रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा - शालेय उपक्रम

<<< Back to WRP paranjape primary school page

योगदिन उत्साहात साजरा..

२१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून रँग्लर र.पु.परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा लक्ष्मी रोड येथे इयत्ता तिसरी व चौथीच्या सुमारे ५९५ विद्यार्थिनिनी विविध प्रकारची योगासने करून मोठ्या उत्साहात योगदिन साजरा केला.

आज संपूर्ण जगाने स्वीकारलेला योगा हा भारतीय संस्कृतीत खूप जुन्या काळापासून चालत आला आहे. शालेय जीवनात लहानपणापासून अभ्यासातील एकाग्रता टिकविण्यासाठी तसेच शरीर, मन यांच्या उत्तम आरोग्यासाठी शालेय विद्यार्थ्यानी योग, आसने करणे अतिशय फायद्याचे ठरते. शाळेच्या मुख्या. मा. उन्नती जावडेकर यांनी याप्रसंगी मुलींना योगाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन दिले.

बालदिन

१४ नोंव्हेबर हा दिवस सर्वत्र बालदिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी शाळेत सर्वत्र सजावट केली. तसेच बालदिनच्या निमित्ताने शाळेत विविध खेळ वर्गावर्गामधून घेण्यात आले. परिपाठामध्ये पं.जवाहरलाल नेहरू यांची माहिती सांगितली गेली.

प्रजासत्ताक दिन

गुरुवार दि.२६ जानेवारी २०२३ रोजी हुजुरपागेच्या प्रांगणात स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. म. ग. ए. संस्थेचे पदाधिकारी सर्व विभागांचे प्रमुख, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हुजुरपागेतील गुणी विद्यार्थिनी आणि आमचा पालकवर्ग उपस्थित होते. ध्वजारोहण होऊन मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. विविध क्षेत्रात वैशिष्टपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थीनींना पारितोषिके देवून त्यांचे कौतुक करण्यात आले.

शिवजयंती

रविवार दि. १९/०२/२०२३ रोजी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. इ.४ थीच्या विद्यार्थिनी पारंपरिक पोशाखात आल्या होत्या. शिवप्रतिमेचे पूजन करून विद्यार्थीनिंनी पोवाडे आणि प्रसंगाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती रेशीम खेडकर यांनी मुलींना सुंदर अशी गोष्ट सांगितली. अश्याप्रकारे शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

काव्यवाचन स्पर्धा

२७ फेब्रुवारी हा दिवस वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस सर्वत्र मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून हुजूरपागेत अंतरशालेय काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वर्षी कवी संदीप खरे यांच्या कविता शिक्षक व पालकांसाठी घेण्यात आल्या तर विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भाव विश्वातील कवितांचे सादरीकरण करण्यात आले. यावर्षी जवळजवळ २३८ मुले, ३३ शिक्षक, २७ पालकांनी सहभाग घेतला. ८ परिक्षकांसह मोठ्या उत्साहात काव्य वाचनाची स्पर्धा पार पडली.

सामाजिकतेचे भान

दरवर्षी आपली शाळा ‘वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेस व येथील अनाथ मुलांना धान्यरूपी मदत करते. यावर्षी विद्यार्थिनींनी 'मुठभर धान्य' म्हणून तूरडाळ, मूगडाळ आणि आखा मसूर आणले होते. (अंदाजे ३०० किलो) तसेच शिक्षक वर्गानेही तेलाचा डबा देऊन सहकार्य केले.

Moothbhar dhanya

भोंडला | ३० सप्टेंबर २२

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा |
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी
पारव घुमतय पारावरी ||

शुक्रवार दि. ३० सप्टेंबर २०२२ रोजी शाळेत नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला साजरा करण्यात आला. इ. पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोशाखात नटून थटून आल्या होत्या. शाळेच्या प्रांगणात हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच या प्रतिमेभोवती फेर धरून मुलींनी भोंडल्याची पारंपारिक गाणीही म्हटली. भोंडल्याची खिरापत ओळखून मुलींना खिरापत देण्यात आली. इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी या भोंडल्याचा मनसोक्त आनंद घेतला.

bhondala bhondala

विद्यार्थिनी दिन | ८ सप्टेंबर २०२२

नव्याच वाटा शोधू आम्ही,
नवेच रस्ते घडवू आम्ही |
नव्या दिशा अन् नव्याच आशा,
नव्या युगाच्या आम्ही मुली,
मुली आम्ही..........||

गुरुवार दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजी शाळेच्या परंपरेनुसार शिक्षकदिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनी दिन साजरा करण्यात आला. यावेळी इ. चौथीच्या विद्यार्थिनींनी शाळेचा पूर्ण दिवसाचा कारभार व्यवस्थित सांभाळला. मुख्याध्यापिकेंपासून शिपायांपर्यंतची सर्व कामे मुलींनी स्वतः उत्साहाने केली. वर्गा वर्गांतून शिकविण्याचा अनुभवही घेतला.

दरवर्षी देण्यात येणारा सेवा ज्येष्ठतेचा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आश्विनी लकडे यांना देण्यात आला.

vidyarthini-din vidyarthini-din

हुजूरपागेत आगळीवेगळी रक्षाबंधन

शुक्रवार दि. १२ ऑगस्ट २२ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेच्या विद्यार्थिनींनी एका आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाचा आनंद घेतला. इ. ४ थी च्या मुलींनी स्वतः राख्या तयार केल्या. तसेच काही शिक्षक, मुख्याध्यापिका व मुलींनी विश्रामबाग पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील पोलीस बांधवांना राख्या बांधून औक्षण केले. तसेच त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त केली. मग या पोलीसदादांनीही चिमुकल्या बहिणींना ओवाळणी म्हणून खाऊ दिला. मा. मुख्याध्यापिका श्रीमती उन्नती जावडेकर यांच्या प्रेरणेतून

साकारलेल्या या उपक्रमातून बालवयातच संस्कारांचे व मूल्यांचे धडे मिळतात तसेच पोलिसांबद्दल असलेली भीती नाहीशी होऊन आदर निर्माण होण्यास मदत होते.

rakshabandhan rakshabandhan

१५ ऑक्टोबर | वाचन प्रेरणा दिन

भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शाळेत “वाचन प्रेरणा दिन” साजरा केला गेला.

डॉ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य, पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा.

या विचाराने प्रेरित होऊन आपल्या शाळेमध्ये शनिवार दि. १५ ऑक्टोबर २२ रोजी मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्गात शिक्षकांनी वाचनाचे महत्व सांगून प्रत्येक मुलीला गोष्टीचे पुस्तक वाचण्यास दिले. इ १ लीच्या मुलींना शिक्षकांनी गोष्टीचे पुस्तक वाचून दाखविले.

या दिनाचे औचित्य साधून शाळेच्या मुख्याध्यापिका उन्नती जावडेकर यांनी इ. ४ थीच्या सर्व मुलींना एक एक गोष्टीचे पुस्तक स्वखर्चातून भेट म्हणून दिली.

Wachan prerana din Wachan prerana din

“पुस्तकहंडी”

शनिवार दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत “पुस्तकहंडी” साजरी करण्यात आली. यावेळी इ. १ लीच्या छोट्या विद्यार्थिनींनी कृष्ण बनून तर इ. २ रीच्या मुलींनी राधा बनून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. तसेच इ. ४ थीच्या विद्यार्थिनींनी गोविंदा बनून नृत्याचा आनंद लुटला. या उपक्रमात हंडीत प्रसादाऐवजी पुस्तकांच्या चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या होत्या. चिट्ठी मिळालेल्या मुलींना भेट स्वरुपात पुस्तक देण्यात आले. विद्यार्थिनींसह सर्व शिक्षकांनीही या छोट्या बाळगोपाळ व राधाकृष्णाबरोबर पुस्तकहंडीचा आनंद लुटला. या उपक्रमास मा. मुख्याध्यापिका श्रीमती उन्नती जावडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

भारत देश माझा महान
तिरंगा आहे त्याची शान

“हर घर झेंडा” या शासनाच्या अभिनव अभियानांतर्गत बुधवार दि. २७ जुलै २०२२ रोजी रँग्लर र.पु.परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा,लक्ष्मी रोड येथे इयत्ता चौथीच्या सुमारे ३०६ विद्यार्थिनींनी प्रभात फेरीत सहभाग घेतला. प्रभात फेरीत विद्यार्थिनींनी भारतमाता,चाचा नेहरू अशा वेशभुषेत सहभाग घेतला होता. झेंड्याच्या घोषवाक्याचे फलक हातात घेऊन, तिरंगी रंगाचे पट्टे चेहऱ्यावर रंगवून विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने प्रभातफेरीत सहभाग घेतला.

झेंड्याविषयीच्या विविध घोषवाक्यांनी परिसर गजबजून गेला होता. अनेक पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

तसेच या अभियानात शाळेत विविध अन्न पदार्थांचे प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानास शाळेच्या मुख्या. मा. श्रीमती उन्नती जावडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Har Ghar Tiranga Har Ghar Tiranga

'होवो कमी कोरोना, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना'

रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा, लक्ष्मी रोड येथे शनिवार दि.२५ जून २०२२ रोजी पालखी सोहळा साजरा करण्यात आला. २ वर्ष वारीत कोरोनामुळे खंड पडला, म्हणून या वर्षी मोठ्या उत्साहाने वारकरी पालखीत सहभागी होताना दिसले. हाच उत्साह मुलींमध्येही ओसंडून वाहत होता. २ वर्ष शाळा बंद असल्याने यावर्षी सर्व उपक्रमांत विद्यार्थिनी हिरिरीने सहभागी होत आहेत.

शाळेच्या परंपरेनुसार वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ, स्वच्छता, पर्यावरण, जल, वृक्ष अशा विविध दिंड्या काढण्यात आल्या. मुली विठ्ठल - रुक्मिणी, नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर अशा पारंपारिक पोशाखात आल्या होत्या. शाळेच्या भोवती लक्ष्मी रोडने विठू नामाचा गजर करत दिंडी काढण्यात आली. तसेच यावर्षी मुख्य आकर्षण ठरले ते - कोरोना योद्धा. कोरोना योद्धांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहींनी कोरोना योद्ध्यांचे पोशाख केले तर काहींनी विविध घोषवाक्यांचे फलक दिंडीत वापरले. मुलींनी खाऊचा, विठूच्या गजराचा आनंद घेतला. याप्रसंगी शाळेच्या मुख्या.मा.उन्नती जावडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Palakhi Sohala Palakhi Sohala

२१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन

'जगाला आनंदित करूया, चला योगाकडे जाऊया'

आज २१ जून जागतिक योगदिन. आज संपूर्ण जगात २१ जून हा जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो. योग हा भारतीय व्यायामप्रकार असून त्याला पूर्ण जगाने अंगिकारले आहे. रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा, लक्ष्मी रोड येथे जागतिक योगदिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना योगाचे महत्त्व व फायदे सांगण्यात आले. शालेय आवारात विविध ठिकाणी योगाचे महत्त्व सांगणारी भित्तीपत्रके लावण्यात आली. तसेच तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग मिळून सुमारे ५७० जणांनी मिळून विविध प्रकारची योगासने व प्रात्यक्षिके केली. सर्वांनी मिळून संस्कृत आरोग्यवर्धक श्लोकाचे पठण केले. मा.मुख्या.श्रीम. उन्नती जावडेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.

