शिशुमंदिर - शालेय उपक्रम
<<< Back to laxmi rd marathi shishu mandir page
- शालेय उपक्रम २०२३ - २४
- शालेय उपक्रम २०२२ - २३
- शालेय उपक्रम २०२१ - २२
- शालेय उपक्रम २०२० - २१
- शालेय उपक्रम २०१९ - २०
भोंडला
नवरात्रीचे औचित्य साधून शाळेत भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. मुले पारंपारिक वेशात छान नटून थटून शाळेत आल्या. ऐलोमा पैलोमा गणेश देवा, एका लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू, अक्कण माती चिक्कण माती अशी भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला. नंतर भोंडल्याची खिरापत ओळखली. मुलींनी खिरापतीचा आनंद घेतला.
फॅन्सी ड्रेस स्पर्धा
मुलींमध्ये असलेल्या साभाधीटपणा, संभाषण कौशल्य यांसारख्या गुणांना वाव मिळावा म्हणून सर्व गटातील मुलीसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली होती. प्रत्येक गटाला वेगवेगळा विषय देण्यात आला होता.
शिशुरंजन गट - प्राणी
छोटा गट - पक्षी
मोठा गट - शालेय साहित्य
या मध्ये विकतची ड्रेपरी न वापरता पालकांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेली वेशभूषा मुलींनी परिधान केली होती. आपण केलेल्या वेशभुषेबद्दल मुली उत्तमरित्या बोलत होत्या.या स्पर्धेचे परीक्षण कै सौ.अश्विनी अरूण देवस्थळी प्रीप्रायमरी च्या मुख्याध्यापिका मा. अंकईकर मॅडम तसेच इंग्रजी माध्यम कात्रजच्या शिक्षिका माँ.अर्पिता कुलकर्णी यांनी केले.
पालाकशाळा
ग्रॅव्हीटर्स फाउंडेशन या संस्थेतर्फे पालकांसाठी ‘चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कोणता’? याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. मुलींना याबाबतचे ज्ञान शाळेत देण्यात आले होते..पण पालकांना ही हे लक्षात यावे यासाठी ह्या पालाकाशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुलींनी जर अशी कुठली तक्रार पालकांकडे केल्यास त्या कडे दुर्लक्ष्य करू नये हे आशा खेडकर यांनी पालकाना आवर्जून सांगितले .
दिवाळी आली..दिवाळी आली.. गंमत जंमत घेऊन आली ..
दिवाळी सारखा मोठा सण शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, पणत्या, आकाशकंदील, दिव्यांची रोषणाई करून शाळा सजवण्यात आली होती. किल्ला व त्यावर चित्रे मांडण्यात आली होती. मुलींकडून दिवाळीची कृती म्हणून आकाशकांदिल रंगवून घेण्यात आला. तसेच कागदी आकाश कंदीलचे भेटकार्ड मुलींनी तयार केले. दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्व मुलींना सांगण्यात आले. धुराचे ,मोठ्या आवाजाचे फटाके न उडवता किल्ला तयार करण्याची शपथ मुलीनी घेतली. मुलींना दिवाळीचा फराळ देण्यात आला . अश्या प्रकारे मोठ्या आनंदात व उत्साहात दिवाळी सण शिशुमंदिर मध्ये साजरा करण्यात आला.
बालदिन....
मोठ्या आनंदात व उत्साहात बालदिन साजरा करण्यात आला. मुलींना चाचा नेहरू विषयी माहिती सांगण्यात आली. शिक्षिकांनी मुलींसाठी पपेटशोचे सादरीकरण केले. पेपरडीश पासून डोलणारी बाहुली मुलिनी तयार केली. जाताना मुलींना खाऊ देण्यात आला.
रंगसप्ताह
शारदीय नवरात्राचे औचित्य साधून शाळेत रंगसप्ताह साजरा करण्यात आला. यात रोज एका रंगाची मांडणी प्रत्येक वर्गात करण्यात आली. या साठी त्या रंगाच्या वस्तू मुलींना घरून आणण्यास सांगितल्या होत्या. प्रत्येक रंगाची कृती वर्गात घेण्यात आली होती उदा. लाल रंगाच्या दिवशी मुलींना डाळिंब सोलायला देण्यात आले, हिरव्या रंगाच्या दिवशी मुलीनी पालेभाजी निवडली., पिवळ्या रंगाच्या दिवशी लिंबू सरबत तयार केले. त्याचप्रमाणे त्या त्या रंगाचा खाऊ मुलींना डब्यात आणण्यास सांगितला होता. पांढरा रंगाच्या दिवशी इडली चटणी, हिरव्या रंगाच्या दिवशी मेथी पराठा, पिवळ्या रंगाच्या दिवशी ढोकळा इ. रंगाच्या मांडणीमधून मुलींना प्रत्येक रंगाचे ज्ञान पक्के झाले.
राखीपौर्णिमा ….
-आजी आजोबा मेळावा
सामाजिक बांधिलकीचे भान राखून शिशुमंदिर दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. पोलीसमैत्री, झाडे आपले मित्र सारखे उपक्रम यापूर्वी शिशुमंदिर मध्ये मोठ्या उत्साहात राबवले गेले. या वर्षी आजी आजोबाना राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली.
१० सप्टेंबरला असणाऱ्या जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून मुलींच्या आजी आजोबाना शाळेत बोलाविण्यात आले होते. आजी आजोबा हे नातवंडाचे पहिले मित्र असतात. संपन्न आणि संस्कारक्षम नातवंड घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. अशा या जिव्हाळ्याच्या आजी आजोबांसाठी ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . मुलींनी आजी आजोबासाठी छानसे ग्रीटिंग तयार केले .आजी आजोबांना राखी बांधली. आजी आजोबांसाठी विविध खेळ घेण्यात आले .सर्व आजी आजोबा वय विसरून या खळामध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी शिक्षिकांनी गाणी म्हणून जीवनाचा प्रवास उलगडला . अतिशय उत्साही आणि आनंद पूर्ण वातावरणात आजी आजोबा मेळावा पार पडला.
ताईंनी मुलींना राखी बांधून नारळी वडीचा खाऊ दिला.
पावसाळी सहल (विद्याविहार ,पानशेत)
पावसाळी सहल पानशेत प्रकल्प येथे गेली होती. तिचे जाताना विद्याविहार चे प्रमुख कडू काका यांनी मुलींना पानशेत ,वरसगाव, तसेच खडकवासला या धरणांविषयी माहिती दिली. तिथे पोहचल्यावर मुलींना वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतींची माहिती सांगण्यात आली. गांडुळ खत, गप्पी मासे हे मुलींना दाखविण्यात आले. खेकड्याची माहिती मुलींना सांगण्यात आली. खेकडा पाहताना मुलींच्या चेहऱ्यावर कुतूहल दिसत होते. वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या आणि त्यांची घरे मुलींना दाखविण्यात आली. जमीन नांगरून मुलींनी पेरणीचा आनंद घेतला. पानशेत धरणाचे बॅक वॉटर पहिले आणि सीड्स बॉल दरीत फेकण्याचा आनंद घेतला. सीड्स बॉल कसे तयार करायचे हे ही मुलींना सांगण्यात आले.आले. संपूर्ण परिसर फिरून माहिती घेत असताना पावसाच्या सरी बरसात होत्या . त्यामुळे निसर्गसौंदर्य आणखीन च खुलले होते.
पालक स्पर्धा
मुलींमध्ये असलेल्या सुप्त गुणांना शाळेत कायमच वाव दिला जातो ..पण पालकांमध्येही सुप्त गुण असतात त्यासाठी चं शाळेत पालकांसाठी विविध स्पर्धाचे नेहमीच आयोजन केले जाते. या वर्षी सॅलड डेकोरेशन ही पालकांसाठी स्पर्धा घेण्यात आली. यात कंदमुळे,पालेभाजी,फळभाजी,फळ वापरून पालकांनी उत्तम सलाड डेकोरेशन केले. या स्पर्धेसाठी कलेमध्ये निपुण असलेल्या माजी शिक्षिका मा.अश्विनी पेटकर व एच.एच.सी.पी हायसकूलच्या मा.सोनल गुंजाळ या परीक्षक म्हणून आल्या होत्या.
नापंचमीचा सण आला..
श्रावण महिन्यात येणारा नागपंचमी हा सण शाळेत मोठ्या आंनदाने साजरा करण्यात आला . मुलींच्या हातावर मेंदी काढण्यात आली. मुली पारंपारिक वेशभुषा करून शाळेत आल्या होत्या. पीपीटी च्या माध्यमातून मुलींना नागपंचमी सणाची माहिती देण्यात आली. नागपंचमी का साजरी करतात?कशी साजरी करतात? हे या पीपीटीत दाखविण्यात आले. झिम्मा,फुगडी या सारख्या पारंपारिक खेळाचा आनंद मुलींनी घेतला. पुरणपोळी चा खाऊ मुलींना देण्यात आला. या निमित्ताने मुलींकडून वेगवेगळ्या कृती करून घेण्यात
स्वातंत्र्यदिन ....
शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलींनी कवायत व ध्वजप्रणाम केले. राष्ट्रगीत म्हणले. मुलींना समजेल अशा भाषेत चित्र दाखवून स्वतंत्रदिनाची माहिती सांगण्यात आली. घरी जाताना मुलींच्या हातावर वॉटर कलर ने तिरंगी झेंड्याचा टॅटू काढण्यात आला. तसेच महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात शिशुमंदिरच्या चिमुकल्यांनी संचलन केले
फॅन्सी ड्रेस स्पर्धा..
सर्व गटातील मुलीसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली होती प्रत्येक गटाला वेगवेगळा विषय देण्यात आला होता.
शिशुरंजन गट - प्राणी
छोटा गट - पक्षी
मोठा गट - शालेय साहित्य
या मध्ये विकतची ड्रेपरी ना वापरता पालकांनी स्वतः तयार केलेला ड्रेस मुलींना घातला होता. आपण केलेल्या वेशभुषे बद्दल मुलीची बोल्त होत्या. स या स्पर्धेचे परीक्षण कै सौ.अश्विनी अरूण देवस्थळी प्रीप्रायमरी च्या मुख्याध्यापिका मा. अंकईकर मॅडम तसेच इंग्रजी माध्यम कात्रजच्या शिक्षिका माँ.अर्पिता कुलकर्णी यांनी केले.
दहीहंडी
शिशुमंदिर मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. छोटा बाळकृष्ण, राधा, गोपगोपी असा मेला जमला होता. मुली छान नटून थाटून आल्या होत्या. कुणी राधा तर कुणी कृष्ण झाले होते. प्रार्थना, भजन,ग दाहहीहंडीची गाणी सामूहिक पाने मुलींनी म्हणली. दहीहंडी सणाची माहिती मुलींना सांगण्यात आली. कालियामर्दन ही गोष्ट मुलींना सांगण्यात आली. मुलींनी कृष्णाच्या गाण्यावर छान नाच केला. कृष्णाने हंडी फोडून काला प्रातिनिधिक स्वरूपात गोपाळांना दिला . वर्गात ताईंनी मुलींच्या मदतीने काल्याचा प्रसाद तयार केला.
भोंडला - ऐलोमा पैलोमा गणेश देवा..
नवरात्रात शिशुमंदिर मध्ये भोंडला मोठ्या उत्साहात करण्यात आला. ऐलोमा पैलोमा ,एक लिंबू झेलू बाई, शिवाजी आमचा राजा, श्रीकांता कमलकांता यासारखी भोंडल्याची गाणी मुलींनी मोठ्या उत्साहात म्हणली. चिमुकल्यांच्या आवाजाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला.. भोंडल्या नंतर मुलींनी खिरापत ओळखली.
शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
पंच ज्ञानेंद्रियावर आधारित मुलींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्या साहित्याचा वापर शाळेत केला जातो, त्या साहित्याची मांडणी शाळेत करण्यात आली होती.
शिशुरंजन गट, छोटा गट, मोठा गट या तीनही गटांचे प्रकल्प मांडण्यात आले होते. भाषा, गणित, विज्ञान, जीवनव्यवहार, मुक्त व्यवसाय या विषयांना अनुसरून मांडणी केली होती. मुलींना करण्यासाठी वेगवेगळ्या कृती ठेवल्या होत्या या प्रदर्शनाचे उद्घाटन हुजूरपागा शिशुमंदिर , कात्रज येथील मुख्याध्यापिका मा. उमा गोसावी यांनी केले. या प्रदर्शांला पालकांनी आणि विद्यार्थीनी उत्तम प्रतिसाद दिला.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी...
लो.टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून बालसभा घेण्यात आली. बालसभेची सुरुवात लो.टिळक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
या चला लोकमान्या ...' ही टिळकांची प्रार्थना मुलीनी सादर केली. शाळेतील एका विद्यार्थीनी लो.टिळकांचा पोशाख करून आली होती. पीपीटी द्वारे टिळकांचा जीवनपट मुलींना उलगडून दाखविला गेला. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग घेऊन नाटक सादर करण्यात आले.
पालकशाळा
शनिवार दि. ८/७/२०२३ रोजी शाळेमध्ये पालक शाळेचे आयोजन करण्यात आले होते.
बालशिक्षण तज्ञ डॉ. वृषाली देहाडराय यांने पालकांना मार्गदर्शन केले. सन २०२३-२४ मध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाचा उत्तम काळ म्हणजे ३ ते ६ हा वयोगट असतो. याच कालावधीत मुलांच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते. मुलांचा विकास योग्यपदतीने झाल्यास तो देशाचा उत्तम नागरिक होऊ शकतो. बालशिक्षण शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे दिले पाहिजे या विषयीचे उत्तम मार्गदर्शन डॉ. देहाडराय यांनी केले.
गुरुपौर्णिमा
मंगळवार दिनांक ४/७/२३ रोजी शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. व्यासपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरुवंदना सादर करण्यात आली. कार्यक्रमासाठी एच.एच.सी.पी. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मा. विनिता फलटणे प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी गुरु-शिष्याच्या पारंपरिक गोष्टी सादर केल्या. सर्व शिक्षकांचे पूजन विद्यार्थीनींच्या हस्ते करण्यात आले. मुलींना PPT द्वारे जुन्या काळातील गुरुकुल शाळा तसेच गुरु शिष्य परंपरेची माहिती देण्यात आली. मा.फलटणे बाईनी मुलीना गोष्ट सांगितली.
विठ्ठल ! विठ्ठल !!
मंगळवार दि. २७/६/२०२३ रोजी शाळेत पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
विठ्ठल ! विठ्ठल !! चल र गड्या । चल र गड्या !! पालखी चाललीया पंढरपुरा जाऊया देवाला भेटायला आज भेटायला!!
अश्या भावपूर्ण वातावरणात हुजूरपागा शिशुमंदिरमध्ये पालखी सोहळा साजरा करण्यात आला. मुलींना वारकऱ्यांचे पारंपारिक पोशाख करून आल्या होत्या. शिशुमंदिर मध्ये पालखीची मांडणी केली होती . वारकरी, विठ्ठलाचे मंदिर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या मूर्ती, तुळशी वृंदावन हे मांडण्यात आले होते. प्रार्थना, भजन, श्लोक, नाच हे घेण्यात आले तसेच संताच्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या. पीपीटी द्वारे पालखी संदर्भातील माहिती मुलींना दाखविण्यात आली. मुलीनी मुली माउली या गाण्यावर उत्तम नाच सादर केला. वेगवेगळ्या आरोळ्या दिल्या.. संत ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज कि जय, पांडुरंग वर दे हरी विठ्ठल तसेच प्रातिनिधिक स्वरूपात एका विद्यार्थीनीने संत ज्ञानेश्वरांची माहिती सांगितली. दरवर्षी पालखीसाठी एखादा विषय घेऊन त्या अनुसरून मांडणी केली जाते. या वर्षी ‘जलप्रदुषण' हा विषय घेऊन दिंडी काढण्यात आली. यानिमित्ताने पाण्याचे महत्व, पाणी प्रदूषण कसे होते व ते होऊ नये म्हणून काय उपाय करावेत किंवा कशी काळजी घ्यावी हे पीपीटी मधून दाखविण्यात आले. मुलीनी शाळे जवळील चौकात घोषणा मधून जलप्रदूषणाविषयी जनजागृती केली.
स्वच्छ नितळ नदी ठेवूया, आजाराला पळवूया ...
पाउले चालती पंढरीची वाट, ठेवूया स्वच्छ नदीचा काठ ...
हरिनामाचा गजर करुया, जलप्रदुषण टाळूया
या या निमित्तने वर्गात तसेच मुलींना घरी विविध कृती देण्यात आल्या. मुलींनी घरून पालकांच्या मदतीने पालखी तयार करून सजवून आणण्यास सांगितली होते, तसेच काही मुलीनी झेंडे तयार करून आणले, जलप्रदूषणा संदर्भातील फलक घरून तयार करून आणण्यास सांगितले होते. वर्गात मुलीनी पालखीचे चित्र रंगविले, स्प्रे-पेंटिंग मधून विठ्ठल रखुमाईचे चित्र साकारले अत्यंत उत्साहाने पालखी सोहळा शिशुमंदिर मध्ये साजरा झाला
योगदिन
२१ जून रोजी योग दिनाचे औचित्य साधून मोठा गटाने सूर्यनमस्कार, ताडासन, पद्मासन, भुजंगासन, पश्चिमोत्तरासन यासारखी आसने शिक्षिकांच्या मदतीने मुलीनी केली. योगदिन म्हणजे काय? तसेच व्यायामाचे रोजच्या जीवनातीला महत्व मुलींना समजावून सांगण्यात आले.
