शिशुमंदिर - शालेय उपक्रम
<<< Back to Katraj Marathi Shishumandir page
पदवीदान समारंभ
मंगळवार दिनांक १०/४/२०१८ रोजी मोठ्या गटाचा पदवीदान समारंभ संपन्न झाला. मोठ्या गटामधून इयत्ता पहिली मध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यासाठी उपक्रम राबवण्यात आला तो म्हणजे पदवीदान समारंभ. हा पदवीदान समारंभ मोठ्या दिमाखदार पद्धतीने पार पडला. सर्व विद्यार्थिनींनी पदवीदान समारंभाचे पोशाख परिधान केले होते.
"एक, दोन, तीन, चार हुजूरपागेचा जयजयकार"
"गुलाब, मोगरा, सायली, अबोली हुजूरपागेच्या हुशार मुली”
अशा घोषणा देत सुखसागरनगर परिसरात रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात गुरुवंदनेने झाली. गुरुवंदना सादर केली छोट्या गटातील चिमुकल्या विद्यार्थिनींनी. तसेच विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरवण्यात आले. ह्यावेळी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागाच्या शालेय समिती अध्यक्ष माननीय श्रीमती वंदना पाठक, संस्थेचे सभासद माननीय श्री. सोनावणी, श्रीमती वर्षा गजेंद्रगडकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिक माननीय श्रीमती रंजना नाईक, इंग्लिश मिडीयम मुख्याध्यापिका माननीय श्रीमती पुरोहित उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये शिशुरंजन आणि छोट्या गटातील विद्यार्थिनींनी भाषणाद्वारे मोठ्या गटातील विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या तर मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी भाषण करून मान्यवरांची मने जिंकली. संस्थेचे सभासद माननीय श्री. सोनवणी ह्यांनी विद्यार्थिनींना बक्षीस दिले.
शुभेच्छा समारंभ
मंगळवार दिनांक ३/४/२०१८ रोजी मोठ्या गटाचा शुभेच्छा समारंभ साजरा करण्यात आला होता. छोट्या गटातील आणि शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. तसेच मोठ्या गटातील विद्यार्थिनींसाठी शुभेच्छा पत्र आणि वॉलपिस तयार केले. छोट्या गटातील विद्यार्थिनींनी मोठ्या गटातील विद्यार्थिनींसाठी लिंबू सरबत तयार करून दिले.
विज्ञान प्रदर्शन, अक्षर जत्रा, गणित जत्रा
शुक्रवार दिनांक २३/३/२०१८ रोजी शिशुमंदिर विभागात विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले, विद्यार्थिनींनी सूक्ष्मदर्शक, लोहचुंबक, तरंगणे बुडणे, प्रकाश सरळ रेषेत जातो अशा विविध प्रयोगांची माहिती प्रात्यक्षिकांद्वारे सांगितली. तसेच भाषा आणि गणित विषयासंबंधी विविध खेळ शिक्षकांनी तयार करून मांडले होते. पालकांनी पाल्यासोबत ह्या खेळांचा आनंद लुटला. खेळाद्वारे अक्षरज्ञान आणि अंकज्ञान ह्या उदेशाने ह्या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी ह्या प्रकल्पास भरघोस प्रतिसाद दिला.
गुढी पाडवा
गुरुवार दिनांक १५/३/२०१८ रोजी शिशुमंदिर विभागात गुढी पाडवा हा सण साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आवडीचा पोशाख करून आल्या होत्या. छोट्या गटामधील विद्यार्थिनींनी माहिती सांगितली आणि नृत्य सादर केले. मुख्याध्यापिका उमा गोसावी ह्यांनी गुढीचे पूजन केले. खाऊ म्हणून विद्यार्थिनींना साखरेच्या गाठी देण्यात आल्या होत्या.
रंगपंचमी
मंगळवार दिनांक ६/३/२०१८ रोजी शिशुमंदिर मध्ये रंगपंचमी सण साजरा करण्यात आला. हळद, बीट ह्यापासून नैसर्गिक रंग तयार करण्यात आले होते. नैसर्गिक रंग वापरून विद्यार्थिनींनी रंगपंचमी साजरी केली. छोट्या गटामधील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. पाण्याचा अपव्यय टाळा हा संदेश माहितीद्वारे देण्यात आला.
पिवळा रंग दिन
बुधवार दिनांक २१/२/२०१८ रोजी शिशुमंदिर मध्ये पिवळा रंग दिन साजरा करण्यात आला. शिशुरंजन गटामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. सर्व विद्यार्थिनी पिवळ्या रंगाचे पोशाख करून आल्या होत्या. खाऊ म्हणून विद्यार्थिनींना पोह्यांचा चिवडा देण्यात आला.
फुलपाखरू उद्यान सहल
शुक्रवार दिनांक २३/२/२०१८ रोजी मोठ्या गटाची सहल फुलपाखरू उद्यान, सहकार नगर येथे नेण्यात आली होती. कीटक प्रकल्पांतर्गत ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारची फुलपाखरे विद्यार्थिनींना दाखवण्यात आली. तसेच फुलपाखरांचा जीवनक्रम चित्राद्वारे सांगण्यात आला.
पालक कार्यशाळा
गुरुवार २२/२/२०१८ रोजी शाळेमध्ये पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. एस. एन. डी. टी. गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कार्यशाळेचे आयोजन केले होते. विविध हस्तव्यवसाय कृती, पाककृती, गाणी, खेळ ह्यामधून पालकांचे मनोरंजन करण्यात आले. त्यानंतर माननीय श्रीमती अनुपमा देसाई ह्यांनी पालकांना 'सुजाण पालकत्व' ह्याविषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या विकासामध्ये पालकांचा सहभाग महत्वाचा असतो ह्या उद्देशाने ह्या पालक कार्यशाळेचे आयोजन केले होते.
जांभळा रंग दिन
बुधवार दिनांक १४/२/२०१८ रोजी शिशुमंदिर मध्ये जांभळा रंग दिन साजरा करण्यात आला. छोट्या गटामध्ये जांभळ्या रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. लाल आणि निळा रंग एकत्र करून जांभळा रंग तयार होतो हे प्रत्यक्ष दाखवण्यात आले. सर्व विद्यार्थिनी जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. गोकर्ण फुलाच्या आकारात ठसेकाम हि कृती विद्यार्थिनींकडून करून घेण्यात आली.
पालक स्पर्धा
गुरुवार दिनांक ८/२/२०१८ रोजी पालकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पालकांमध्ये असणाऱ्या कलाकौशल्यांना वाव मिळावा ह्या उद्दिष्टाने स्पर्धा आयोजित केल्या होत्या. शिशुरंजन गटातील पालकांसाठी शाडू मातीपासून फळे बनवणे. छोट्या गटातील पालकांसाठी फुलांपासून दागिने बनवणे तर मोठ्या गटातील पालकांसाठी कागदापासून घडीकामातून पक्षी बनवणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये पालकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला आणि कल्पकतेने खूपच छान वस्तू बनवल्या. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती रंजना नाईक, प्राथमिक विभागाच्या कला शिक्षिका श्रीमती तुप्ती खैरे ह्यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विजेत्यांना पालक सभेदिवशी बक्षिसे देण्यात आली.
कीटक प्रकल्प (मोठा गट)
गुरुवार दिनांक ८/२/२०१८ रोजी मोठ्या गटामध्ये कीटक प्रकल्पाची मांडणी करण्यात आली होती. कीटकांचे प्रकार, त्यांचे अवयव, उपयोग, रोग पसरवणारे कीटक त्यांची घरे अशी विविध प्रकारची माहिती चित्रे, मोडेल्स, तक्ते ह्याद्वारे देण्यात आली होती. मांडणी पाहण्यासाठी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
गुड टच बॅड टच प्रशिक्षण
मंगळवार दिनांक ६/२/२०१८ रोजी शिशुमंदिर मधील सर्व विद्यार्थिनींना बालविकास आणि महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या यु. एस. के. संस्थेतर्फे गुड टच बॅड टच प्रशिक्षण देण्यात आले. शिशुमंदिर मधील विद्यार्थिनी ह्या अतिशय लहान असतात. बाह्यजगामध्ये शाळेच्या निमीताने प्रथम पाऊल टाकतात. बाहेरील जगामध्ये विद्यार्थिनी सुरक्षित रहाव्या तसेच त्यांनी स्वतःचे स्वतः संरक्षण करावे ह्या उदिष्टाने शिशुमंदिर विभागात प्रशिक्षण देण्यात आले. शिशुमंदिर मधील विद्यार्थिनींच्या वयास समजतील अश्या पद्धतीने चित्राद्वारे आणि फिल्मद्वारे छान माहिती सांगण्यात आली.
