हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळा
<<< Back to Katraj Marathi Primary page
शालेय उपक्रम २०२० - २०२१
ऑनलाईन शिक्षण
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद पण शिक्षण सुरु या शासन धोरणा नुसार ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. शिक्षक शाळेत तर विद्यार्थिनी घरी. आणि तरीही शाळेची घंटा वाजली, शाळा सुरू झाली, वर्ग सुरू. गप्पा गोष्टी करत ऑनलाईन वर्गाला सुरुवात झाली. इ. ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थींनी तंत्रस्नेही बनत ऑन लाईन शिक्षणासाठी तयार झाल्या. त्यासाठी त्यांना सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. काळाची गरज ओळखून सुरवातीचे दोन दिवस सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींना तंत्र स्नेही बनविण्यासाठी खूप परिश्रम घेतले. इ. १ ली ते इ. ४ थी च्या सर्व विद्यार्थिनिंनी आई वडिलांच्या मदतीने ऑनलाईन शिक्षण घेतले.
विद्यार्थिनींनीच्या किलबिलाटाशिवायच शाळा सुरु झाली.
जन जन में जगाओ, योग की ललक |
जिससे बदले देशभर में स्वास्थ्य की झलक ||
२१ जून योग दिना निमित्त सर्व विद्यार्थिनींनी मध्ये योग विषयी जागृती निर्माण करण्यासाठी व उदयाचा भारत सशक्त व संपन्न बनविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थिनींना ऑन लाईन तासाला योग दिनाची माहिती व महती सांगितली. तसेच विविध आसनांचे व्हिडीओ द्वारे प्रात्यक्षिक दाखवले.
पदोन्नती
श्रीमती प्रमिला गायकवाड यांची पदोन्नती होऊन हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली. त्यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारला.
ऑनलाईन पालक सभा
सध्या काळाची गरज म्हणून ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व या विषयी पालकांना मा. मुख्याध्यापिका श्रीमती प्रमिला गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्री.दीक्षित सरांनी सर्व पालकांना google meet हे app कसे वापरायचे याचे प्रशिक्षण दिले. तसेच google meet या app चा माहितीपर व्हिडीओ पालकांना सविस्तर माहिती होण्यासाठी Whatsapp ग्रुप वर सादर केला. त्या अनुषंगाने शाळेवर भरभरून प्रेम करणाऱ्या पालकांच्या खूप छान मनोगतवजा प्रतिक्रिया शाळेस प्राप्त झाल्या.
दीप अमावस्या
ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सुद्धा आपल्या संस्कृतीचा ठेवा जपत सर्व शिक्षकांनी विद्यार्थींनीचा सर्वांगिण विकास करणे या ध्येयासक्तीने विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे दीप अमावस्या होय. दीप अमावस्येची माहिती व महती सांगणारा व्हिडीओ शिक्षकांनी खास विद्यार्थिनींसाठी तयार केला, व दीप अमावस्या ऑन लाईन वर्गात अत्यंत उत्साहात साजरी केली.
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इथे नमूद करण्यास अत्यंत आनंद होतो की हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेची उज्ज्वल परंपरा राखत खालील विद्यार्थीनींनी गुणवत्ता यादीत नाव पटकावले..
अ.क्र. | विद्यार्थिनीचे नाव | इयत्ता | मिळालेले गुण | गुणवत्ता यादीतील स्थान |
१ | कु. वैष्णवी आंग्रे | इ. ५ वी | २२६ गुण | १९१ |
२ | कु. अंतरा दराडे | इ. ५ वी | २१४ गुण | ३५८ |
त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक
- श्रीम. जयश्री मुजुमले
- श्रीम. प्रिया गोगावले
- श्रीम. नूतन गोलांडे
- श्रीम. बळवंतराव शीतल
- श्री. वासुदेव महाजन
सर्वांचे खूप खूप अभिनंदन !!!
नागपंचमी
निसर्गातील अनेक जीव जंतू याप्रती विद्यार्थिनींनीच्या मनात भूतदया जोपासावी म्हणून नागपंचमी निमित्ताने शिक्षकांनी व्हिडीओ द्वारे नागपंचमीची माहिती व महती विद्यार्थिनींपर्यंत पोहचवली.
भारतीय सांस्कृतिक वारसा जपणे व नवीन पिढीला त्याचे महत्त्व कळणे या दृष्टीने प्रत्येकानेच त्याचे अवलोकन करणे खूपच गरजेचे आहे. भारताच्या जाज्ज्वल्य इतिहासाची आठवण ठेवणे व अनके थोरामोठ्याचे स्मरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. या दृष्टीने अनके सामाजिक, राजकीय, साहित्यिक, कलाकार यांच्या जन्मतिथी व पुण्यतिथी ऑन लाईन तासाला साजऱ्या करण्यात आल्या.
क्रांती सप्ताह
१५ ऑगस्ट या दिनाचे औचित्य साधून त्या सप्ताहात क्रांती सप्ताहाचे आयोजन करून विद्यार्थिनींनीच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धा आयोजन ऑनलाईन तासाला घेतल्या (जसे – कथाकथन (क्रांती कारकांच्या गोष्टी), निबंध स्पर्धा, विविध क्रांतीकारकांची माहिती सांगणे, क्रांतीकारकांचे चित्र काढणे)
शिक्षक दिन
शिकवता शिकवता आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक
या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी ऑनलाईन तासाला शिक्षक होऊन शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला व त्यायोगे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रती सर्वांनी वाहिलेली आदरांजली.
संस्थेचा वर्धापन दिन
या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी आपले शाळेप्रती प्रेम, आदर व्यक्त केला तो विविध कविता लिहून त्या सादर केल्या.
तांदूळ वाटप
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या. पण शासन धोरणा नुसार व आदेशानुसार प्रत्येक विद्यार्थिनीला शासनातर्फे तांदूळ वाटप करण्यात आला. अत्यंत नियोजनबद्ध व कोविड 19 संदर्भातील सर्व नियम पाळून पालकांना तांदूळ व डाळींचे वाटप करण्यात आले. या कार्यात पालकांची बहुमोलाची साथ लाभली.
वाचन प्रेरणा दिन
विद्यार्थिनींनीचे वाचन वाढावे त्यांनी अनेकोत्तम पुस्तकं वाचावी या कडे शिक्षक जातीने लक्ष देतात. त्यासाठी शाळेने मुलींकरिता अद्ययावत ग्रंथालय उपलब्ध करून दिलेले आहेत. परंतु या वर्षीची थोडी परिस्थिती वेगळीच असल्याने शिक्षकांनी वेगवेगळ्या शक्कल लढवत मुलींना वाचनास प्रवृत्त केले. व खऱ्या अर्थाने वाचन प्रेरणा दिन साजरा झाला.
विजयादशमी व पाटी पूजन
विजयादशमी निमित्त सर्व मुलींनी ऑनलाईन तासाला पाटीपूजन केले. तसेच इ. ३ रीच्या विद्यार्थिनींनी आगळावेगळा उपक्रम शिक्षकांच्या मदतीने सादर केला.
शाळा व्यवस्थापन सभा
शासकीय परिपत्रकानुसार शाळा व्यवस्थापन सभा ऑन लाईन घेण्यात आली. या सभेस पालक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सभासद तसेच मा. दिपाली जोगदंड (संपर्क प्रमुख तथा अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासन), मा. शिल्पकला रंधवे (प्रकल्प अधिकारी समग्र शिक्षा अभियान), मा. अविनाश महाजन विषयतज्ज्ञ उपस्थित होते.
क्रीडा महोत्सव
आपल्या हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागामध्ये दरवर्षी क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहाने पार पडतो. अनेक क्रीडा प्रकारांमध्ये निपुण असणाऱ्या खेळाडूंचे मार्गदर्शन या निमित्ताने विद्यार्थीनींना लाभते. विविध खेळांचा आनंद त्या घेतात. परंतु या वर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा केवळ ऑनलाईन सुरु आहे. तरी देखील या संकटावर मात करत आपण क्रीडा महोत्सव साजरा केला.
स्नेह संमेलन
दरवर्षी नाविण्य पूर्ण असे असलेले स्नेह संमेलन !! या वर्षी करोना महामारी ला न जुमानता विद्यार्थिनींनी स्नेह संमेलनाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. सर्व विद्यार्थिनींचा घरी राहूनच पण उत्साहाने स्नेह संमेलनात सहभाग होता. स्नेह संमेलनाच्या निमित्ताने शाळेच्या शाला समिती अध्यक्ष मा. श्रीमती शालिनीताई पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले.
पुन्हा शाळेची घंटा वाजली
शासन आदेशानुसार करोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी झाल्याने इ. ५ वी ते ७ वी ची शाळा सर्व खबरदारी घेत सुरु झाली. शाळेत पुन्हा एकदा किलबिलाट सुरु झाला. त्याचे औचित्य साधून विद्यार्थिनींनीचे स्वागत केले. तसेच त्यांना साहित्य वाटप केले.
शिव जयंती
विद्यार्थिनींनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.शिवराय शिवजयंती निमित्त प्रत्येक घरात पोहचावे म्हणून आपल्या शाळेतील शिक्षिका श्रीम. ज्योत्स्ना पवार यांनी आपल्याला भावलेला शिवरायांचा इतिहास विद्यार्थिनींना रंगावालीतून साकारण्यास प्रोत्साहन दिले. तसेच शिवजयंती निमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोवाडे, नाटक, नृत्य बसविले व सादर केले.
शालेय उपक्रम २०१९ - २०२०
पालखी सोहळा
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती | रखुमाईच्या पती सोयरिया ||
गोड तुझे रूपं गोड तुझे नाम | देई मज प्रेम सर्व काळ ||
पंढरीची वारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे अध्यात्मिक सांस्कृतिक वैभव. लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर मुखी विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने, आनंदाने शिस्तीत वारीत सामील होतात. हा भक्तिरसाचा वारसा विद्यार्थिनींनी मधे रुजविण्यासाठी शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी दिंडी, वृक्ष दिंडी, डिजिटल दिंडी, पर्यावरण दिंडी, जलदिंडी अशा विविध दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते.




पालक शाळा
इ. १ ली ते ७ वी च्या सर्व वर्गांच्या पालक सभा झाली. पालक सभेत साधारणपणे शाळेच्या शिस्तीचे नियम, विविध उपक्रमांची माहिती, अभ्यासक्रम, व शालेय शैक्षणिक धोरणाला अनुसरून इतर अनेक विषयांवर चर्चा घेण्यात आली. पालकांनी या पालक सभांना उत्तम प्रतिसाद दिला.