शाळेचा पहिला दिवस
मोठ्या गटाची शाळा १५ /६/२०२३ रोजी, छोट्या गटाची शाळा १९ /६/२०२३ रोजी सुरु झाली. सर्व गटातील मुलींचे स्वागत पारंपारिक पद्धतीने औक्षण करून करण्यात आले. सर्व वर्गात सजावट केली होती. या वर्षी प्रथमच मुलींबरोबर पालक देखील वर्गात थांबले होते.मुलींना खाऊ देण्यात आला. घरी जाताना मुलींना हातावर कागदी बँड बांधण्यात आले. मुलींसाठी खास सेल्फी पॉइंटस् तयार करण्यात आले होते. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली.
स्वातंत्र्यदिन
या वर्षीचा ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. शिशुमंदिर मध्ये या निमित्ताने विविध कृती घेण्यात आल्या. मुलींना तिरंग्याची माहिती सांगण्यात आली. मुलींनी राष्ट्रगीत म्हणले. कवायत केली.
मोठ्या गाटातील प्रत्येक वर्गातील एका मुलीने एका क्रांतीक्रारकाची माहिती सांगितली. सुभाषचंद्र बोस, मा. गांधी, वीर सावरकर, भगतसिंग, चाफेकर बंधू, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, या सारख्या क्रांतीकारकांचा त्यात समावेश होता. तिरंग्याचे मनोगत अतिशय प्रभावीपणे मोठ्या गटातील एका विद्यार्थीनीने मांडले.
घरी जाताना मुलींच्या हातावर तिरंग्याचा टॅटू काढण्यात आला. अश्याप्रकारे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मुलींनी उत्साहात साजरा केला
राखीपौर्णिमा ..
श्रावण महिन्यात येणारा आणखी एक सण म्हणजे राखीपौर्णिमा..
सामाजिक बांधिलकीचे भान राखून शिशुमंदिर दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. पोलीसमैत्री, झाडे आपले मित्र सारखे उपक्रम यापूर्वी शिशुमंदिर मध्ये मोठ्या उत्साहात राबवले गेले. शाळा व घर यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे शाळेतील मुलींचे आवडते “व्हॅन व रिक्षा वाले काका”. यावर्षी त्यांना राखी बांधून मुलींनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच “आमची सुरक्षा आमचे व्हॅनवाले काका’’ अश्या घोषणा मुलींनी दिल्या. काकांना भेटकार्ड देण्यात आले. सर्व कार्यक्रमानंतर मुलींनाही वर्गात ताईंनी राखी बांधली.
अतिशय आनंदात राखीपौर्णिमा शाळेत साजरी करण्यात आली.
नागपंचमी
नागोबा आला...
नागपंचमीचा सण शिशुमंदिर मधाल्या मुलींनी उत्साहात साजरा केला.
नागोबाची गाणी म्हणली, नागोबा आला हा नाच केला.
झिम्मा, फुगडी सारखे पारंपारिक खेळ मुलींनी मोठ्या आनंदाने खेळले . PPT द्वारे मुलीना नागाची माहिती त्यांचे प्रकार दाखविण्यात आले. कागदाचे नाग मुलीनी रंगवले,
थोडे पारंपारिक, थोडे आधुनिक यांची सांगड घालून मुलीनी नागपंचमीचा सण साजरा केला
पालकशाळा
शिशुमंदिरच्या पालकांसाठी “सुजाण पालकत्व” या विषयावर पालकशाळेचे आयोजन केल होते .पालकांना बहुमोल मार्गदर्शन करण्यासाठी “मा.श्री.राजेंद्र बहाळकर” सर आले होते.
प्रत्येक मुल हे वेगळ आहे त्यामुळे त्याची तुलना न करता त्यांना सकारात्मक वातावरण देऊन त्यांच्यातील कलागुणांचा विकास करणे , मुलींचे खरे कौतुक करणे, त्यांना शारिरीक, मानसिक भावनिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम आणि समर्थ बनवणे म्हणेच खरे सुजाण पालकत्व .. हे सरांनी त्यांच्या मार्गदर्शांत सांगितले. वेगवेगळी गाणी, छोटे छोटे खेळ घेऊन आतिशय सहजरीत्या त्यांनी पालकांशी संवाद साधला .
गुरुपौर्णिमा
शिशुमंदिर मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. व्यासपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या 'मा.सुनंदा कांबळे 'या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या.
मोठ्या गटातील मुलीनी गुरुशिष्यांच्या पारंपारिक गोष्टी सांगितल्या. आई हा सर्वात पहिला गुरु म्हणूनच तिचे पूजन आज मुलींनी केले.प्रत्येक वर्गातील प्रातिनिधिक स्वरूपात एकेक आईला आज बोलावण्यात आले होतो. आईला गजरा देऊन तसेच स्वतःच्या हाताने रंगवलेले कागदाचे फुल भेट म्हणून देण्यात आले.
मान्यवरांनी मुलींशी संवाद साधला.
पालखी सोहळा २०२२
चल रं गड्या चल रं गड्या..
पालखी चालली या पंढरपुरा
शिशुमंदिर शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुली छान वारकरी पोशाखात नटून थटून आल्या होत्या.संतवाणीच्या मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली.
दर वर्षी शाळेत एखादा विषय घेऊन पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षीचा विषय ‘क्रीडा दिंडी’ असा होता. तुळशीवृंदावन , हातात पताका, गळ्यात टाळ घेऊन खेळाविषयी घोषणा देत पालखी शाळेच्या प्रांगणात मिरविण्यात आली.
दोन वर्ष कोविड -१९ मुळे मुलांना घराबाहेर पडून खेळणे शक्य होत नव्हते. पण आता त्याना मोबाईल मधून बाहेर काढून मैदानी खेळ खेळणे हे किती महत्वाचे आहे हे समजावणे हाच या दिंडी मागचा उद्देश होता
मुलींच्या हातात खेळांची चित्रे असलेली वेगळी पालखी देण्यात आली होती. तसेच वेगवेगळ्या घोषणा असलेल्या पाट्या त्यांच्या हातात देण्यात आल्या होत्या. यात ‘ शिशुमंदिर कशाला खेळायला आणि बागडायला’, ‘मुलांचा खेळ तनामनाचा मेळ’ , ‘मुलाचं पसायदान , हसतं, खेळतं मैदान’, ‘शिशुमंदीर हवेहवे खेळ खेळण्या नवे नवे’. यासारख्या घोषणांचा समावेश करण्यात आला होता.
शाळेचा पहिला दिवस
शिशुमंदिर शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून २०२२ पासून सुरु झाले. सर्व प्रथम १५ जून पासून मोठ्या गटाची, छोट्या गटाची शाळा १७ जून , तर शिशुरंजन गटाची सुरुवात २० जूनपासून झाली.
मुलींच्या स्वागतासाठी शाळा झिरमिळ्या, फुगे लावून सजवली होती. प्रातिनिधिक स्वरूपात काही मुलींना मा मुख्याध्यापिका श्रीमती अनघा रानडे यांनी औक्षण केले. मुलींच्या स्वागातासाठी कमान फुलानी, पऱ्यानी सजवली होती. प्रत्येक गटात वर्गाबाहेर selfie point तयार केले होते.
वर्गात सर्व मुलीना औक्षण करून ताटली व पौष्टीक खाऊ म्हणून सुकामेवा देण्यात आला.
मुलींकडून फुलपाखरू रंगवून घेऊन त्याचे ब्रेसलेट मनगटावर बांधण्यात आले.
वर्गात गाणी गोष्टी घेतले.
शाळेची ओढ, शाळेत येण्याची प्रचंड उत्सुकता मुलींच्या चेहऱ्यावर दिसत होती. मुली आनंदी, उत्साही होत्या ...
शिशुमंदिर शाळेचा परिसर मुलींच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा गजबजून गेला..
शिक्षककृत साधनांचे प्रदर्शन...
१२/०४/२२ रोजी शिक्षककृत साधनांचे प्रदर्शन शिशुमंदिर मध्ये भरविण्यात आले.
शिशुमंदिर मध्ये येणाऱ्या मुलींचा वयोगट हा ३ ते ५ वर्ष असा आहे. या वयातील मुलींचा हस्त नेत्र समन्वय साधण्यासाठी वेगवेगळी साधने वापरून मुलींचा सर्वांगीण विकास केला जातो. अशाच शिक्षककृत साधनांचे हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व गटातील पालक व मुलींना बोलावले होते.
चला पाहू विज्ञानातील गमती जमती.....