विद्यार्थी शालाप्रवेशोत्सव

शाळा बंद - शाळा चालू, कोरोनाच्या लाटा, ऑनलाईन तास या तांत्रिक जगातून बाहेर येऊन आता मुले प्रत्यक्ष शाळेचा खऱ्या अर्थाने आनंद घेणार असल्याने शासन निर्णयानुसार बुधवार दि.१५ जून २०२२ पासून रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा, लक्ष्मी रोड येथे आज चिमुकल्यांचा पुन्हा नव्याने किलबिलाट ऐकू येऊ लागला. रांगोळी, फुग्यांचे तोरण, स्वागतार्ह आकर्षक फलकलेखन, भेटवस्तू, लहान मुलांची किलबिल गाणी, खाऊ अशा उत्साहाच्या वातावरणात शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम उन्नती जावडेकर व सहकारी शिक्षकांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक स्वागत केले. इयत्ता ४ थीच्या विद्यार्थिनींनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणाच्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा समाजसुधारकांच्या पेहरावात आल्या होत्या तसेच मुलांच्या आवडत्या कार्टून व्यक्तिरेखा भीम, चुटकी अशा पोशाखातही मुली आल्या होत्या.

पहिल्याच दिवशी नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात आले. देवी सरस्वतीच्या पूजनाने व पुस्तक पूजनाने विद्यार्थिनींचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

1st day of school 2022-23 1st day of school 2022-23

पालखी सोहळा

मंगळवार दिनांक 20 जुलै 2021 रोजी देवशयनी आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका उन्नती जावडेकर व सर्व शिक्षक यांनी दिंडीचे अतिशय जल्लोषात जय जय राम कृष्ण हरी चा जयघोष करत पालखी सोह पोळा साजरा केला.

व या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुलींना शाळेच्या सांस्कृतिक आयडीवर केले गेले. तसेच दिंडी चे महत्व दिंडी विषयीची माहिती रिंगण पालखी चे प्रस्थान कोरणा मुळे बसमधून नेण्यात आलेल्या माऊलींच्या पादुका या सर्वांविषयी चे लिंक तयार करून मुलींना पाठविण्यात आली अशा पद्धतीने मुलींनी ऑनलाईन पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.

या वर्षात करोना असल्याने सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यामुळे फोटो व माहिती नसली तरी सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरे केले गेले. प्रत्येकाचे सविस्तर व्हिडीओ केले होते.

शालेय उपक्रम २०१९ - २०

१९ फेब्रुवारी २०२० | हुजूरपागा प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

बुधवार दि. १९/०२/२०२० रोजी रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा येथे शिवसोहळा साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे ६०० विद्यार्थिनींची शिव घोषणा देत लक्ष्मी रस्त्याने प्रभात फेरी काढण्यात आली.

यानंतर शिवप्रतिमेचे पूजन करून विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे विद्यार्थिनींनी नाटुकले सादर केले. तसेच वीररसाने भरलेले पोवाडे सादर करण्यात आले. याद्वारे आपल्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यात आले.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सगळ्या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्या. मा. श्रीमती साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

१९ डिसेंबर २०१९ | स्नेहसंमेलन २०१९

गुरुवार दि. १९ डिसेंबर २०१९ रोजी रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा या शाळेचे 'बालगंधर्व रंगमंदिर' येथे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या समारंभास संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध एकपात्री विनोदी कलाकार श्री. बंडा जोशी लाभले होते. त्यांनी त्यांच्या खुमासदार शैलीतून पालकांना खळखळून हसवले.

"महाराष्ट्राचा जागर" या संकल्पनेवर आधारित अनेक नाटक व नृत्ये बालचमुंनी सादर केली. यावेळी पालकांनी पोवाडा, लावणी, भारुड, कोळीनृत्य, आदिवासी , शेतकरी नृत्य अशा विविध महाराष्ट्रातील संस्कृतीचा आनंद घेतला. तसेच इ. १ ली व २ रीच्या विद्यार्थिनींनी विविध बालगीतांवर नृत्याविष्कार सादर केला. यावेळी संस्थेतर्फे तसेच माजी शिक्षकांतर्फे शाळेस ISO मान्यता मिळाल्याबद्दल मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. शाळेच्या मुख्या. मा. श्रीमती साधना जक्कल यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले.

स्नेहसंमेलन २०१९ स्नेहसंमेलन २०१९

 पालकशाळा

दरवर्षीप्रमाणे गुरुवार दि. २८/११/१९ व शुक्रवार दि. २९/११/१९ रोजी शाळेच्या अमृत महोत्सव सभागृहामध्ये इयत्ता १ ली ते ४ थीच्या पालकांसाठी पालकशाळेचे आयोजन केले होते. ही पालकशाळा स.११ ते ३ या वेळेत भरविण्यात आली होती. पालकशाळेचे आयोजन दोन सत्रात करण्यात आले.

इयत्ता १ ली व २ री च्या पालकांसाठी प्रथम सत्रात प्रसिद्ध लेखक व तज्ञ मार्गदर्शक डॉ. अनिल अवचट तसेच दुसऱ्या सत्रात बालरोग तज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. तसेच इ. ३ री व ४ थीच्या पालकांसाठी समुपदेशक श्रीमती पल्लवी मोहाडीकर यांनी सुजाण पालकत्व या विषयावर तसेच डॉ. अश्विनी गोडबोले यांनी मुलांचे आहार व आरोग्य या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.

पालकशाळा पालकशाळा

 क्रीडा स्पर्धा

विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपली शाळा त्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सोमवार दि. २५/११/१९ ते २८/११/१९ या दरम्यान क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

सोमवार दि. २५/११/१९ रोजी क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणी म्हणून कु. स्वामिनी जाधव ही उपस्थित होती. क्रीडा ज्योत प्रज्वलित करून रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. इ. ३ री व ४ थीच्या मुलींनी संचलन केले. मनोरे. सामुहिक कवायत, रिंग कवायत, सूर्यनमस्कार, योगासने इ. प्रकारची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

यात इ. ३ री व ४ थी साठी लंगडी, डॉजबॉल हे सांघिक खेळ तर धावणे, चेंडूफेक यांसारखे वैयक्तिक खेळ घेण्यात आले. तसेच इ. १ ली व २ री साठी चेंडूपास, रिले, अडथळ्याची शर्यत, लंगडी घालत पळणे इ. स्पर्धा घेण्यात आल्या.

सहभागी सर्व संघ व खेळाडूंनी नियमांचे पालन करीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा

सामाजिकतेचे भान

दरवर्षी आपली शाळा ‘वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेस व येथील अनाथ मुलांना धान्यरूपी मदत करते. यावर्षी विद्यार्थिनींनी 'मुठभर धान्य' म्हणून हिरवे मुग आणले होते. (सुमारे १४० किलो) तसेच शिक्षक वर्गानेही तेलाचा डबा देऊन सहकार्य केले.

तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महापुरात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. यावेळी अनेकांनी तेथील लोकांना पुन्हा उभे राहण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. अशीच मदत आपल्या शाळेतील शिक्षकवृंदानेही सुमारे १२५ नग कॉपर बोट्म असलेली स्टेनलेस स्टील ची भांडी देऊन केली व सामाजिकतेचे भान जपण्याचा प्रयत्न केला.

शाळेतील बालचमुंनीही आपला खारीचा वाटा उचलला. स्वतःचे शालेय साहित्य- दप्तर, पेन्सिल, वह्या-पुस्तके, कंपास याप्रकारचे साहित्य पूरग्रस्त विद्यार्थिवर्गास भेट म्हणून दिली.

 शैक्षणिक सहल २०१९

माणसाला चतुर होण्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. त्यामध्ये 'केल्याने देशाटन' हा पहिला उपाय आहे. हे जाणून विद्यार्थी दशेपासून परिसर, समाज यांची माहिती व्हावी यासाठी शाळेत शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० यावर्षात पुढीलप्रमाणे सहलींचे आयोजन करण्यात आले होते.

वार दिनांक इयत्ता ठिकाण
सोमवार १८/११/१९ तिसरी आनंद कृषी पर्यटन
मंगळवार १९/११/१९ पहिली निसर्ग संगीत
बुधवार २०/११/१९ चौथी महाबळेश्वर,प्रतापगड
गुरुवार २१/११/१९ दुसरी मोराची चिंचोली

शैक्षणिक सहल २०१९ शैक्षणिक सहल २०१९

१४ नोव्हेंबर २०१९ | डिजिटल हुजूरपागा बनली पुण्यातील पहिली मराठी ISO प्रमाणित शाळा.

गुरुवार दि. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी बालदिनाचे औचित्य साधून रँ.र.पु.परांजपे हुजूरपागा शाळेत आपले १० वर्ग डिजिटल करून संपूर्ण शाळा म्हणजेच २० वर्ग व एक ६४ टॅब असलेली लॅब डिजिटल केली. उद्घाटनासाठी मा. श्रीमती मीनाक्षी राऊत प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग पुणे मनपा तसेच मा. रंधवे मॅडम व मा. आवारे मॅडम सहाय्यक शिक्षण प्रमुख, पुणे मनपा. त्याचप्रमाणे म.ग.ए संस्थेच्या सचिव मा. श्रीमती रेखाताई पळशीकर, सहसचिव मा. श्रीमती शालिनीताई पाटील, कोषाध्यक्ष मा.श्री सोनावणी सर, प्रमुख विश्वस्त मा. श्रीमती जयश्रीताई बापट तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

या सत्कार समारंभात इ. १ ली च्या शिक्षकांनी तयार केलेले "चला वाचूया" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर मानाचा तुरा म्हणजे रँ.र.पु.परांजपे हुजूरपागा प्राथमिक शाळेला ISO मान्यता मिळाली. ही ISO मान्यता मिळालेली हुजूरपागा ही पुण्यातील पहिली मराठी शाळा आहे.

अशाप्रकारे संपूर्ण शाळा १००% डिजिटल करण्याचे मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल बाई यांचे स्वप्न साकार झाले.

यावेळी श्रीमती राऊत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की शिक्षणाची गोडी निर्माण करणे, मुलांनी स्वयंप्रेरणेने शिकावे यासाठी ही उत्कृष्ट साधने आहेत. तसेच छोटी मुले तंत्रज्ञान साधने लिलया हाताळतात. म्हणून ही मुलांना शिक्षण पूरक साधने आहेत तसेच प्रतिकूल परिस्थितीत गुणवत्ता टिकवणारी संस्था म्हणून शाळेचे कौतुकही केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जोशी सर यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाला मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

डिजिटल हुजूरपागा बनली पुण्यातील पहिली मराठी  ISO प्रमाणित शाळा. डिजिटल हुजूरपागा बनली पुण्यातील पहिली मराठी  ISO प्रमाणित शाळा.