फळे प्रकल्प मांडणी
गुरुवार दिनांक १/२/२०१८ रोजी शिशुरंजन गटामध्ये फळे प्रकल्प मांडणी करण्यात आली होती. फळांचे विविध प्रकार, उपयोग, फळांच्या बियांची नावे, त्यांचे रंग अशी विविध माहिती देणारे तक्ते ह्यांची मांडणी करण्यात आली होती. मांडणी बघण्यास विद्यार्थिनींसोबत पालक उपस्थित होते.
फुले प्रकल्प
गुरुवार दिनांक १/२/२०१८ रोजी छोट्या गटामध्ये फुल प्रकल्प मांडणी करण्यात आली होती. फुलाचे प्रकार, फुलांचे उपयोग, तक्ते, चित्रे ह्यांची मांडणी करण्यात आली होती. पालक उत्स्फुर्तपणे मांडणी बघण्यासाठी उपस्थित होते.
भोसरी उद्यान सहल
सोमवार १५/१/२०१८ रोजी मोठ्या गटाची सहल भोसरी उद्यान येथे नेण्यात आली होती. तेथे विद्यार्थिनींनी घसरगुंडी, झोका, जंगलजीम अशा विविध खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. तसेच फुलराणीमधून बागेची सफर केली. खाऊ म्हणून विद्यार्थिनींना मेथी पराठा, सॉस, लाडू देण्यात आला.
एम्प्रेस गार्डन सहल
शनिवार १३/१/२०१८ रोजी शिशुरंजन आणि छोट्या गटाची सहल एम्प्रेस गार्डन येथे नेण्यात आली होती. झोका, जंगलजीम, घसरगुंडी ह्या खेळांचा आनंद विद्यार्थिनींनी लुटला. विविध प्रकारच्या झाडांची माहिती देण्यात आली. खाऊ म्हणून विद्यार्थिनींना मेथी पराठा, सॉस, लाडू देण्यात आला.
काळा रंग दिन (मोठा गट)
शुक्रवार दिनांक १२/१/२०१८ रोजी मोठ्या गटामध्ये काळा रंग दिन साजरा करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थिनी काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. विविध काळ्या रंगांच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. काळ्या रंगाच्या कोळी किटकाचे चित्र विद्यार्थिनींनी रंगवून त्यापासून स्पिनर हा खेळ तयार केला.
पक्षी आणि व्यावसायिक लोक प्रकल्प
गुरुवार दिनांक १८/१/२०१८ रोजी मोठ्या गटासाठी पक्षी आणि व्यावसायिक लोक या विषयाची मांडणी करण्यात आली होती. पक्षी, घरे, खाद्य, पक्ष्यांचे अवयव आणि प्रकार तसेच व्यावसायिक लोक साहित्य त्यांची चित्रे अशी विविध मांडणी करण्यात आली. मांडणी पाहण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष माननीय श्रीमती शामा जाधव आणि संस्थेच्या सचिव माननीय श्रीमती रेखा पळशीकर आवर्जून उपस्थित होत्या.
हिवाळा प्रकल्प मांडणी
गुरुवार दिनांक १८/१/२०१८ रोजी शिशुरंजन गटाच्या अभ्यासक्रमातील हिवाळा प्रकल्पाची मांडणी करण्यात आली होती.हिवाळा ऋतूमध्ये येणारे सण, हिवाळ्यामध्ये वापरण्यात येणारे कपडे, खाल्ले जाणारे पदार्थ अशा विविध वस्तूंची मांडणी शाळेत करण्यात आली होती. पालकांनी मोठ्या प्रमाणात मांडणी पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवली.
वाहने आणि पाण्यातले जग प्रकल्प मांडणी
गुरुवार दिनांक १८/१/२०१८ रोजी छोट्या गटामध्ये वाहने आणि पाण्यातले जग ह्या प्रकल्प विषयांची मांडणी करण्यात आली होती. विविध वाहने, त्यांचे प्रकार, वाहतुकीचे नियम, पाण्यातले प्राण्याचे विविध प्रकार, त्यांचे अवयव, उपयोग अशी माहिती देणारे मोडेल्स, तक्ते, चित्रे मांडण्यात आली होती. पालकांनी उत्साहाने विद्यार्थिनीसोबत मांडणी बघण्यास उपस्थिती दर्शवली.
मकर संक्रांत
शुक्रवार दिनांक १२/१/२०१८ रोजी शिशुमंदिर विभागात मकर संक्रांत साजरी करण्यात आली. सर्व विद्यार्थिनी काळ्या रंगाचे पोशाख परिधान करून आल्या होत्या. शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींचे बोरन्हाण करण्यात आले. छोट्या विद्यार्थिनींना हलव्याचे दागिने घालण्यात आले होते. गोळ्या, बिस्कीट, चुरमुरे, बोर असे विविध पदार्थ एकत्र करून मोठ्या उत्साहात बोरन्हाण करण्यात आले. तसेच ऊस, रेवडी, बोर हा खाऊ विद्यार्थिनींना देण्यात आला.
आबा बागुल उद्यान (शिशुरंजन गट)
शुक्रवार दिनांक २२/१२/२०१७ रोजी शिशुरंजन गटाची सहल आबा बागुल उद्यान येथे नेण्यात आली. तेथील खेळाचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला. तसेच शेंगदाण्याचा लाडू खाऊ म्हणून देण्यात आला.
रेल्वे म्युझियम (छोटा गट)
शुक्रवार दिनांक २२/१२/२०१७ रोजी वाहने प्रकल्पांतर्गत छोट्या गटाची सहल कोथरूड येथील रेल्वे म्युझियम येथे नेण्यात आली होती. तेथे रेल्वेचे कामकाज कसे चालते ह्याची माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष धावणाऱ्या रेल्वे पाहून विद्यार्थिनीना खूप आनंद झाला. रेल्वेच्या विविध नियमांची माहिती सुद्धा देण्यात आली. तसेच कोथरूड येथील तात्यासाहेब थोरात उद्यान मधील खेळांची मजा विद्यार्थिनींनी लुटली. सोबत शेंगदाण्याच्या लाडूचा आस्वाद सुद्धा घेतला.
पक्षी निरीक्षण
शुक्रवार दिनांक २२/१२/२०१७ रोजी मोठ्या गटाची सहल पक्षी प्रकल्पांतर्गत तळजाई टेकडी येथे नेण्यात आली. गुलाबी थंडीचा अनुभव घेत बदक, सनबर्ड, बगळा, कबुतर, सुतार पक्षी आणि विविध प्रकारचे पक्षी विद्यार्थिनींनी बघितले. तसेच पुस्तकांमधील पक्ष्यांच्या चित्राप्रमाणे पक्ष्यांचा शोध सुद्धा घेतला. त्यासाठी भिंगाचा वापरही केला. भटकंती करताना शेंगदाण्याच्या लाडूचा आस्वाद विद्यार्थिनींनी घेतला.
नाताळ
मंगळवार दिनांक १९/१२/२०१७ रोजी शिशुमंदिर विभागात नाताळ सण साजराकरण्यात आला. ख्रिसमस ट्री सजवण्यात आला. नाताळ सणाची माहिती दृक माध्यमातून सांगण्यात आली. तसेच नृत्य सुद्धा करण्यात आले. विद्यार्थिनींना भेटण्यासाठी सांताक्लॉज आला होता. खाऊ म्हणून विद्यार्थिनींना केक देण्यात आला.
भाजी मंडई
गुरुवार दिनांक १४/१२/२०१७ रोजी छोट्या गटाच्या भाजी प्रकल्पांतर्गत भाजी मंडई भरवण्यात आली होती. छोट्या गटाच्या विद्यार्थिनी भाजीवालीच्या पोषाखामध्ये आल्या होत्या. भाजी घ्या भाजी अशा आरोळ्या देत विद्यार्थिनी भाजी घेण्याचा आग्रह करत होत्या. मोठ्या गटामधील विद्यार्थिनी पालकांसोबत भाजी खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. आर्थिक व्यवहाराचे ज्ञान होणे आणि भाज्यांची माहिती होण्याच्या उद्देशाने भाजी मंडई भरवण्यात आली होती.
वार्षिक स्नेहसंमेलन
मंगळवार दिनांक १२/१२/२०१७ रोजी शिशुमंदिर विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन अण्णाभाऊ साठे सभागृह येथे संपन्न झाले. ’रमते फुलांसावे’ हा फुलांवर आधारित कार्यक्रम विद्यार्थीनिंनी सादर केला. फुलांच्या गाण्यावर नृत्य, नाटिका, संगीतिका विद्यार्थीनिनी सादर केली. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ५ ते ६ वर्षे वयोगटामधील विद्यार्थीनिनी केले. कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय श्रीमती वंदना पाठक (महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या सभासद आणि शिशुमंदिर कात्रज शालेय समितीच्या अध्यक्ष) उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमासाठी माननीय श्रीमती श्यामा जाधव (महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष ), माननीय श्रीमती उषा वाघ (महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या उपाध्यक्ष), माननीय श्रीमती रेखा पळशीकर (महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या सचिव), माननीय श्रीमती जयश्री बापट(प्रमुख विश्वस्थ),माननीय श्री.सोनवणी (महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेचे सभासद) उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थीनीना प्रातिनिधिक स्वरूपात बक्षीस म्हणून पुस्तके देण्यात आली.