योग दिवस
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शरीर आणि मन निरोगी रहाण्यासाठी योगासने, प्राणायाम करण्याची गरज असते. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये ताडासन, वृक्षासन, पद्मासन, भुजंगासन, नौकासन तसेच प्राणायाम इ. घेण्यात आले. त्यामध्ये सर्व विद्यार्थिनी, शिक्षक सहभागी झालेले होते. मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक, क्रीडाशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योगदिन खुप उत्साहात, जोशात साजरा झाला.





नवागतांचे स्वागत
मे महिन्याची सुट्टी संपली की ओढ लागते ती शाळेची! नवीन दप्तर, नवीन पुस्तके, वह्या आणि नवीन शाळा!! इयत्ता पहिलीत प्रवेश घेणार्या चिमुकल्यांना अशीच नाविन्याची ओढ असते. शाळेत आलेल्या या नवागतांचे स्वागत करण्यास वर्ग खोल्या सजल्या होत्या. विद्यार्थिनींना नवीन पुस्तके दिलीत. खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस म्हणून बुद्धि देवता शारदा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.





शालेय उपक्रम २०१८ - २०१९
शुभ दीपावली
यशाची रोषणाईसमाधानाचा फराळ मंगलमय रांगोळी
मधुर मिठाई आकर्षक आकाशकंदील
आकाश उजळवणारे फटाके
हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागात मोठ्या उत्साहात व आनंदात फटाके विरहीत दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थिनीला एक पणती, आकाशकंदील व लाडू चिवडा शाळेकडून दिवाळीची भेट म्हणून देण्यात आले. विद्यार्थिनींनी मिळालेली पणती सुरेख रंगवली व त्याच पणत्या वापरून दिव्यांची रोषणाई केली, मोठ्ठी रांगोळी काढून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.






सरदार वल्लभ भाई पटेल जयंती
३१ ऑक्टोबर, मरणोत्तर भारतरत्न असा किताब मिळालेले सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती शाळेत साजरी झाली. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थिनींसमोर त्यांचा जीवनपट थोडक्यात उलगडला व त्यांचा फोटोचे पूजन केले.
खंडेनवमी - शस्त्र पूजन, दसरा - पाटीपूजन
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत खंडेनवमी व पाटीपूजन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. पाटीवर काढलेल्या सरस्वतीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींना या दिवसांचे महत्व सांगण्यात आले.


भोंडला
हस्त नक्षत्रावर साजरा केला जाणारा अश्विन महिन्यातील नवरात्र हा सण. या नऊ दिवसांमध्ये सर्वत्र भोंडला साजरा करतात. आपल्या शाळेत देखील दि. १५ आॅक्टोबरला हत्तींच्या प्रतिमेचे पूजन करून, फेर धरून गाणी गाऊन हा दिवस साजरा केला. खिरपतीचे वाटप केले.




वाचन प्रेरणा दिन
दि. १५ आॅक्टोबर माजी राष्ट्रपती डा. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करतो. या वर्षी विविध पुस्तकांचे वाचन विद्यार्थिनींनी केले. वर्गावर्गातून विद्यार्थिंनींना त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. या प्रसंगाचे औचित्य साधून मा. मुख्याध्यापिका श्रीम. जावडेकर बाईंनी विद्यार्थिनींना विविध पुस्तके दिली.




हिंदी दिन
१४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा करतात. इ. ५ वी च्या सर्व विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण वातावरणात हिंदी दिन साजरा केला. या दिवशी काही विद्यार्थिनींनी हिंदीतून गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. वर्गशिक्षकांनी हिंदी भाषेच्या पुस्तकांचे वाचन, हिंदी भाषिक खेळ असे आयोजन केले होते. श्री. महाजन सर व श्रीम. मुजुमले बाई यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सर्व विद्यार्थिनींना सांगितले.





नो हॉर्न डे
दि. १२ सप्टेंबर २०१८ रोजी आर. टी. ओ. पुणे व पुणे शहर वाहतूक पोलिस यांचेकडून 'नो हॉर्न डे' साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून जनजागृती करण्यासाठी राजस सोसायटीच्या चौकात हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या एकूण ४० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.





गणपती रंगवणे स्पर्धा
दर वर्षी प्रमाणे या वर्षीही इ. ५ वी ते इ. ७ वीच्या विद्यार्थिनींची गणपती रंगवणे स्पर्धा शनिवार दि. ८ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत ४३५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.



शिक्षकदिन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते थोर विद्वान व हाडाचे शिक्षक होते. आपल्या शिकविण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून त्यांनी भावी सर्व शिक्षक परिवारासाठी आदर्श घालून दिला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत सुद्धा शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन मुख्याध्यपिका, पर्यवेक्षक, लेखनिक, शिपाई यांची भूमिका अगदी चोख पार पाडली. तसेच काही विद्यार्थिनी कात्रज विभागातील शिशुमंदिर विभागात शिक्षिका म्हणून गेल्या होत्या.
ज्या विद्यार्थिनी शिक्षिका झाल्या होत्या त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांना शाळेकडून खाऊ वाटप करण्यात आला.




पुस्तकहंडी
दहीहंडीचे औचीत्त्य साधून हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत मंगळवार दि. ४ सप्टेंबर रोजी पुस्तकहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. इ. ६ वीच्या विद्यार्थिनींचा यात सहभाग होता. श्रीम. मोनाली तनपुरे यांनी दहीहंडी विषयी माहिती सांगितली व मा. मुख्याध्यापिका श्रीम. उन्नती जावडेकर यांच्या हस्ते इ. ६ वीच्या सर्व विद्यार्थिनींना शाळेकडून पुस्तक कायमस्वरूपी भेट देण्यात आले. सर्व पुस्तके एकमेकींना हस्तांतर करून वाचन करण्याचे आवाहन करण्यात आले.





पदभार सांभाळणे

शालेय परिवहन समिती
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ सालासाठी शालेय परिवहन समितीची स्थापना करण्यात आली. समितीमध्ये स्थानिक नगरसेवक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रिक्षावाले, व्हॅनवाले काका या सर्वांना आमंत्रित करण्यात आले.
सभेसाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. उन्नती जावडेकर व शिशुमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. उमा गोसावी तसेच शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. सभेमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षित वाहतुकीवर तसेच सर्व काकांना येणाऱ्या समस्या व त्यावरील उपायांवर चर्चा करण्यात आली. सर्वांना वाहतुकीचे नियम सांगण्यात आले. तसेच रिक्षावाले व व्हॅनवाले काका यांच्यामधून प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
पालक शिक्षक संघ
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये पालक शिक्षक संघ व माता पालक संघाची स्थापना करण्यात आली. माजी उपाध्यक्ष यांना श्रीफळ देऊन त्यांच्या जागी आवाजी मतदानाने या वर्षीच्या पालक शिक्षक संघ, माता पालक संघाच्या उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे कार्यकारी मंडळ मागील वर्षाप्रमाणेच राहील. या समितीतील सदस्य सलग २ वर्षे काम पाहतात. या तीनही संघाच्या अध्यक्ष पदी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. उन्नती जावडेकर आहेत. पालक शिक्षक संघ उपाध्यक्षपदी श्रीम. सुजाता व्हावळ, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष श्रीम. सुनिता केकान तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. खंदारे हे आहेत.
गुरुपौर्णिमा
|| गुरु ईश्वर तात माय | गुरुविण जगी थोर काय ||आषाढ शुध्द पौर्णिमेलाच आपण गुरु पौर्णिमा असेही म्हणतो. आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा मंगल दिवस. जीवनाच्या प्रत्येक वळणावर विविध रुपात गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. प्राथमिक शाळेत सुद्धा गुरु पौर्णिमा अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. उन्नती जावडेकर व पालक शिक्षक संघातील पालक यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सत्कार विद्यार्थिनींच्या हस्ते श्रीफळ देऊन केले.
नागपंचमी
निसर्ग आपुला सखा सोबती या उक्ती प्रमाणेच निसर्गातील सर्व प्राणीमात्रांवर द्या करा. असे सांगणारा नागपंचमी हा सण शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नागपंचमी निमित्ताने शनिवार दि. ११ ऑगस्ट रोजी पालक, विद्यार्थिनी व शिक्षक यांची मेंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी शिशुमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका मा. उमा गोसावी, इंग्रजी माध्यमाची कला शिक्षक श्रीम. निवंगुणे व माजी शिक्षिका श्रीम. शैला आमडेकर हे परीक्षक म्हणून लाभले. पालक शिक्षक संघांतील पालकांनी इ. १ ली व इ. २ रीच्या विद्यार्थिनींच्या हातावर मेंदी काढली.
राखी पौर्णिमा
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधनघेऊन आला श्रावण
लाख लाख शुभेच्छा
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण ||
अशाप्रकारे भाऊ-बहिण यांच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणजेच राखी पौर्णिमा. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व काही विद्यार्थिनी पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहिलो. शाळेतील कला शिक्षिका श्रीम. गजमल यांनी विद्यार्थिनींकडून सुरेख राख्या तयार करून घेतल्या होत्या. त्याच राख्या विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी पोलिसांना बांधल्या, औक्षण केले व प्रत्येकाचे तोंड गोड केले.

क्रांतिसप्ताह
भारताचा हा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्यांनी केलेली सर्वस्वाची होळी आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेकांनी केलेला त्याग असे स्वातंत्र्याचे अमूलत्व पुढच्या पिढीपर्यंत पोहचावे, त्यांच्यात राष्ट्रभक्ती जागृत रहावी या हेतूने हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत दरवर्षी क्रांतिसप्ताहाचे आयोजन करण्यात येते. मा. मुख्याध्यापिका उन्नती जावडेकर यांनी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन केले. या प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या सप्ताहात कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांनी क्रांतीकारकांची रोमहर्षक चरित्रे कथारूपाने विद्यार्थिनींना सांगितली.
स्वातंत्र्य प्राप्त झाले. ते टिकविणे व त्याचे संवर्धन करून ते सशक्त करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्यच आहे. तसेच सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया थांबवणे व आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करणे हे देखील अतिशय महत्त्वाचे आहे. शत्रूंपासून आपल्या भारताचे रक्षण करण्याचे अलौकिक कार्य आपले सैनिक सर्व सुखांचा त्याग करून, खडतर परिस्थितीचा सामना करत, आपल्या कुटुंबापासून शेकडो मैल दूर राहून अतिशय निष्ठेने करीत असतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांचे मनोबल वाढविणे यासाठी शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी जवानांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून राख्या पाठविण्याचा उपक्रम देखील क्रांती सप्ताहात राबविण्यात आला.
श्रावणी शुक्रवार
निसर्गाचे आपल्यावर अगणित ऋण आहे. याच ऋणाची जाणीव व्यक्त करण्यासाठी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये वसुंधरा पूजनाचा तसेच निसर्ग पूजनाचा कार्यक्रम शुक्रवार दि. ३१ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. सुर्य, झाड, आकाश, पाणी, फूल यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांचे पूजन करण्यात आले. निसर्गातील या देवतांची माहिती व महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले.
याच दिवशी विद्यार्थिनींनी आदिशक्तीचे पूजन करून भक्तिमय वातावरणात श्रावणी शुक्रवार साजरा केला. श्रावणी शुक्रवारची कहाणी सांगण्यात आली तसेच देवीची आरती, गजर घेण्यात आला व प्रसाद वाटण्यात आला.

