शालेय उपक्रम २०१७ - २०१८
पुणे गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये ८०० पेक्षा कमी गटामध्ये हुजूरपागा कात्रज शाळेने मिळविलेले यश
क्रीडा स्पर्धा सन २०१७-१८ | |||
---|---|---|---|
पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे
८०० पेक्षा कमी विद्यार्थिनी गटात सांघिक - स्पर्धा |
|||
१ | लंगडी | लहान गट | उपविजयी संघ |
२ | कबड्डी | लहान गट | विजयी संघ |
३ | मारचेंडू | लहान गट | विजयी संघ |
सांघिक - स्पर्धा लहान गट विजेते पद | ||
---|---|---|
ड्रील - स्पर्धा | ||
१ | योगासन | तृतीय क्रमांक |
२ | सुर्य नमस्कार | तृतीय क्रमांक |
३ | कॅलेस्थानिक | द्वितीय संघ |
४ | लेझीम | प्रथम क्रमांक |
५ | लोकनृत्य | प्रथम क्रमांक |
सर्व ड्रील - स्पर्धा उपविजेते पद |
स्वामी विवेकानंद विचार मंच | |||
---|---|---|---|
वकृत्व - स्पर्धा | |||
१ | कु. भुमी विजय कुंभार | इ. ७ वी | द्वितीय क्रमांक |
२ | कु. वैष्णवी अमित मुधोळ | इ. ७ वी | तृतीय क्रमांक |
नाट्य छटा - स्पर्धा | |||
३ | कु. गीतांजली पांडुरंग काळभोर | इ. ६ वी | प्रथम क्रमांक |
४ | कु. आदिती अरविंद राऊत | इ. ६ वी | द्वितीय क्रमांक |
५ | कु. मानसी प्रविण थिटे | इ. ६ वी | तृतीय क्रमांक |
पद्य पाठांतर - स्पर्धा | |||
६ | कु. श्रावणी भिलारे | इ. ५ वी | प्रथम क्रमांक |
७ | कु. मुग्धा महेश सुरनीस | इ. ५ वी | द्वितीय क्रमांक |
उतारा पाठांतर - स्पर्धा | |||
८ | कु. वैष्णवी अमित मुधोळ | इ. ७ वी | प्रथम क्रमांक |
संस्कृत सुभाषित पाठांतर - स्पर्धा | |||
९ | कु. वैभवी नंदकुमार कुरुम | इ. ७ वी | प्रथम क्रमांक |
१० | कु. मधुरा विजय डेरे | इ.७ वी | द्वितीय क्रमांक |
गीताधर्म मंडळ | |||
---|---|---|---|
गीता पाठांतर स्पर्धा | |||
१ | कु. प्रतीक्षा आरोटे | इ. ३ री | तृतीय क्रमांक |
वन्यजीव सप्ताह स्पर्धा
पुणे महानगरपालिकेतर्फे राजीव गांधी प्राणी संग्रहालय व इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रालय येथे "वन्यजीव सप्ताह" निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दि. १/१०/२०१७ रोजी
अनु. क्र. | दिनांक | स्पर्धेचे नाव | विद्यार्थीनीचे नाव | क्रमांक |
---|---|---|---|---|
१. | १/१०/२०१७ | टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार करणे | कु. ऋतुजा नागनाथ केकान | प्रथम |
२. | कु. नेहा नितिन येवारे | द्वितीय | ||
३. | २/१०/२०१७ | चित्रकला स्पर्धा | कु. नंदिनी बाळय्या स्वामी | द्वितीय |
४. | कु. नेहा नितिन येवारे | तृतीय | ||
५. | ३/१०/२०१७ | रांगोळी स्पर्धा | कु. श्रेया धनंजय कालेकर | प्रथम |
६. |
६/१०/२०१७ |
पथनाट्य स्पर्धा |
कु. प्रणिता प्रशांत पवार | |
कु. मानसी प्रविण थिटे | ||||
कु. पूर्वा समीर कोकाटे | ||||
कु. अदिती अरविंद राऊत | ||||
कु. गीतांजली पांडुरंग काळभोर | ||||
कु. ऐश्वर्या बालाजी किवडे | ||||
कु. सिद्धी आशिष खांडरे | ||||
कु. हर्षदा मनोज विसपुते | ||||
कु. पल्लवी विनय बोंडगे | ||||
कु. साक्षी संतोष कदम |
वनराई करंडक
वनराई पर्यावरण वाहिनी तर्फे घेतल्या जाणाऱ्या वनराई करंडक स्पर्धेत नृत्य आणि गायन विभागात हुजूरपागा कात्रज विभागाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेसाठी गाणे लिहिले आहे. शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सुचिता सावंत यांनी गाण्याला स्वरसाज चढविला. शाळेतील संगीत शिक्षिका श्रीमती गायत्री साठे यांनी तसेच शाळेतील सहशिक्षक श्री. दीक्षित सर यांनी ढोलकी वर साथ दिली.