१९ ऑक्टोबर २०१९ | दिवाळी

शनिवार दि. १९ ऑक्टोबर २०१९ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी शालेय आवारात आकर्षक किल्ला बांधला होता. तसेच रांगोळ्यांच्या पायघड्याही घातल्या होत्या. संपूर्ण शाळेत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली, तसेच प्रत्येक वर्गाबाहेर आकाशकंदील लावला होता. मुलींना खाऊ म्हणून दिवाळीचा फराळ चिवडा आणि लाडू आणि एकेक आकाशकंदील देण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांचे मार्गदर्शन लाभले.

०७ ऑक्टोबर २०१९ | भोंडला

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा |

माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी

पारव घुमतय पारावरी ||

सोमवार दि. ०७ ऑक्टोबर २०१९ रोजी शाळेत नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला साजरा करण्यात आला. इ. पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोशाखात नटून थटून आल्या होत्या. शाळेच्या प्रांगणात हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच या प्रतिमेभोवती फेर धरून मुलींनी भोंडल्याची पारंपारिक गाणीही म्हटली. भोंडल्याची खिरापत ओळखून मुलींना खिरापत देण्यात आली. इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी या भोंडल्याचा मनसोक्त आनंद घेतला.

स्वच्छता पंधरवडा

शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छता पंधरवडा या मोहिमे अंतर्गत रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये शालेय परिसर व आवाराची स्वच्छता, चित्रकला स्पर्धा, हात धुणे प्रात्यक्षिक, टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन तसेच स्वच्छता साखळी, स्वच्छतेशी संबंधित घोषवाक्ये, निबंध स्पर्धा, प्रश्नावली इ. अशा विविध उपक्रमांनी हा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. याद्वारे स्वच्छतेबाबत विद्यार्थिनी व शिक्षकांकडून जनजागृती करण्यात आली.

स्वच्छता पंधरवडा स्वच्छता पंधरवडा

२४ सप्टेंबर २०१९ | हुजूरपागेत नवरात्रीनिमित्त स्त्रीशक्ती चा जागर

रँग्लर र. पु. परांजपे शाळेत नवरात्रोत्सवानिमित्त दिनांक २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत माता पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्त्री शक्ती जागर महोत्सवांतर्गत होम मिनिस्टर म्हणजेच प्लानिंग मास्टर, रांगोळी स्पर्धा, पौष्टिक पाककृती स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच विविध कला गुणदर्शन (गायन, वादन, नृत्य, नाट्यछटा, एकांकिका) इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. शाळा सतत विद्यार्थिनींनी बरोबरच पालकांसाठी विविध स्पर्धांचे व्याख्यानांचे आयोजन करत असते.

 हुजूरपागेत नवरात्रीनिमित्त स्त्रीशक्ती चा जागर  हुजूरपागेत नवरात्रीनिमित्त स्त्रीशक्ती चा जागर

२३ ऑगस्ट २०१९ | हुजूरपागेत पुस्तकहंडी आणि श्रावणी शुक्रवार साजरा

शुक्रवार दि. २३ ऑगस्ट १९ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागेत श्रावणी शुक्रवार निमित्त हळदी - कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोशाखात हजर होत्या. भजन, देवीचा गजर तसेच श्रीलक्ष्मी देवीची आरती इ. गोष्टींनी कार्यक्रम सजलेला होता. सर्वात शेवटी मुलींना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याचप्रमाणे “पुस्तकहंडी” ही साजरी करण्यात आली. यावेळी इ. १ लीच्या छोट्या विद्यार्थिनींनी कृष्ण बनून तर इ. २ रीच्या मुलींनी राधा बनून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. तसेच इ. ४ थीच्या विद्यार्थिनींनी गोविंदा बनून नृत्याचा आनंद लुटला. या उपक्रमात हंडीत प्रसादाऐवजी पुस्तकांच्या चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या होत्या. चिट्ठी मिळालेल्या मुलींना भेट स्वरुपात पुस्तक देण्यात आले. या उपक्रमास मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहकारी शिक्षक वर्ग व सेवक वर्ग यांचे उत्तम सहकार्य लाभले.

२३ ऑगस्ट २०१९ | हुजूरपागेत रंगल्या आज कान्हासह यशोदा

शुक्रवार दि. २३ ऑगस्ट १९ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा येथे, पुणे महानगर क्रीडा भारती आयोजित “यशोदा पहचान (ओळखा)” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा भारती ही खेळ व आरोग्य यांसाठी कार्यरत असणारी एक राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे. या उपक्रमात सुमारे 350 माता पालक एकाच रंगाच्या साडीत उपस्थित होत्या. सर्व मुली व पालकांनी विविध खेळांचा आनंद घेतला व बक्षिसेही मिळवली. पुणे महानगर मंत्री श्री. विजय रजपूत, पुणे महानगर सहमंत्री श्री प्रदीप अष्टपुत्रे, पुणे महानगर उपाध्यक्षा श्रीमती शकुंतलाताई खटावकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमास पालक व शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमास मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यशोदा पहचान

१६ ऑगस्ट २०१९ | हुजूरपागेची आगळीवेगळी राखीपौर्णिमा

मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजी रँग्लर र.पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा येथे विद्यार्थिनी स्वराज्यसभेचा शपथविधी समारंभ पार पडला. विद्यार्थिनींना लोकशाही व त्याचे कामकाज याची जवळून ओळख व्हावी यासाठी शाळा हा उपक्रम राबवत असते. शाळेमध्ये दिनांक १९ जुलै २०१९ या दिवशी निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी मतदान कक्ष, गुप्त मतदान, मतमोजणी या सगळ्या प्रक्रिया घेण्यात आल्या. यानंतर निवडून आलेल्या प्रतिनिधींचा शपथविधी घेण्यात आला. शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल बाई यांनी नवीन शालेय मंत्रिमंडळास शपथ दिली. या कार्यक्रमाच्या वेळी म.ग.ए संस्थेच्या सहसचिव शालिनीताई पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी व नवनिर्वाचित उपशिक्षणाधिकारी कुमारी पूजा नांगरे या उपस्थित होत्या. यावेळी त्या आपल्या मार्गदर्शनात मुलींना असे म्हणाल्या की, ”जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्यात तुम्ही उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करा”. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

राखीपौर्णिमा राखीपौर्णिमा

१३ ऑगस्ट २०१९ | हुजूरपागेच्या विद्यार्थिनी स्वराज्यसभेचा शपथविधी

मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजी रँग्लर र.पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा येथे विद्यार्थिनी स्वराज्यसभेचा शपथविधी समारंभ पार पडला. विद्यार्थिनींना लोकशाही व त्याचे कामकाज याची जवळून ओळख व्हावी यासाठी शाळा हा उपक्रम राबवत असते. शाळेमध्ये दिनांक १९ जुलै २०१९ या दिवशी निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी मतदान कक्ष, गुप्त मतदान, मतमोजणी या सगळ्या प्रक्रिया घेण्यात आल्या. यानंतर निवडून आलेल्या प्रतिनिधींचा शपथविधी घेण्यात आला. शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल बाई यांनी नवीन शालेय मंत्रिमंडळास शपथ दिली. या कार्यक्रमाच्या वेळी म.ग.ए संस्थेच्या सहसचिव शालिनीताई पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी व नवनिर्वाचित उपशिक्षणाधिकारी कुमारी पूजा नांगरे या उपस्थित होत्या. यावेळी त्या आपल्या मार्गदर्शनात मुलींना असे म्हणाल्या की, ”जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्यात तुम्ही उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करा”. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

शपथविधी

१ ऑगस्ट २०१९ | बालसभा

रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळेत गुरुवार दि. १ ऑगस्ट २०१९ रोजी इ. ४ थीच्या विद्यार्थिनींनी बालसभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून हायस्कूलमधील इ. ९ वी ड मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कु. नंदिनी सेन हिला आमंत्रित केले होते. मुलींनीच या कार्यक्रमात पाहुण्यांची ओळख, सूत्रसंचालन इ. उत्तमरीत्या केले. तसेच मुलींनी लोकमान्य टिळकांचा पोवाडा, गाणी, त्यांचे कार्य, माहिती गोष्टीरूपात सांगितली. तसेच नंदिनी सेन हिने मुलींना अतिशय सुंदर उपदेशपर मार्गदर्शन केले.

१९ जुलै २०१९ | निवडणुक

शुक्रवार दि. १९ जुलै, रोजी रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा येथे "विद्यार्थिनी मंत्रिमंडळ निवडणुका" घेण्यात आल्या. विद्यार्थिनींना सार्वत्रिक निवडणुकांची माहिती व्हावी या उद्देशाने शाळेने प्रथमच हा उपक्रम राबविला. मुलींकडूनही यास भरघोस प्रतिसाद मिळाला. इयत्ता १ ली ते ४ थीच्या सर्व मुलींनी उमेदवार पत्रिका तयार करणे, उमेदवार निवडणे, योग्य चिन्हावर शिक्का मारणे, प्रचार, पोलीस बंदोबस्त ही सर्व कामे आवडीने केली. तसेच आवडता प्रतिनिधी निवडून आल्यावर जल्लोषही साजरा केला. विविध वर्गांतून नाविन्यपूर्ण रीतीने व कल्पकतेने निवडणूक घेण्यात आली. शाळेने राबविलेल्या या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

२९ जून २०१९ | विठ्ठल संतमेळ्यांसह अवतरला हुजुरपागेत

टाळांचा गजर... सजविलेल्या पालख्या... विठूनामात दंग झालेला वारकरी वर्ग आणि हे वातावरण अनुभवणारा पारंपारिक वेशभूषेतला बालचमू.

शनिवार दि. २९.६.१९ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा येथे अतिशय उत्साहात पालखी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचा सतत उत्साही असणारा आमचा शिक्षकवर्ग, पालक वर्ग, शाळेचे रिक्षावाले काका व विद्यार्थिनी यांनी पखवाज व टाळ यांच्या तालावर विठूचा गजर केला व हुजूरपागा पंढरीमय झाली. यात विविध दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. वृक्ष दिंडीने नागरिकांना रोपे वाटून हरित संदेश दिला. तर स्वच्छता दिंडीने कापडी पिशव्या वाटून प्लास्टिकचा वापर टाळण्यास सांगितले. पालखी शाळेच्या आवारातून निघून लक्ष्मी रोड वरून परिक्रमा करून आली. मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे शाळेच्या मा. मुख्या. श्रीमती साधना जक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा उत्साहात पार पडला.

२१ जून २०१९ | हुजुरपागेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

शुक्रवार दि. २१ जून १९ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत योगासनांचे विद्यार्थी जीवनात असणारे महत्व सांगण्यात आले. तसेच तिसरी व चौथीच्या सुमारे ६०८ विद्यार्थिनींनी सूर्यनमस्कार, प्राणायाम व विविध आसने प्रात्यक्षिकांसह सादर केली. यावेळी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांनी शरीर व मन निरोगी राखण्यासाठी योगाचे मार्गदर्शन केले.