स्वराज्य सभा
विद्यार्थिनींना लोकशाहीचे महत्त्व कळून जबाबदार नागरिकत्वाचे बाळकडू शालेय जीवनापासूनच मिळावे या हेतूने शालेय मंत्री - मंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते. १ ली ते ७ वीच्या निवडून आलेल्या विद्यार्थिनी मंत्र्यांना स्वराज्य सभा शपथविधी समारंभात शपथ देण्यात येते. या समारंभास राजकारणातील व्यक्तींना शाळा आमंत्रित करते. यावर्षी दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी स्वराज्य सभा शपथविधी समारंभास आमदार श्रीम. मेघा कुलकर्णी ह्या प्रमुख पाहुण्या, तसेच म.ग.ए. संस्थेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. सुधीर निरफारके हे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थिनींना राजकारणातील अनुभवांचे मोलाचे मार्गदर्शन केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. गालिंदे व श्रीम. जावडेकर यांनी नवनिर्वाचित मंत्रिमंडळास गोपनियतेची व पदाची शपथ दिली. या कार्यक्रमास श्री. वसंत मोरे, मा. राजाभाऊ कदम, मा. श्रीम. मनिषाताई कदम, मा. राणीताई भोसले इ. नगरसेवक तसेच काही सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच सर्व विभागांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.



बालसभा
दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या दोन्हींचे औचित्य साधून शाळेत इ. ५ वी च्या विद्यार्थिनींनी मा. मुख्याध्यापिका जावडेकर बाई तसेच इ. ५ वीच्या सर्व वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाने बालसभेचे आयोजन केले. या सभेसाठी स्वराज्य मंत्रिमंडळाची अध्यक्षा कु. गीतांजली काळभोर व पंतप्रधान कु. कस्तुरी वाघ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस सुरुवात झाली. बाल सभेचे सूत्र संचालन कु. आर्या गायकवाड हिने केले. इ. ५ वी च्या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणाद्वारे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे जीवनपट उपस्थित विद्यार्थिनींपुढे उलगडला. कु. वैभवी बहिरट हिने सर्व उपस्थितांचे आभार मानले. अशाप्रकारे बालसभा संपन्न झाली.
रमजान ईद
कुठे बसंती, कुठे पंचमी अथवा दुर्गामाता,पोळा, पोंगल, ईद, इराही इथेच नांदे समता
रंग, ढंग जरी वेगवेगळे प्रेम दिसे मज नामी
हिंदू-मुस्लिम, सीख न ख्रिस्ती सारे एकच आम्ही
सर्वधर्मसमभावाचे मूल्य आपण जोपासतो, हेच मूल्य विद्यार्थिनींमध्ये रुजावीत यासाठी शाळेत विविध धर्मांचे सण साजरे करतो. त्याचप्रमाणे दि. २०/६/२०१८ रोजी शाळेत रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. लोकमतच्या प्रतिनिधी हलिमा अब्दूल कुरेशी या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. त्यांनी ईद सणाविषयी, त्यांच्या धर्माविषयी, भारतातील एकतेविषयी विद्यार्थिनींना अनमोल मार्गदर्शन केले. शाळेतील मुस्लिम विद्यार्थिनींनी पवित्र सण रमजान ईद विषयी माहिती सांगितली. मुस्लिम पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. रंजना नाईक बाईंनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.






पालखी सोहळा
जरी सुखासाठी तळमळशी | तरी पंढरी जाई एक वेळ ||सर्व सुखाचे आगर | बाप रखुमाई देवीवरु ||
पंढरीची वारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे अध्यात्मिक सांस्कृतिक वैभव. लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर मुखी विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने, आनंदाने शिस्तीत वारीत सामील होतात.
हा भक्तिरसाचा वारसा विद्यार्थिनींमधे रुजविण्यासाठी शुक्रवार दि. १३ जुलै रोजी शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी दिंडी, वृक्ष दिंडी, डिजिटल दिंडी,पर्यावरण दिंडी, जलदिंडी अशा विविध दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते.
योग दिन
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शरीर आणि मन निरोगी रहाण्यासाठी योगासने, प्राणायाम करण्याची गरज असते.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये ताडासन, वृक्षासन, पद्मासन, भुजंगासन, नौकासन तसेच प्राणायाम इ. घेण्यात आले. त्यामध्ये सर्व विद्यार्थिनी, शिक्षक सहभागी झाले होते. मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक, क्रीडाशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योगदिन खुप उत्साहात, जोशात साजरा झाला.





सेवापूर्ती समारंभ

नवागतांचे स्वागत
दिवस उजाडल्याची माहिती मिळतेपक्ष्यांच्या चिवचिवाटाने आणि
नव शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते
चिमुकल्यांच्या आगमनाने ||
खरंच उन्हाळी सुटीत शांत झालेली कात्रज प्रशालेची इमारत चिमुकल्यांच्या आगमनाने गजबजून गेली. अत्यंत प्रसन्न वातावरणात शुक्रवार दि. १५ जून २०१८ रोजी शाळेच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. विद्यार्थिनींनाचा उत्साह, आनंद, द्विगुणीत करण्यासाठी सर्व विद्यार्थिनींना खाऊ म्हणून लाडू देण्यात आले. पुस्तकांचे वाटप केले, इ. १ लीच्या विद्यार्थिनींना प्ले शेड मध्ये पपेट शो दाखविण्यात आला तसेच त्यांना टोप्या दिल्या. या दिवशी पालक शिक्षक संघातील पालकांनी विद्यार्थिनींना व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले. नव्या उमेदीने, आनंदाने शाळेच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.
शालेय उपक्रम २०१७ - २०१८
पुणे गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये ८०० पेक्षा कमी गटामध्ये हुजूरपागा कात्रज शाळेने मिळविलेले यश
क्रीडा स्पर्धा सन २०१७-१८ | |||
---|---|---|---|
पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे
८०० पेक्षा कमी विद्यार्थिनी गटात सांघिक - स्पर्धा |
|||
१ | लंगडी | लहान गट | उपविजयी संघ |
२ | कबड्डी | लहान गट | विजयी संघ |
३ | मारचेंडू | लहान गट | विजयी संघ |
सांघिक - स्पर्धा लहान गट विजेते पद | ||
---|---|---|
ड्रील - स्पर्धा | ||
१ | योगासन | तृतीय क्रमांक |
२ | सुर्य नमस्कार | तृतीय क्रमांक |
३ | कॅलेस्थानिक | द्वितीय संघ |
४ | लेझीम | प्रथम क्रमांक |
५ | लोकनृत्य | प्रथम क्रमांक |
सर्व ड्रील - स्पर्धा उपविजेते पद |
स्वामी विवेकानंद विचार मंच | |||
---|---|---|---|
वकृत्व - स्पर्धा | |||
१ | कु. भुमी विजय कुंभार | इ. ७ वी | द्वितीय क्रमांक |
२ | कु. वैष्णवी अमित मुधोळ | इ. ७ वी | तृतीय क्रमांक |
नाट्य छटा - स्पर्धा | |||
३ | कु. गीतांजली पांडुरंग काळभोर | इ. ६ वी | प्रथम क्रमांक |
४ | कु. आदिती अरविंद राऊत | इ. ६ वी | द्वितीय क्रमांक |
५ | कु. मानसी प्रविण थिटे | इ. ६ वी | तृतीय क्रमांक |
पद्य पाठांतर - स्पर्धा | |||
६ | कु. श्रावणी भिलारे | इ. ५ वी | प्रथम क्रमांक |
७ | कु. मुग्धा महेश सुरनीस | इ. ५ वी | द्वितीय क्रमांक |
उतारा पाठांतर - स्पर्धा | |||
८ | कु. वैष्णवी अमित मुधोळ | इ. ७ वी | प्रथम क्रमांक |
संस्कृत सुभाषित पाठांतर - स्पर्धा | |||
९ | कु. वैभवी नंदकुमार कुरुम | इ. ७ वी | प्रथम क्रमांक |
१० | कु. मधुरा विजय डेरे | इ.७ वी | द्वितीय क्रमांक |
गीताधर्म मंडळ | |||
---|---|---|---|
गीता पाठांतर स्पर्धा | |||
१ | कु. प्रतीक्षा आरोटे | इ. ३ री | तृतीय क्रमांक |
वन्यजीव सप्ताह स्पर्धा
पुणे महानगरपालिकेतर्फे राजीव गांधी प्राणी संग्रहालय व इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रालय येथे "वन्यजीव सप्ताह" निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दि. १/१०/२०१७ रोजी
अनु. क्र. | दिनांक | स्पर्धेचे नाव | विद्यार्थीनीचे नाव | क्रमांक |
---|---|---|---|---|
१. | १/१०/२०१७ | टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार करणे | कु. ऋतुजा नागनाथ केकान | प्रथम |
२. | कु. नेहा नितिन येवारे | द्वितीय | ||
३. | २/१०/२०१७ | चित्रकला स्पर्धा | कु. नंदिनी बाळय्या स्वामी | द्वितीय |
४. | कु. नेहा नितिन येवारे | तृतीय | ||
५. | ३/१०/२०१७ | रांगोळी स्पर्धा | कु. श्रेया धनंजय कालेकर | प्रथम |
६. |
६/१०/२०१७ |
पथनाट्य स्पर्धा |
कु. प्रणिता प्रशांत पवार | |
कु. मानसी प्रविण थिटे | ||||
कु. पूर्वा समीर कोकाटे | ||||
कु. अदिती अरविंद राऊत | ||||
कु. गीतांजली पांडुरंग काळभोर | ||||
कु. ऐश्वर्या बालाजी किवडे | ||||
कु. सिद्धी आशिष खांडरे | ||||
कु. हर्षदा मनोज विसपुते | ||||
कु. पल्लवी विनय बोंडगे | ||||
कु. साक्षी संतोष कदम |

वनराई करंडक
वनराई पर्यावरण वाहिनी तर्फे घेतल्या जाणाऱ्या वनराई करंडक स्पर्धेत नृत्य आणि गायन विभागात हुजूरपागा कात्रज विभागाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेसाठी गाणे लिहिले आहे. शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सुचिता सावंत यांनी गाण्याला स्वरसाज चढविला. शाळेतील संगीत शिक्षिका श्रीमती गायत्री साठे यांनी तसेच शाळेतील सहशिक्षक श्री. दीक्षित सर यांनी ढोलकी वर साथ दिली.
नाट्य स्पर्धा
चंद्र सुर्य रंगभूमी तर्फे घेतल्या गेलेल्या नाट्यस्पर्धेत हुजूरपागा कात्रज शाळेला तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेतील नाटकाचा विषय – मी आणि दहशतवादी हल्ला. या नाटकाचे लेखन केलं आहे हुजूरपागा कात्रज शाळेतील सहशिक्षिका श्रीमती प्रिया गोगावले यांनी.

