शालेय उपक्रम २०१८ - २०१९

शुभ दीपावली

यशाची रोषणाई
समाधानाचा फराळ मंगलमय रांगोळी
मधुर मिठाई आकर्षक आकाशकंदील
आकाश उजळवणारे फटाके

हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागात मोठ्या उत्साहात व आनंदात फटाके विरहीत दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थिनीला एक पणती, आकाशकंदील व लाडू चिवडा शाळेकडून दिवाळीची भेट म्हणून देण्यात आले. विद्यार्थिनींनी मिळालेली पणती सुरेख रंगवली व त्याच पणत्या वापरून दिव्यांची रोषणाई केली, मोठ्ठी रांगोळी काढून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली

सरदार वल्लभ भाई पटेल जयंती

३१ ऑक्टोबर, मरणोत्तर भारतरत्न असा किताब मिळालेले सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती शाळेत साजरी झाली. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थिनींसमोर त्यांचा जीवनपट थोडक्यात उलगडला व त्यांचा फोटोचे पूजन केले.

खंडेनवमी - शस्त्र पूजन, दसरा - पाटीपूजन

हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत खंडेनवमी व पाटीपूजन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. पाटीवर काढलेल्या सरस्वतीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींना या दिवसांचे महत्व सांगण्यात आले.

दसरा दसरा

भोंडला

हस्त नक्षत्रावर साजरा केला जाणारा अश्विन महिन्यातील नवरात्र हा सण. या नऊ दिवसांमध्ये सर्वत्र भोंडला साजरा करतात. आपल्या शाळेत देखील दि. १५ आॅक्टोबरला हत्तींच्या प्रतिमेचे पूजन करून, फेर धरून गाणी गाऊन हा दिवस साजरा केला. खिरपतीचे वाटप केले.

भोंडला भोंडला भोंडला भोंडला

वाचन प्रेरणा दिन

दि. १५ आॅक्टोबर माजी राष्ट्रपती डा. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करतो. या वर्षी विविध पुस्तकांचे वाचन विद्यार्थिनींनी केले. वर्गावर्गातून विद्यार्थिंनींना त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. या प्रसंगाचे औचित्य साधून मा. मुख्याध्यापिका श्रीम. जावडेकर बाईंनी विद्यार्थिनींना विविध पुस्तके दिली.

वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन

हिंदी दिन

१४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा करतात. इ. ५ वी च्या सर्व विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण वातावरणात हिंदी दिन साजरा केला. या दिवशी काही विद्यार्थिनींनी हिंदीतून गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. वर्गशिक्षकांनी हिंदी भाषेच्या पुस्तकांचे वाचन, हिंदी भाषिक खेळ असे आयोजन केले होते. श्री. महाजन सर व श्रीम. मुजुमले बाई यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सर्व विद्यार्थिनींना सांगितले.

हिंदी दिन हिंदी दिन हिंदी दिन हिंदी दिन हिंदी दिन

नो हॉर्न डे

दि. १२ सप्टेंबर २०१८ रोजी आर. टी. ओ. पुणे व पुणे शहर वाहतूक पोलिस यांचेकडून 'नो हॉर्न डे' साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून जनजागृती करण्यासाठी राजस सोसायटीच्या चौकात हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या एकूण ४० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

नो हॉर्न डे नो हॉर्न डे नो हॉर्न डे नो हॉर्न डे नो हॉर्न डे

गणपती रंगवणे स्पर्धा

दर वर्षी प्रमाणे या वर्षीही इ. ५ वी ते इ. ७ वीच्या विद्यार्थिनींची गणपती रंगवणे स्पर्धा शनिवार दि. ८ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत ४३५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

गणपती रंगवणे स्पर्धा गणपती रंगवणे स्पर्धा गणपती रंगवणे स्पर्धा

शिक्षकदिन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते थोर विद्वान व हाडाचे शिक्षक होते. आपल्या शिकविण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून त्यांनी भावी सर्व शिक्षक परिवारासाठी आदर्श घालून दिला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत सुद्धा शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन मुख्याध्यपिका, पर्यवेक्षक, लेखनिक, शिपाई यांची भूमिका अगदी चोख पार पाडली. तसेच काही विद्यार्थिनी कात्रज विभागातील शिशुमंदिर विभागात शिक्षिका म्हणून गेल्या होत्या.
ज्या विद्यार्थिनी शिक्षिका झाल्या होत्या त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांना शाळेकडून खाऊ वाटप करण्यात आला.

शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन

पुस्तकहंडी

दहीहंडीचे औचीत्त्य साधून हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत मंगळवार दि. ४ सप्टेंबर रोजी पुस्तकहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. इ. ६ वीच्या विद्यार्थिनींचा यात सहभाग होता. श्रीम. मोनाली तनपुरे यांनी दहीहंडी विषयी माहिती सांगितली व मा. मुख्याध्यापिका श्रीम. उन्नती जावडेकर यांच्या हस्ते इ. ६ वीच्या सर्व विद्यार्थिनींना शाळेकडून पुस्तक कायमस्वरूपी भेट देण्यात आले. सर्व पुस्तके एकमेकींना हस्तांतर करून वाचन करण्याचे आवाहन करण्यात आले.

पुस्तकहंडी पुस्तकहंडी पुस्तकहंडी पुस्तकहंडी पुस्तकहंडी

पदभार सांभाळणे

पदभार सांभाळणे

शालेय परिवहन समिती

हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ सालासाठी शालेय परिवहन समितीची स्थापना करण्यात आली. समितीमध्ये स्थानिक नगरसेवक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रिक्षावाले, व्हॅनवाले काका या सर्वांना आमंत्रित करण्यात आले.
सभेसाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. उन्नती जावडेकर व शिशुमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. उमा गोसावी तसेच शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. सभेमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षित वाहतुकीवर तसेच सर्व काकांना येणाऱ्या समस्या व त्यावरील उपायांवर चर्चा करण्यात आली. सर्वांना वाहतुकीचे नियम सांगण्यात आले. तसेच रिक्षावाले व व्हॅनवाले काका यांच्यामधून प्रतिनिधींची निवड करण्यात आली.

पालक शिक्षक संघ

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये पालक शिक्षक संघ व माता पालक संघाची स्थापना करण्यात आली. माजी उपाध्यक्ष यांना श्रीफळ देऊन त्यांच्या जागी आवाजी मतदानाने या वर्षीच्या पालक शिक्षक संघ, माता पालक संघाच्या उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे कार्यकारी मंडळ मागील वर्षाप्रमाणेच राहील. या समितीतील सदस्य सलग २ वर्षे काम पाहतात. या तीनही संघाच्या अध्यक्ष पदी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. उन्नती जावडेकर आहेत. पालक शिक्षक संघ उपाध्यक्षपदी श्रीम. सुजाता व्हावळ, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष श्रीम. सुनिता केकान तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. खंदारे हे आहेत.

गुरुपौर्णिमा

|| गुरु ईश्वर तात माय | गुरुविण जगी थोर काय ||

आषाढ शुध्द पौर्णिमेलाच आपण गुरु पौर्णिमा असेही म्हणतो. आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा मंगल दिवस. जीवनाच्या प्रत्येक वळणावर विविध रुपात गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. प्राथमिक शाळेत सुद्धा गुरु पौर्णिमा अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. उन्नती जावडेकर व पालक शिक्षक संघातील पालक यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सत्कार विद्यार्थिनींच्या हस्ते श्रीफळ देऊन केले.

नागपंचमी

निसर्ग आपुला सखा सोबती या उक्ती प्रमाणेच निसर्गातील सर्व प्राणीमात्रांवर द्या करा. असे सांगणारा नागपंचमी हा सण शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नागपंचमी निमित्ताने शनिवार दि. ११ ऑगस्ट रोजी पालक, विद्यार्थिनी व शिक्षक यांची मेंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी शिशुमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका मा. उमा गोसावी, इंग्रजी माध्यमाची कला शिक्षक श्रीम. निवंगुणे व माजी शिक्षिका श्रीम. शैला आमडेकर हे परीक्षक म्हणून लाभले. पालक शिक्षक संघांतील पालकांनी इ. १ ली व इ. २ रीच्या विद्यार्थिनींच्या हातावर मेंदी काढली.