१७ जून २०१९ | पुन्हा घणाणली घंटा

सोमवार दि. १७ जून रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा येथे बालचमुंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेचा संपूर्ण परिसर फुगे, मुखवटे व रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. त्यानंतर शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांनी सर्व विद्यार्थिनींचे स्वागत केले व त्यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. बालगीतांनी संपूर्ण वातावरण प्रसन्न व आनंदी झाले. नंतर विद्यार्थिनींना नवीन पाठ्यपुस्तक व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच काही विद्यार्थिनी थोर व्यक्तींच्या वेशभूषेत आल्या होत्या. त्यांनी संबंधित व्यक्तींच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. अशाप्रकारे शाळेचा पहिला दिवस आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.

शालेय उपक्रम २०१८ - १९

२७ फेब्रुवारी २०१९ | मराठी दिनानिमित्त हुजूरपागेत काव्यवाचन स्पर्धा

रँ. र. पु. पराजपे हुजूरपागा शाळेत आज आंतरशालेय काव्यवाचन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. १३३ विद्यार्थी व 33 शिक्षक यांच्या सहभागाने या स्पर्धेत रंगत आली. या वर्षी शिक्षकांची २ गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. गट १) हुजूरपागा शिक्षक व गट २) इतर शाळेतील प्राथमिक शिक्षक. या स्पर्धेमध्ये बाहेरील शिक्षक गटात बालशिक्षण मंदिरच्या श्रीमती वंदना कुंडेटकर प्रथम क्रमांक तर वा. दि. वैद्य या शाळेच्या श्रीमती साधना फडणीस यांचा द्वितीय क्रमांक आला. हुजूरपागा गटात कात्रजच्या श्रीम. मोनाली तनपुरे यांचा प्रथम क्रमांक तर कात्रज शाळेच्याच श्रीम. ज्योत्स्ना पवार यांचा द्वितीय क्रमांक आला. पालकांच्या गटांमध्ये श्रीम. नेहा वैद्य यांचा प्रथम क्रमांक आला. विद्यार्थांच्या गटामध्ये एकूण पहिले चार व २ उत्तेजनार्थ अशी ६ बक्षिसे दिली. त्यामध्ये रँ. र. पु शाळेची शर्वरी कोकणे प्रथम क्रमांक, हुजूरपागा कात्रजची श्रीनिधी हुद्दार द्वितीय क्रमांक तर नवीन मराठी शाळेची सानिया भंडारे हिचा तृतीय क्रमांक आला. या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास संस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती विनयाताई देशपांडे आवर्जून उपस्थित होत्या. या संपूर्ण काव्यवाचन स्पर्धेसाठी श्रीमती अंजली कुलकर्णी, श्रीमती सुनीति लिमये, श्रीमती दीपा भिडे, श्रीमती नीलिमा रास्ते, श्रीमती गीता देशमुख, श्रीमती मंगला साळुंखे यांनी परीक्षण केले. बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका श्रीम. अंजली कुलकर्णी त्यांच्या मनोगतात शाळेच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. तसेच कवितेचा निखळ आनंद लुटण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन केले जावे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्या. मा. श्रीम. साधना जक्कल बाईंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

१९ फेब्रुवारी २०१९ | रँ. र. पु. हुजूरपागेत शिवजयंती जल्लोषात साजरी

इयत्ता ३ री व ४ थीच्या विद्यार्थिनी पारंपरिक पोशाखात शाळेत आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मा. मुख्या. श्रीमती साधना जक्कल बाई यांच्या हस्ते शिवप्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थिनी, शिक्षक व पालकांसमवेत शालेय आवाराभोवती प्रभातफेरी शिवरायांच्या जयघोषाने निनादून निघाली. त्यानंतर शिवरायांच्या विविध प्रसंगातून त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी केले. सर्व कार्यक्रमासाठी मा. मुख्या. जक्कल बाईंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अवघ्या वातावरणात शिवमय सळसळता उत्साह संचारत होता.

Shivjayanti Shivjayanti

१९ डिसेंबर १८ | स्नेहसंमेलन

विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देणारा, बक्षिसे मिळविणाऱ्या मुलींचे कौतुक करणारा लगबगीचा दिवस म्हणजे स्नेहसंमेलन. यावर्षी शाळेचे स्नेहसंमेलन बुधवार दि. १९/१२/१८ रोजी हुजुरपागेच्या प्रांगणात भरविण्यात आले. संमेलनाची प्रमुख पाहुणी म्हणून छत्रपती संभाजी मालिकेतील युवराज्ञी येसूबाई म्हणजेच हुजूरपागेची माजी विद्यार्थिनी प्राजक्ता गायकवाड ही लाभली होती.

नोव्हेंबर २०१८ | शैक्षणिक सहल

शाळेमध्ये अनेक उपक्रमांची रेलचेल असते. या सर्व उपक्रमांमध्ये सर्वांचा आवडता उपक्रम म्हणजे "शैक्षणिक सहल". दरवर्षी विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणींबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी सहलीचा आनंद लुटतात. यातून नवीन ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन तर होतेच मात्र त्याबरोबर विद्यार्थिनींच्या अनेक क्षमतांचा विकास होण्यास मदत होते.

दिनांक इयत्ता ठिकाण
२० नोव्हेंबर २०१८ ४ थी Moon Water Resort
२७ नोव्हेंबर २०१८ ३ री निसर्ग संगीत
२२ नोव्हेंबर २०१८ २ री बनेश्वर कृषी पर्यटन केंद्र
२९ नोव्हेंबर २०१८ १ ली मुंदडा कि वाडी

क्रीडा स्पर्धा

Sports Sports

२ नोव्हेंबर १८ | दिवाळी

"आली आली दिवाळी जिची पाहत होतो वाट
आनंदाचे तरंग सर्वत्र पसरली उत्साहाची लाट"

दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही शुक्रवार दि. २/११/१८ रोजी दिवाळी साजरी करण्यात आली. शाळेत अतिशय उत्साहाचे वातावरण पसरले होते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ किल्ला, मावळे, दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. आवडीच्या पोशाखातील मुलींना दिवाळी भेट म्हणून खाऊ व आकाशकंदील देण्यात आले.

१ अॉक्टोबर | हुजूरपागेत डिजिटल वर्गांचा विद्यार्थ्यार्पण सोहळा

म. ग. ए. संस्थेच्या रॅं. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा येथे चार टि.व्ही वर्ग, चार इंटरॲक्टीव्ह बोर्ड असणारे वर्ग, एक साऊंड क्लास व ६४ टॅबची एक प्रशस्त टॅबलॅब यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवार दि. १/१०/२०१८ रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाला. उद्घाटनासाठी मा. श्री. डॉ. सुनील मगर संचालक बालभारती, मा. श्री. राजेंद्र जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी पुणे, तसेच संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती शामाताई जाधव, सचिव मा. श्रीमती रेखाताई पळशीकर, कोषाध्यक्षा मा. श्रीमती उषाताई वाघ, सहसचिव मा. श्रीमती शालिनीताई पाटील तसेच संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, विभाग प्रमुख, पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
सदर कार्यक्रमात बोलताना श्री. मगरसाहेब यांनी “पुण्यात डिजिटल बनलेली पहिली शाळा" या शब्दांत शाळेचे अभिनंदन केले. तंत्रज्ञानाप्रमाणे संस्कार, शिक्षक, अभ्यासक्रमाशी सुसंगत साहित्य यांचीही तितकीच गरज आहे, असेही सांगितले. तर श्री. राजेंद्र जगतापसाहेबांनी डिजिटल शाळा झाल्यामुळे आता शाळेतून स्मार्ट मुली बाहेर पडतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच विद्यार्थिनींचे कौतुकही केले. सदर कार्यक्रमात शाळेने डिजिटल वर्गांबरोबर विद्यार्थिनींना त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या इयत्तेप्रमाणे शैक्षणिक ॲप देऊन ८४७ विद्यार्थिनीही डिजिटल केल्या. त्या ॲपचेही व्हर्च्युअल उद्घाटन सर्व प्रमुखांच्या हस्ते करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाच्या पूर्णत्वासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांचे मार्गदर्शन लाभले.

Digital shala Digital shala

४ सप्टेंबर | हुजूरपागेत पुस्तकहंडी दणक्यात साजरी

मंगळवार दि. ४ सप्टेंबर १८ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत “पुस्तकहंडी” साजरी करण्यात आली. यावेळी इ. १ लीच्या छोट्या विद्यार्थिनींनी कृष्ण बनून तर इ. २ रीच्या मुलींनी राधा बनून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. तसेच इ. ४ थीच्या विद्यार्थिनींनी गोविंदा बनून नृत्याचा आनंद लुटला. या उपक्रमात हंडीत प्रसादाऐवजी पुस्तकांच्या चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या होत्या. चिट्ठी मिळालेल्या मुलींना भेट स्वरुपात पुस्तक देण्यात आले. विद्यार्थिनींसह सर्व शिक्षकांनीही या छोट्या बाळगोपाळ व राधाकृष्णाबरोबर पुस्तकहंडीचा आनंद लुटला. या उपक्रमास मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Pustak handi Pustak handi

२७ ऑगस्ट | हुजूरपागेची आगळीवेगळी राखीपौर्णिमा

रेनबो फ़ाऊंडेशन इंडिया (R.F.I.) अंतर्गत "स्नेह घर" या अनाथ मुलांच्या संस्थेत सोमवार दि. २७ ऑगस्ट २०१८ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा या शाळेतील इ. ४ थीच्या विद्यार्थिनींनी राखीपौर्णिमेचा आगळावेगळा उपक्रम साजरा केला. मुलींनी स्वतः बनविलेल्या राख्या या अनाथ मुलांना बांधल्या व त्यासोबत भेटकार्डही दिले. याचबरोबर S.R.P. प्रमुख श्री. अजित कोल्हे व त्यांचे सहकारी यांनाही राख्या बांधल्या.
आपल्या पोलीस बांधवांप्रती वाटणाऱ्या भावना त्यांना सुंदर पत्रे व चित्र असणारे हस्तलिखित देऊन व्यक्त केल्या. तेथील मुलांनी व आपल्या विद्यार्थिनींनीही या कार्यक्रमाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले. S.R.P. ग्रुप तर्फे मुलींना खाऊ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. शाळेतर्फे तेथील सर्वांना मिठाई देण्यात आली. असा आगळावेगळा उपक्रम शाळेच्या मुख्या. मा. श्रीमती साधना जक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Rakshabandhan Rakshabandhan

१ ऑगस्ट | बालसभा

रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळेत बुधवार दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी इ. ४ थीच्या विद्यार्थिनींनी बालसभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून हायस्कूलमधील इ. ९ वी ब मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कु. सिद्धी फिरोदिया हिला आमंत्रित केले होते. मुलींनीच या कार्यक्रमात पाहुण्यांची ओळख, सूत्रसंचालन इ. उत्तमरीत्या केले. तसेच मुलींनी लोकमान्य टिळकांचा पोवाडा, गाणी, त्यांचे कार्य, माहिती गोष्टीरूपात सांगितली. तसेच सिद्धी फिरोदिया हिने मुलींना अतिशय सुंदर उपदेशपर मार्गदर्शन केले.