नाट्य स्पर्धा
चंद्र सुर्य रंगभूमी तर्फे घेतल्या गेलेल्या नाट्यस्पर्धेत हुजूरपागा कात्रज शाळेला तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेतील नाटकाचा विषय – मी आणि दहशतवादी हल्ला. या नाटकाचे लेखन केलं आहे हुजूरपागा कात्रज शाळेतील सहशिक्षिका श्रीमती प्रिया गोगावले यांनी.
सहल
शैक्षणिक सहलींना विद्यार्थिनींच्या विकासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असते. निरिक्षण शक्ती वाढीस लागते. आपल्या भोवतालचा समाज व निसर्ग यांच्याशी असलेले आपले नाते दृढ होते. विद्यार्थिनी अनुभवसंपन्न होतांनाच आनंदही लुटतात.
पहिली :- केतकावळे, बनेश्वर, शेती
दुसरी :- शिरगाव, पार्ले बिस्कीट, भोसरी गार्डन
तिसरी :- हाडशी, लोणावळा
चौथी :- शिवनेरी, ओझर
पाचवी :- चोखी ढाणी
सहावी :- सज्जनगड, ठोसेघर, चाळकेवाडी
सातवी :- कोल्हापूर, कण्हेरी मठ, पन्हाळा
शिक्षण दिन
देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दूल कलाम आझाद यांचा जन्म दिवस ११ नोव्हेंबर शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत मौलाना अब्दूल कलाम आझाद यांच्या स्मृतीस अभिवादन करून विद्यार्थिनींना शिक्षण दिनाची माहिती सांगितली
विद्यार्थी दिन
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शालेय जीवनाचा प्रवास ज्या दिवशी सुरु झाला तो दिवस म्हणजे ७ नोव्हेंबर. ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.
विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धांमध्ये भाग घेतला.
शुभ दीपावली
समाधानाचा फराळ मंगलमय रांगोळी
मधुर मिठाई आकर्षक आकाशकंदील
आकाश उजळवणारे फटाके
वाचन प्रेरणा दिन
१५ ऑक्टोबर हा अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. अब्दुल कलाम हे हाडाचे शिक्षक होते. यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी आवर्जून पुस्तके वाचली. इ. १ ली व २ री च्या विद्यार्थिनींना गोष्टीची पुस्तके वाचण्यास दिली. तसेच इ. ५ ते ७ च्या विद्यार्थिनींनी अब्दुल कलमांची पुस्तके वाचली.
खंडेनवमी आणि पाटीपूजन
| उत्सव आला विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा |
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत खंडेनवमी आणि पाटीपूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. इ. १ ली ते इ. ४थी च्या विद्यार्थिनी या दिवशी आवडीचा पोशाख घालून आल्या. १ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थिनींनी पाटीवर सरस्वती काढून पूजन केले.