(जागतिक विज्ञान दिन - २८ फेब्रुवारी)
विज्ञानाविषयी कुतूहल कायमच मुलीमध्ये असते. हे लक्षात घेऊन मोठ्या गटातील मुलींनी वेगवेगळे प्रयोग आपल्या मैत्रीणीना करून दाखवले, जसे की ‘ज्वलनाला हवेची गरज असते’, ‘लोहचुंबकाचा खेळ’ , ‘तरंगणे –बुडणे’ इत्यादी .आणि प्रत्येक प्रयोगा मध्ये दडलेले विज्ञानदेखील सांगितले. तसेच मोठ्या गटातील शिक्षिकानी विज्ञानदिनाविषयी माहिती सांगितली.
स्कूल चले हम....
२२ फेब्रुवारी २०२२ पासून शिशुमंदिर शाळा कोविड -१९ चे सर्व नियम पाळून प्रत्यक्षरीत्या सरू झाली. सर्व प्रथम मोठा गट व ७ मार्च २०२२ पासून उर्वरीत शिशुरंजन गट व छोटा गट सुरु झाले .
चिमुकल्यांच्या स्वागतासाठी शाळा झिरमिळ्या, फुगे लावून सजवली होती . मुली घरून प्रथमच शाळेत येत असल्याने घराची प्रतिकृती तयार केली होती त्यातून मुली शाळेत प्रवेशकर्त्या झाल्या. मुलीना मा मुख्याध्यापिका श्रीमती अनघा रानडे यांनी औक्षण केले . शाळेची ओढ, शाळेत येण्याची प्रचंड उत्सुकता मुलींच्या चेहऱ्यावर दिसत होती.
छोटा गट व शिशुरंजन गटातील मुलींच्या स्वागातासाठी कमान फुलानी, पऱ्यानी सजवली होती .मोठ्या गटातील मुलींनी आपल्या छोट्या गटातील मैत्रीणींचे स्वागत पुष्पवर्षाव करून केले . मुली आनंदी, उत्साही होत्या ...
शिशुमंदिर शाळेचा परिसर मुलींच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा गजबजून गेला..
दिपपूजन
ऐका मुलींनो एका तरी दिव्यांची पूजा घरोघरी असे म्हणत मुलींनी दिव्यांची अमावस्या साजरी केली. ऑनलाईन वर्गात दिव्यांची गाणी मुलीनी म्हणली. दिव्यांचे महत्व मुलींना या वेळेस सांगण्यात आले. पारंपरिक दिवे जसे कि कंदील, चिमणी, लामणदिवा, यासारखे दिवे मुलींना दाखवण्यात आले. त्याचबरोबर मेणबत्ती, बल्ब, बॅटरी या सारख्या दिव्यांचे उपयोग देखील सांगण्यात आले. शाळेत सर्व दिव्यांची मांडणी करून त्याची पूजा आघाडा दुर्वा , वाहून करण्यात आली. . मुलींना ऑनलाईन वर्गात शाळेत केलेली मांडणी दाखवण्यात आली. दिव्यांचे महत्व सांगणारी आधुनिक गोष्ट मुलींना सांगण्यात आली. कणकेचे दिवे मुलीना करण्यास सांगितले होते . यावेळेस मुलीनी करोनारूपी अंधार नाहीसा होऊ दे अशी प्रार्थना केली.
शाळेचा पहिला दिवस
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये कोविड १९ मुळे शाळेची सुरुवात ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली . मंगळवार दि. १५/०६/२०२१ रोजी मोठा गट , बुधवार दि.१६/०६/२१ रोजी छोटा गट , गुरुवार १७/०६/२१ रोजी शिशुरंजन गट या प्रमाणे शाळा सुरू करण्यात आली . ऑनलाईन शाळेची सुरुवात झूमॲपद्वारे मोठ्या उत्साहाने झाली. झिरमिळ्या , फुगे लावून शाळा सजविण्यात आली होती . वर्गात छान छान चित्रे लावण्यात आली होती.फळ्यावर चित्रे काढली होती. मुलींना शाळेची ओळख व्हावी ह्यासाठी शाळेची चित्रफीत तयार करण्यात आली होती. शाळेची सुरुवात सरस्वतीपूजनाने झाली . नंतर प्रार्थना, भजन, श्लोक, व बडबडगाणी घेतली . सर्व वर्गशिक्षकांची ओळख मा. मुख्याध्यपिका श्रीमती अनघा रानडे यांनी करून दिली. नंतर विद्यार्थीनी आणि पालकांशी मा. अनघाताईंनी संवाद साधला.
ऑनलाईन पालखी सोहळा
विठ्ठल ! विठ्ठल !! चल र गड्या । चल र गड्या !! पालखी चाललीया पंढरपुरा जाऊया देवाला भेटायला आज भेटायला !! अश्या भावपूर्ण वातावरणात हुजूरपागा शिशुमंदिरमध्ये ऑनलाईन पालखी सोहळा साजरा करण्यात आला. कोविड १९ मुळे सध्या शाळा ऑनलाईन पद्धतीने मुलींना शिक्षण देत आहे अशा परिस्थितीत मुलींना सांस्कृतिक सणांची ओळख व्हावी व सकारत्मकता निर्माण व्हावी या साठी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. शिशुमंदिर मध्ये पालखीची मांडणी केली होती . वारकरी, विठ्ठलाचे मंदिर, संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम यांच्या मूर्ती , तुळशी वृंदावन हे मांडण्यात आले होते. दरवर्षी पालखीसाठी एखादा विषय घेऊन त्या अनुसरून मांडणी केली जाते. या वर्षी 'आरोग्य दिंडी' शिशुमंदिरने काढली होती. यानिमित्ताने निरोगी राहण्याचे महत्व, आहार कसा असावा, व्यायाम कसा करावा? व्यायामाचे महत्व मुलींना सांगण्यात आले. याचा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. ऑनलाईन वर्गामध्ये मुलींना वारकऱ्यांचे पारंपारिक पोशाख करण्यास सांगितले. मोठ्या गटाच्या मुलींनी घरी राहून पालकांच्या मदतीने पालखी तयार करण्याचा ती सजविण्याचा आनंद घेतला. छोट्या गटाच्या मुलीनी पालखीचे चित्र रंगविले . तर शिशुरंजनच्या चिमुकल्या मुलीनी केशरी झेंडा तयार केला . वर्गात प्रार्थना, भजन, श्लोक , नाच हे घेण्यात आले तसेच संताच्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या . तसेच वेगवेगळ्या आरोळ्या त्यादिवशी दिल्या.. संत ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज कि जय, पांडुरंग वर दे हरी विठ्ठल . . तसेच आरोग्यविषयीच्या वेगवेगळ्या आरोळ्या शिक्षिकांनी तयार केल्या होत्या. अत्यंत उत्साहाने पालखी सोहळा शिशुमंदिर मध्ये साजरा झाला
गुरुपौर्णिमा
गुरूने दिला ज्ञानरुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा हे जाणून शिशुमंदिर ने कोविड १९ च्या या काळात ऑनलाईन शाळेत २५/७/२०२१ रोजी अनोखी गुरुपौर्णिमा साजरी केली. 'आई माझा गुरु आई कल्पतरू' हे ओळखून शिशुमंदिरच्या चिमुकल्यांनी घरी राहून मातृपूजन केले . आईला हळद-कुंकू लावून गजरा, फुल, तसेच स्वतः तयार केलेले भेटकार्ड दिले. काही मुलीनी आईविषयीच्या आपल्या भावना आपल्या शब्दांत व्यक्त केल्या. अतिशय आनंदाने साजरा झाला गरुपौर्णिमेचा हा कर्यक्रम.
स्वातंत्र्यदिन
झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा मुलींमध्ये असलेल्या कलागुणांना शिशुमंदिर मध्ये कायमच वाव दिला जातो . पण १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून खास पालकांसाठी देशभक्तीगीत गायन स्पर्धा घेतली गेली. पालकांनी स्पर्धेसाठी देशभक्ती गीताचे व्हिडीओ पाठवले होते या स्पर्धेत मोठया संख्येने सहभागी होऊन पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 'ए मेरे वतन के लोगो', 'ए वतन ए वतन', 'संदेसे आते है', या सारखी अनेक देशभक्तीगीते पालकांनी गायली. मुलींनी घरी झेंडावंदन केले व झेंडयाची माहिती सांगितली व त्याचा व्हिडीओ तयार केला. तसेच खाऊ म्हणून घरी तिरंगी कोशिंबीर देखील खाल्ली.
ऑनलाईन शिक्षण
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. शिक्षक शाळेत तर विद्यार्थिनी घरी. आणि तरीही शाळेची घंटा वाजली, शाळा सुरू झाली, वर्ग सुरू झाले. शिशुमंदिरच्या मुलींचा वयोगट लहान असल्याने त्यांना शिकवताना विशेष काळजी घेण्यात आली या वयोगटातील मुलींचे एकाजागी बसण्याचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्यांना live शिकवणे अवघड जाते त्यासाठी शिशुमंदिरच्या शिक्षिकांनी मुलींसाठी त्या त्या गटाला व विषयाला अनुसरून व्हिडीओ तयार केले व ते व्हिडीओ मुलींपर्यंत पोहचवले. अश्या प्रकारे शाळेला सुरुवात झाली.