३१ जुलै | निवडणुक

मंगळवार दि. ३१ जुलै, रोजी रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा येथे “विद्यार्थिनी मंत्रिमंडळ निवडणुका“ घेण्यात आल्या. विद्यार्थिनींना सार्वत्रिक निवडणुकांची माहिती व्हावी या उद्देशाने शाळेने प्रथमच हा उपक्रम राबविला. मुलींकडूनही यास भरघोस प्रतिसाद मिळाला. इयत्ता १ ली ते ४ थीच्या सर्व मुलींनी उमेदवार पत्रिका तयार करणे, उमेदवार निवडणे, योग्य चिन्हावर शिक्का मारणे, प्रचार, पोलीस बंदोबस्त ही सर्व कामे आवडीने केली. तसेच आवडता प्रतिनिधी निवडून आल्यावर जल्लोषही साजरा केला. विविध वर्गांतून नाविन्यपूर्ण रीतीने व कल्पकतेने निवडणूक घेण्यात आली. शाळेने राबविलेल्या या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Nivadnuk Nivadnuk

१४ जुलै २०१८ | विठ्ठलाच्या नामगजरात हुजूरपागा दुमदुमली

शनिवार दि. १४ जुलै २०१८ रोजी रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा, लक्ष्मी रोड येथे पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने स्वच्छता, पर्यावरण, वृक्ष, ग्रंथ अशा विविध दिंड्यांसह आधुनिक काळाचे प्रतिनिधित्व करणारी ‘डिजिटल दिंडी’ ही दिमाखात सहभागी झाली होती. यावेळी मुलींनी लक्ष्मी रोड येथून पालखी मार्गस्थ होताना नागरिकांना तुळशीची रोपे वाटली. यातूनच “झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश या चिमुकल्यांनी अप्रत्यक्षरीत्या दिला. तसेच “प्लास्टिक टाळा, कापडी पिशव्या वापरा” असा जयघोष करत कापडी पिशव्यांचे वाटप रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना केले. विद्यार्थिनींचे कौतुक करत रिक्षावाले काकाही उत्साहाने या दिंडीत सहभागी झाले.
या नाविन्यपूर्ण दिंडीचे आयोजन सर्व उत्साही शिक्षकांनी केले, तर त्यांना मार्गदर्शन शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांनी केले.

२१ जून २०१८ | हुजूरपागा प्राथमिक शाळेत योगदिन उत्साहात साजरा

"आंतरराष्ट्रीय योगदिनाचे" औचित्य साधून गुरुवार दि. २१ जून २०१८ रोजी रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा, लक्ष्मी रोड येथे 'योगदिन' उत्साहात साजरा झाला. शाळेच्या विद्यार्थिनींना योगदिनाचे महत्व सांगण्यात आले. सूर्यनमस्कार, प्राणायम, विविध व्यायाम प्रकार, आसने इ. प्रात्यक्षिकांचे सादरीकरण इ. ४ थीच्या सर्व विद्यार्थिनींनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल तसेच सर्व इ. ४ थीचे सर्व वर्गशिक्षक उपस्थित होते.

जून २०१८ | हुजूरपागा प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत

रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा येथे शालेय आवारात फुगे लावून, रांगोळ्या काढून सनईच्या मधुर सुरांनी मुलींचे स्वागत करण्यात आले.
शिक्षण मंडळ पुणे मनपाच्या सहाय्यक प्रमुख मा. श्रीमती रंधवे मॅडम, पर्यवेक्षक मा. श्री. मेमाणे सर, सोनवलकर सर, डायटचे प्रमुख मा. श्री. शेवाळे सर व शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल बाई यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले.
शाळेतील सर्व मुलींना पाठ्यपुस्तके व खाऊ देऊन तर पालकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

Navagatanche Swagat Navagatanche Swagat

शालेय उपक्रम २०१७ - १८

२७ फेब्रुवारी २०१८ | मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आंतरशालेय काव्यवाचन स्पर्धा

२७ फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त आपल्या रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत आंतरशालेय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले होते. विविध शाळांमधील १०५ मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मुलांसाठी कवितेचा विषय त्यांच्या भावविश्वातील त्यांना आवडणारी कविता त्याचे वाचन करायचे होते. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन होऊन स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून मा. श्रीमती अपर्णा निरगुडे बाई, श्रीमती जोगळेकर बाई, श्रीमती ठाकूर बाई, श्रीमती साळुंखे बाई यांना बोलाविले होते. स्पर्धा संपल्यावर लगेचच बक्षीस समारंभ झाला. यशस्वी स्पर्धकांना परिक्षकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

Kavyawachan Spardha Kavyawachan Spardha

जानेवारी २०१८ । क्रीडा स्पर्धा

सोमवार दि. ८/१/२०१८ ते गुरुवार दि. ११/१/२०१८ या काळात आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. सोमवार दि. ८/१/२०१८ या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर आसने, सूर्यनमस्कार, साधन कवायते, एरोबिक्स, पिरॅमिड, लेझीम ही प्रात्याक्षिके सादर केली. इ. १ ली ते ४ थीच्या मुलींच्या सांघिक व वैयक्तिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. चेंडू पास, रिले, लंगडी, चकवा चेंडू या सांघिक स्पर्धा व धावणे, अडथळ्याची शर्यत, लंगडी, चेंडूफेक अशा वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही चेंडूपास, भरभर चालणे, चेंडू फेक या स्पर्धा घेण्यात आल्या.

Krida Spardha Krida Spardha

नोव्हेंबर २०१७ | सहल

शाळा हे उपक्रमांचे मोहोळ असते, असे शिक्षणतज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे मत. खरंच शाळेत अनेक विविधांगी वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रमांची रेलचेलच असते. या सर्व उपक्रमांत सर्वांचा आवडता उपक्रम म्हणजे “शैक्षणिक सहल”. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थिनींनी वर्गमैत्रिणीं बरोबर वेगवेगळ्या सहलींचा आनंद लुटला. इ. पहिलीची सहल बुधवार दि. २२ नोव्हेंबर रोजी 'नरेंद्र मुंदडाजी कि वाडी' या ठिकाणास भेट देण्यास गेली होती. येथे मुलींनी अस्सल गावरान मेनूचा आस्वाद घेत शेतीला भेट दिली. तर काही शूर मुलींनी सर्पमित्रांबरोबर सापही अंगावर घेतले.
इ. दुसरीची सहल मंगळवार दि. २१ नोव्हेंबर रोजी खेड शिवापूर येथील "माउंटमाची" येथे गेली. येथे मुलींनी विविध खेळांचा, झाडांवरील घरांचा तसेच नयनरम्य दृश्यांचा आनंद घेतला.
इयत्ता तिसरीची सहल सोमवार दि. २० नोव्हेंबर रोजी "चोखी दाणी" येथे जाऊन आली. राजस्थानी जेवण, घोडागाडीची सफर, मातीची भांडी, राजस्थानी नृत्य, जादुगार याचा आनंद लुटला.
इयत्ता चौथीची सहल गुरुवार दि. १६ नोव्हेंबर रोजी "प्रथमेश रिसोर्ट" येथे जाऊन आली. येथील अनेक साहसी खेळांचा जसे रोप वे, वॉल क्लायबिंग अशा खेळांचा अनुभव घेतला.

१५ नोव्हेंबर २०१७ | बालदिन

१४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. पंडित नेहरूंना मुले खूप आवडत म्हणून त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.
यावर्षीही आपण आपल्या शाळेत बुधवार दि. १५ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला. सर्व मुली आवडीचा पोशाख घालून आल्या. फुग्यांनी शाळेची सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. शाळेच्या ऑफिसबाहेर पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. त्यांच्या विषयीची पुस्तके मांडण्यात आली व माहिती सांगण्यात आली. या दिवशी अभ्यासाला सुट्टी देऊन सर्व विद्यार्थिनींनी वर्गावर्गातून विविध मनोरंजक खेळाचा व खाऊचा आस्वाद घेतला.

Baldin Baldin

१४ ऑक्टोबर २०१७ | दिवाळी

आली आली दीपावली जिची पाहात होते वाट |
आनंदाचे तरंग सर्वत्र पसरली उत्साहाची लाट ||
खरोखरच दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, सौख्य, समृद्धी आणि चैतन्याचा उत्सव.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शनिवार दि. १४ ऑक्टोबर २०१७ रोजी शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. सर्व मुली आवडीचा पोशाख करून नटून थटून शाळेत आल्या होत्या. सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरलेले होते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच इतिहासाची साक्ष देणारा किल्ला बनवण्यात आला होता. सुंदर फलकलेखन करण्यात आले होते. सर्व मुलींनी पणत्या आणून शाळेत दीपोत्सव साजरा केला. सर्वत्र विलोभनीय दृश्य होते. मा. मुख्याध्यापिका श्रीमती जक्कल बाई व सर्व शिक्षक, मुलींनी आनंदाने दिवाळी साजरी केली. शाळेकडून मुलींना दिवाळी भेट म्हणून लाडू, चिवडा व एक लहान आकाशकंदील देण्यात आला.
अशाप्रकारे उत्साहाने व आनंददायी वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली.

२ ऑक्टोबर २०१७ | संस्थेच्या वर्धापनदिनी हुजूरपागेने रोवली डिजिटल शाळेची मुहूर्तमेढ

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचा १३३ वा वर्धापन दिन २ ऑक्टोबर २०१७ रोजी साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आपल्या प्राथमिक शाळेने शिक्षण पद्धतीतील आधुनिक क्रांती स्विकारत डिजिटल शाळेचे स्वप्न पाहिले व अल्पावधीतच ते पूर्ण केले. यावेळी इ. पहिली ते चौथीचे सर्व वर्ग अपग्रेड करताना २ वर्ग डिजिटल केले तर एक वर्ग 'Tab Lab (टॅब लॅब)' तयार करण्यात आला. या दिवशी तीनही वर्गांचे उद्घाटन संस्थेचे पदाधिकारी तसेच संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती शामाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यापुढे आता विद्यार्थिनी अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यावर आधारीत व्हिडीओ पाहतील व पाठाशी संबंधित खेळही टॅबवर खेळतील.
या डिजिटल शाळेच्या संकल्पनेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षकवर्गाने हि संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी मोलाची जबाबदारी उचलली.

Digital shala Digital shala

२३ सप्टेंबर २०१७ | भोंडला

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा |
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी
पारव घुमतय पारावरी ||
शनिवार दि. २३ सप्टेंबर २०१७ रोजी शाळेत नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला साजरा करण्यात आला. इ. पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोशाखात नटून थटून आल्या होत्या. शाळेच्या प्रांगणात हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच या प्रतिमेभोवती फेर धरून मुलींनी भोंडल्याची पारंपारिक गाणीही म्हटली. भोंडल्याची खिरापत ओळखून मुलींना खिरापत देण्यात आली.
इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी या भोंडल्याचा मनसोक्त आनंद घेतला.

