विद्यार्थिनीला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

क्षेत्र भेट

दि. २३/२/२०२४ रोजी इ. ४थी च्या विद्यार्थिनींनी दिली पापड उद्योग कारखान्याला भेट दिली.

क्रीडा स्पर्धा

हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत २०/२/२४ रोजी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मोठया जल्लोषात साजरे झाले. अतिशय उत्साहवर्धक जोशपूर्ण वातावरणात विविध चुरशीच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या

शिवजयंती

शिवव्याख्याता कुमारी शार्वी खोपडे हिने आपल्या वाख्यानाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींसमोर उलगडला. सोमवार दि. १९/०२/२०२४ रोजी शिवजयंती साजरी करण्यासाठी इ. ४थी च्या ४० विद्यार्थिनी व श्रीम. कविता हडवळे व श्रीम. वाघ मोहिनी व सेवक सावंत मावशी कलेक्टर आॕफिस, पुणे याठिकाणी जाऊन शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रसंगावर नृत्याचे सादरीकरण उत्तमप्रकारे केले.

हुजूरपागेत रंगवल्या रंगीबेरंगी छत्र्या...

पावसाळा म्हंटले की छत्री आलीच... हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत मुलीसाठी ऋतूमानाप्रमाणे छत्री रंगवण्याचा उपक्रम घेण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी यांनी शिक्षणासोबतच व्यवसायिक शिक्षण देण्यासाठी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. सहावी व सातवीच्या विद्यार्थीनींनी पर्यावरण, अंतराळ, विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित सुंदर चित्राचे रेखाटन या छत्री वर केले.

प्रशालेतील शिक्षिका सुचिता सावंत, शीतल वणवे, हेमलता गोरे, सारिका झावरे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

Umbrella colouring

इयत्ता पाचवीच्या वर्गाचा उपक्रम.....

कापसापासून वाती, फुल वाती, वस्त्र बनवणे. तसेच पूजेची सुपारी सजवणे. तसेच बियांपासून विविध कीटक प्राणी तयार करणे.

इ. ४ थी च्या विद्यार्थिनींनी सीड बॉल तयार करून शाळे जवळील परिसरात त्यांची रुजवण केली.

दीपावली निमित्ताने सामाजिक संदेश देणारे आकाशकंदील विद्यार्थिनींनी तयार केले.

Seed birds Seed ball Lantern making Lantern making Lantern making Deeputsav

भोंडला

शाळेत नवरात्रा निमित्त भोंडल्याचे आयोजन केले होते. हत्तीचे पूजन करून विविध भोंडल्याची गाणी म्हणत व फेर धरत विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात भोंडला खेळला. तसेच खंडे नवमी निमित्त संगणक कक्षातील संगणकांचे तसेच बाग कामासाठी लागणारे अवजारे यांचे पूजन केले.

राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमेचे औचित्य साधून पालकांसाठी पर्यावरण पूरक राखी तयार करणे स्पर्धा आयोजित केली.

श्रावणी शुक्रवार

शुक्र वार दि. ८/०९/२०२३ रोजी स. १० ते ११ यावेळेत श्रावणी शुक्रवार व निसर्गदेवता पूजनाचा उपक्रम शाळेत घेण्यात आला. इ. ४थी च्या विद्यार्थिनी निसर्ग देवता म्हणून तयार करण्यात आल्या होत्या. त्या निसर्ग देवतांचे पूजन शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती राजमणी बाई यांनी केले.

Nature Nature Leaf colouring

दहीहंडी

दहीहंडीचे औचित्य साधून विद्यार्थिनीमध्ये वाचनाची गोडी वाढावी म्हणून शाळेत पुस्तक हंडीचे आयोजन करण्यात आले. मुलींना गोष्टीचे पुस्तक देण्यात आले.

Pustak handi Pustak handi

नागपंचमी

नागपंचमी हा सण शाळेत अनोख्या पद्धतीने साजरा केला. विद्यार्थिनींसमवेत सर्पोद्यानाला भेट देली. सर्पमित्रांनी विद्यार्थिनींना सापांबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली.

Naagpanchami

क्रांति सप्ताह

हुजूरपागा प्राथमिक शाळेत क्रांतीसप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे विद्यार्थींनी मध्ये देशप्रेमाचे बाळकडू रुजवण्याचा प्रयत्न.

स्वराज्य सभा निवडणूक व शपथविधी समारंभ

हुजूरपागा प्राथमिक शाळेत प्रत्येक वर्गातून स्वराज्य सभा अंतर्गत आपापले वर्ग प्रतिनिधी निवडले. तसेच शपथविधी समारंभाला आपलीच माजी विद्यार्थिनी वरदा रांजणे कृषी अधिकारी लाभली. शपथविधी समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.

Election Election

पालखी सोहळा

विविध पारंपारिक दिंड्या व सामाजिक बांधिलकी जपत समाज प्रबोधन करण्यासाठी जल दिंडी, वाहतूक दिंडी, पर्यावरण दिंडी यांसारख्या अनेक दिंड्या पालखीत होत्या.

योग दिन

हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत योगदिन मोठ्या उत्साहात विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करत पार पडला.

Yog din

नवागतांचे स्वागत

सन २०२३-३०२४ या शैक्षणिक वर्षात हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. फुग्यांनी सजवलेली कमान, आकर्षक फलक लेखन या मुळे शालेय परिसर विद्यार्थिनी स्वागतासाठी सज्ज होता. विद्यार्थिनींचे शाळेत मोठया उत्साहात स्वागत झाल

Welcome Welcome

 



मागील वर्षांचे शालेय उपक्रम