सहल
शैक्षणिक सहलींना विद्यार्थिनींच्या विकासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असते. निरिक्षण शक्ती वाढीस लागते. आपल्या भोवतालचा समाज व निसर्ग यांच्याशी असलेले आपले नाते दृढ होते. विद्यार्थिनी अनुभवसंपन्न होतांनाच आनंदही लुटतात.
पहिली :- केतकावळे, बनेश्वर, शेती
दुसरी :- शिरगाव, पार्ले बिस्कीट, भोसरी गार्डन
तिसरी :- हाडशी, लोणावळा
चौथी :- शिवनेरी, ओझर
पाचवी :- चोखी ढाणी
सहावी :- सज्जनगड, ठोसेघर, चाळकेवाडी
सातवी :- कोल्हापूर, कण्हेरी मठ, पन्हाळा






शिक्षण दिन
देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दूल कलाम आझाद यांचा जन्म दिवस ११ नोव्हेंबर शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत मौलाना अब्दूल कलाम आझाद यांच्या स्मृतीस अभिवादन करून विद्यार्थिनींना शिक्षण दिनाची माहिती सांगितली


विद्यार्थी दिन
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शालेय जीवनाचा प्रवास ज्या दिवशी सुरु झाला तो दिवस म्हणजे ७ नोव्हेंबर. ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.
विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धांमध्ये भाग घेतला.


शुभ दीपावली
समाधानाचा फराळ मंगलमय रांगोळी
मधुर मिठाई आकर्षक आकाशकंदील
आकाश उजळवणारे फटाके




वाचन प्रेरणा दिन
१५ ऑक्टोबर हा अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. अब्दुल कलाम हे हाडाचे शिक्षक होते. यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी आवर्जून पुस्तके वाचली. इ. १ ली व २ री च्या विद्यार्थिनींना गोष्टीची पुस्तके वाचण्यास दिली. तसेच इ. ५ ते ७ च्या विद्यार्थिनींनी अब्दुल कलमांची पुस्तके वाचली.
खंडेनवमी आणि पाटीपूजन
| उत्सव आला विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा |
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत खंडेनवमी आणि पाटीपूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. इ. १ ली ते इ. ४थी च्या विद्यार्थिनी या दिवशी आवडीचा पोशाख घालून आल्या. १ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थिनींनी पाटीवर सरस्वती काढून पूजन केले.
त्याच प्रमाणे मा. मुख्याध्यपिका श्रीम. रंजना नाईक व इतर शिक्षकांनी शाळेतील सर्व लोखंडी वस्तू व शस्त्रांची पूजा केली. या उपक्रमाची माहिती माईकवरून सर्व विद्यार्थिनींना सांगितली.

भोंडला
ऐलोमा पैलोमा गणेश देवा |
माझा खेळ मांडीयेला करीन तुझी सेवा ||
हे गाणं ऐकलं कि आठवतो तो भोंडला. अश्विन प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत जे देवीचे नवरात्र साजरे होते, त्या नऊ दिवसांत भोंडला साजरा करतात. भोंडल्यालाच हादगा असेही म्हणतात. हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून फेर धरून विविध गाणी म्हणतात व प्रत्येकीने आणलेली खिरापत ओळखतात. असा हा भोंडला हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्तेनुसार इ. १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थींनींना फेर धरून गाणी म्हटली. सुरवातीलाच मा. मुख्याध्यपिका रंजना नाईक यांनी हत्तीच्या प्रतिमेचे पूजन केले. श्रीम. साठेबाईंनी गाणी म्हटली. गाणी संपल्यावर मुलींनी खिरापत ओळखली. सर्व मुलींना खिरापत वाटण्यात आली. अशा प्रकारे पारंपारिक संस्कृती जपणारा भोंडला आमच्या शाळेत आनंदाने साजरा करण्यात आला.


शिक्षकदिन (५ सप्टेंबर २०१७)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते थोर विद्वान व हाडाचे शिक्षक होते. आपल्या शिकविण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून त्यांनी भावी सर्व शिक्षक परिवारासाठी आदर्श घालून दिला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत सुद्धा शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन मुख्याध्यपिका, पर्यवेक्षक, लेखनिक, शिपाई यांची भूमिका अगदी चोख पार पाडली. तसेच काही विद्यार्थिनी कात्रज विभागातील शिशुमंदिर विभागात शिक्षिका म्हणून गेल्या होत्या. ज्या विद्यार्थिनी शिक्षिका झाल्या होत्या त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांना शाळेकडून खाऊ वाटप करण्यात आला.






गणपती बनविणे कार्यशाळा (२४ ऑगस्ट २०१७)
पुणे महानगरपालिका आयोजित गणपती बनविणे कार्यशाळा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या इ. सातवी ते दहावी साठी असलेल्या उपक्रमात हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या २५ विद्यार्थिनी सहभागी झाल्याने विद्यार्थिनींची नावे गिनिज बुक मध्ये गेली आहेत.





गणपती रंगवणे स्पर्धा (२२ ऑगस्ट २०१७)
इ. ५ वी ते इ. ७ वी च्या ४७५ विद्यार्थिनींनी गणपती रंगवणे स्पर्धेत भाग घेतला अशा प्रकारे विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य सतत चालू असते.
पुस्तकहंडी (१४ ऑगस्ट २०१७)
दहीहंडीचे औचीत्त्य साधून शुक्रवार दि. २६ ऑगस्ट रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत पुस्तकहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. इ. ६ वी च्या विद्यार्थिनींचा यात सहभाग होता. मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक यांच्या कल्पनेतून इ. ६ वी च्या सर्व विद्यार्थिनींना शाळेकडून पुस्तक कायमस्वरूपी भेट देण्यात आले. सर्व पुस्तके एकमेकींना हस्तांतर करून वाचन करण्याचे आवाहन करण्यात आले.




श्रावणी शुक्रवार (१८ ऑगस्ट २०१७)
निसर्गाचे आपल्यावर अगणित ऋण आहेत. याच ऋणाची जाणीव व्यक्त करण्यासाठी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये वसुंधरा पूजनाचा तसेच निसर्ग पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सुर्य, झाड, आकाश पाणी, फूल, यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांचे पूजन करण्यात आले. निसर्गातील या देवतांची माहिती व महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले.
याच दिवशी इ. ३ री व इ. ४ थी च्या विद्यार्थिनींनी आदिशक्तीचे पूजन करून भक्तिमय वातावरणात श्रावणी शुक्रवार साजरा केला. श्रावणी शुक्रवारची कहाणी सांगण्यात आली तसेच देवीची आरती, गजर घेण्यात आला व प्रसाद वाटण्यात आला.


राखी पौर्णिमा (१२ ऑगस्ट २०१७)
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला श्रावण
लाख लाख शुभेच्छा
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण ||
अशाप्रकारे भाऊबहिण यांच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणजेच राखी पौर्णिमा. दि. १६ ऑगस्ट रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व काही विद्यार्थिनी पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे सकाळी ८.४५ वाजता उपस्थित राहिलो. शाळेतील कला शिक्षिका श्रीम. गजमल यांनी विद्यार्थिनींकडून सुरेख राख्या तयार करून घेतल्या होत्या. त्याच राख्या विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी पोलिसांना बांधल्या, औक्षण केले व प्रत्येकाचे तोंड गोड केले.
विद्यार्थिनी व शिक्षकांसाठी हा अनोखा अनुभव होता. तेथील श्री. श्रीकांत शिंदे यांनी आमच्या सर्व विद्यार्थिनींना पोलिस स्टेशनचे कामकाज कसे चालते ते सविस्तर सांगितले. वॉकी – टॉकीवरचे प्रत्यक्ष बोलणे एकून तर विद्यार्थिनी हरखूनच गेल्या. पोलिसांजवळ असलेल्या विविध बंदुकांची माहिती त्यांनी विद्यार्थिनींना दिली व त्या सर्व बंदुकी विद्यार्थिनींना पाहायला मिळाल्या. तसेच त्या स्टेशनच्या अखत्यारीत असलेल्या सर्व चौकातील रहदारी CCTV कॅमेऱ्याने तेथील स्क्रीनवर बघता आली. हा सर्व अनुभव विद्यार्थिनी व शिक्षकांसाठी खूपच छान व वेगळा होता.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे मुख्य पोलिस अधिकारी यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून सामाजिक भान प्रत्येक नागरीकाला येणं किती गरजेचे आहे हे पटवून दिले.




क्रांतिसप्ताह (८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट)
जनन – मरण हे तुझ्याचसाठी, टिळा मातीचा लावीन माथी |
सार्वभौमत्व हे भारतभूचे, अभंग आपण राखूया,
चला चला रे तिरंगा खांद्यावर मिरवू या !!
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्मृती मनात सतत तेवत राहाव्यात याच हेतूने हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत क्रांतिसप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशप्रेम, सांघिक भावना, सामाजिक भान इ. नीतिमुल्ये विद्यार्थिनींच्या मनात रुजविली जातात.
क्रांती सप्ताहाचे औचित्य साधून विद्यार्थिनींच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. इ. ३ ते ७ वी च्या विद्यार्थिनींची कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. तसेच इ. ७ वी च्या विद्यार्थिनींची निबंध स्पर्धा घेण्यात आली.
आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आपल्या भावना व्यक्त करणारे पत्रलेखन इ. ७ वी च्या विद्यार्थिनींनी केले, ही पत्रं व राख्या सीमेवरील सैनिक बांधवांना पाठविण्यात आल्या व त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला गेला.