केशरी रंग दिन
बुधवार दिनांक २९/११/२०१७ रोजी छोट्या गटाचा केशरी रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षिका केशरी रंगाचा पोषाख परिधान करून आल्या होत्या. केशरी रंगाच्या विविध वस्तूंची मांडणी वर्गामध्ये करण्यात आली होती. लाल आणि पिवळा रंगाचे मिश्रण म्हणजे केशरी रंग हे प्रत्यक्ष रंग एकत्र करून विद्यार्थींनी बघितले. सूर्यफुलाची कागदी अंगठी विद्यार्थीनींना देण्यात आली. केशरी रंगाच्या विविध कृतींचा आनंद विद्यार्थीनिनी घेतला.
दूध प्रकल्प मांडणी (मोठा गट)
गुरुवार दिनांक २३/११/२०१७ रोजी मोठ्या गटाच्या दूध प्रकल्पाची मांडणी करण्यात आली होती. दूध देणारे प्राणी, दुधाचे पदार्थ, दुधाचे उपयोग, दुधाचे आरोग्यासाठीचे महत्व अशी विविध माहिती देणारे तक्ते आणि साधने ह्याची मांडणी करण्यात आली. विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष पालकांना माहिती सुद्धा सांगितली. पालकांनी प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद दिला.
बाग प्रकल्प (शिशुरंजन गट)
शनिवार १८/११/२०१७ रोजी बाग प्रकल्पांतर्गत शिशुरंजन गटाची सहल पु.ल.देशपांडे उद्यान सिंहगड रोड येथे नेण्यात आली होती. विविध खेळ जसे घसरगुंडी, झोका, जंगलजीम ह्यांचा आनंद विद्यार्थींनींनी घेतला. तसेच भटकंतीचाही अनुभव विद्यार्थिनींनी घेतला. क्रीमरोल खाऊ सुद्धा देण्यात आला. सोमवार ६/११/२०१७ रोजी वर्गामध्ये बाग प्रकल्पाची मांडणी करण्यात आली होती.
जंगली प्राणी प्रकल्प मांडणी (छोटा गट)
गुरुवार दिनांक १६/११/२०१७ रोजी छोट्या गटाचा जंगली प्रकल्पाची मांडणी करण्यात आली होती. प्राण्यांची घरे, खाद्ये, बाळे त्याची नावे अशी विविध माहिती देणारी साधने प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली होती. पालकांनी विद्यार्थीनिंना घेऊन प्रदर्शनाला भेट दिली.
आकार दिन
बुधवार दिनांक ८/११/२०१७ रोजी शिशुमंदिरमध्ये आकार दिन साजरा करण्यात आला होता. विद्यार्थीनिंनी त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, आयत अशा विविध आकाराच्या वस्तू आणल्या होत्या. त्याची वर्गामध्ये मांडणी करण्यात आली होती. रंगकाम, चिकटकाम अशा हस्त व्यवसाय कृती देण्यात आल्या. खेळाद्वारे विविध आकाराची ओळख विद्यार्थिनींना करून देण्यात आली. तसेच चौकोन, आयत ,वर्तुळ अशा आकाराची बिस्किटे खाऊ म्हणून देण्यात आली. अशाप्रकारे आकारदिन हा अतिशय वेगळा उपक्रम राबवण्यात आला.
कात्रज दूध डेअरी भेट
शनिवार दिनांक ४/११/२०१७ रोजी मोठ्या गटाच्या विद्यार्थिनींनी दूध प्रकल्पांतर्गत कात्रज येथील दूध डेअरीला भेट दिली. डेअरीमध्ये दूध आल्यानंतर केल्या जाणा-या विविध प्रक्रियांची माहिती देण्यात आली. दुधाचे पदार्थ तयार कसे करतात हे प्रत्यक्ष पाहता आले. विद्यार्थिनीचे आवडीचे आईस्क्रीम देण्यात आले.
राजीव गांधी प्राणी संग्रहालय भेट
शनिवार दिनांक ४/११/२०१७ रोजी छोट्या गटाच्या विद्यार्थिनींनी कात्रज येथील प्राणी संग्रहालयाला भेट दिली. जंगली प्राणी प्रकल्पांतर्गत ह्या सहलीचे आयोजन करण्यातआले होते. सिंह, वाघ, साळिंदर, साप, नाग, हत्ती, माकड असे विविध प्राणी प्रत्यक्ष पहायला मिळाले. खाऊ म्हणून क्रीमरोल सुद्धा देण्यात आला.
पालकसभा
गुरुवार दिनांक २/११/२०१७ रोजी पालक सभा आयोजित करण्यात आली होती. पालकसभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.अनिल पानसे उपस्थित होते. वय वर्षे ३ ते ५ मधील मुलांचे आरोग्य ह्या विषयावर पालकांना डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. तसेच पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच डॉ.सुषमा जलमकर ह्या सुद्धा पालक सभेसाठी उपस्थित होत्या. १०८ क्रमांक रुग्णवाहिका सेवेबद्दल माहिती डॉ.सुषमा जलमकर ह्यांनी प्रात्यक्षिकासह पालकांना दिली.
दीपोत्सव
बुधवार दिनांक ११/१०/२०१७ रोजी शिशुमंदिर विभागात दीपोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी मातीचा किल्ला तयार केला. शाळेच्या परिसरामध्ये सजावट करण्यात आली होती. रांगोळी, पणत्या लावण्यात आल्या. त्यामुळे शाळेचा सर्व परिसर उजळून निघाला. सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोशाखात आल्या होत्या. दिवाळीच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. नाटुकल्याद्वारे विद्यार्थिनींनी फटाक्याविना दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व विद्यार्थिनींनी सांगितले. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी काय-काय करतात हे वस्तूंच्या मांडणीद्वारे दाखवण्यात आले. शेवटी पुरी, छोले, श्रीखंड हे जेवण देण्यात आले. घरी जाताना प्रत्येक विद्यार्थिनीला रांगोळी-छाप भेट म्हणून देण्यात आला. अशाप्रकारे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली.
कोजागिरी पौर्णिमा आणि पांढरा रंग दिन
गुरुवार दिनांक ५/१०/२०१७ रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. चांदोमामा ह्या गाण्यावर विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थिनी पांढरा पोशाख परिधान करून आल्या होत्या. मोठ्या गटाचा पांढरा रंग दिन सुद्धा त्याच दिवशी साजरा करण्यात आला. पांढऱ्या रंगाच्या विविध वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे हस्त व्यवसायच्या विविध कृतीसुद्धा करून घेण्यात आल्या. घरी जाताना कागदाची हसरी चांदणी देण्यात आली. कोजागिरी निमित्त मसाले दुध देण्यात आले.
निळा रंग दिन
बुधवार दिनांक ४/१०/२०१७ रोजी शिशुरंजन गटाचा निळा रंग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी आणि शिक्षकवर्गाने निळ्या रंगाचे पोशाख परिधान केले होते. विविध निळ्या रंगाच्या वस्तूंची मांडणी वर्गामध्ये करण्यात आली होती. तसेच विद्यार्थिनींनी अनेक वस्तूसुद्धा आणल्या होत्या. अशाप्रकारे निळ्या रंगाची ओळख विद्यार्थिनींनी करून देण्यात आली.
दसरा
शुक्रवार दिनांक २९/९/२०१७ रोजी दसरा हा सण साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी आवडीच्या पोषाखामध्ये आल्या होत्या. विद्यार्थिनींनी नृत्याद्वारे देवीचा जागर सादर केला. तसेच खंडेनवमी निमित्त शस्त्रांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या विविध साधनखेळांचे आणि सरस्वतीचे पूजन मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी ह्यांचा हस्ते करण्यात आले. विद्यार्थिनींनी पाटीचे पूजन करून प्रार्थना केली. तसेच नवरात्रउत्सवामध्ये गहू पेरून घेण्यात आले होते. ते गव्हांकुर विद्यार्थिनींनी खाण्यास दिले. त्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व पटवून सांगितले.
भोंडला
बुधवार दिनांक २७/९/२०१७ रोजी शिशुमंदिर विभागात नवरात्र निमित्त भोंडला साजरा करण्यात आला. आवडीच्या पोशाखात विद्यार्थिनी शाळेत आल्या होत्या. हत्तीच्या छायाचित्राची मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी ह्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. विविध पारंपारिक गाणी म्हणून फेर धरण्यात आला. खिरापत म्हणून डोसा, बटाट्याची भाजी आणि जिलेबी हा विद्यार्थिनींच्या आवडीचा खाऊ देण्यात आला.