९ सप्टेंबर २०१७ | विद्यार्थिनी दिन

नव्याच वाटा शोधू आम्ही,
नवेच रस्ते घडवू आम्ही |
नव्या दिशा अन् नव्याच आशा,
नव्या युगाच्या आम्ही मुली,
मुली आम्ही..........||
शनिवार दि. ९ सप्टेंबर २०१७ रोजी शाळेच्या परंपरेनुसार शिक्षकदिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनी दिन साजरा करण्यात आला. यावेळी इ. चौथीच्या विद्यार्थिनींनी शाळेचा पूर्ण दिवसाचा कारभार व्यवस्थित सांभाळला. मुख्याध्यापिकेंपासून शिपायांपर्यंतची सर्व कामे मुलींनी स्वतः उत्साहाने केली. वर्गा वर्गांतून शिकविण्याचा अनुभवही घेतला.
दरवर्षी देण्यात येणारा सेवा ज्येष्ठतेचा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सुषमा वैद्य यांना देण्यात आला.

१९ ऑगस्ट २०१७ | हुजूरपागेत गोविंदांनी फोडली पुस्तकहंडी

शनिवार दि. १९ ऑगस्ट १७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत छोट्या गोविंदांनी उत्साहात पुस्तकहंडी साजरी केली. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थिनी राधा - कृष्णाच्या पोशाखात नटून आल्या होत्या. गोविंदा बनलेल्या इयत्ता चौथीच्या मुलींनी वेगवेगळ्या प्रकारचे मानवी मनोरे रचले होते. प्रत्येक वर्गाच्या हंडीमध्ये पटसंख्येप्रमाणे कार्डशीटच्या चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. हंडी फोडल्यानंतर ज्या क्रमांकाची चिट्ठी मिळेल त्या क्रमांकाचे पुस्तक मुलींना प्रसाद म्हणून देण्यात आले. अशाप्रकारे ही दहीहंडी उत्साहात साजरी झाली.

pustak handi pustak handi

१५ ऑगस्ट २०१७ | स्वातंत्र्यदिन

दि. ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट शाळेत ‘क्रांती सप्ताह’ साजरा करण्यात आला. यावेळी शालेय परिपाठामध्ये क्रांतिकारकांच्या जीवनावरील आधारीत माहिती व गोष्टी सांगण्यात आल्या. तसेच क्रांतिदिन सप्ताहानिमित्त सानेगुरुजी कथामालेच्या सदस्य श्रीमती. सुषमा इनामदार यांनीही शालेय परिपाठामध्ये क्रांतीकारकांची गोष्ट सांगितली.
मंगळवार दि. १५ ऑगस्ट १७ रोजी शाळेत ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शाळा रांगोळी व क्रांतिकारकांच्या फोटोंनी सजली होती. इ. पहिली ते चौथीच्या सर्व मुली सकाळी ७.४५ वाजता शाळेत हजर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मा. सोनावणी सर उपस्थित होते. मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गाण्यावर समूहगीत व नृत्य सादर केले. असा हा राष्ट्रीय सण आनंदात साजरा करण्यात आला.

११ ऑगस्ट २०१७ | श्रावणी शुक्रवार

शुक्रवार दि. ११ ऑगस्ट १७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागेत श्रावणी शुक्रवार निमित्त हळदी - कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोशाखात हजर होत्या.
या कार्यक्रमात श्रीमती मुजुमले बाई यांनी या सणाचे महत्त्व सांगणारी पारंपारिक गोष्ट सांगितली. भजन, देवीचा गजर तसेच श्रीलक्ष्मी देवीची आरती इ. गोष्टींनी कार्यक्रम सजलेला होता. सर्वात शेवटी मुलींना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांनी केले.

०९ ऑगस्ट २०१७ | हुजूरपागेत आगळीवेगळी रक्षाबंधन

बुधवार दि. ०९ ऑगस्ट रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेच्या विद्यार्थिनींनी एका आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाचा आनंद घेतला. इ. ४ थी च्या मुलींनी स्वतः राख्या तयार केल्या. तसेच काही शिक्षक, मुख्याध्यापिका व मुलींनी विश्रामबाग पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील पोलीस बांधवांना राख्या बांधून औक्षण केले. तसेच त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त केली. मग या पोलीसदादांनीही चिमुकल्या बहिणींना ओवाळणी म्हणून खाऊ दिला. मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या उपक्रमातून बालवयातच संस्कारांचे व मूल्यांचे धडे मिळतात तसेच पोलिसांबद्दल असलेली भीती नाहीशी होऊन आदर निर्माण होण्यास मदत होते.

rakshabandhan rakshabandhan

०१ ऑगस्ट २०१७ | बालसभा

मंगळवार दि. १ ऑगस्ट १७ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत बालसभा आयोजित करण्यात आली. हुजूरपागा माध्यमिक विभागातून इ. ९ वी तील विद्यार्थिनी कु. अंकिता अलगुडे हिला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले. या कार्यक्रमात लोकमान्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इ. ४ थी तील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तसेच काही मुलींनी टिळकांच्या जीवनावर आधारीत गोष्टी सांगितल्या. मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

२६ जुलै २०१७ | हुजूरपागेत रंगला मेंदी महोत्सव

“श्रावण महिना म्हणजे सणांची लयलूट, या महिन्यातील पहिलाच सण नागपंचमी” बुधवार दि. २६ जुलै १७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत नागपंचमी निमित्त आयोजित मेंदी महोत्सवात शिक्षक, पालक व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तसेच मेंदी काढण्याचा व काढून घेण्याचा आनंद लुटला. या सणानिमित्त माता-पालक संघ, पालक संघ तसेच शिक्षकांचीही मेंदी स्पर्धा घेण्यात आली. शिक्षक व पालकांनी यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला तसेच इ. पहिली व दुसरीच्या मुलींच्या हातावर पालकांनी मेंदी काढली व इ. तिसरी व चौथीच्या मुलींनी एकमेकींच्या हातावर मेंदी काढली. अशाप्रकारे शाळेत उत्साही वातावरणात नागपंचमी निमित्त मेंदी महोत्सव साजरा करण्यात आला.

२२ जुलै २०१७ | दीप पूजन

शनिवार दि. २२ जुलै १७ रोजी प्राथमिक शाळेत दीप अमावस्या साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मा. मुख्या. श्रीमती साधना जक्कल तसेच सेवाज्येष्ठ शिक्षकांनी दिव्यांची पूजा केली. या दिनाचे महत्त्व विद्यार्थिनींना माईक वरून सांगण्यात आले. यांसारखे पारंपारिक सण शाळेत नेहमीच उत्साहाने साजरे करण्यात येतात.

१ जुलै २०१७ | वृक्षारोपण

शनिवार दि. १ जुलै २०१७ रोजी वृक्षदिनाचे औचित्य साधून शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल, सेवाज्येष्ठ शिक्षिका तसेच विद्यार्थिनींच्या समवेत शालेय परिसरात वृक्षारोपण केले. विविध प्रकारची औषधी झाडे व फुलझाडे शाळेच्या प्रांगणात लावण्यात आली.

२७ जून २०१७ | रमजान ईद

मंगळवार दि. २७ जून २०१७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत रमजान ईदचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. श्री. अन्वर राजन सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना ईद विषयी माहिती दिली. आपले मुस्लिम धर्मी बांधव पालक देखील उपस्थित होते. विद्यार्थिनींनी मुलाखतीद्वारे पालकांना व प्रमुख पाहुण्यांना प्रश्न विचारून रमजान सणाची माहिती जाणून घेतली.

Eid Eid

२४ जून २०१७ | हुजूरपागा झाली पंढरीमय

शनिवार दिनांक २४ जून रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींनी पालखी सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला. सकाळपासून शाळेत विठ्ठलाच्या नामगजरात वातावरण पांडुरंगमय झाले होते. बऱ्याच मुली ज्ञानेश्वर, तुकाराम व वारकऱ्यांच्या वेशात आल्या होत्या. तसेच काही जणींनी वृंदावन, झेंडे अशा पारंपारिक वेशात तर वृक्ष दिंडी, स्वच्छता दिंडी अशा विविध आधुनिक दिंड्यांसह सामाजिक संदेश देत पालखी लक्ष्मी रोड वरून शाळेच्या परिसरात आली. यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांसह नामगजरात रिक्षावाले काकाही सहभागी झाले होते.

२१ जून २०१७ | आंतरराष्ट्रीय योग दिन

दिनांक २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून हुजूरपागा प्राथमिक शाळेतील सुमारे ८७० विद्यार्थिनींनी विविध आसन प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करून आनंद घेतला. तसेच या दिनाचे औचित्य साधून मुलींनी नियमित योगासने करण्याचे आश्वासनही दिले. तसेच नियमित योगासने करण्याचे फायदेही सांगण्यात आले. कार्यक्रमाची सांगता ओमकारानेकरण्यात आली. मा. मुख्याध्यापिका श्रीम. साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

१५ जून २०१७ | नवागतांचे स्वागत

१५ जून २०१७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत सर्व बालचमुंचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. सर्व पहिलीच्या विद्यार्थिनींना हसरे फुगे देण्यात आले. सर्व शिक्षकांनी विविध प्रकारे गोष्टी सांगून, नाट्यीकरणाने पहिला दिवस साजरा केला. तसेच पहिल्या दिवशी मुलींना पाठ्यपुस्तकांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. अशा आनंदी वातावरणात शाळेचा पहिला दिवस पार पडला.

शालेय उपक्रम २०१६ - १७

४ जानेवारी २०१७ | पालकशाळा

बुधवार दि. ४/१/२०१७ या दिवशी इ.१ ली व २ रीच्या पालकांसाठी व शुक्रवार दि. ६/१/२०१७ या दिवशी इ. ३ री व ४ थीच्या पालकांसाठी अमृतमहोत्सव सभागृहात पालकशाळा घेतली. दोन्ही पालकशाळेसाठी बोलाविलेले वक्ते- मा. श्री.राजीव तांबे(बालसाहित्यिक)- विषय – सुजाण पालकत्व, मा. डॉ. श्रीमती प्रफुल्लता सुरु(आयुर्वेदिक डॉक्टर)- विषय – आहार व आरोग्य.

Palak shala Palak shala

१६ डिसेंबर | स्नेहसंमेलन

इ. पहिली व दुसरीच्या मुलींसाठी शुक्रवार दि. १६/१२/२०१६ या दिवशी अमृतमहोत्सव सभागृहामध्ये रंजन कार्यक्रम दाखविण्यात आले. त्या दिवशी सहाय्यक शिक्षण अधिकारी मा. श्रीमती शिल्पकला रंधवे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलाविण्यात आले होते. त्यांच्या हस्ते मुलींना बक्षिसे देण्यात आली. सोमवार दि. १९/१२/२०१६ या दिवशी इ. ३ री व ४ थीच्या मुली व पालकांसाठी हायस्कूलच्या ग्राउंडवर स्नेहसंमेलन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून इतिहासतज्ज्ञ मा. श्रीयुत विजयचंद्र थत्ते यांना आमंत्रित केले होते. संमेलनाच्या अध्यक्षा प्राथमिक शालेय समितीच्या अध्यक्षा मा. श्रीमती शालिनीताई पाटील या होत्या. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मुलींना बक्षिसे देण्यात आली. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांचे नाट्यरूपाने शिवचरित्र सादर केले.