बालसभा (१ ऑगस्ट २०१७)
विद्यार्थिनींना शालेय जीवनापासूनच देशभक्तीचे बाळकडू मिळावे व प्रत्येकीच्या मनात देशभक्ती जागृत रहावी, पूर्व सुरींनी केलेले बलिदान स्मरणात रहावे इ. उद्देशांसाठी महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करत असतो.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आक्रमक व जहाल नेतृत्व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनी दि. १ ऑगस्ट २०१७ हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत याच हेतूने बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील महत्त्वाचे नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही याच कार्यक्रमात साजरी करण्यात आली. बालसभेच्या या उपक्रमास प्रमुख पाहुणी म्हणून हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेच्या स्वराज्यसभेतील मंत्रिमंडळाची अध्यक्ष कु. यामिनी थेऊरकर उपस्थित होती. इयत्ता सातवीच्या काही विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक व काही विद्यार्थिनींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल, सामाजिक, राजकीय, कार्याबद्दल आपल्या भाषणातून माहिती सांगितली.
उत्तम नियोजन, विद्यार्थिनींची उत्तम भाषणे व भारावलेल्या वातावरणात ही बालसभा यशस्वीपणे संपन्न झाली.






नागपंचमी (२६ जुलै २०१७)
नागपंचमी निमित्ताने पालक, विद्यार्थिनी व शिक्षक यांची मेंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी इ. १ ली च्या तसेच शिशुमंदिरच्या विद्यार्थिनींच्या हातावर मेंदी काढली.






स्वराज्यसभा शपथविधी समारंभ (२२ जुलै २०१७)
विद्यार्थिनींना लोकशाहीचे महत्त्व कळून जबाबदार नागरिकत्वाचे बाळकडू शालेय जीवनापासूनच मिळावे या हेतूने शालेय मंत्री - मंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते. १ ली ते ७ वी च्या निवडून आलेल्या विद्यार्थिनी मंत्र्यांना स्वराज्य सभा शपथविधी समारंभात शपथ देण्यात येते. या समारंभास राजकारणातील व्यक्तींना शाळा आमंत्रित करते. या वर्षी दि. २२ जुलै २०१७ रोजी स्वराज्य सभा शपथविधी समारंभास पुणे जिल्हा परिषदेच्या सभापती मा. श्रीम. सुजाता पवार ह्या प्रमुख पाहुण्या, तसेच म.ग.ए. संस्थेचे नियामक मंडळ सभासद मा. रविंद्र साळुंखे हे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थिनींना राजकारणातील अनुभवांचे मोलाचे मार्गदर्शन केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. गालिंदे व श्रीम. जवळेकर यांनी नवनिर्वाचित मंत्रिमंडळास गोपनियतेची व पदाची शपथ दिली. या कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम. उषाताई वाघ व सर्व विभागांचे मुख्याध्यापक, पत्रकार बंधू उपस्थित होते.






वृक्षारोपण (१ जुलै २०१७)
पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने राज्यशासनाने १ जुलै रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हुजूरपागा कात्रज विभागात सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पुणे म.न.पा. शिक्षण मंडळ माध्य. व तांत्रिक शिक्षणाधिकारी श्री. दीपक माळी, तसेच म.ग.ए.संस्थेच्या सचिव श्रीम. रेखाताई पळशीकर, माजी अध्यक्षा श्रीम. जयश्रीताई बापट, सहसचिव श्रीम. शालिनीताई पाटील, सभासद श्री. सुभाष महाजन व सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका या सर्वांनी विविध वृक्षांची लागवड केली. शाळेतील विद्यार्थिनींनी वृक्षारोपण केले.



डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा (१ जुलै २०१७)
अध्यापनात विविधता आणल्यास व त्याला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास अध्ययन सहज व प्रभावी होते. शिक्षण क्षेत्रातील स्पर्धात्मक युगात उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे. या धर्तीवर म.ग.ए. सोसायटीच्या हुजूरपागा कात्रज शाळेत दि. १ जुलै रोजी डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे म.न.पा. शिक्षण मंडळ माध्य. व तांत्रिक शिक्षणाधिकारी श्री. दीपक माळी यांना आमंत्रित करण्यात आले होते. सोहळ्यास म.ग.ए.संस्थेच्या सचिव श्रीम. रेखाताई पळशीकर, माजी अध्यक्षा श्रीम. जयश्रीताई बापट, सहसचिव श्रीम. शालिनीताई पाटील, सभासद श्री. सुभाष महाजन, श्री. सोनावणी, हिरामण बनकर शाळेचे माध्यमिक विभागाचे हरिचंद्र गायकवाड उपस्थित होते. सायबर नेटीक्स डिजिटल शाळा तयार करण्यासाठी संदीप गुंड यांचे मार्गदर्शन लाभले.



रमझान ईद (२८ जून २०१७)
दान कर्माचा महिना म्हणजे रमजान
प्रेम अर्पिण्याचा महिना म्हणजे रमजान
असा हा मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र सण रमजान ईद बुधवार दि. २८ जून २०१७ रोजी कात्रज हुजूरपागा प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. या प्रसंगाचे औचित्य साधून मा. श्रीम. श्रीतमन्ना ईनामदार थोर समाजसेविका तसेच समुपदेशक यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. अत्यंत उत्साह पूर्वक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. मुस्लिम पालकांना देखील या प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते. मा. श्रीतमन्ना ईनामदार यांनी अत्यंत समर्पक शब्दांत रमजान ईद या सणाचे महत्त्व पटवून दिले, तसेच सर्वधर्मसमभावाची मुल्ये आपल्या मार्गदर्शनातून रुजविली. विद्यार्थिनी व पालकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.




पालखी सोहळा (२४ जून २०१७)
शनिवार दिनांक २४ जून रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या पालखी सोहळ्यात स्वच्छता दिंडी, पर्यावरण दिंडी, वृक्ष दिंडी, जल दिंडी, ग्रंथ दिंडी, स्त्री भृणहत्या, वाहतूक दिंडी, डिजिटल दिंडी, यांसारख्या विविध प्रकारच्या दिंडींचे आयोजन करण्यात आले.
विठ्ठल नामाच्या गजरा बरोबर विद्यार्थिनींनी विविध घोष वाक्ये देऊन व पथनाट्य सादरीकरणातून सामाजिक जागृती केली. शाळेच्या जवळील परिसरातील लोकांना विद्यार्थिनींनी तयार केलेल्या कागदी व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेजवळील चौकात वाहतूक दिंडीतील विद्यार्थिनींनी वाहतूक कोंडी दूर करण्याचे काम केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी “डिजिटल पालखीचे” ही आयोजन करण्यात आले. अशाप्रकारे सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकून विद्यार्थिनींना सामाजिकतेचे भान येण्यासाठी प्रतिकात्मक दिंडींचे आयोजन करण्यात आले. पालखी नंतर सर्व विद्यार्थिनींना प्रसादचे वाटप करण्यात आले.







योग दिवस (२१ जून २०१७)
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शरीर आणि मन निरोगी रहाण्यासाठी योगासने, प्राणायाम करण्याची गरज असते.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये ताडासन, वृक्षासन, पद्मासन, भुजंगासन, नौकासन तसेच प्राणायाम इ. घेण्यात आले. त्यामध्ये साधारण १६१३ विद्यार्थिनी, शिक्षक सहभागी झालेले होते. मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक, क्रीडाशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योगदिन खुप उत्साहात, जोशात साजरा झाला.






ज्ञानांजन कृतज्ञता पुरस्कार
ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी तर्फे शिक्षण सेवेतील योगदानाबद्दल दिला जाणारा कृतज्ञता पुरस्कार या वर्षी ३६ वर्षाच्या शैक्षणिक सेवेत, १५ वर्षे शिष्यवृत्ती वर्गाला मार्गदर्शन करणाऱ्या हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागाच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती. रंजना नाईक यांना प्रदान करण्यात आला.



नवागतांचे स्वागत (१५ जून २०१७)
ही आवडते मज मनापासूनी शाळा
लाविते लळा ही बाळा
अतिशय प्रसन्न व उत्साही वातावरणात दि. १५ जून २०१७ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली. शाळेचा परिसर विद्यार्थिनी, पालक यांनी गजबजला होता. इयत्ता पहिली ते सातवीचे सर्व वर्ग, फळे सजविले होते.
इ. पहिलीच्या विद्यार्थिनींना पालक व शाळा यांच्या तर्फे गुलाबपुष्प व पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
नवागतांच्या स्वागतासाठी इयत्ता पहिली व दुसरीच्या शिक्षकांनी ‘बाहुली नाट्य’ चे सादरीकरण केले. इयत्ता ३ री ते ७ वी च्या सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गात विविध कार्यक्रम घेऊन विद्यार्थिनींचे स्वागत केले. नवीन वर्ग, नवीन पुस्तके, नव्या बाई, त्यांच्याशी साधलेला संवाद, गप्पा, गोष्टी यामुळे विद्यार्थिनी हरखून गेल्या.






शालेय उपक्रम २०१६ - २०१७
शैक्षणिक सहली (२०१६-१७)
सन २०१६ - १७ या वर्षातील शैक्षणिक सहलींचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात आले होते.

सहल यशस्वी होण्यात वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. मा. मुख्याध्यपिका श्रीमती रंजना नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहल विभागाने काटेकोर नियोजन केले होते. तसेच सर्व सहकारी शिक्षकांचे सहकार्य व विद्यार्थिनींची शिस्त यामुळे नियोजनाची अचूक अंमलबजावणी करता आली. व सर्व सहलीतील विद्यार्थिनींना पर्यटनाचा पुरेपूर आनंद घेता आला.