ऑनलाइन बोरनहाण
या वर्षी शिशुरंजन गटाचे बोरनहाण ऑनलाईन करण्यात आले. शिशुरंजन गटाच्या आमच्या छोट्या मुली घरी राहून आंनदाने यात सहभागी झाल्या होत्या. काळ्या रंगाचा ड्रेस घालून मुली छान नटून थटून बोरनहाणासाठी तयार होत्या. पालकांना घरी सर्व तयारी करण्यात सांगण्यात आली होती. ताईंनी गाणी , माहिती सांगून पालकांना सूचना देत मुलींना बोरनहाण घालण्यास सांगितले. या कार्यक्रमाचा मुलींनी आणि पालकांनी आनंद घेतला.
धमाल मस्ती शिबीर
कोविड १९ च्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी शाळा चालू झालीच नाही. ‘मास्क वापरा’ , ‘सॅनिटायझर वापरा’ , ’ सुरक्षित अंतर पाळा’ या सर्व नियमांचे पालन करता करता घरीच असलेल्या आमच्या चिमुकल्या मुलींना नक्कीच कंटाळा आला असणार. सभोवतालच्या निराशाजनक वातावरणात त्यांची उमलती मने प्रफुल्लीत ठेवण्याचे काम जसे पालकांचे आहे तसेच आम्हा शिक्षकांचे देखील आहे. हाच एका ध्यास घेऊन वर्षभर घेतलेल्या अभ्यासाला थोडासा वळसा देत आम्ही 'धमाल मस्ती शिबीर' याचे आयोजन केले. मा.मुख्याध्यापिका अनघा रानडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या धमाल मस्ती शिबीरात संस्कारांचे महत्व जाणून श्लोक, प्रार्थना मुलींना शिकवल्या. त्यांच्या बालविश्वातील घटकांवर आधारलेली गाणी सांगितली. व्यायामाचे महत्व पटवून देत छोटे छोटे खेळही घेतले. आणि पंचज्ञानेंद्रियांची कौशल्ये विकसित होण्याच्या दृष्टीने हस्तव्यवसाय, जीवनव्यवहार, पाककला, इ. कृती करून घेतल्या. सध्याच्या परिस्थितीचा अविभाज्य घटक असलेल्या ऑनलाईन पध्द्तीने हे शिबीर उत्तम रित्या संपन्न झाले. मुलींबरोबर पालकांचाही उत्तम सहभाग यात दिसून आला. घरी बसून कंटाळलेल्या आमच्या मुलींना हसत खेळत ठेऊन नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न ..... धमाल मस्ती शिबीर !!
शाळेचे स्नेहसंमेलन
शाळेचे स्नेहसंमेलन म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय..मुलींची प्रॅक्टिस, छान छान कपडे, गाणी, नाच, संगीतिका, अशी रेलचेल असलेला हा संपूर्ण कार्यक्रम..पण यंदा covid19 मुळे कार्यक्रम होईल का नाही अशी चुटपुट लागून राहिली. आणि मग मा. मुख्याध्यापिका अनघा रानडे यांच्या संकल्पनेतून उभे राहिले हे ऑनलाईन स्नेहसंमेलन..याला आमचे पालक आणि आमच्या छोट्या गोड मुली यांनी विश्वास ठेवून अनमोल साथ दिली..शिक्षिकांच्या सहकार्याने तयार झाले हे ऑनलाईन स्नेहसंमेलन २०-२१.. जसे हे आगळेवेगळे स्नेहसंमेलन तसेच त्याचा विषयही वेगळा *पेहराव*
क्रीडा सप्ताह
गेलदोन वर्ष शाळेत क्रीडा सप्ताह साजरा करण्यात येतो. या वर्षी ही या उपक्रमात खंड पडला नाही, मा.मुख्याध्यापिका अनघा रानडे यांच्या हस्ते क्रीडा सप्ताहाचे उदघाटन झाले. त्यानंतर आठवडाभर मुलीना वेगवेगळे खेळ घरीच खेळून व्हिडीओ, फोटो स्वरूपात मागवले. यात बेडूक उद्या, कोलांटी उडी, डोक्यावर पुस्तक घेऊन चालणे, लंगडी, बाबांच्या मदतीने खाऊ करणे या सारख्या अनेक खेळांचे नियोजन होते. घरातील खेळ असल्याने पालक आणि मुली यांनी या खेळांचा आनंद घेतला.
नागपंचमी
श्रावण महिन्यात दरवर्षी शिशुमंदिर मध्ये आनंदाने साजरा होणारा नागपंचमीचा सण या वर्षी ही साजरा केला. मुलींना कागदी नाग कसे तयार करायचे? हे शिकवून ते तयार करायला सांगितले होते. तसेच प्रत्येक गटाला वेगवेगळ्या कृती दिल्या होत्या जसे कि आईच्या मदतीने दिवे तयार करणे, झिम्मा खेळणे, नाग तयार करणे, झोक्यावर खेळणे इ. या सत्याच कृती करतानाचा आनंद मुलींच्या चेहऱ्यावर दिसत होता. ताईंनी पाठवलेला नागपंचमी चा व्हिडीओ पहिला आणि त्यावर प्रतिक्रिया ही दिल्या..
सहल
आपण दरवर्षी प्रकल्प सहली नेत असतो त्याचप्रमाणे यंदा त्या नेल्या . फक्त त्याचे स्वरूप वेगळे होते . यंदा online पद्धतीने सहली नेण्यात आल्या. शिशुरंजन गट- बाग प्रकल्प, छोटा गट – पाण्यातले विश्व, मोठा गट – पक्षी प्रकल्प अशा प्रकारे सहलींचे नियोजन होते. online पद्धतीने सहल नेताना मुलीना गाडीत बसण्यापासून ते खाऊ खाण्या पर्यंत सर्वच प्रकारचा आनंद देण्यात आला. ही वेगळ्या पद्धतीची सहल मुलींना खूप आवडली..
सांस्कृतिक कार्यक्रम - विठूचा गजर
online पद्धतीने आमच्या छोट्या मुलीना शिकवायला सुरुवात तर छानच झाली. दरवर्षी शाळेत मोठ्या उत्साहात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. या वर्षीही ते तसेच साजरे करायचे असे ठरवले. पहिला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे पालखी. या वर्षी मुलीना घरी केशरी खडूने उपलब्ध कागदावर रंगवून त्याचा झेंडा तयार करण्यास सांगितला होता. तसेच शिक्षिकानी प्रार्थना, भजन, पालखीची गाणी तसेच पालखीची माहिती असलेला व्हीडीओ तयार करून मुलीना पाठवला. तो व्हिडीओ पाहून, तसेच दिलेली कृती करून त्याचे व पारंपारिक वेशेतील मुलींचे फोटो पालकांनी पाठवले.
स्नेहसंमेलन
शाळेच्या प्रवासातील महत्वाचा कार्यक्रम..
याही वर्षी बुधवार दि . १८/१२/२०१९ रोजी शिशुमंदिर शाळेचे स्नेहसंमेलन ' बालगंधर्व रंगमंदिर ' येथे अतिशय उत्साहात संपन्न झाले. शाळा दरवर्षी एखादा विषय घेऊन स्नेहसंमेलन करीत असते. यावर्षी शाळेच्या स्न्हेहसंमेलनाचा विषय होता 'शाळा'.. अतिशय वेगळा विषय घेऊन त्याला अनुसरून गाणी जसे आई मला शाळेत जायचंय, टण टण टण घंटी बजी स्कूल की , आज है संडे , शाळा सुटली पाटी फुटली, मजे मजेची शाळा अशा गाण्यांवर मुलींनी उत्तम नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळवली. , तसेच शाळेत प्रवेश घेताना पालकांची उडणारी तारांबळ या सारखा विषय घेऊन 'मिशन ऍडमिशन ' हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे लेखन मा.मुख्याध्यापिका अनघा रानडे यांनी केले होते.
गुरुवार दि . २०/१२/१९ रोजी मुलींसाठी अल्पोपहार ठेवला होता . स्नेहसंमेलनानंतरचा अल्पोपहार हा मुलींसाठी श्रमपरिहारच असतो . अल्पोपहाराची मुलींनी यथे आनंद लुटला.
बालदिन
गुरुवार दिनांक १४/११/२०१९ रोजी शाळेत बालदिन साजरा करण्यात आला.