Gathering Gathering

२१ नोव्हेंबर | सहल

इ. ४ थीची सहल सोमवार दि. २१/११/२०१६ रोजी ‘बारामती अॅग्रो’ येथे गेली होती. तिथे शेतीचे व पशु व्यवसायाचे उत्पन्न कसे वाढवावे याची माहीती वेगवेगळ्या प्रकल्पाव्दारे मुलींना दाखवण्यात आली. व इ. ३ रीची सहल सोमवार दि. २८/११/२०१६ रोजी ‘मोराची चिंचोली’ येथे गेली तिथे मुलींना शहरी भाग व ग्रामीण भागातील जनजीवनाची ओळख झाली. आणि मंगळवार दि. २९/११/२०१६ रोजी इ. पहिलीची सहल ‘शिरगाव (प्रतिशिर्डी)’ आणि ‘भोसरी गार्डन’ येथे व आणि बुधवार दि. ३०/११/२०१६ रोजी इ. दुसरीची सहल ‘दुर्गा टेकडी’ , ‘शिरगाव (प्रतिशिर्डी)’ येथे गेली. तिथे मुलींना बागेत खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.

sahal sahal

१४ नोव्हेंबर | बालदिन

१४ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीची सुट्टी आल्यामुळे मंगळवार दि. १५/११/२०१६ या दिवशी शाळेत बालदिन साजरा केला. पं. जवाहरलाल नेहरूंच्या फोटोला हार घालण्यात आला व त्यांच्या जीवनावर आधारित गोष्टींची पुस्तके वाचनासाठी ठेवली होती. प्रत्येक इयत्तेतील वर्गशिक्षकांनी मुलींचे खेळ घेतले. इयत्ता पहिलीच्या शिक्षकांनी “पपेट शो” मुलींना दाखविला. इयत्ता दुसरीच्या शिक्षकांनी छोटेसे नाटक बसविले होते. काही मुली पं.जवाहरलाल नेहरूंचा पोशाख घालून आल्या होत्या. अशाप्रकारे बालदिन साजरा केला.

२१ ऑक्टोबर २०१६ | दिवाळी

शुक्रवार दि. २१/१०/२०१६ या दिवशी शाळेत दिवाळी साजरी केली. शिक्षक, पालकसंघ व व्यवस्थापन समितीच्या सर्वांनी मिळून रांगोळ्या काढल्या. देवकुळे काकांनी किल्ला बनविला होता. संपूर्ण शाळा तोरण, आकाशकंदील आणि विजेच्या माळा यांनी सजवली होती. दिवाळीची माहिती सांगण्यात आली व फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याचा संकल्प सर्वांनी केला. फक्त प्रतिकात्मक स्वरुपात भुईनळा, भुईचक्र लावले व आनंदात दिवाळी साजरी केली. मुलींना खाऊ व आकाशकंदील भेट दिला.

१० ऑक्टोबर २०१६ | भोंडला आणि विजयादशमी

सोमवार दि. १०/१०/२०१६ या दिवशी शाळेत ‘दसरा’ व ‘भोंडला' हे सण साजरे करण्यात आले. म. ग. ए. सोसायटीच्या सभासद व प्राथमिक शाळेच्या अध्यक्षा मा. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन केले. मुलींनीही पाटीपूजन केले. दसरा गीत, माहिती, गोष्ट इ. कार्यक्रमांनी दसरा सण साजरा केला गेला. तसेच मुलींनी फेर धरून भोंडल्याची गाणी म्हटली. सर्व मुली आवडीचा पोशाख घालून आल्या होत्या. मुलींना खिरापत देण्यात आली.

२८ सप्टेंबर | वाचन प्रकल्पांतर्गत पुस्तक प्रकाशन

बुधवार दि. २८/०९/२०१६ या दिवशी डॉ. ललिता गुप्ते यांच्या "मानवी कोहिनूर डॉ. अब्दुल कलाम" या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपल्याच शाळेतील इ. चौथी ई मधील कु. दिक्षा मोटे हिच्या हस्ते झाले. इ. चौथीच्या मुली, मुख्याध्यापिका, शिक्षिका कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. यावर्षी इ. चौथी क च्या वर्गावर जुलै पासून दर बुधवारी गुप्ते बाई येऊन त्यांचा प्रकल्प राबवितात. कृतज्ञता म्हणून इ. चौथी क च्या सर्व मुलींनी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच इतर काही विद्यार्थिनींनी त्यांचे पुस्तक विकत घेतले.

Pustak Prakashan Pustak Prakashan

६ सप्टेंबर | विद्यार्थिनी दिन

यावर्षी ५ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आल्यामुळे मंगळवार दि. ०६/०९/२०१६ या दिवशी शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोला हार घालून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांची माहिती सर्व मुलींना सांगितली गेली. या दिवशी आपल्या शाळेत ‘विद्यार्थिनी दिन’ साजरा केला जातो. इ. चौथीच्या मुलींनी शिक्षिका बनून वर्गांवर जाऊन अध्यापन केले.

हुजूरपागा प्राथमिक शाळेतर्फे सर्व माजी मुख्याध्यापक,शिक्षक तसेच आता कार्यरत असणारे सर्व शिक्षक व कर्मचारी यांचाही श्रीफळ व रुमाल देऊन सत्कार करण्यात आला. यावर्षी सेवाज्येष्ठ शिक्षिका म्हणून श्रीमती वैशाली कोळी यांचा हुजूरपागा परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.

Teachers Day Teachers Day

२६ ऑगस्ट | श्रावणी शुक्रवार व पुस्तकहंडी

शुक्रवार दि. २६/०८/२०१६ शाळेत ‘श्रावणी शुक्रवार’ व ‘पुस्तकहंडी’ असे दोन कार्यक्रम साजरे करण्यात आले. मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल व ज्येष्ठ शिक्षिकांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. देवीस्तवन, देवीचे गाणे, जयघोष, माहिती व गोष्ट अशाप्रकारे कार्यक्रम साजरा केला. मुलींना दाणे व फुटाणे प्रसाद म्हणून देण्यात आला.

सुटीनंतर पुस्तकहंडीचा कार्यक्रम घेतला. यामध्ये इ.पहिली ते चौथीच्या सर्व मुलींनी कार्यक्रमात सहभाग घेतला. मुली कृष्ण, राधा, गोविंदा बनून पुस्तकहंडी फोडून कार्यक्रम साजरा केला. इ. चौथीच्या मुलींना शाळेकडून गोष्टीची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.

१९ ऑगस्ट |शिक्षकांची शैक्षणिक सहल

शुक्रवार दि. १९/०८/२०१६ या दिवशी ज्ञानरचनावादावर आधारित वाई तालुक्यातील वाहागाव, शिरगाव, कळंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे अध्यापन सुरु आहे. त्या शाळांना भेट देण्यासाठी हुजूरपागा प्राथमिक व कात्रज प्राथमिक अशा सर्व शिक्षकांची शैक्षणिक सहल गेली. तेथून आम्हां सर्वांना नवीन दिशा मिळाली. ज्यायोगे आमच्या दैनंदिन अध्यापनात नाविन्यपूर्ण बदल करण्यास मदत झाली. त्याबद्दल त्या सर्व शाळांचे व तसेच आम्हांस त्या शाळा भेटीचा योग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घडवून दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

Teachers trip Teachers trip

१६ ऑगस्ट | एक अनोखा उपक्रम

मंगळवार दि. १६/०८/२०१६ रोजी राखी पौर्णिमेचे औचित्य साधून मुलींनी व शिक्षकांनी शाळेत राख्या तयार केल्या होत्या. तसेच इ. चौथीच्या मुलींनी लिहिलेली पत्र व राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यात आल्या. इ. चौथीच्या काही मुली मुख्याध्यापिका व शिक्षिका ‘विश्रामबागवाडा’ पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना औक्षण करून राख्या बांधल्या. त्यांच्यातर्फे मुलींना खाऊ देण्यात आला.

१५ ऑगस्ट | स्वातंत्र्यदिन

सोमवार दि. १५/०८/२०१६ भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन शाळेच्या गच्चीवर साजरा झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत , प्रतिज्ञा , झेंडागीत, माहिती, गोष्ट असा कार्यक्रम सादर केला व वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाल्यावर मुलींना खाऊ देण्यात आला.

६ ऑगस्ट | नागपंचमी

शनिवार दि. ०६/०८/२०१६ या दिवशी नागपंचमी या सणाच्या निमित्ताने पालक-शिक्षक संघ व व्यवस्थापन समिती मधील पालकांच्या मदतीने इ. पहिली व दुसरीच्या मुलींच्या हातावर मेंदी काढण्यात आली. इ. तिसरी व चौथीच्या मुलींनी एकमेकींच्या हातावर मेंदी काढली. शाळेत मेंदी काढल्यामुळे मुली खूप आनंदात होत्या.

१ ऑगस्ट २०१६ |बालसभा

सोमवार दिनांक ०१/०८/२०१६ रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असल्यामुळे शाळेत बालसभेचे आयोजन करण्यात आले. परिपाठामध्ये लोकमान्य टिळकांविषयी महत्वाची माहिती सर्वांना सांगण्यात आली व त्यांच्यावर आधारित एक स्फूर्तीदायक गाणे ऐकवण्यात आले.
दुपारी बालसभेच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आपल्याच शाळेतील माध्यमिक विभागातील इ.९ वी तील 'शताक्षी जोशी' ही विद्यार्थिनी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, अध्यक्षांची ओळख हे सर्व इ. ४ थी ई वर्गातील विद्यार्थिनींनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन इ.४ थीच्या वर्गशिक्षकांकडे होते. श्रीमती तंतरपाळे बाईंनी शताक्षी जोशी चा सत्कार केला. इ.चौथीतील काही विद्यार्थिनींनी पोवाडा सादर केला. तसेच लोकमान्य टिळकांवर आधारित गोष्टींचे कथन व प्रसंग विद्यार्थिनींना सांगितले. त्यानंतर शताक्षी जोशी ने सुद्धा सुंदर व समर्पक गोष्ट सांगितली. विद्यार्थिनी सुद्धा अगदी मन लावून ऐकत होत्या व शेवटी आभार मानण्यात आले.
अशाप्रकारे बालसभेचा कार्यक्रम अत्यंत छान व व्यवस्थितरित्या पार पडला.