झाडे प्रकल्प प्रदर्शन (मोठा गट)
शनिवार दिनांक २३/९/२०१७ रोजी झाड प्रकल्पाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. झाडाचे विविध प्रकार, झाडाचे अवयव, झाडाचे विविध उपयोग ह्या संबंधित साधनांची मांडणी करण्यात आली होती. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे पालकांच्या सहभागाने कागदी झाडांचे विविध प्रकार तयार केले होते. पालकांनी अतिशय आकर्षक झाडे तयार केली होती. तसेच प्रदर्शनामध्ये विद्यार्थिनींनी झाडाबद्दल माहिती सांगितली.
पावसाळा प्रकल्प प्रदर्शन (शिशुरंजनगट)
पावसाळा प्रकल्पांतर्गत शिशुरंजन गटामध्ये अध्यापनासाठी वापरण्यात येणा-या शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन शनिवार दिनांक १६/९/२०१७ रोजी भरवण्यात आले होते. पावसाळ्यामध्ये वापरण्यात येणारे साहित्य पावसाळ्यात दिसणारे कीटक तसेच पाऊस कसा पडतो ह्याबद्दल माहिती देणाऱ्या साधनांची मांडणी प्रदर्शनात करण्यात आली होती. तसेच पावसाळ्याबद्दल माहिती देणाऱ्या ppt चे सादरीकरण करण्यात आले. पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
वैद्यकीय तपासणी शिबीर
दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा शिशुमंदिर मधील सर्व गटातील विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी गुरुवार दिनांक १४/९/२०१७ आणि शुक्रवार दिनांक १५/९/२०१७ रोजी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ३ ते ६ वर्षे वयोगटामध्ये असणाऱ्या विद्यार्थिनींची तपासणी अपूर्वा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली. तपासणीसाठी डॉ. सुहास शितोळे, डॉ. सुषमा जलमकर, डॉ. विलास टाकणे, डॉ. गणेश निंबाळकर, डॉ. दिलीप सूर्यवंशी उपस्थित होते. डॉक्टरांनी विद्यार्थिनींच्या आरोग्याबद्दल शिक्षकांशी संवाद साधला.
लाल रंग दिन
बुधवार दिनांक १३/९/२०१७ रोजी शिशुरंजन गटामध्ये लाल रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षक लाल रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. तसेच वर्गात लाल रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. अनेक विविध लाल रंगाच्या वस्तू विद्यार्थिनींनी घरून आणल्या होत्या. खाऊ म्हणून टोमॅटो देण्यात आला. आकारात ठसेकाम कृती घेण्यात आली. घरी जाताना लाल रंगाचे कागदी फुल ड्रेसला लावून देण्यात आले.
घरे प्रकल्प प्रदर्शन (छोटा गट)
घरे प्रकल्पांतर्गत छोट्या गटामध्ये अध्यापनासाठी वापरण्यात येणाऱ्या शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन बुधवार दिनांक १३/९/२०१७ रोजी भरवण्यात आले होते. घरांच्या विविध प्रकारापासून ते बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यापर्यंत साधनांची मांडणी करण्यात आली होती. तसेच घरांच्याबद्दल माहिती देणाऱ्या ppt चे सादरीकरण करण्यात आले. यासाठी पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
वर्षा विहार
येरेयेरे पावसा, तुला देतो पैसा पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा शुक्रवार दिनांक ८/९/२०१७ आणि शनिवार दिनांक ९/९/२०१७ रोजी मोठ्या गटाच्या अभ्यासक्रमातील पाणी प्रकल्पांतर्गत विद्यार्थिनींना वर्षाविहारासाठी पानशेत येथे नेण्यात आले. खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण दाखवण्यात आले. श्री. ल. म. कडू (लेखक, चित्रकार, प्रकाशक) ह्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून विविध उपयुक्त औषधी झाडांची माहिती दिली. त्यांचे वैशिष्ट्य सांगितले. शेण आणि माती मिसळून त्यामध्ये बिया घालून तयार करण्यात आलेले छोटे चेंडू विद्यार्थिनींनी डोंगरावर टाकून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ संदेश सुद्धा दिला. तसेच नांगरणीचा अनुभवही विद्यार्थिनींनी घेतला. सोबत जेवणाचा आस्वाद घेतला. वय वर्षे ५ ते ६ वयोगटातील विद्यार्थिनींना मिळालेला हा अनुभव अद्वितीय ठरला.
पाणी प्रकल्प ( मोठा गट )
गुरुवार दिनांक २०/७/२०१७ रोजी ‘पाणी’ या विषयावर प्रकल्प मांडणी करण्यात आली. पाण्याचे उपयोग, पाणी स्त्रोत, पाणी शुद्धीकरण, पाणी प्रदुषण या माहितीचा समावेश करण्यात आला होता. विविध साधने, चित्रे मांडणी पाहण्यासाठी पालक उपस्थित होते. विद्यार्थीनींनी पाणी प्रकल्पाबद्दल माहिती पालकांना दिली.
पालकसभा
शाळेमध्ये राबवण्यात येणारे विविध प्रकल्प तसेच शिकवण्यात येणारे विषय याबद्दल पालकांना माहिती व्हावी या उद्देशाने गुरुवार दिनांक ६/७/२०१७ रोजी मोठ्या गटाची, शनिवार दिनांक ८/७/२०१७ छोट्या गटाची आणि शनिवार १५/७/२०१७ रोजी शिशुरंजन गटाची पालक सभा आयोजित केली. पालकांना प्रात्यक्षिकाद्वारे अध्यापनाच्या विविध पद्धतींची माहिती देण्यात आली. प्रकल्प पद्धत, अक्षरवळण, अंकओळख, गाणी, गोष्ट, जीवनव्यवहार, इंद्रिय विज्ञान, गणिती संकल्पना अशा विषयांची साधनाद्वारे माहिती देण्यात आली.
स्वागत समारंभ
बुधवार दिनांक १२/७/२०१७ रोजी स्वागत समारंभ करण्यात आला. शिशुरंजन आणि छोट्या गटातील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे स्वागत मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी केले. चिकटकाम, रंगकाम याद्वारे शोभेच्या वस्तू मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी तयार केल्या आणि नवीन विद्यार्थीनींना भेट म्हणून दिल्या. मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. तसेच सँडविच तयार करून खाऊ म्हणून दिले.
वारी विठ्ठलाची
सोमवार दिनांक २/७/२०१७ रोजी विठ्ठलाच्या नामघोषात पालखी काढण्यात आली. वारक-याच्या पोशाखात आलेल्या विद्यार्थिनींनी वाहतूक नियमनाचा संदेश दिला. पालखीसोबत सायकल रॅली शाळेच्या परिसरात काढण्यात आली. तसेच दृकश्राव्य ( ppt ) साधनाद्वारे माहिती सांगण्यात आली.
रमजान ईद
बालवयात सर्वधर्म समभाव हे मूल्य रुजवण्याच्या उद्दिष्टाने मंगळवार दिनांक २७/६/२०१७ रोजी शिशुमंदिर मध्ये रमजान ईद हा सण साजरा करण्यात आला. छोटया गटातील विद्यार्थिनींनी माहिती सांगून नृत्य सादर केले. एकमेकांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. शिरखुर्मा खाऊ म्हणून देण्यात आला.
शाळेचा पहिला दिवस
गुरुवार दिनांक १५/६/२०१७ रोजी छोटा गट, सोमवार दिनांक १९/६/२०१७ रोजी मोठा गट आणि शुक्रवार दिनांक २३/६/२०१७ रोजी शिशुरंजन गटाची शाळा सुरु झाली. शाळेमध्ये राबवले जाणारे विविध प्रकल्प आणि शाळेबद्दल माहिती पालकांना सांगण्यात आली. तसेच छोट्या गटातील पालकांना पाहण्यासाठी विविध साधन खेळांची मांडणी करण्यात आली होती. मोठ्या गटातील पालकांनी पाल्याबरोबर फिंगर पपेट तयार करून गाणे म्हटले. शिशुरंजन गटातील पालकांनी आपल्या पाल्याबरोबर ठसेकाम ह्या कृतीचा आनंद लुटला. घरी जाताना भेट म्हणून रुमाल आणि खाऊ म्हणून सुकामेवा देण्यात आला. शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींना भेट म्हणून खेळ देण्यात आला.
शिक्षक प्रशिक्षण ( पपेट तयार करणे. )
मंगळवार दिनांक १३\६\२०१७ आणि बुधवार दिनांक १४\६\२०१७ रोजी कात्रज विभागातील शिक्षकांसाठी पपेट्स बनवणे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रभावी अध्यापनासाठी प्रशिक्षणाचा उपयोग शिक्षकांना होणार आहे. माननीय श्री. प्रदीप वाघमारे ( scert चे कर्मचारी ) यांना प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. कागदी पक्षी बनवणे, स्टिक पपेट, हँडपपेट, कळसूत्री बाहुल्या बनवणे आणि त्यांचा वापर करण्याच्या पद्धतींचा वापर प्रात्यक्षिकातून देण्यात आला. कमीतकमी वेळात आणि कमीतकमी खर्चात आकर्षक साधने बनविण्याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले.