पं . नेहरूंच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . आजच्या दिवशी शाळेतील पालक शिक्षक संघाने सर्व गटातील मुलींना खेळता येतील असे 'फनी गेम्स' सर्व वर्गात मांडले होते. यात 'हत्तीला शेपूट काढाणे', 'ग्लासचा मनोरा रचणे', 'बादलीत बॉल टाकणे'. मुलीनी पालकांबरोबर येऊन खेळ खेळून मजा केली. घरी जाताना मुलींना खाऊ आणि पिगी बँक गिफ्ट देण्यात आली.
बैलपोळा
शुक्रवार दिनांक ३०/८/२०१९ रोजी शाळेत बैलपोळा साजरा करण्यात आला.
बैल हा शेतकऱ्याचा मित्र.. म्हणूनच श्रावण महिन्यातील अमावास्येला बैलपोळा हा सण साजरा होतो. या वर्षी प्रथमच शिशुमंदिर मध्ये बैलपोळा साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने मातीच्या बैलजोडीचे पूजन करून औक्षण करण्यात आले. बैलांचे महत्व, तसेच वेगवेगळ्या भागात बैलपोळा सण कसा साजरा होतो हे मुलींना PPT च्या माध्यमातून दाखविण्यात आले. यात बैल रंगवताना, तसेच बैलांचे औक्षण आणि बैलांची मिरवणूक या सारखे व्हिडीओ मुलींनी लक्षपूर्वक पहिले. मोठ्या गटातील मुलींनी 'बिगी बिगी चला जाऊ' हा नाच सादर केला.
शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
शनिवार दिनांक २७/७/२०१९ रोजी शाळेत शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यात आली. शिशुरंजन गट, छोटा गट व मोठा गट या तीनही वर्षामध्ये मुलींना कश्याप्रकारे शिकविले जाते, कोणती साधने वापरली जातात, प्रकल्पानुसार कसे शिक्षण दिले जाते या सर्व गोष्टी या प्रदर्शनातून पालकांना बघायला मिळाल्या. मुली व्यावसायिक होऊन आल्या होत्या. आपण होऊन आलेल्या व्यावसायिकाबद्दल उत्तमपणे वर्णन केले. शिक्षिकांनी केलेल्या टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले. तीनही गटाचे पालक मोठया संख्येने प्रदर्शन बघण्यास आले होते.
गुरुपौर्णिमा
मंगळवार दिनांक १६/७/२०१९ रोजी शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. व्यासपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरुवंदना सादर करण्यात आली. कार्यक्रमासाठी रँग्लर र. पू. परांजपे शाळेच्या शिक्षिका 'मा.वीणा येले' आल्या होत्या. मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी गुरु-शिष्याच्या पारंपरिक गोष्टी सादर केल्या. सर्व शिक्षकांचे पूजन विद्यार्थीनींच्या हस्ते करण्यात आले. मुलींना PPT द्वारे जुन्या काळातील गुरुकुल शाळा तसेच गुरु शिष्य परंपरेची माहिती देण्यात आली.
पावसाळी सहल
गुरुवार दिनांक ११/७/२०१९ व शनिवार दिनांक १३/७/२०१९ रोजी मोठ्या गटांची पावसाळी सहल "ग म भ न प्रकाशन संचालित विद्याविकास निसर्ग शाळा, पानशेत" येथे गेली होती.
ल. म. कडू काका यांनी मुलींना वाटेत खडकवासला धरणाची माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी वृक्ष, वेली, झुडूप, रोप, गवत हे झाडांचे प्रकार दाखविले. सीड्स बॉल कसे बनवतात हे मुलींनी पहिले. प्रत्येक झाडाच्या पानाचा आकार, रंग, स्पर्श वेगळा असतो हे मुलींच्या निदर्शनास आणून दिले. तसेच गप्पी मासे, गांडूळ खत व खेकड्याची गंमत मुलींनी प्रत्यक्ष अनुभवली. नांगरणी करण्याचा वेगळा अनुभव मुलींनी घेतला.
येरे येरे पावसा
दिनांक ११ जुलै रोजी शिशुरंजन व छोट्या गटाची पावसाळी सहल ‘वर्तक बाग’ येथे गेली होती. पावसाचा आनंद घेत मुलींनी बागेत फेरफटका मारला व विविध झाडांची माहिती घेतली व पावसाळी सहलीचा आनंद लुटला.
योगदिन
२१ जून रोजी योग दिनाचे औचित्य साधून मोठा गटाने सूर्यनमस्कार, ताडासन, पद्मासन, भुजंगासन, पश्चिमोत्तरासन यासारखी आसने शिक्षिकांच्या मदतीने मुलीनी केली. योगदिन म्हणजे काय? तसेच व्यायामाचे रोजच्या जीवनातीला महत्व मुलींना समजावून सांगण्यात आले.
शाळेचा पहिला दिवस
मोठा गट व शिशुरंजन गटाची शाळा १७/६/२०१९ रोजी, तर छोट्या गटाची शाळा २०/६/२०१९ रोजी सुरु झाली. सर्व गटातील मुलींचे स्वागत पारंपारिक पद्धतीने औक्षण करून करण्यात आले. सर्व वर्गात सजावट केली होती. मुलींना खाऊ देण्यात आला. घरी जाताना मुलींना शिक्षिकानी तयार केलेले कागदी मुकुट देण्यात आले. शिशुरंजन गटातील मुलींना ‘ताटली व चमचा’ देण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली.
- शालेय उपक्रम २०१८ - १९
- शालेय उपक्रम २०१७ - १८
- शालेय उपक्रम २०१६ - १७
- सन २०१५-१६ मधील मधील विशेष उपक्रम
येरे येरे पावसा..
शनिवार दि. १८/८/१८ रोजी मोठ्या गटांची पावसाळी सहल "ग म भ न प्रकाशन संचालित विद्याविकास निसर्ग शाळा , पानशेत" येथे गेली होती.
ल. म. कडू काका यांनी मुलींना वाटेत खडकवासला धरणाची माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी वृक्ष, वेली, झुडूप, रोप, गवत हे झाडांचे प्रकार दाखविले. प्रत्येक झाडाच्या पानाचा आकार, रंग , स्पर्श वेगळा असतो हे मुलींच्या निदर्शनास आणून दिले. तसेच गप्पी मासे, गांडूळ खत व खेकड्याची गंमत मुलींनी प्रत्यक्ष अनुभवली.
यावेळी मुलींनी बटाटे लावले व बैलांची नांगरणी पाहिली.
नागोबा आला...
मंगळवार दि. १४/८/२०१८ रोजी नागपंचमीचा सण शिशुमंदिरमध्ये साजरा करण्यात आला.
नागप्रतिमेचे पूजन करण्यात आले. नागांचे व सापांचे महत्व मुलीना सांगण्यात आले.
नागांची माहिती सांगणारी गोष्ट सांगून मुलींच्या मनातील नाग – सापांची भिती साफ नाहिशी करण्यात आली.
झिम्मा फुगडी सारखे पारंपरिक खेळ खेळून मुलीनी नागपंचमीचा सण साजरा केला.
या प्रसंगी मुलीना हातावर मेंदी काढण्यात आली
चला रंग ओळखुया....
शिशुमंदिर मध्ये लाल, निळा, पिवळा हे मूळ रंगदिन साजरे करण्यात आले. या रंगदिनांच्या निमित्ताने त्या त्या रंगांच्या हस्तव्यवसायाच्या कृती, रंगांच्या वस्तूंची मांडणी द्वारे मुलीना मूळ रंगांची ओळख देण्यात आली. रंगदिनांच्या दिवशी त्या त्या रंगांचे फ्रॉक घालून मूली शाळेत उपस्थित होत्या.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे....
बुधवार दि. १/८/२०१८ रोजी शिशुमंदिरच्या विद्यर्थीनींनी केसरी वाडा, नारायण पेठ येथे
विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून लो. टिळकांना आदरांजली वाहिली.
या प्रसंगी मुलींनी 'या चला लोकमान्या' ही लो. टिळकांची प्रार्थना ..
'मी शेंगा खाल्ल्या नाहीत' हे नाटुकले...
'आज लो. टिळक पुण्यात अवतरले तर...' ही नाट्यछटा
सादर करून उपस्थित पालकांकडून शाबासकीची थाप मिळवली.
मुलींनी पालकांसमवेत केसरीवाडा येथील संग्रहालय बघितले व कार्यक्रमाची सांगता झाली.
गुरूने दिला ज्ञानरुपी वसा...
दि. ३०/७/२०१८ रोजी शिशुमंदिर मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या प्रसंगी रानडे बालक मंदिरच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन व गुरुपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोठ्या गटातील मुलींनी गुरुशिष्यांवर आधारीत असलेल्या काही पौराणिक गोष्टी व सचिन तेंडुलकर व आचरेकर गुरुजी यांसारख्या आधुनिक गुरुशिष्यांच्या प्रेरणादायक गोष्टी सांगितल्या.
जय जय विठोबा ...