भारतीय संविधान दिवस (२६ नोव्हेंबर २०१६)
दि. २६ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस होय या दिवशी म्हणजेच दि. २६ नोव्हें १९५० रोजी भारताची घटना तयार झाली. या घटनेचे शिल्पकार होते डॉ. बाबा साहेब आंबेडकर. म्हणून शाळेत २६ नोव्हें २०१६ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिशुमंदिर विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. उमा गोसावी, प्राथमिक विभागाच्या जेष्ठ शिक्षिका नूतन जवळेकर यांनी केले. विद्यार्थिनींना आपले संविधान, राज्यघटना व त्यातील नागरिकांचे हक्क, कर्तव्ये, शासनव्यवस्था, मुल्ये, व उद्दिष्टे यांबाबत सविस्तर माहिती श्रीम. प्रिया गोगावले यांनी दिली. कु. रमा नलावडे इ. ५ वी अचला व कु. मानसी मरळ इ. ६ वी या विद्यार्थिनींनी संविधान दिनाबद्दल मनोगत व्यक्त केले. संविधान दिनाचे औचित्य साधून इ. ७ वी चा प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम घेण्यात आला. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद या चार गटात विद्यार्थिनींचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्रीम. सुचिता सावंत यांनी केले. तर परीक्षक म्हणून श्रीम. जवळेकर व श्रीम. गोगावले यांनी काम पहिले. सहभागी व विजयी विद्यार्थिनींना श्रीम. उमा गोसावी यांच्या हस्ते बक्षिसे दिली.
कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम्” या राष्ट्रगीताने झाली.


बाल दिन (१४ नोव्हेंबर २०१६)
बच्चे मनके सच्चे सारी दुनियाके ऑंखों के तारे | ये जो नन्हे फूल भगवान को लगते प्यारे || या ओळींप्रमाणे लहान मुलं सर्वांनाच आवडतात. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा लहान मुलं खूपच आवडायची म्हणून त्यांचा जन्मदिवस म्हणजेच १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा केला जातो. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत बालदिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेतले. इ. १ लीच्या शिक्षकांनी इ. १ ली च्या विद्यार्थिनींना पपेट-शो द्वारे छान छान गोष्टी सांगितल्या. तर इ. ३ रीच्या सर्व विद्यार्थिनींची पोत्याची शर्यत घेण्यात आली. इ. ४ थीच्या विद्यार्थिनींचा फुग्याचा खेळ घेण्यात आला. असे प्रत्येक इयत्तेने विविध मनोरंजनात्मक खेळ घेऊन विद्यार्थिनींचा उत्साह वाढवला.




ज्ञानरचनावाद - कार्यशाळा (ऑक्टोबर २०१६)
विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व गणित कौशल्य विकसित करण्यासाठी अध्ययन अध्यापनासाठी रचानावाद सिद्धांत फायदेशीर ठरू लागला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात ह्या ज्ञानरचनावादाने विद्यार्थ्यांची भाषिक व गणित कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या शाळेतील शिक्षकांनी वाई तालुक्यात शाळांना भेट देऊन तेथे चालू असलेला हा स्तुत्य उपक्रम आपल्या हुजूरपागेच्या इतर विभागातील शिक्षकांना कार्यशाळे द्वारे उत्तम प्रकारे समजावून सांगितला. ह्या मध्ये ज्ञानरचानावादाचे नेमके स्वरूप शिक्षकाची भूमिका, वर्गखोलीची रचना हे विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट करण्यात आली.






गणित जत्रा (ऑक्टोबर २०१६)
इ. ५ वी अचला च्या वर्गात गणित विषयावर आधारित मनोरंजनात्मक गणित जत्रा हा प्रकल्प शाळेतील सहशिक्षिका श्रीम. प्रिया गोगावले यांनी घेतला. या मध्ये विद्यार्थिनींनी बेरीज, वजाबाकी, सम-विषम, खरेदी-विक्री, पाढ्यांची गंमत, नफा – तोटा आदींवर आधारित गमतीदार खेळ स्वत:च्या कल्पकतेने सादर केले. सर्व विद्यार्थिनींनी, मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक तसेच इ.१ ली ते ४ थी. च्या सर्व शिक्षकांनी या खेळाचा आनंद घेतला.






शुभ दीपावली (२१ ऑक्टोबर २०१६)
यशाची रोषणाई
समाधानाचा फराळ मंगलमय रांगोळी
मधुर मिठाई आकर्षक आकाशकंदील
आकाश उजळवणारे फाटके
२१ ऑक्टोबर रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागात मोठ्या उत्साहात व आनंदात फाटके विरहीत दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थिनीला एक पणती आकाशकंदील व लाडू चिवडा शाळेकडून दिवाळीची भेट म्हणून देण्यात आले. विद्यार्थिनींनी मिळालेली पणती सुरेख रंगवली व त्याच पणत्या वापरून दिव्यांची रोषणाई केली, मोठ्ठी रांगोळी काढून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
वाचन प्रेरणा दिन (१५ ऑक्टोबर २०१६)
१५ ऑक्टोबर हा अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. अब्दुल कलाम हे हाडाचे शिक्षक होते. यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी आवर्जून पुस्तके वाचली. इ. १ ली व २ री च्या विद्यार्थिनींना गोष्टीची पुस्तके वाचण्यास दिली. तसेच इ. ५ ते ७ च्या विद्यार्थिनींनी अब्दूल कलमांची पुस्तके वाचली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त इ. ४ थीच्या विद्यार्थिनींनी आपल्या शालेय परिसराच्या जवळ असलेल्या शाळांना भेट दिली. स्व. रामभाऊ म्हाळगी या शाळेच्या माध्यमिक विभागाच्या ग्रंथालयाला भेट दिली तसेच तेथील मुख्याध्यपिकांची मुलाखत घेतली.




खंडेनवमी आणि पाटीपूजन (१० ऑक्टोबर २०१६)
| उत्सव आला विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा |
सोमवार दि. १०/१०/२०१६ रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत खंडेनवमी आणि पाटीपूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. इ. १ ली ते इ. ४ थी च्या विद्यार्थिनी या दिवशी आवडीचा पोशाख घालून आल्या. १ ली ते ४ थीच्या सर्व विद्यार्थिनींनी पाटीवर सरस्वती काढून पूजन केले. त्याच प्रमाणे मा. मुख्याध्यपिका श्रीम. रंजना नाईक व इतर शिक्षकांनी शाळेतील सर्व लोखंडी वस्तू व शस्त्रांची पूजा केली. या उपक्रमाची माहिती शाळेतील सहशिक्षिका श्रीम. ताम्हाणे यांनी माईकवरून सर्व विद्यार्थिनींना सांगितली.





भोंडला (१० ऑक्टोबर २०१६)
ऐलोमा पैलोमा गणेश देवा |
माझा खेळ मांडीयेला करीन तुझी सेवा ||
हे गाणं ऐकलं कि आठवतो तो भोंडला. अश्विन प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत जे देवीचे नवरात्र साजरे होते, त्या नऊ दिवसांत भोंडला साजरा करतात. भोंडल्यालाच हादगा असेही म्हणतात. हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून फेर धरून विविध गाणी म्हणतात व प्रत्येकीने आणलेली खिरापत ओळखतात. असा हा भोंडला हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आवडीचा पोशाख घालून आल्या होत्या. इयत्तेनुसार इ. १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थीनींना फेर धरून गाणी म्हणण्यासाठी प्लेशेड मध्ये पाठविण्यात आले. सुरवातीलाच मा. मुख्याध्यपिका रंजना नाईक यांनी हत्तीच्या प्रतिमेचे पूजन केले. श्रीम. साठेबाई व श्रीम. देशमुखबाई यांनी मुलींना भोंडल्याची माहिती सांगून गाणी म्हटली. गाणी संपल्यावर मुलींनी खिरापत ओळखली. सर्व मुलींना खिरापत वाटण्यात आली. अशा प्रकारे पारंपारिक संस्कृती जपणारा भोंडला आमच्या शाळेत आनंदाने साजरा करण्यात आला.
शिक्षकदिन (५ सप्टेंबर २०१६)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते थोर विद्वान व हाडाचे शिक्षक होते. आपल्या शिकविण्याच्या विशीष्ट शैलीतून त्यांनी भावी सर्व शिक्षक परिवारासाठी आदर्श घालून दिला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत सुद्धा शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन मुख्याध्यपिका, पर्यवेक्षक, लेखनिक, शिपाई यांची भूमिका अगदी चोख पार पाडली. तसेच काही विद्यार्थिनी कात्रज विभागातील शिशुमंदिर विभागात शिक्षिका म्हणून गेल्या होत्या.
ज्या विद्यार्थिनी शिक्षिका झाल्या होत्या त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांना शाळेकडून खाऊ वाटप करण्यात आला.



श्रावणी शुक्रवार (२६ ऑगस्ट २०१६)
निसर्गाचे आपल्यावर अगणित ऋण आहे. याच ऋणाची जाणीव व्यक्त करण्यासाठी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये वसुंधरा पूजनाचा तसेच निसर्ग पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सूर्य, झाड, आकाश, पाणी, फूल, यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांचे पूजन करण्यात आले. निसर्गातील या देवतांची माहिती व महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले. याच दिवशी इ. ३ री व इ. ४ थी च्या विद्यार्थिनींनी आदिशक्तीचे पूजन करून भक्तिमय वातावरणात श्रावणी शुक्रवार साजरा केला. श्रावणी शुक्रवारची कहाणी सांगण्यात आली तसेच देवीची आरती, गजर घेण्यात आला व प्रसाद वाटण्यात आला. याच दिवशी इ. ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थिनींसाठी खेळ मंगळागौरीचे हा कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेतील ग्रंथपाल श्रीम. जयश्री कुलकर्णी यांच्या सखी मंगळागौर या ग्रुपने अतिशय उत्तम, रंजक असे मंगळागौरीचे खेळ सादर केले.








पुस्तकहंडी (२६ ऑगस्ट २०१६)
दहीहंडीचे औचित्य साधून शुक्रवार दि. २६ ऑगस्ट रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत पुस्तकहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. इ. ६ वी च्या विद्यार्थिनींचा यात सहभाग होता. श्रीम. मोनाली तनपुरे यांनी दहीहंडी विषयी माहिती सांगितली व मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक यांच्या कल्पनेतून इ. ६ वी च्या सर्व विद्यार्थिनींना शाळेकडून पुस्तक कायमस्वरूपी भेट देण्यात आले. सर्व पुस्तके एकमेकींना हस्तांतर करून वाचन करण्याचे आवाहन करण्यात आले.





नागपंचमी (१९ ऑगस्ट २०१६)
'निसर्ग आपुला सखा सोबती' या उक्ती प्रमाणेच 'निसर्गातील सर्व प्राणीमात्रांवर द्या करा' असे सांगणारा नागपंचमी हा सण शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमी निमित्ताने पालक, विद्यार्थिनी व शिक्षक यांची मेंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी इ. १ लीच्या विद्यार्थिनींच्या हातावर मेंदी काढली.