शिक्षकांचे प्रशिक्षण ( फुले तयार करणे. )
सोमवार दिनांक १२\६\२०१७ रोजी शिशुमंदिर शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. विविध प्रकारची कागदी फुले बनविण्यास शिकविण्यात आले. प्रशिक्षण देण्यासाठी माननीय श्रीमती सुवर्णा अवचट उपस्थित होत्या. जास्वंद, गुलाब, झेंडू यासारखी विविध प्रकारची आकर्षक फुले शिक्षकांनी तयार केली. प्रशिक्षणामध्ये बनविलेल्या फुलांचा उपयोग शाळा सुशोभन आणि शाळेच्या इतर उपक्रमामध्ये होणार आहे.
अक्षरमेळावा
शनिवार दिनांक ४/३/२०१७ रोजी अक्षर मेळावा हा आगळावेगळा प्रकल्प आयोजित करण्यात आला होता. खेळामधून अक्षर ओळख ह्या उद्देशाने प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. अक्षरांचे विविध खेळ शिक्षकांनी तयार केले होते. पालकांनी अक्षर जोड्या, शब्दामध्ये अक्षर शोध, डाइस खेळ, टिपरी पाणी अशा विविध खेळामधून पाल्यासोबत आनंद घेतला.
आजी आजोबा संमेलन
बुधवार दिनांक ५/४/२०१७ आजी आजोबा संमेलन आयोजित करण्यात आला होते. विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासामध्ये आजी आजोबांचा सहभाग हा मोलाचा असतो. ह्या उद्देशाने आजीआजोबा आणि नात ह्यांचे नाते दृढ करण्याचा प्रयत्न प्रकल्पाद्वारे शाळेने केला. चाफ्याचे फुल देऊन आणि अत्तराच्या सुगंधामध्ये आजीआजोबांचे स्वागत करण्यात आले. वेगवेगळ्या खेळांचा आनंद आजी आजोबांनी घेतला. तसेच भेटकार्ड तयार करून विविध संदेश देण्यात आले.
गुढी पाडवा
बुधवार दिनांक २९/३/२०१७ रोजी शाळेत गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. तसेच गुढीपाड्व्याबद्दल विद्यार्थिनींना माहिती सांगण्यात आली. मुख्याध्यपिका श्रीमती उमा गोसावी ह्यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. कैरी डाळ आणि कोकम सरबत ह्याचा आस्वाद विद्यार्थींनीनी घेतला.
शुभेच्छा समारंभ
छोट्या आणि शिशुरंजन गटामधील विद्यार्थिनींनी मोठ्या गटातील विद्यार्थिनींना गुरुवार दिनांक २८/३/२०१७ रोजी पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा समारंभातून शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना शिशुरंजन व छोट्या गटामधील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. भेटकार्ड तयार करून देण्यात आले. तसेच छोट्या गटातील विद्यार्थिनींनी लिंबू सरबत तयार करून मोठ्या गटातील विद्यार्थिनींना दिले.
फुले प्रकल्प
बुधवार दिनांक २२/२/२०१७ रोजी छोट्या गटामध्ये फुल प्रकल्पांतर्गत फुलांची वेशभूषा करणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालकांनी विद्यार्थिनींना अनेक प्रकारच्या फुलांच्या वेशभूषा करून पाठवले होते. तसेच विद्यार्थिनींनी तयार करून आलेल्या विशिष्ट फुलाबद्दल माहिती सांगितली. विद्यार्थिनींना विविध फुलांबद्दल माहिती मिळावी तसेच सामान्यज्ञानात भर पडावी, सभाधीटपणा यावा ह्या उदिष्टाने फुल प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते.
फळे प्रकल्प
बुधवार दिनांक ८/२/२०१७ रोजी शिशुरंजन गटामध्ये फळे प्रकल्पांतर्गत पालकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. पालकांनी विविध फळांचा वापर करून कलाकृती तयार केल्या होत्या. पालकांनी अतिशय सुंदर अशा कलाकृती सादर केल्या. तसेच प्रथम, द्वितीय असे क्रमांक काढण्यात आले. पालकसभेमध्ये पालकाना बक्षिसे सुद्धा देण्यात आली.
रंग पंचमी
बुधवार दिनांक १५/३/२०१७ रोजी शाळेमध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली. सणाचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक रंगांचा वापर करून सण साजरा करण्यात आला होता. सर्व रंग शाळेत तयार करण्यात आले होते. बीटापासून गुलाबी रंग, हळदीपासून पिवळा रंग असे रंग तयार करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी रंग खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.
पालकसभा
शनिवार २५/२/२०१७ रोजी शिशुमंदिर मध्ये पालकसभा आयोजित करण्यात आली होती. मानसशास्त्रज्ञ माननीय श्री.पंकज मीठभाकरे यांनी पालकांना विविध खेळाद्वारे मार्गदर्शन केले. आनंदी पालकत्व आणि पालकविद्यार्थींनी संवाद कसा असावा ह्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
वसंतोत्सव
शुक्रवार दिनांक ७/४/२०१७ रोजी वसंतोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींना वसंत ऋतुची माहिती सांगण्यात आली. वसंत ऋतूमध्ये येणारी फळे मातीकामातून विद्यार्थिनींनी तयार केली.तसेच वेळ, झुडूप, गवत, मोठे झाड असे विविध प्रकार विद्यार्थिनिनी चिकटकाम, ठसेकाम ह्यामधून तयार केले. आईस्क्रिम खाण्याचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला.
फुलपाखरू उद्यान
शनिवार दिनांक ११/३/२०१७ रोजी 'कीटक' प्रकल्पांतर्गत मोठ्या गटाची सहल फुलपाखरू उद्यान, अरण्येश्वर येथे नेण्यात आली होती. विविध रंगांची फुलपाखरे, फुले विद्यार्थिनींनी बघितली. तसेच विविध फळे, मधमाशा सुद्धा बघायला मिळाल्या.
शेकोटी
सोमवार दिनांक २३/१/२०१७ रोजी शाळेमध्ये शेकोटी करण्यात आली होती. विद्यार्थिनींना संध्याकाळी शाळेत बोलवण्यात आले होते. शिक्षिकांनी बालगीतांचा कार्यक्रम सादर केला. शेकोटी नंतर गरम डाळ-खिचडी आणि पापड ह्या पदार्थांचा आस्वाद घेतला.
आबा बागुल उद्यान भेट
शुक्रवार दिनांक १०/२/२०१७ रोजी शिशुरंजन गटाची सहल आबा बागुल उद्यानमध्ये नेण्यात आली होती. तेथील संगीत कारंजे बघण्यात विद्यार्थिनी रमून गेल्या होत्या. तसेच भीमसेन जोशी सभागृहातील नाविन्यपूर्ण हलणारी चित्रे दाखवण्यात आली.
संधी पक्षी निरीक्षणाची
शुक्रवार दिनांक १०/२/२०१७ रोजी 'पक्षी' प्रकल्पांतर्गत मोठ्या गटाची सहल कात्रज तलाव येथे पक्षी निरीक्षणासाठी नेण्यात आली होती. बदक, पाणकोंबडी, टिटवी, कावळे, बगळे ह्यासारखे विविध पक्षी प्रत्यक्ष पहिले. तसेच विविध पक्षांची घरटी पहायला मिळाली. विविध पक्षांचे आवाज ऐकून ते ओळखण्याचा प्रयत्न केला. तळ्याकाठी बसून विविध पक्षांची चित्रे असलेली पुस्तकेसुद्धा बघितली. खाऊ म्हणून पेरू देण्यात आला.
पाण्यातील जग
शुक्रवार दिनांक १०/२/२०१७ रोजी छोट्या गटाची सहल संभाजी पार्क मत्स्यालय येथे नेण्यात आली होती. पाण्यातील जग ह्या प्रकल्पांतर्गत ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विविध जातीचे मासे, पाण्यातील कासव विद्यार्थिनींनी बघितले. तसेच विविध खेळांची मजा सुद्धा लुटली.
गोठा भेट
बुधवार दिनांक १/२/२०१७ रोजी शिशुरंजन गटामधील विद्यार्थिनींनी शाळेजवळ असलेल्या गोठ्याला भेट दिली. पाळीव 'प्राणी' प्रकाल्पांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले होते. गाय, म्हैस, बैल ह्यांचे खाद्य, घ्यावयाची काळजी ह्याबद्दल माहिती विद्यार्थिनींना प्रत्यक्ष बघण्यास मिळाली.