दि. १८/७/१८ रोजी विठोबाचा गजर करत शिशुमंदिरच्या मुलींनी शाळेच्या आवारात पालखी मिरवली. या वर्षीचा पालखीचा विषय होता ‘प्लॅस्टिक बंदी’. ‘चल ग सखे, चल ग सखे पंढरीला.. प्लॅस्टिक मुक्त करू या धरतीला..’ अशा स्वरूपाच्या विविध घोषणा देत ‘कापडी व कागदी पिशव्या वापरा’ हा संदेश देण्यात आला.
ये रे ये रे पावसा...
दिनांक १३ जुलै व १६ जुलै रोजी अनुक्रमे शिशुरंजन व छोट्या गटाची पावसाळी सहल ‘वर्तक बाग’ येथे गेली होती. पावसाचा आनंद घेत मुलींनी बागेत फेरफटका मारला व विविध झाडांची माहिती घेतली व पावसाळी सहलीचा आनंद लुटला.
शाळेचा पहिला दिवस
दि.१५/०६/२०१७ रोजी सरस्वती पूजनाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिशूरंजन गट व छोट्या गटास सुरुवात झाली. वर्ग छान सजवलेले होते, फळ्यावर छान चित्रे काढली होती. घरी जाताना मुलींना छोटा रुमाल व शिशूरंजन गटातील मुलींना खेळ देण्यात आले.
शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात पार पडला.
दिन दिन दिवाळी.....
शिशुमंदिरमध्ये विविध पणत्या, किल्ला, आकाशकंदील लावून दिवाळी साजरी करण्यात आली. या निमित्त दिवाळीची माहिती सांगून मुलींना खाऊ देण्यात आला. आकाशकंदील भेट देण्यात आला. पहिल्या सत्रातील हा शेवटचा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
करूया वंदन सरस्वतीला....
दसऱ्यानिमित्त मुलींनी शाळेत पाटीपूजन केले. शाळेत आणलेल्या नवीन खेळाचे पूजन करण्यात आले. मुलींना नवरात्रीची व दसऱ्याची माहिती सांगण्यात आली.
ऐलोमा पैलोमा...
नवरात्री निमित्त शिशुमंदिरमध्ये मुलींचा भोंडला आयोजित करण्यात आला होता. हस्त नक्षत्राची माहिती सांगून हत्ती भोवती मुलींनी फेर धरून पारंपारिक भोंडल्याची गाणी म्हटली व खिरापतीचा आनंद लुटला.
गणपती बाप्पा मोरया......
गणेशोत्सवानिमित्त शिशुमंदिरमध्ये श्रींची स्थापना करण्यात आली. मुलींनी 'गणपती बाप्पाची पम् पम् छान' या बालगीतावर छान नाच केला व मोठ्या गटातील मुलींनी अथर्वशिर्षाचे पठण केले व गणपती बाप्पाला वंदन केले. यानिमित्ताने पालक श्री. गावडे यांनी शाडूच्या मातीची गणेशमुर्ती मुलींना करून दाखवली. मुलींनी मैद्याची गणेशमुर्ती तयार करण्याचा आनंद लुटला.
गोविंदा आला रे आला .....
या वर्षी शिशुमंदिर मध्ये ‘स्वच्छता हंडीचे’ आयोजन करण्यात आले होते. या प्रयोजनाने मुलींना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. पारंपारिक पद्धतीने बालकृष्णाने दहीहंडी फोडली.
मोठ्या गटातील मुलींनी ‘कालिया मर्दन’ हे नाटुकले सादर केले. या वर्षी मुलींनी स्वहस्ते दहीकाला तयार केला व त्याचा आनंद लुटला.
ग्रंथालय दिन
१२ ऑगस्ट या जागतिक ग्रंथालय दिनानिमित्त शिशुमंदिरच्या विद्यार्थीनींनी पुणे मराठी ग्रंथालय येथे भेट देऊन ग्रंथालयाच्या दैनंदिन कामकाजाबाबत माहिती घेतली.
रक्षाबंधन
दि ८ ऑगस्ट २०१७ रोजी नारळीपौर्णिमेनिमित्त रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या दिवशी मुलींना राखी बांधण्यात आली व नारळाची वडी खाऊ म्हणून देण्यात आली.
संस्थेतील ४ सफाई कामगार व शिशुमंदिर मधील एक सफाई कामगार यांना मुलींनी राखी बांधली व स्वच्छतेचे एक प्रेरणागीत म्हणून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. मुलींना या निमित्ताने स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले.
स्वराज्य हा माझा......
दि. १/८/२०१७ रोजी लो. टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मोठया गटातील मुलींची बालसभा आयोजित करण्यात आली होती. मुलींनी टिळकांच्या विविध गोष्टी सांगितल्या. P. P. T. द्वारे टिळकांचे बालपण ते टिळकांची महाअंतयात्रा हा प्रवास मुलींसमोर मांडण्यात आला.
नवीन नियुक्ती
दि. ३१/७/२०१७ रोजी मा. मुख्याध्यापिका श्रीमती. मंजिरी मराठे या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. दि. १/८/२०१७ पासून मा. श्रीमती. अनघा रानडे यांनी मुख्यध्यापिका या पदाचा पदभार स्विकारला. त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन!!
नागोबा आला.....
दि. २८/७/१७ शुक्रवार रोजी शिशुमंदीर मध्ये नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला. त्यादिवशी सर्पमित्र श्री. अक्षय सूर्यवंशी यांना शाळेत निमंत्रित केले होते. त्यांनी P. P. T. च्या माध्यमातून साप व नागांविषयी मुलींना माहिती दिली. तसेच सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचार काय करायचे हे ही सांगितले. नंतर नागाची पूजा केली. मुलींनी झिम्मा, फुगडी यासारखे पारंपारिक खेळ खेळले. कार्डशीटचे तयार केलेले नाग मुलींना घरी देण्यात आले.
दीपज्योती नमोस्तुते।।
दि. २१/७/१७ शुक्रवार रोजी शिशुमंदीर मध्ये दिप पुजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यावेळी लामणदिवा, नंदादीप, कंदील इ. पारंपरिक दिव्यांचे तसेच ट्यूब, बल्ब, बॅटरी इ. आधुनिक दिव्यांचे पूजन करण्यात आले. तसेच काही मुलींनी दिव्यांची तोंडी माहिती सांगितली. दिप पुजनानिमित्त मुलींनी तयार केलेल्या मातीच्या पणत्या मुलींना घरी देण्यात आल्या.
गुरुपौर्णिमा
दि. ११/७/२०१७ मंगळवार रोजी शिशुमंदीर, लक्ष्मी रोड शाळेत गुरुपौर्णिमा साजरी केली. गुरुपौर्णिमेनिमित्त मुलींनी स्वतः रंगविलेली फुले आपला ‘पहिला गुरु : आई’ म्हणून आईला देऊन कृतज्ञता व्यक्त केली. प्रातिनिधिक स्वरुपात एका आईला शाळेत निमंत्रित केले होते. म. ए. सो. शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका मा. मेधा दाते यांना पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. व्यासपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोठया गटातीला मुलींनी गुरु शिष्यांच्या उत्तम गोष्टी सांगितल्या. पूर्वीच्या काळातील गुरु शिष्यांची ओळख मुलींना व्हावी म्हणून धौम्य ऋषी व अरुणी यांच्यातील एक छोटासा संवाद मुलींनी सादर केला.
विठ्ठल.... विठ्ठल....
दि. ३ जुलै १७ रोजी शिशुमंदीर मध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखीचा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
या वर्षी पालखीचा विषय ‘शारिरीक स्वच्छता’ हा होता. त्या निमित्ताने माऊलींच्या पालखी बरोबर स्वच्छतेची एक स्वतंत्र पालखी काढण्यात आली. ‘ सकाळी लवकर उठलेच पाहिजे ’, ‘दात स्वच्छ घासलेच पाहिजेत ’, ‘ स्वच्छ आंघोळ केलीच पाहिजे ’ , ‘ नियमित व्यायाम केलाच पाहिजे’ इत्यादी या घोषणा देत आमच्या बालचमूंची छोटीशी दिंडी लक्ष्मी रोड वरून चालत चालत शिशुमंदिरच्या प्रांगणात आली. विठोबाच्या गजराने अवघी शाळा दुमदुमली.
योगादिन
शिशुमंदिरमध्ये दि. २१/६/१७ रोजी योगादिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. मुलींनी वज्रासन, पर्वतासन, शंखासन, वृक्षासन, त्रिकोणासन या सारखी आसने व सूर्यनमस्कार घातले. एक वेगळाच आनंद व सकारात्मक ऊर्जा घेऊन मुली घरी गेल्या.
शिक्षिकांचे कलाकौशल्य शिबीर
दि. १२/६/१७ रोजी श्रीमती सुवर्णा अवचट यांच्या मार्गदर्शनाद्वारे विविध प्रकारच्या कागदांची फुले तयार करण्याचे कौशल्य शिक्षिकांनी आत्मसात केले.