राखी पौर्णिमा (१६ ऑगस्ट २०१६)
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला श्रावण
लाख लाख शुभेच्छा
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण ||
अशाप्रकारे भाऊबहिण यांच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणजेच राखी पौर्णिमा. दि. १६ ऑगस्ट रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व काही विद्यार्थिनी पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे सकाळी ८.४५ वाजता उपस्थित राहिल्या. शाळेतील कला शिक्षिका श्रीम. गजमल यांनी विद्यार्थिनींकडून सुरेख राख्या तयार करून घेतल्या होत्या. त्याच राख्या विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी पोलिसांना बांधल्या, औक्षण केले व प्रत्येकाचे तोंड गोड केले. विद्यार्थिनी व शिक्षकांसाठी हा अनोखा अनुभव होता. तेथील श्री. श्रीकांत शिंदे यांनी आमच्या सर्व विद्यार्थिनींना पोलिस स्टेशनचे कामकाज कसे चालते ते सविस्तर सांगितले. वॉकी –टॉकीवरचे प्रत्यक्ष बोलणे एकून तर विद्यार्थिनी हरखूनच गेल्या. पोलिसांजवळ असलेल्या विविध बंदुकांची माहिती त्यांनी विद्यार्थिनींना दिली. व त्या सर्व बंदुकी विद्यार्थिनींना पाहिला मिळाल्या. तसेच त्या स्टेशनच्या अखत्यारीत असलेल्या सर्व चौकातील रहदारी CCTV कॅमेऱ्याने तेथील स्क्रीनवर बघता आली. हा सर्व अनुभव विद्यार्थिनी व शिक्षकांसाठी खूपच छान व वेगळा होता. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे मुख्य पोलिस अधिकारी SPI विजयसिंग गायकवाड यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून सामाजिक भान प्रत्येक नागरीकाला येणं किती गरजेचे आहे हे पटवून दिले.


















क्रांतिसप्ताह (८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१६)
जनन - मरण हे तुझ्याचसाठी, टिळा मातीचा लावीन माथी |
सार्वभौमत्व हे भारतभूचे, अभंग आपण राखूया,
चला चला रे तिरंगा खांद्यावर मिरवू या !!
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, क्रांतिकारकांच्या स्मृतीं मनात सतत तेवत राहाव्यात याच हेतूने हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत क्रांतिसप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशप्रेम, सांघिक भावना, सामाजिक भान इ. नीतिमुल्ये विद्यार्थिनींच्या मनात रुजविली जातात. गुरुवार दि. ११ ऑगस्ट २०१६ रोजी इ. ५ वी च्या विद्यार्थिनींची कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. तसेच इ. ५ वी ते ७ वी सर्व वर्गांमध्ये क्रांतिकाराकांच्या पुस्तकांतील कथांचे वाचन घेण्यात आले. शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी इ. ६ वी च्या विद्यार्थिनींची निबंध स्पर्धा घेण्यात आली.
आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आपल्या भावना व्यक्त करणारे पत्रलेखन इ. ७ वी च्या विद्यार्थिनींनी केले ही पत्रं व राख्या सीमेवरील सैनिक बांधवांना पाठविण्यात आल्या. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला गेला.




बालसभा (१ ऑगस्ट २०१६)
विद्यार्थिनींना शालेय जीवनापासूनच देशभक्तीचे बाळकडू मिळावे व प्रत्येकीच्या मनात देशभक्ती जागृत रहावी, पूर्व सुरींनी केलेले बलिदान स्मरणात रहावे इ. उद्देशांसाठी महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आक्रमक व जहाल नेतृत्व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनी दि. १ ऑगस्ट २०१६ हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत याच हेतूने बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील महत्त्वाचे नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही याच कार्यक्रमात साजरी करण्यात आली. बालसभेच्या या उपक्रमास प्रमुख पाहुणी म्हणून हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेच्या स्वराज्यसभेतील मंत्रिमंडळाची अध्यक्ष कु. कोमल उणेचा उपस्थित होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळा स्वराज्यसभा मंत्रिमंडळ अध्यक्ष कु. आदिती किंद्रे हिने भूषविले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी इ. सातवी वसुधा या वर्गातील कु. सानिका मुसळे हिने पार पाडली. पाहुण्यांचा परिचय कु. गौरी बंगाळे तर आभार प्रदर्शन कु. कुंभार हिने पार पाडले. इयत्ता सातवीच्या काही विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक व काही विद्यार्थिनींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल, सामाजिक, राजकीय, कार्याबद्दल आपल्या भाषणातून माहिती सांगितली. उत्तम नियोजन, विद्यार्थिनींची उत्तम भाषणे व भारावलेल्या वातावरणात ही बालसभा यशस्वीपणे संपन्न झाली. या कार्यक्रमास हुजूरपागा कात्रज प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. रंजना नाईक उपस्थित होत्या. सभा पार पडल्यानंतर बाईंनी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले.











गुरुपौर्णिमा (१९ जुलै २०१६)
|| गुरु ईश्वर तात माय | गुरुविण जगी थोर काय ||
आषाढ शुध्द पौर्णिमेलाच आपण गुरु पौर्णिमा असेही म्हणतो. आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा मंगल दिवस. जीवनाच्या प्रत्येक वळणावर विविध रुपात गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. प्राथमिक शाळेत सुद्धा गुरु पौर्णिमा अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सत्कार विद्यार्थिनींच्या हस्ते श्रीफळ, फुल, व भेटवस्तू देऊन केले.

स्वराज्य सभा शपथविधी समारंभ (१६ जुलै २०१६)
विद्यार्थिनींना जबाबदार नागरिकत्वाचे बाळकडू शालेय जीवनापासूनच मिळावे या हेतूने शालेय मंत्री- मंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते. १ ली ते ७ वी च्या निवडून आलेल्या विद्यार्थिनी मंत्र्यांना स्वराज्य सभा शपथविधी समारंभात शपथ देण्यात येते. या समारंभास राजकारणातील व्यक्तींना शाळा आमंत्रित करते. या वर्षी दि. १६ जुलै २०१६ रोजी स्वराज्य सभा शपथविधी समारंभास पुणे शहराचे महापौर मा.श्री. प्रशांत जगताप हे प्रमुख पाहुणे लाभले. त्यांनी विद्यार्थिनींना राजकारणातील अनुभवांचे मोलाचे मार्गदर्शन केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. सीमा झोडगे यांनी उगवत्या मंत्रिमंडळास शपथ दिली. या कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी मा. श्रीम. संध्या गायकवाड, रत्नप्रभा जगताप, सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाशभाऊ कदम, श्रीम. राठोड बाई, श्री. घाटगे सर, पत्रकार बंधू उपस्थित होते.












रमजान ईद (८ जुलै २०१६)
हर तरफ फैले खुशियों के गीत
इसी तमन्ना के साथ
आपको मुबारक हो ईद
शुक्रवार दि. ८ जुलै २०१६ रोजी कात्रज हुजूरपागा प्राथमिक शाळा येथे ‘रमजान ईद’ चे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मा. श्री. शमशुद्दीन तांबोळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अत्यंत उत्साह पूर्वक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. मुस्लिम पालकांना देखील या प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते तसेच पालकांचा सत्कार मा. श्री. शमशुद्दीन तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला. मा. श्री. शमशुद्दीन तांबोळी यांनी अत्यंत समर्पक शब्दांत रमजान ईद या सणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थिनी व पालकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.




पालक सभा (जुलै २०१६)
इ. १ ली ते ७ वी च्या सर्व वर्गांच्या पालक सभा जुलै महिन्यात घेण्यात आल्या. पालक सभेत साधारणपणे शाळेच्या शिस्तीचे नियम, विविध उपक्रमांची माहिती, अभ्यासक्रम व शालेय शैक्षणिक धोरणाला अनुसरून इतर अनेक विषयांवर चर्चा घेण्यात आली. पालकांनी या पालक सभांना उत्तम प्रतिसाद दिला.


पालखी सोहळा (९ जुलै २०१६)
|| विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ||
या वर्षी पालखी सोहळ्यात पारंपारिक दिंडी बरोबर जलदिंडी, वाहतुक सुरक्षा दिंडी, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, पर्यावरण दिंडी, साक्षरता दिंडी इ. दिंडींचा समावेश होता. पुणे शहरास भेडसावणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाबाबत विद्यार्थिनींनी जल दिंडीतून जनजागृती केली. झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा. असा संदेश विद्यार्थिनिंनी वृक्ष दिंडीतून दिला. वृक्ष दिंडीचे औचित्य साधून इ. ४ थीच्या विद्यार्थिनिंनी तुळशीरोपाचे राजस सोसायटी, कात्रज परिसरात वाटप केले. कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप सुखसागर परिसरात करून प्लास्टिकचा वापर टाळा असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.








वृक्षारोपण (१ जुलै २०१६)
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वनविभागातर्फे राबविण्यात आलेला राज्यस्तरीय वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दि. १ जुलै २०१६ रोजी हुजूरपागा कात्रज विभागाच्या परिसरात राबविण्यात आला. परिसराला अनुसरून विविध रोपे लावण्यात आली लाल पिवळी कर्दळ, पानफूटी, गवती चहा, कडूलिंब यांसारखी रोपे म.ग.ए. संस्थेचे सभासद मा. सुभाष महाजन सर, प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक, शिशु मंदिर विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. उमा गोसावी तसेच प्राथमिक विभागाच्या माजी मुख्याध्यापिका मा. श्रीम. गीता बोगम यांच्या हस्ते लावण्यात आली. याच अनुषंगाने विद्यार्थिनींना झाडांचे महत्त्व पटवून दिले.



नवागतांचे स्वागत (१५ जून २०१६ )
दिनांक १५ जून २०१६ रोजी शालेय शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली. इयत्ता पहिलीतील चिमुकल्यांचे गोष्टीची पुस्तके व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. पहिलीच्या शिक्षकांनी पर्यावरणावर आधारित नाटक सादर केले.