शैक्षणिक प्रदर्शन
शनिवार दिनांक २१/१/२०१७ रोजी शिशुरंजन गटाचे साधनांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. आपले आपली स्वच्छता, पाळीव प्राणी, बाग, पावसाळा, हिवाळा, वाहने अशा प्रकल्पांवर आधारित साहित्यांची मांडणी करण्यात आली होती. पालकांनी प्रदर्शनाला भेट देऊन छोट्या गटाच्या प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली.
मकर संक्रांत
शुक्रवार दिनांक १३/१/२०१७ रोजी शाळेमध्ये संक्रांत साजरी करण्यात आली होती. सर्व विद्यार्थिनी काळ्या रंगाचे पोशाख परिधान करून आल्या होत्या. शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींचे बोरन्हाण करण्यात आले. हलव्याचे दागिने विद्यार्थीनिंनी परिधान केले होते. संक्रांतीची माहिती सांगून हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला. वाण म्हणून विद्यार्थीनिंनी एकमेकींना टिकल्यांचे पाकीटसुद्धा दिले. बोरं, हरभरा, गाजर, रेवडी, तीळवडी असा हिवाळी मेवा खाऊ म्हणून देण्यात आला. तिळगुळ घ्या गोड बोला असे सांगत अतिशय उत्साहात संक्रांतीचा सण पार पडला.
काळा रंग दिन
शुक्रवार दिनांक १३/१/२०१७ रोजी मोठ्या गटामध्ये काळा रंगदिन साजरा करण्यात आला. इतर रंगाप्रमाणे काळ्या रंगाचे महत्व विद्यार्थिनींना समजावे ह्या दृष्टीने काळा रंगदिन साजरा करण्यात आला. सर्वांनी काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.तसेच वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. कोळी ह्या किटकाचे चित्र रंगवून त्याची अंगठी तयार करून विद्यार्थिनींना देण्यात आली.
सफर भोसरी उद्यानाची
शनिवार दिनांक ७/१/२०१७ रोजी मोठ्या गटाची सहल भोसरी येथील उद्यानामध्ये नेण्यात आली होती. अनेक विविध खेळांबरोबरच फुलराणी सफरीचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला. मेथीपराठा, कणकेच्या लाडूचा आस्वाद घेतला.
सफर एम्प्रेस गार्डनची
शुक्रवार दिनांक ६/१/२०१७ रोजी शिशुरंजन आणि छोट्या गटाची सहल एम्प्रेस गार्डन येथे नेण्यात आली होती. तेथे असलेल्या विविध खेळांचा आनंद विद्यार्थींनीनी घेतला. विविध पुरातन वृक्षांची माहिती जाणून घेतली. प्रत्येक वृक्षामध्ये असणारे वैविध्याचे निरीक्षण विद्यार्थिनींनी केले. सोबत मेथी पराठा, सॉस, कणकेच्या लाडूचा आस्वाद सुद्धा घेतला.
रेल्वे संग्रहालय भेट
गुरुवार दिनांक २२/१२/२०१६ रोजी 'वाहने' प्रकल्पांतर्गत छोट्या गटाची सहल रेल्वे संग्रहालय कोथरूड येथे नेण्यात आली होती. विद्यार्थिनींना आवडणा-या झुक झुक गाडीचे काम नक्की कसे चालते? ह्या बद्दल माहिती प्रत्यक्ष हलत्या प्रतिकृतीद्वारे देण्यात आली.
कला-क्रीडा सप्ताह
विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच शारीरिक विकास होण्याच्या उद्देशाने सोमवार दिनांक १९/१२/२०१६ ते गुरुवार २२/१२/२०१६ रोजी कला-क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला. अडथळ्यांची शर्यत, पळणे,रचना करणे, रांगोळीमध्ये रंग भरणे, बादलीत चेंडू टाकणे, तीन पायांची शर्यत, पोत्यामधून उड्या मारणे, चित्रे रंगवणे ह्यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.
गुलाबी रंग दिन
बुधवार दिनांक २३/११/२०१६ रोजी मोठ्या गटामध्ये गुलाबी रंग दिन साजरा करण्यात आला. विविध वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. तसेच सर्व विद्यार्थिनी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून आल्या होत्या. गुलाबी रंगाचे फुलपाखरू ड्रेसला लावण्यात आले.
दिवाळी
शुक्रवार दिनांक २१/१०/२०१६ रोजी शिशुमंदिर विभागात दिवाळी साजरी करण्यात आली. विद्यार्थीनींनी मातीचा किल्ला बनविला. तसेच आकाशकंदील लावून रांगोळी काढून सजावट करण्यात आली. तसेच पणत्या लावण्यात आल्या. अतिशय आकर्षक पद्धतीने रांगोळी काढून पणत्यांची सजावट करण्यात आली. विद्यार्थीनींनी फराळाच्या पदार्थांचे नाटुकले सादर केले. दिवाळीची माहिती सांगितली. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व पटवून सांगण्यासाठी नाटुकले सादर केले. विद्यार्थीनिना घरी जाताना पणती आणि पोस्टकार्ड देण्यात आले. प्रत्येक पोस्टकार्डवर विद्यार्थीनींनी चित्रे रंगवली. पोस्टकार्ड मैत्रीणीना पाठवण्यास सांगण्यात आले. अशाप्रकारे अतिशय वेगळ्या प्रकारे दिवाळी सण साजरा करण्यात आला.
भाजी मंडई
बुधवार दिनांक १९/१०/२०१६ रोजी शाळेमध्ये भाजीमंडई भरवण्यात आली. छोट्या गटाच्या भाजी प्रकल्पांतर्गत भाजी मंडई भरवण्यात आली होती. छोट्या विद्यार्थिनी भाजीवालीचा पोषाख करून आल्या होत्या. मोठया गटामधील विद्यार्थिनी पालकांबरोबर भाजी खरेदी साठी आल्या होत्या. कांदा, बटाटा, वांगे, भेंडी, गवार ह्यासारख्या भाज्या विकण्यासाठी ठेवल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थीनींना भाजी ओळख तर झालीच. तसेच आर्थिक व्यवहार कसे चालतात ह्याबद्दल माहिती मिळाली. अतिशय उत्साहाच्या वातावरणात भाजीमंडई साजरी करण्यात आली.
निळा रंग दिन
बुधवार १९/१०/२०१६ रोजी शिशुरंजन गटाचा निळा रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी निळ्या रंगाचा पोषाख परिधान करून आल्या होत्या. तसेच विविध वस्तुसुद्धा विद्यार्थीनींनी आणल्या होत्या. विद्यार्थिनींच्या हातावर हस-या ढगाचे चित्र काढण्यात आले.
पालकांच्या स्पर्धा
सोमवार दिनांक १९/९/२०१६ रोजी पालकांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. एकूण १९ पालकांनी सहभाग दर्शविला. स्पर्धेचे परिक्षण प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती रंजना नाईक आणि कला शिक्षिका श्रीमती गजमल यांनी केले. पालकांनी विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या. रांगोळी मधून सामाजिक संदेश सुद्धा देण्यात आला होता. स्पर्धेमध्ये एकूण तीन क्रमांक काढण्यात आले. पालकसभेदिवशी बक्षिसे देऊन पालकांचे कौतुक करण्यात आले.
पालकसभा
शनिवार दिनांक ८/१०/२०१६ रोजी पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते. पालकसभेमध्ये पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी माननीय डॉ. दुश्यंत कोठारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. पालकांच्या विविध शंकांचे निरसन डॉक्टरांनी केले. बाल्यावस्थेत आहार कसा घ्यावा, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ह्याबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती सांगितली.
चित्रकला स्पर्धा
महाराष्ट्र राज्य कला अध्यापक महासंघ तर्फे शाळेमध्ये राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते शाळेमधील छोट्या आणि मोठ्या गटाच्या मिळून ९६ विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.सहभागी विद्यार्थीनींना प्रशस्ती पत्रक देण्यात आले.
आंतरशालेय स्पर्धा
रानडे बालक मंदिर तर्फे घेण्यात आलेल्या आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धमध्ये मोठ्या गटामधील तीन विद्यार्थीनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
शैक्षणिक सहल
सोमवार दिनांक १७/१०/२०१६ रोजी शिशुरंजन गटाची सहल पु. ल. देशपांडे उद्यानामध्ये नेण्यात आली. बाग प्रकल्पांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले होते. बागेमधील घसरगुंडी, जंगलजीम, झोका ह्या खेळाबरोबरच मनसोक्त हिंडण्याचा आनंद विद्यार्थीनींनी लुटला. वाहत्या पाण्यातील मासे बघून मुलीना खूप मजा वाटली. क्रीमरोल खाऊ देण्यात आला.