राखी पौर्णिमा

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला श्रावण
लाख लाख शुभेच्छा
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण ||

अशाप्रकारे भाऊ-बहिण यांच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणजेच राखी पौर्णिमा. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व काही विद्यार्थिनी पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहिलो. शाळेतील कला शिक्षिका श्रीम. गजमल यांनी विद्यार्थिनींकडून सुरेख राख्या तयार करून घेतल्या होत्या. त्याच राख्या विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी पोलिसांना बांधल्या, औक्षण केले व प्रत्येकाचे तोंड गोड केले.

राखी पौर्णिमा

क्रांतिसप्ताह

भारताचा हा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्यांनी केलेली सर्वस्वाची होळी आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेकांनी केलेला त्याग असे स्वातंत्र्याचे अमूलत्व पुढच्या पिढीपर्यंत पोहचावे, त्यांच्यात राष्ट्रभक्ती जागृत रहावी या हेतूने हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत दरवर्षी क्रांतिसप्ताहाचे आयोजन करण्यात येते. मा. मुख्याध्यापिका उन्नती जावडेकर यांनी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन केले. या प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या सप्ताहात कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांनी क्रांतीकारकांची रोमहर्षक चरित्रे कथारूपाने विद्यार्थिनींना सांगितली.
स्वातंत्र्य प्राप्त झाले. ते टिकविणे व त्याचे संवर्धन करून ते सशक्त करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्यच आहे. तसेच सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया थांबवणे व आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करणे हे देखील अतिशय महत्त्वाचे आहे. शत्रूंपासून आपल्या भारताचे रक्षण करण्याचे अलौकिक कार्य आपले सैनिक सर्व सुखांचा त्याग करून, खडतर परिस्थितीचा सामना करत, आपल्या कुटुंबापासून शेकडो मैल दूर राहून अतिशय निष्ठेने करीत असतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांचे मनोबल वाढविणे यासाठी शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी जवानांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून राख्या पाठविण्याचा उपक्रम देखील क्रांती सप्ताहात राबविण्यात आला.

श्रावणी शुक्रवार

निसर्गाचे आपल्यावर अगणित ऋण आहे. याच ऋणाची जाणीव व्यक्त करण्यासाठी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये वसुंधरा पूजनाचा तसेच निसर्ग पूजनाचा कार्यक्रम शुक्रवार दि. ३१ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. सुर्य, झाड, आकाश, पाणी, फूल यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांचे पूजन करण्यात आले. निसर्गातील या देवतांची माहिती व महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले.
याच दिवशी विद्यार्थिनींनी आदिशक्तीचे पूजन करून भक्तिमय वातावरणात श्रावणी शुक्रवार साजरा केला. श्रावणी शुक्रवारची कहाणी सांगण्यात आली तसेच देवीची आरती, गजर घेण्यात आला व प्रसाद वाटण्यात आला.

श्रावणी शुक्रवार

स्वराज्य सभा

विद्यार्थिनींना लोकशाहीचे महत्त्व कळून जबाबदार नागरिकत्वाचे बाळकडू शालेय जीवनापासूनच मिळावे या हेतूने शालेय मंत्री - मंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते. १ ली ते ७ वीच्या निवडून आलेल्या विद्यार्थिनी मंत्र्यांना स्वराज्य सभा शपथविधी समारंभात शपथ देण्यात येते. या समारंभास राजकारणातील व्यक्तींना शाळा आमंत्रित करते. यावर्षी दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी स्वराज्य सभा शपथविधी समारंभास आमदार श्रीम. मेघा कुलकर्णी ह्या प्रमुख पाहुण्या, तसेच म.ग.ए. संस्थेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. सुधीर निरफारके हे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थिनींना राजकारणातील अनुभवांचे मोलाचे मार्गदर्शन केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. गालिंदे व श्रीम. जावडेकर यांनी नवनिर्वाचित मंत्रिमंडळास गोपनियतेची व पदाची शपथ दिली. या कार्यक्रमास श्री. वसंत मोरे, मा. राजाभाऊ कदम, मा. श्रीम. मनिषाताई कदम, मा. राणीताई भोसले इ. नगरसेवक तसेच काही सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच सर्व विभागांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