शालेय उपक्रम २०१५ - २०१६
.jpg)
नवागतांचे स्वागत (१५ जून २०१५ )
नवागतांचे स्वागत (१५ जून २०१५ )
दिनांक १५ जून २०१५ रोजी शालेय शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली. इयत्ता पहिलीतील चिमुकल्यांचे गोष्टीची पुस्तके व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. पहिलीच्या शिक्षकांनी पर्यावरणावर आधारित नाटक सादर केले.
.jpg)
स्वराज्य सभा शपथविधी समारंभ (११ जुलै २०१५)
स्वराज्य सभा शपथविधी समारंभ (११ जुलै २०१५)
विद्यार्थिनींना जबाबदार नागरिकत्वाचे बाळकडू शालेय जीवनापासूनच मिळावे या हेतूने शालेय मंत्री- मंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते. १ ली ते ७ वी च्या निवडून आलेल्या विद्यार्थिनी मंत्र्यांना स्वराज्य सभा शपथविधी समारंभात शपथ देण्यात येते. या समारंभास राजकारणातील व्यक्तींना शाळा आमंत्रित करते. या वर्षी दि. ११ जुलै २०१५ रोजी स्वराज्य सभा शपथविधी समारंभास महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा.श्री. दिलीप कांबळे हे प्रमुख पाहुणे लाभले. त्यांनी विद्यार्थिनींना राजकारणातील अनुभवांचे मोलाचे मार्गदर्शन केले. प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. सुरेखा ओव्हाळ यांनी उगवत्या मंत्रिमंडळास शपथ दिली.
.jpg)
पालखी सोहळा (१७ जुलै २०१५)
पालखी सोहळा (१७ जुलै २०१५)
|| विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ||
या वर्षी पालखी सोहळ्यात पारंपारिक दिंडी बरोबर जलदिंडी, वाहतुक सुरक्षा दिंडी, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, पर्यावरण दिंडी, इ. समावेश होता. पुणे शहरास भेडसावणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाबाबत विद्यार्थिनींनी जल दिंडीतून जनजागृती केली. झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा. असा संदेश विद्यार्थिनिंनी वृक्ष दिंडीतून दिला. कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप भोवतालच्या परिसरात करून प्लास्टिकचा वापर टाळा असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
.jpg)
रमजान ईद (१७ जुलै २०१५)
रमजान ईद (१७ जुलै २०१५)
सर्व धर्म समभावाचे दर्शन घडविणारा सण मुस्लीम बांधवांची ‘रमजान ईद’ अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. म.ग.ए. सोसायटीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. अन्वर राजन यांच्या व पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. आपल्या भाषणातून प्रमुख पाहुण्यांनी या सणाविषयी माहिती सांगितली. विद्यार्थिनी व पालकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
.jpg)
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा (२५ जुलै २०१५)
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा (२५ जुलै २०१५)
हुजूरपागा कात्रज शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवाणारा असा सन २०१४-१५ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागला. एकूण पाच विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळाली.
शिष्यवृत्ती परीक्षेत झळकलेल्या विद्यार्थिनी
इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा
- कु. वैष्णवी अमित मुधोळ - १५ वी
- कु. सिद्धी राजेश भास्कर - १५ वी
- कु. पूर्वा राजेश चरेगावकर - २१ वी
- कु. श्रेया सचिन लाड - २२ वी
इयत्ता७वीशिष्यवृत्तीपरीक्षा
- कु. स्नेहा मोतीराम पाडे -१६वी
या यशस्वी विद्यार्थिनींचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार समारंभ कार्यक्षम नगरसेविका मा.श्रीम. भारतीताई कदम यांच्या हस्ते दि. २५ जुलै रोजी संपन्न झाला. विद्यार्थिनींच्या यशात मोलाचा वाट उचलणाऱ्या त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. या कौतुक सोहळ्यास म.ग.ए. संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारीही आवर्जून उपस्थित होते.
.jpg)
गुरुपौर्णिमा (३१ जुलै २०१५)
गुरुपौर्णिमा (३१ जुलै २०१५)
|| गुरु ईश्वर तात माय | गुरुविण जगी थोर काय ||
आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा मंगल दिवस शाळेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जीवनाच्या प्रत्येक वळणावर विविध रुपात गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणूनच मा. मुख्याध्यापिका श्रीम. सुरेखा ओव्हाळ यांच्या कल्पनेतून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूजन विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले.

बाल सभा ( १ ऑगस्ट २०१५)
बाल सभा ( १ ऑगस्ट २०१५)
लोकमान्य टिळक पुण्यतिथी या दिवसाचे औचित्य साधून इयत्ता ७ वीच्या विद्यार्थिनींनी बालसभेचे आयोजन केले. या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या थोर पुरुषांच्या जीवनातील प्रसंग कथेतून व नाटकातून विद्यार्थिनींनी सादर केले.
.jpg)
क्रांति सप्ताह (९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१५)
क्रांति सप्ताह (९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१५)
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या क्रांती सप्ताहाचे उद्घाटन लेफ्टनंट कर्नल श्री. दिपक आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. या सप्ताहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशप्रेम, सांघिक भावना, सामाजिक भान इ. नीतिमुल्ये विद्यार्थिनींच्या मनात रुजविली जातात.
क्रांति सप्ताहातील विविध कार्यक्रम
-
क्रांतिकारकांच्या माहितीचे प्रदर्शन
- कथाकथन स्पर्धा (क्रांतिकारकांच्या गोष्टी)
- वेशभूषा (क्रांतिकारक)
- देशभक्तीपर समूह गीत स्पर्धा
.jpg)
नागपंचमी (१९ ऑगस्ट २०१५)

पन्हाळा किल्ला

शिवनेरी

पन्हाळा किल्ला
नागपंचमी (१९ ऑगस्ट २०१५)
निसर्ग आपुला सखा सोबती या उक्ती प्रमाणेच निसर्गातील सर्व प्राणीमात्रांवर द्या करा. असे सांगणारा नागपंचमी हा सण शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नागपंचमी निमित्ताने पालक, विद्यार्थिनी, व शिक्षक यांची मेंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी इ. १ लीच्या विद्यार्थिनींच्या हातावर मेंदी काढली.
राखी पौर्णिमा ( २७ ऑगस्ट २०१५)
बहिण भाऊ यांच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा हा सण. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेने हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला सामाजिक भान आणून देणारा असा साजरा केला. दि. २७ ऑगस्ट रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक सर्वांनी लष्कराच्या अपंग विकलांग केंद्रातील सैनिकांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी केली.
पुस्तक हंडी (४ सप्टेंबर २०१५)
परंपरेला आधुनिकतेची झालर लावत दहीहंडी ऐवजी पुस्तक हंडी साजरी करून पुस्तकांचे महत्त्व सांगणारा हा पुस्तक हंडीचा कार्यक्रम दि. ४ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न झाला. पुस्तक हंडीचा प्रसाद म्हणून विद्यार्थिनींना विविध प्रकारची पुस्तके वाटण्यात आली.
श्रावणी शुक्रवार (४ सप्टेंबर २०१५ )
आदिशक्तीचे पूजन करून भक्तिमय वातावरणात श्रावणी शुक्रवार साजरा करण्यात आला. देवीची आरती गजर घेण्यात आला. व प्रसाद वाटप करण्यात आला.
याच दिवशी पृथ्वी मातेप्रति आपली कृतज्ञता वसुंधरा पूजनाद्वारे विद्यार्थींनीनी व्यक्त केली.
शिक्षकदिन (५ सप्टेंबर )
मिसाईल मॅन म्हणून नावाजलेल्या द्रष्ट्या शिक्षकास म्हणजे ए.पी.जे. अब्दूल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता शिक्षकदिनानिमित्त भरविण्यात आलेले विज्ञान प्रदर्शन. या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थिनींनी नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केले. तसेच ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या कारकिर्दीविषयी व जीवनाविषयी चित्रफीत दाखविण्यात आली.
शिक्षक पालक संघातील पालकांनी सर्व शिक्षकांचा सत्कार करून शिक्षक दिन साजरा केला.
गणपती रंगवणे स्पर्धा (१४ सप्टेंबर २०१५)
दर वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती रंगवणे स्पर्धा शाळेत घेतली जाते. बहुसंख्य विद्यार्थिनी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात.
हिंदी दिवस (१४ सप्टेंबर २०१५)
दि. १४ सप्टेंबर रोजी शाळेमध्ये हिंदी दिवस उत्साहाने साजरा केला. यादिवशी शाळेमध्ये सर्वांनी हिंदी मध्ये संभाषण केले. हिंदी दिनाविषयी माहिती, गोष्टी, घोष वाक्ये इ. विद्यार्थिनींनी सांगितली.
संस्था वर्धापनदिन (२ ऑक्टोबर )
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचा १३१ वा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात कात्रज विभागात साजरा करण्यात आला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रा.गो. भांडारकर, शंकर पांडुरंग पंडित,वामन आबाजी मोडक या संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन नियामक मंडळाच्या सदस्या मा. श्रीम. हिमानी गोखले यांनी केले.
पाटी पूजन (२१ ऑक्टोबर )
विद्यार्थिनींनी पाटी पूजन करून व ‘ झाडाची पाने तोडू नका पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत दसरा हा सण साजरा केला. दसऱ्याचे पारंपारिक महत्त्व शिक्षिकांनी विद्यार्थिनींना सांगितले.
भोंडला (२१ ऑक्टोबर )
नवरात्रातील भोंडला याच दिवशी साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी आवडीचा पोशाख परिधान करून, हादग्याची गाणी गात, खिरापतीचा आस्वाद घेत भोंडल्याचा आनंद लुटला.
शैक्षणिक सहली
सहली यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. मा. मुख्याध्यापिका श्रीम. सुरेखा ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहल विभागाने अत्यंत काटेकोर नियोजन केलेले होते. विद्यार्थिनींची शिस्त व सर्व सहकारी शिक्षकांचे सहकार्य यामुळे नियोजनाची अचूक अंमलबजावणी करता आली.
सर्वच पर्यटनस्थळांवर विद्यार्थिनींची शिस्त वाखाणण्याजोगी होती. इतर पर्यटक कौतुकाने शाळेची चौकशी करत होते. सर्व ठिकाणांची माहिती हेऊन, पर्यटनाचा आनंद पुरेपूर उपभोगून विद्यार्थिनींनी सहली आपल्या आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवल्या.
सन २०१५-१६ या वर्षातील शैक्षणिक सहलींचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात आले होते.
वार | दिनांक | इयत्ता | ठिकाण |
शुक्रवार | १८ / १२ / २०१५ | ७ वी | कण्हेरी मठ, पन्हाळा किल्ला |
शनिवार | १९ / १२ / २०१५ | १ ली २ री | एम्प्रेस गार्डन लेखा फार्म |
सोमवार | २१ / १२ / २०१५ | ६ वी | सज्जनगड, ठोसे घर, चाळकेवाडी |
मंगळवार | २२ / १२ / २०१५ | ३ री, ४ थी | शिवनेरी, ओझर |
बुधवार | २३ / १२ / २०१५ | ५ वी | महाड, पाली, उन्हेरे, अलिबाग |