कोजागिरी पोर्णिमा आणि पांढरा रंग दिन
शुक्रवार दिनांक १४/१०/२०१६ रोजी शाळेमध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. मोठ्या गटाचा पांढरा रंग दिन सुद्धा साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी व ताई पांढरा पोशाख परिधान करून आल्या होत्या. वर्गामध्ये पांढऱ्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. चंद्राच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. विद्यार्थीनींनी सामुहिक हस्तव्यवसायाची कृती केली. विविध चंद्राच्या कलांच्या आकारात चंदेरी कागद चिकटवण्यात आले. विद्यार्थीनींनी मसाले दुधाचा आनंद लुटला. घरी जाताना कागदाचे सशाचे पपेट भेट म्हणून देण्यात आले.
दसरा
सोमवार दिनांक १०/१०/२०१६ रोजी दसरा सण साजरा करण्यात आला. विदयार्थीनीनी देवीचा जागर सादर केला. तसेच दसऱ्याची माहितीसुद्धा सांगितली. झाडे न तोडता फक्त दस-या च्या शुभेच्छा सर्वांना द्या हा संदेश विद्यार्थीनींना देण्यात आला. तसेच शस्त्र पूजन, सरस्वती पूजन, पाटीपूजन विद्यार्थीनीनी केले.
शैक्षणिक सहल
शुक्रवार दिनांक ३०/९/२०१६ रोजी छोट्या गटाची सहल राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे नेण्यात आली होती. जंगली प्राणी प्रकल्पांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले होते. वाघ, सिंह, हत्ती, काळवीट अश्या प्राण्यांचे निरीक्षण विद्यार्थीनींनी केले. क्रीमरोल खाऊ खाऊन सहलीचा आनंद विद्यार्थीनींनी लुटला.
स्वतःची ओळख (शिशुरंजन प्रकल्प)
शिशुरंजन गटामधील विद्यार्थिनींसाठी स्वतःची ओळख प्रकल्पांतर्गत एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थिनींच्या पालकांना शाळेमध्ये गोष्ट सांगण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. पालकांनी विविध लहान मुलांच्या गोष्टी सांगून विद्यार्थिनीची करमणूक केली.
आकारदिन
सन २०१६-१७ ह्या शैक्षणिक वर्षामधील नवीन आणि आगळा वेगळा प्रकल्प म्हणजे आकार दिन. बुधवार दिनांक ५/१०/२०१६ रोजी आकार दिन साजरा करण्यात आला. शिशुरंजन गटामध्ये वर्तुळ, छोट्या गटामध्ये त्रिकोण व चौकोन, मोठ्या गटामध्ये आयत आकाराच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थीनींनी सुद्धा विविध आकाराच्या वस्तू आणल्या होत्या. प्रत्येक वर्गामध्ये आकाराशी संबंधित एक खेळ घेण्यात आला. आकाराशी संबंधित हस्तव्यवसाय कृती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थिनीची आकार हि संकल्पना दृढ होण्यास मदत झाली.
केशरी रंग दिन
गुरुवार दिनांक १३/१०/२०१६ रोजी छोट्या गटामध्ये केशरी रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी केशरी रंगाचा पोशाख करून आल्या होत्या. वर्गामध्ये केशरी रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थीनींना केशरी रंगाची फुलं भेट म्हणून देण्यात आली.
शैक्षणिक प्रदर्शन (छोटा गट)
छोट्या गटामध्ये खेळाद्वारे अध्यापन करताना जी शैक्षणिक साधने शाळेमध्ये वापरली जातात त्याबद्दल पालकांना माहिती मिळावी ह्या उद्देशाने रविवार दिनांक २५/९/२०१६ रोजी शैक्षणिक प्रदर्शन भरवण्यात आले. छोट्या गटामध्ये राबवल्या जाणा-या प्रकल्पानुसार जसे वहाने, फुले, पाण्यातले प्राणी, जंगली प्राणी, घरे, फळे, भाज्या ह्यांची मांडणी करण्यात आली. प्रकल्पानुसार प्रोजेक्टरवर चित्रे दाखवण्यात आली पालकांनी प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद दिला.
भोंडला
सोमवार दिनांक ७/१०/२०१६ रोजी नवरात्री निमित्त भोंडला साजरा करण्यात आला. पारंपारिक गाणी म्हणून भोंडला साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोषाखामध्ये आल्या होत्या. खिरापत म्हणून मसाले डोसा व जिलेबी विद्यार्थीनींना देण्यात आली.
वैद्यकीय तपासणी
सोमवार २९/७/२०१६ व मंगळवार ३०/७/२०१६ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये सर्व विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी डॉ. सुहास शितोळे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
लाल रंग दिन
बुधवार दिनांक १९/९/२०१६ रोजी शिशुरंजन गटामध्ये लाल रंग दिन साजरा करण्यात आला. वर्गात लाल रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. सर्व विद्यार्थिनी आणि ताई लाल रंगाचे पोशाख परिधान करून आल्या होत्या. खाऊ म्हणून लाल रंगाची चेरी देण्यात आली. विद्यार्थीनींनी हस्तव्यवसाय सामुहिक कृती केली.
शिक्षक दिन
बुधवार दिनांक ७/९/२०१६ रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्राथमिक विभागातील विद्यार्थीनींनी शिक्षिकेची भूमिका पर पाडली. शिशुमंदिरमधील छोट्या विद्यार्थीनींना गाणी, गोष्टी सांगितल्या. तसेच पालक शिक्षक संघाने विद्यार्थिनी आणि शिक्षकांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. संघाचे उपाध्यक्ष श्री. सागर खंदारे ह्यांनी सूत्रसंचालन केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचा भेटवस्तू आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पालक शिक्षक संघातर्फे शाळेला गुरु व्यासांचा फोटो भेट म्हणून दिला. तसेच अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले होते. अशाप्रकारे शाळेबद्दल पालकांमध्ये असणारा आदर अनुभवायास मिळाला.
गणेशोत्सव
बुधवार दिनांक ७/८/२०१६ रोजी शाळेमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थीनींनी गणपती पूजेसाठी लागणारे साहित्य जसे दुर्वा, फुले, उदबत्ती आणले. दुर्वांचे महत्व विद्यार्थीनींना सांगण्यात आले. गणपती प्रतिमेची मिरवणूक पालखीमधून काढण्यात आली. शिशुरंजन च्या छोट्या विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थीनींनी शाळेजवळील गणपती मंदिरास भेट दिली. तेथे फुलांची रांगोळी काढली. आरती, श्लोक म्हणण्यात आले. शाळेमध्ये आल्यावर प्रसाद म्हणून उकडीचा मोदक देण्यात आला.
घरे प्रकल्प
छोट्या गटामध्ये घरे प्रकल्पांतर्गत सोमवार दिनांक २९/७/२०१६ रोजी फिल्ड ट्रीप नेण्यात आली. प्रत्यक्ष घराचे बांधकाम कसे केले जाते हे दाखवण्यासाठी शाळेजवळ चालू असणाऱ्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी विद्यार्थीनींना नेण्यात आले. त्या ठिकाणी वापरण्यात येणारे बांधकाम साहित्यसुद्धा दाखवण्यात आले. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण विद्यार्थीनींना मिळाले.
संस्थेचा वर्धापन दिन
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन व महात्मा गांधी जयंती रविवार २/१०/२०१६ रोजी साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने शुक्रवार दिनांक ३०/९ /२०१६ रोजी विद्यार्थीनींना स्वछता मोहीम राबवण्यात आली. शाळेमध्ये संस्थापकांच्या प्रतिमांची मुख्याध्यापकांच्या हस्ते पूजा करण्यात आली. संस्थेमध्ये वर्धापनानिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये हुजूरपागा (कात्रज) शाळेच्या शिशुमंदिर विभागातील शिक्षिका श्रीमती कीर्ती म्हसवडे ह्यांना कै. माननीय श्रीमती सिंधुताई केतकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हिरवा रंग दिन
बुधवार दिनांक २१/९ /२०१६ रोजी छोट्या गटामध्ये हिरवा रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आणि ताई हिरव्या रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. वर्गामध्ये हिरव्या रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थीनींनी ठसेकाम ही हस्तव्यवसाय सामुहिक कृती केली. कोथिंबीर भात खाण्यासाठी देण्यात आला.
पानशेत सहल
शुक्रवार दिनांक २६/८/२०१६ आणि शनिवार दिनांक २७/८/२०१६ रोजी मोठ्या गटाची पाणी प्रकल्पांतर्गत गमभन प्रकाशनाचे विद्याविहार ,पानशेत येथे सहल नेण्यात आली. धरण, नदी, शेतीबद्दल कामे अशी विविध माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळावी ह्या दृष्टीकोनातून सहलीचे आयोजन करण्यात आले होते. खडकवासला , पानशेत, वरसगाव हि धरणे विद्यार्थीनींना दाखवून माहिती सांगण्यात आली. गप्पी मासे, गांडूळ खत, खेकडा ह्याबद्दल माहिती श्री. कडू ह्यांनी विद्यार्थीनींना दिली. नांगरणी , खुरपणी , नाचणीची लागवड ह्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थीनींनी घेतला. विविध औषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थीनींनी मिळवली. पोटभर जेवणासोबत वर्षाविहाराचा आनंद विद्यार्थीनींनी लुटला.