स्वराज्य सभा निवडणूक स्वराज्य सभा शपथविधी समारंभ स्वराज्य सभा

बालसभा

दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या दोन्हींचे औचित्य साधून शाळेत इ. ५ वी च्या विद्यार्थिनींनी मा. मुख्याध्यापिका जावडेकर बाई तसेच इ. ५ वीच्या सर्व वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाने बालसभेचे आयोजन केले. या सभेसाठी स्वराज्य मंत्रिमंडळाची अध्यक्षा कु. गीतांजली काळभोर व पंतप्रधान कु. कस्तुरी वाघ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस सुरुवात झाली. बाल सभेचे सूत्र संचालन कु. आर्या गायकवाड हिने केले. इ. ५ वी च्या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणाद्वारे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे जीवनपट उपस्थित विद्यार्थिनींपुढे उलगडला. कु. वैभवी बहिरट हिने सर्व उपस्थितांचे आभार मानले. अशाप्रकारे बालसभा संपन्न झाली.

रमजान ईद

कुठे बसंती, कुठे पंचमी अथवा दुर्गामाता,
पोळा, पोंगल, ईद, इराही इथेच नांदे समता
रंग, ढंग जरी वेगवेगळे प्रेम दिसे मज नामी
हिंदू-मुस्लिम, सीख न ख्रिस्ती सारे एकच आम्ही

सर्वधर्मसमभावाचे मूल्य आपण जोपासतो, हेच मूल्य विद्यार्थिनींमध्ये रुजावीत यासाठी शाळेत विविध धर्मांचे सण साजरे करतो. त्याचप्रमाणे दि. २०/६/२०१८ रोजी शाळेत रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. लोकमतच्या प्रतिनिधी हलिमा अब्दूल कुरेशी या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. त्यांनी ईद सणाविषयी, त्यांच्या धर्माविषयी, भारतातील एकतेविषयी विद्यार्थिनींना अनमोल मार्गदर्शन केले. शाळेतील मुस्लिम विद्यार्थिनींनी पवित्र सण रमजान ईद विषयी माहिती सांगितली. मुस्लिम पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. रंजना नाईक बाईंनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

रमजान ईद रमजान ईद रमजान ईद रमजान ईद रमजान ईद रमजान ईद

पालखी सोहळा

जरी सुखासाठी तळमळशी | तरी पंढरी जाई एक वेळ ||
सर्व सुखाचे आगर | बाप रखुमाई देवीवरु ||

पंढरीची वारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे अध्यात्मिक सांस्कृतिक वैभव. लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर मुखी विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने, आनंदाने शिस्तीत वारीत सामील होतात.
हा भक्तिरसाचा वारसा विद्यार्थिनींमधे रुजविण्यासाठी शुक्रवार दि. १३ जुलै रोजी शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी दिंडी, वृक्ष दिंडी, डिजिटल दिंडी,पर्यावरण दिंडी, जलदिंडी अशा विविध दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते.

योग दिन

हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शरीर आणि मन निरोगी रहाण्यासाठी योगासने, प्राणायाम करण्याची गरज असते.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये ताडासन, वृक्षासन, पद्मासन, भुजंगासन, नौकासन तसेच प्राणायाम इ. घेण्यात आले. त्यामध्ये सर्व विद्यार्थिनी, शिक्षक सहभागी झाले होते. मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक, क्रीडाशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योगदिन खुप उत्साहात, जोशात साजरा झाला.

योग दिन योग दिन योग दिन योग दिन योग दिन

सेवापूर्ती समारंभ

सेवापूर्ती समारंभ

नवागतांचे स्वागत

दिवस उजाडल्याची माहिती मिळते
पक्ष्यांच्या चिवचिवाटाने आणि
नव शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते
चिमुकल्यांच्या आगमनाने ||

खरंच उन्हाळी सुटीत शांत झालेली कात्रज प्रशालेची इमारत चिमुकल्यांच्या आगमनाने गजबजून गेली. अत्यंत प्रसन्न वातावरणात शुक्रवार दि. १५ जून २०१८ रोजी शाळेच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. विद्यार्थिनींनाचा उत्साह, आनंद, द्विगुणीत करण्यासाठी सर्व विद्यार्थिनींना खाऊ म्हणून लाडू देण्यात आले. पुस्तकांचे वाटप केले, इ. १ लीच्या विद्यार्थिनींना प्ले शेड मध्ये पपेट शो दाखविण्यात आला तसेच त्यांना टोप्या दिल्या. या दिवशी पालक शिक्षक संघातील पालकांनी विद्यार्थिनींना व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले. नव्या उमेदीने, आनंदाने शाळेच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.