९ जुलै २०१६ | पालखी सोहळा

“ज्ञानेश्वर माऊली” च्या गजरात रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक ९ जुलै २०१६ रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींची दिंडी निघाली. इयत्ता तिसरीच्या मुली वारकऱ्यांच्या पोशाखात दिंडीत सहभागी झाल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल व ज्येष्ठ शिक्षिका यांनी माऊलींच्या मूर्तीचे पूजन केले. तसेच पालखीबरोबर स्वच्छता दिंडी, पर्यावरण दिंडी, वृक्ष दिंडी अशा दिंड्या सहभागी झाल्या होत्या. दिंडीमध्ये विठ्ठल नामाच्या गजरासह वृक्षारोपण, पर्यावरण यांच्या आरोळ्याही देण्यात आल्या.

जुलै २०१६ | शैक्षणिक उपक्रम

शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ज्ञानांजन संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता तिसरी व चौथीसाठी शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेला एकूण ११९ विद्यार्थिनी बसल्या त्याचा निकाल १००% लागला. एकूण ३० मुलींना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या मुलींना आमच्या गुणी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

१ जुलै २०१६ | वृक्षारोपण

दिनांक १ जुलै वृक्षदिनाचे औचित्य साधून शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल, सेवाज्येष्ठ शिक्षिका तसेच विद्यार्थिनींच्या समवेत शालेय परिसरात वृक्षारोपण केले.
१ जुलै २०१६ रोजी श्रीमती साधना जक्कल बाईंनी शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार स्विकारला व याचेच औचित्य साधून उपस्थित पदाधिकारी, माजी मुख्याध्यापिका व शिक्षिका तसेच सर्व शिक्षक, सेवक व उपस्थितांना रोपे देऊन एक आगळावेगळा वृक्षदिन साजरा केला

वृक्षारोपण वृक्षारोपण

२१ जून २०१६ |आंतरराष्ट्रीय योग दिन

२१ जून हा "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी शाळेच्या टेरेसवर व इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींकडून प्लेशेड मध्ये श्रीयुत जगताप या पालकांनी योगासने करून घेतली. यावेळी इयत्ता चौथीचे सर्व शिक्षक व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रंजना नाईक हजर होत्या.

१५ जून २०१६ | नवागतांचे स्वागत

यंदाचा शालेय वर्षाचा कार्यारंभ दि.१५ जून १६ रोजी झाला शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक व विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. यासाठी शालेय समिती अध्यक्षा मा. शालिनीताई पाटील आणि वर्षभरात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर यांच्या समवेत सरस्वती पूजन करून करण्यात आले. विद्यार्थिनीना खडू पेटी व क्ले वाटण्यात आले.

शालेय उपक्रम २०१५ - १६

क्षणचित्रे

School activities

Bhondla

Bhondla

Gathering

alumni program - Me Huzurpagechi

शैक्षणिक उपक्रम

शाळेच्या उज्वल परंपरेला शोभणारी गोष्ट म्हणजे चौथीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा. या परीक्षेला एकूण १०१ विद्यार्थिनी बसल्या. शाळेचा निकाल १००% लागला. एकूण ७ मुलींना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या मुलींना आमच्या गुणी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ज्ञानांजन संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता तिसरीसाठी शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेला एकूण १५० विद्यार्थिनी बसल्या त्याचा निकाल १००% लागला. एकूण ३४ मुलींना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या मुलींना आमच्या गुणी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

नवागतांचे स्वागत

यंदाचा शालेय वर्षाचा कार्यारंभ दि.१५ जून १५ रोजी झाला शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक व विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. यासाठी शालेय समिती अध्यक्षा मा. शालिनीताई पाटील आणि वर्षभरात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर यांच्या समवेत सरस्वती पूजन करून करण्यात आले.

आहार व आरोग्य सप्ताह

दरवर्षी जानेवारी महिन्यात क्रीडा स्पर्धेबरोबर आहार व आरोग्य सप्ताह साजरा केला जातो. मानवी जीवनात ‘आहार’ चे महत्व काय आहे हे समजाविले जाते - आहार प्रदर्शनातून इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थिनींचा या प्रदर्शनात सहभाग असतो. अन्न घटक, अन्न पदार्थ आकर्षक सजावट करण्यात येते. मुलींना पौष्टिक खाऊ दिला जातो.

शालाबाह्य स्पर्धा

आपले नाणे किती खणखणीत आहे हे आपल्याला बाहेरच्या जगात जाऊन पहावे लागते.त्यासाठीच आपण आपल्या विद्यार्थीनीना विविध बाह्य स्पर्धांमध्ये घेऊन जातो.
या वर्षी समूहगीत स्पर्धा, आंतरशालेय नाट्यवाचन, वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, रामरक्षा व भगवद्गीता पाठांतर, मराठी भाषा ऑलिम्पियाड परीक्षा, ज्युडो कराटे स्पर्धा, शिक्षक, पालकांच्या कथाकथन स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यात मुली, शिक्षक, पालक यांनी भरपूर बक्षिसे मिळविली.

मूठभर धान्य प्रकल्प

मुल्यसंस्कार फक्त गोष्टी सांगून किवा परिपाठाच्या तासातून होत नाहीत. तर प्रत्यक्ष कृती करून होतात. सामाजिक जाणीव ठेऊन मूठभर धान्य या प्रकल्पातून वनवासी कल्याण आश्रमाला विद्यार्थिनींनी जमा केलेले चार पोती गहू, दोन पोती साखर, एक तेलाचा डबा असे पाठविण्यात अलर तसेच हडपसर येथील अंध शाळेला दोन पोती साखर व एक तेलाचा डबा पाठविण्यात आले.
यावर्षी ससून रुग्णालयातील प्रसूती विभागाला दोन पोती तांदूळ व दोन पोती गहू पाठविण्यात आले.

दिनांक २१ जून रोजी योग दिन माजी मुख्याध्यापिका मा. श्रीमती उषा नाईक आणि पालक श्रीमती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. तेव्हापासून इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलींना दर शनिवारी एक तास आपले पालक श्री व सौ. जगताप योग व प्राणायामाचे मार्गदर्शन करतात.

१५ ऑक्टोबर डॉ. अब्दुल कलम यांचा जन्मदिवस सर्वत्र ‘वाचन दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. आपल्या शाळेतही हा दिवस वाचन दिन म्हणून साजरा केला. शाळेतील शिक्षिका श्रीमती उन्नती जावडेकर यांनी तिसरी चौथीच्या मुली व शिक्षक यासर्वांना गोष्टीची पुस्तके भेट दिली.

सांकृतिक कार्यक्रम

विद्यार्थिनींच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी आपल्या रँ. र. पु. परांजपे हुजूरपागा प्राथमिक शाळेमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत शाळेत थोर नेत्यांची जयंती पुण्यतिथी, राष्ट्रीय सण, श्रावणी शुक्रवार, नागपंचमी, पुस्तकहंडी, शिक्षकदिन, भोंडला, दसरा, दिवाळी, स्नेहसंमेलन, सहली, संक्रांत, विज्ञान दिन, महिला दिन, चौथी निरोपसमारंभ असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात.

पालखी सोहळा

दरवर्षी पुण्यनगरीत ज्येष्ठ वद्य नवमीला श्री. संत ज्ञानेश्वर व श्री. संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन होते. तर आमच्या प्राथमिक शाळेतही इयत्ता तिसरीच्या मुली असाच ‘पालखी सोहळा’ साजरा करीत आहेत. यावर्षी मुलींनी प्रत्येक वर्गाचे वेगळे रिंगण करून वारक-यांप्रमाणे नाचून विठ्ठलाचा जयजयकार केला.

नागपंचमी

बायका-मुलींचा आवडता सण ‘नागपंचमी’ त्यानिमित्ताने पहिली व दुसरीच्या विद्यार्थिनींच्या हातावर आमचे पालक - संघातील उत्साही पालक व शिक्षकांनी मेंदी काढली आणि तिसरी चौथीच्या मुलींनी एकमेकींच्या हातावर मेंदी काढली.

श्रावणी शुक्रवार

हिंदू धर्मातील विविध सणांचे महत्व कळावे, ते कसे साजरे करावेत हे समजण्यासाठी बरेचसे सण शाळेत साजरे करण्यात येतात त्यापैकी एक श्रावणी शुक्रवारचे हळदी-कुंकू.

पुस्तकहंडी

शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये दहीहंडी प्रमाणे पुस्तकहंडी केली जाते. त्यामध्ये इयत्ता चौथीच्या प्रत्येक मुलीला एक पुस्तक शाळेतून भेट म्हणून दिले जाते. यामध्ये पहिलीच्या मुली कृष्ण व दुसरीच्या मुली राधा असतात.

लेखक आपल्या भेटीला

पुस्तकहंडीच्या निमित्ताने लेखक आपल्या भेटीला हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत केला जातो. ज्यामध्ये पाठ्यपुस्तकातील किंवा मुलींच्या परिचयाचे लेखक मुलींच्या भेटीला येतात. यावर्षी शाळेच्या माजी विद्यार्थिनी लेखिका डॉ. श्रीमती ललिता गुप्ते यांना प्रश्न विचारून त्या लेखिका कशा झाल्या हे तिसरी व चौथीच्या मुलींनी जाणून घेतले.

नवरात्र उत्सव

नवरात्र उत्सवात आपल्या शाळेत भोंडला व सरस्वती पूजन केले जाते. यावर्षी गांधी भवन येथील अंध शाळेतील मुलींना आपल्या शाळेत बोलावण्यात आले आणि त्यांच्या समवेत चित्रातील हत्ती भोवती फेर धरून भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हटली. त्यानंतर सरस्वती पूजन करण्यात आले. मुलींना खिरापत देण्यात आली.

दिवाळी

आपल्या शाळेतल्या काकांनी यावर्षी मुलींची मदत घेऊन मातीचा सुंदर किल्ला बनविला व त्यावर चित्रे मांडली. चौथीच्या मुलींनी शिक्षकांसमवेत बिन आवाजाचे फटाके उडविले. पालक संघातील पालकांनी सुंदर रांगोळ्या काढून पणत्या लावून, आकाशकंदील लावून शाळा सुंदर सजविली. आनंदात उत्साहात दिवाळी साजरी झाली.

शैक्षणिक सहल

यंदा इ. पहिलीची सहल लेखा फार्म, दुसरीची सहल संस्कृती गार्डन, तिसरीची सहल सूर्य शिबीर व चौथीची सहल बारामती जवळील ‘अग्रोवान’ येथे गेली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनिंनी फळझाडे, फुलझाडे, पक्षी, फुलपाखरे यांचे निरीक्षण केले.ट्रॅक्टर मध्ये बसून सहलीचा आनंद लुटला.

वैद्यकीय तपासणी

शरीर निरोगी असेल तरच मन निरोगी राहू शकते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये शासनातर्फे विद्यार्थिनींची मोफत वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. व एका खाजगी संस्थेकडून डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली.

शालेय विविध समिती व संघ

विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट त्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद असणे महत्वाचे आहे. याच उद्देशाने
१) शिक्षक-पालक संघ
२) शाळा व्यवस्थापन समिती
३) माता- पालक संघ व
४) परिवहन समिती यांची स्थापना करण्यात आली.