गोकुळाष्टमी
बुधवार दिनांक २४/८/२०१६ रोजी शाळेमध्ये गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला साजरे करण्यात आले. कृष्णाचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. तसेच दहीहंडी साजरी करण्यात आली. सर्व विद्यार्थिनी राधा कृष्णाच्या अतिशय आकर्षक पोषाखामध्ये आल्या होत्या. प्रत्येक वर्गामध्ये दहीहंडी लावण्यात आली होती. विद्यार्थीनींना कृष्णाच्या गोष्टींची सीडी दाखवण्यात आली. विद्यार्थिनींनी टेबलवर चढून दहीहंडीमध्ये ठेवलेला शेंगदाण्याचा लाडू खाण्यास घेतला. दहीहंडी न फोडता खाऊ घेतल्याने विद्यार्थीनींना खूपच मजा वाटली. अशा प्रकारे अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने शाळेमध्ये दहीहंडी साजरी करण्यात आली. दडपे पोहे खाऊ म्हणून देण्यात आले.
राखीपौर्णिमा
मंगळवार दिनांक १६ /८/२०१६ रोजी राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली. विद्यार्थिनींनी नारळीपौर्णिमेनिमित्त कोळी नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थिनींनी नारळीपौर्णिमा आणि राखीपौर्णिमेची माहिती सांगितली. समाजामधील विविध काम करणा-या व्यक्तींबद्दल आदर निर्माण व्हावा आणि त्यांच्या कामाबद्दल माहिती व्हावी ह्या उद्दिष्टाने शाळेमध्ये विविध व्यक्तींना निमंत्रित केले जाते. ह्यावर्षी विद्यार्थीनींना शाळेमध्ये ने-आण करणा-या रिक्षावाले काकांना बोलवण्यात आले. विद्यार्थीनींनी काकांना राख्या बांधून अशीच आमची काळजीपूर्वक ने-आण करा असे आवाहन केले. आपल्या सर्व काकांचे आभार देखील मानले.
स्वातंत्र्यदिन
स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम करण्यात आला. विद्यार्थिनींना आपल्या देशाबद्दल माहिती मिळावी ह्या दृष्टीकोनातून कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचे विविध पोषाख करून विद्यार्थिनी आल्या होत्या. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सानेगुरुजी ह्या थोर पुरुषांची माहिती विद्यार्थिनींनी सांगितली. तसेच विद्यार्थिनींनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांच्या जीवनावर आधारित एक नाटुकले सादर केले. सर्व विद्यार्थिनींनी ढोलताशांच्या तालावर अतिशय आकर्षक पद्धतीने कवायत सादर केली.
शैक्षणिक प्रदर्शन (मोठा गट)
शनिवार दिनांक ३०/७/२०१६ रोजी शिशुमंदिर मधील मोठया गटाच्या पालकांसाठी प्रदर्शन भरवण्यात आले होते. शाळेमध्ये वर्षभरामध्ये मोठया गटासाठी जे विविध प्रकल्प राबवले जातात तसेच अध्यापनासाठी शिक्षक नाविन्यपूर्ण जी साधने वापरतात त्याबद्दल पालकांना माहिती व्हावी ह्या उद्देशाने शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्पानुसार साधनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आली. पालकांसोबत विविध शाळेतील शिक्षकांनी प्रदर्शनाला भेट दिली.
गुरुपौर्णिमा
मंगळवार दिनांक १९/७/२०१६ रोजी शिशुमंदिर विभागात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. मोठया आणि छोट्या गटातील विद्यार्थीनिंनी गुरुशिष्याच्या गोष्टी वर्गातील इतर विद्यार्थिनींना सांगितल्या. तसेच माननीय मुख्याधापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या हस्ते सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
नाते तुझे माझे
‘माझे कुटुंब’ या प्रकल्पांतर्गत छोट्या गटामध्ये बुधवार दिनांक २०/७/२०१६ रोजी 'नाते तुझे माझे' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमामध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आई-वडिलांव्यतिरिक्त इतर नातेवाईक जसे मामा, मावशी, काका, काकू असे नातेवाईक कार्यक्रमात सहभागी झाले होते. चिकटकाम, ठसेकाम यासारख्या हस्तव्यवसाय कृती विद्यार्थिनींनी नातेवाईकांच्या सोबत अतिशय उत्साहामध्ये केल्या.
रमजान ईद
शिशुमंदिर विभागामध्ये सर्वधर्मसमभाव ही भावना विद्यार्थिनींमध्ये रुजवली जाते. म्हणूनच इतर सणासोबत ‘रमजान ईद’ हा सण सुद्धा मंगळवार दिनांक ५/७/१६ रोजी साजरा करण्यात आला. त्यादिवशी मोठ्यागटातील विद्यार्थिनींचे पालक श्री.शेख उपस्थित होते त्यांनी विद्यार्थिनींना ‘रमजान ईद’ सणाचे महत्व सांगितले. छोट्यागटाच्या (चाफा) विद्यार्थिनींनी गाण्यावर नृत्य सादर केले. पालक श्री. शेख ह्यांचे भेटवस्तू आणि फुल देऊन आभार मानले. विद्यार्थिनींना खाऊ म्हणून शिरखुर्मा देण्यात आला.
शिक्षकांसाठी उद्बोधन शिबीर
विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षिका या कायम प्रयत्नशील असतात. बदलत्या काळाप्रमाणे शिक्षण घेऊन विकास साधण्यासाठी शिक्षकांना सुद्धा नवीन नवीन तंत्र आत्मसात करावी लागतात. त्याचा वापर रोजच्या अध्ययन पद्धतीमध्ये केला तर नक्कीच विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शिक्षकांची हीच गरज ओळखून महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेने पूर्वप्राथमिक शिक्षकांसाठी (वर्ष २०१६-१७) वर्षाच्या सुरवातीला कार्यशाळेचे आयोजन केले. गुरुवार दिनांक ९/६/२०१६ आणि शुक्रवार दिनांक १०/६/१६ रोजी हस्तकला व खेळ ह्या विषयावर श्रीमती अर्चना वाटवे व श्रीमती वासंती काळे यांनी मार्गदर्शन केले.
शाळेचा पहिला दिवस
आई, आई असे सतत म्हणत आणि सतत आईच्या मागे मागे धावत असणारी विद्यार्थीनी शाळेत प्रवेश करते. आपले कुटुंब म्हणजेच सर्व विश्व मानणाऱ्या लहान मुली आता विद्यार्थिनी म्हणून शाळेमध्ये येणार असतात. शाळा सुद्धा त्यांना आपले विश्व वाटावे ह्या दृष्टीकोनातून शाळा सतत प्रयत्नशील असते. शाळेचा पहिला दिवस हा सुखद अनुभव देणारा आणि कायम स्मरणामध्ये राहावा म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रम घेतले जातात.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील पहिला दिवस हा हुजूरपागेतील आगळावेगळा ठरला. छोटा गट सोमवार दिनांक १३/६/१६, मोठा गट सोमवार दिनांक २०/६/२०१६ रोजी सुरु झाला. शिशुरंजन गटाची शाळा शुक्रवार दिनांक २४/६/२००१६ रोजी सुरु झाली. पहिल्याच दिवशी नवीन गणवेश घालून विद्यार्थिनींनी पालकांसमवेत शाळेत प्रवेश केला. त्याचे स्वागत वर्गाबाहेर रांगोळी काढून करण्यात आले. वर्गामध्ये विविध चित्रे लावण्यात आली. ह्यावर्षी छोट्यागटामध्ये कार्टूनच्या पताका तयार करून लावल्या. मोठया गटामध्ये फुलांची मोबाईल चित्रे तयार करून वर्गाची सजावट केली. शिशुरंजन गटामध्ये मुलींच्या आवडीच्या खाद्यपदार्थांची मोबाईल चित्रे लावण्यात आली. सर्व गटामधील पालकांना वर्गामध्ये शाळेच्या नियमांबद्दल माहिती सांगण्यात आली. तसेच छोट्या व मोठया गटामधील मुलींना भेटवस्तू म्हणून छोटा हातरुमाल, खाऊ म्हणून काजूकंद देण्यात आला. तसेच मोठ्या गटातील विद्यार्थिनी व पालकांनी मिळून गवतीचहा, तुळस, ओवा इ. औषधी रोपे कुंड्यांमध्ये लावली. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश विद्यार्थिनींपर्यंत पोहोचला. घरी जाताना हातावर हसरा चेहरा काढण्यात आला. शिशुरंजन छोट्या गटामधील विद्यार्थीनींनी पालकांसोबत ठसेकाम, चिकटकाम ह्यासारख्या कृतींचा आनंद लुटला. शिशुरंजन गटाला भेटवस्तू म्हणून डबा व water-bag देण्यात आली.