सेविकांसाठी उद्बोधन शिबीर २०१७-२०१८
दि. १०/६/२०१७ रोजी वा. दी. वैद्य मुलींची शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. जयश्री एडगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेविकांसाठी उद्बोधन शिबीर आयोजित करण्यात आले. विविध खेळांच्या माध्यमाद्वारे व परस्पर संवादातून सेविकांसाठी कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेचा सेविकांचा विकास होण्यास निश्चितच फायदा झाला.
प्रदर्शन व विक्री
४ फेब्रुवारी २०१७ या दिवशी पालकांनी खाद्य पदार्थ व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन मांडले व त्यांची विक्री केली. याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
पालक स्पर्धा
३ फेब्रुवारी २०१७, पालकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शिशुमंदीरमध्ये ‘एक मिनिट स्पर्धा’ व एक ‘टाकाऊ वस्तूंमधून सुशोभनाचे तक्ते तयार करणे’ ह्या दोन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
आजी-आजोबा मेळावा
२ फेब्रुवारी २०१७ या दिवशी खास आजी–आजोबांसाठी शिशुमंदिरमध्ये एक मंगलमय सोहळा आयोजित करण्यात आला होता. गुलाबपुष्प व अत्तरा द्वारे आजी- आजोबांचे स्वागत करण्यात आले. छोट्या गटातील निधी आल्हाटे व स्वरा पंडित यांनी आजी –आजोबांची वेशभूषा करून एक आजी–आजोबांचा संवाद सादर केला. आजी –आजोबांनी याला उत्तम दाद दिली. शिक्षिकांनी व सेविकांनी करमणुकीचे विविध कार्यक्रम सादर केले. आजी–आजोबांनी नातीच्या मदतीने ग्रिटींग तयार करण्याचा आनंद घेतला.
पपेट शो
१ फेब्रुवारी २०१७ या दिवशी शिक्षिकांनी वेगवेगळ्या पपेट्सद्वारे विविध बालकथांचे उत्तम सादरीकरण केले. या उपक्रमाला मुलींनी उत्तम प्रतिसाद दिला.
रंगदिन
मुलींना रंगांची ओळख व्हावी म्हणून शिशुमंदिर मध्ये विविध रंगदिन साजरे करण्यात आले. रंगदिनादिवशी त्या त्या रंगाची हस्तकलेची कृती मुलींकडून करून घेण्यात आली. त्या त्या रंगांच्या वस्तू व कृती मुलींना बघण्यासाठी मांडण्यात आल्या. या मांडणीमुळे मुलींना रंग ओळख झाली व रंगदिनाचा हेतू साध्य झाला.
शैक्षणिक साहित्य प्रदर्शन (दि.३०.९.२०१६)
शिशुरंजन गट, छोटा गट व मोठा गट या तीनही वर्षामध्ये मुलींना कश्याप्रकारे शिकविले जाते, कोणती साधने वापरली जातात, प्रकल्पानुसार कसे शिक्षण दिले जाते या सर्व गोष्टी या प्रदर्शनातून पालकांना बघायला मिळाल्या. तीनही गटाचे पालक मोठया संख्येने प्रदर्शन बघण्यास आले होते.
पावसाळा सहल (मोठा गट)
दि. २९.८.२०१६ रोजी मोठ्या गटाची पावसाळी सहल पु. ल. देशपांडे उद्यान येथे गेली होती. मुलींनी बागेतील पूल, पाण्यातील मासे, वेगवेगळी झाडे, फुले बघून व बागेत फिरून सहलीचा आनंद लुटला.
ग्रंथालय दिन
दिनांक 12 ऑगस्ट रोजी शिशुमंदिर मध्ये ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला. या दिवशी मुलींसाठी शिक्षिकांनी बालकवितांचे वाचन केले. मुलींनी ग्रंथालयात जाऊन बालकथा व बालकवितांची पुस्तके हाताळली. मोठ्या गटातील मुलींनी उत्स्फूर्तपणे एक हस्तलिखित पुस्तक तयार केले.
लो.टिळक पुण्यतिथी
सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी शिशुमंदिरने लो. टिळक पुण्यतिथी केसरी वाडा, नारायण पेठ येथे साजरी केली. या वेळी टिळकांच्या प्रतिमेचे पूजन झाले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोठया गटातील काही मुलींनी टिळकांची प्रार्थना म्हटली व त्यांना वंदन केले. या नंतर टिळकांच्या शालेय जीवनातील दोन प्रसंग घेऊन विद्यर्थीनींनी एक छोटेसे नाटुकले सादर केले व प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 'आज पुण्यात टिळक अवतरले तर' अशी संकल्पना घेऊन टिळकांच्या जहाल भाषेतील नाट्यछटा एका विद्यार्थीनीने उत्तम सादर केली. नंतर पालकांसमवेत लो. टिळक म्युझियम व केसरीच्या छापखान्याची माहिती मुलींनी घेतली. अशा रीतीने एक आगळी वेगळी लो. टिळक पुण्यतिथी शिशुमंदिरने मोठया उत्साहात साजरी केली.
आकाशवाणी
आकाशवाणी केंद्राला भेट देऊन बालोद्यान या कार्यक्रमासाठी शाळेतील गुणी विद्यार्थिनींनी 'विविध गुणदर्शन' ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे प्रेक्षेपण शनिवार दि.३०.७.२०१६ रोजी दुपारी २.३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून होणार आहे.
पालकशाळा
शनिवार दि. १६.७.१६ रोजी 'मुलांचा आहार, आरोग्य व मुलांवर होणारा जाहीरातींचा परिणाम' या विषयावर डॉ. ज्योत्स्ना पडळकर यांचे पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बहुसंख्य पालकांनी याचा लाभ घेतला व मनातील शंकांचे निरसन करून घेतले. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात कार्यक्रम सफल झाला.
प्रोजेक्टर उद्घाटन
शिशुमंदीरच्या नविन प्रोजेक्टरचे उद्घाटन श्री. कांजीभाई गाला यांच्या हस्ते करण्यात आले. प्रोजेक्टर बाल चित्रपट ( जंगल बुक ) बघण्याचा आनंद मुलींनी मनमुराद लुटला.
शैक्षणिक वर्षाची सुरुवात
सन २०१६ - १७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 'पपेट्स तयार करणे' या कार्यशाळेने झाली. शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमती अर्चना मिलिंद वाटवे यांनी या बाबत शिक्षिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षिकांनी उत्तम प्रतिसाद दिला व गोष्टी सांगण्यासाठी, अभिनयगीत्ते म्हणण्यासाठी आपल्या कल्पकतेचा वापर करत विविध पपेट्स तयार केली.
दुसऱ्या दिवशी बालभवन येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती वासंती काळे यांची विविध खेळांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विविध खेळांद्वारे मुलींना आपण हसत खेळत कसे शिक्षण देऊ शकू याबद्दलचे शिक्षिकांना वर्षभर उपयोगी पडेल असे उत्तम मार्गदर्शन लाभले.
- वार्षिक नियतकालिक -
'अंकुर' नावाचे एक नियतकालिक दरवर्षी निघते. या मध्ये पालकांचे व शिक्षिकांचे विविध विषयांवर आधारीत असलेले योग्य ते लेख छापले जातात.
- सन २०१५ - २०१६ मध्ये म. ग. ए. सोसायटीचे उत्कृष्ठ वार्षिक नियतकालिक म्हणून अंकुर या नियतकालिकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
- या वर्षी ‘स्वच्छ पुणे सुंदर पुणे’ हा संदेश देण्यासाठी मुलींची एक दिंडी काढण्यात आली.
- श्रावण महिन्यातील विविध सांस्कृतिक सणांची मुलींना माहिती मिळावी म्हणून ‘श्रावणमौज’ या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
- लो. टिळक पुण्यतिथी निमित्त मुलींची एक बालसभा आयोजित करण्यात आली.
- बालसभेमध्ये मुलींनी टिळकांची प्रार्थना, गोष्ट व एक नाटुकले उत्तमरीत्या सादर केले.
- पोलीस मैत्रीच्या दिवशी शिक्षिकांनी मुलींसाठी एक प्रोबाधनपर पथनाट्य सादर केले. मुलींनी एक समूहगान सादर केले.
- वाहतुकीचे नियम मुलींना कळावे म्हणून सन २०१५-२०१६ या वर्षी वाहतूक पोलिसांना निमंत्रित केले होते. मुलीनी त्यांना उत्फूर्तपणे प्रश्न विचारले व राख्या बांधून पोलिसांशी मैत्री केली.
- विविध प्रकल्पांतर्गत मुलींच्या वेगवेगळ्या सहली काढण्यात आल्या.
- शिक्षिकांसाठी विविध उद्बोधनपर शिबीरे आयोजित करण्यात आली.