त्याच प्रमाणे मा. मुख्याध्यपिका श्रीम. रंजना नाईक व इतर शिक्षकांनी शाळेतील सर्व लोखंडी वस्तू व शस्त्रांची पूजा केली. या उपक्रमाची माहिती माईकवरून सर्व विद्यार्थिनींना सांगितली.
भोंडला
ऐलोमा पैलोमा गणेश देवा |
माझा खेळ मांडीयेला करीन तुझी सेवा ||
हे गाणं ऐकलं कि आठवतो तो भोंडला. अश्विन प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत जे देवीचे नवरात्र साजरे होते, त्या नऊ दिवसांत भोंडला साजरा करतात. भोंडल्यालाच हादगा असेही म्हणतात. हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून फेर धरून विविध गाणी म्हणतात व प्रत्येकीने आणलेली खिरापत ओळखतात. असा हा भोंडला हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्तेनुसार इ. १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थींनींना फेर धरून गाणी म्हटली. सुरवातीलाच मा. मुख्याध्यपिका रंजना नाईक यांनी हत्तीच्या प्रतिमेचे पूजन केले. श्रीम. साठेबाईंनी गाणी म्हटली. गाणी संपल्यावर मुलींनी खिरापत ओळखली. सर्व मुलींना खिरापत वाटण्यात आली. अशा प्रकारे पारंपारिक संस्कृती जपणारा भोंडला आमच्या शाळेत आनंदाने साजरा करण्यात आला.
शिक्षकदिन (५ सप्टेंबर २०१७)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते थोर विद्वान व हाडाचे शिक्षक होते. आपल्या शिकविण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून त्यांनी भावी सर्व शिक्षक परिवारासाठी आदर्श घालून दिला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत सुद्धा शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन मुख्याध्यपिका, पर्यवेक्षक, लेखनिक, शिपाई यांची भूमिका अगदी चोख पार पाडली. तसेच काही विद्यार्थिनी कात्रज विभागातील शिशुमंदिर विभागात शिक्षिका म्हणून गेल्या होत्या. ज्या विद्यार्थिनी शिक्षिका झाल्या होत्या त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांना शाळेकडून खाऊ वाटप करण्यात आला.
गणपती बनविणे कार्यशाळा (२४ ऑगस्ट २०१७)
पुणे महानगरपालिका आयोजित गणपती बनविणे कार्यशाळा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या इ. सातवी ते दहावी साठी असलेल्या उपक्रमात हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या २५ विद्यार्थिनी सहभागी झाल्याने विद्यार्थिनींची नावे गिनिज बुक मध्ये गेली आहेत.
गणपती रंगवणे स्पर्धा (२२ ऑगस्ट २०१७)
इ. ५ वी ते इ. ७ वी च्या ४७५ विद्यार्थिनींनी गणपती रंगवणे स्पर्धेत भाग घेतला अशा प्रकारे विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य सतत चालू असते.
पुस्तकहंडी (१४ ऑगस्ट २०१७)
दहीहंडीचे औचीत्त्य साधून शुक्रवार दि. २६ ऑगस्ट रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत पुस्तकहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. इ. ६ वी च्या विद्यार्थिनींचा यात सहभाग होता. मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक यांच्या कल्पनेतून इ. ६ वी च्या सर्व विद्यार्थिनींना शाळेकडून पुस्तक कायमस्वरूपी भेट देण्यात आले. सर्व पुस्तके एकमेकींना हस्तांतर करून वाचन करण्याचे आवाहन करण्यात आले.
श्रावणी शुक्रवार (१८ ऑगस्ट २०१७)
निसर्गाचे आपल्यावर अगणित ऋण आहेत. याच ऋणाची जाणीव व्यक्त करण्यासाठी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये वसुंधरा पूजनाचा तसेच निसर्ग पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सुर्य, झाड, आकाश पाणी, फूल, यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांचे पूजन करण्यात आले. निसर्गातील या देवतांची माहिती व महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले.
याच दिवशी इ. ३ री व इ. ४ थी च्या विद्यार्थिनींनी आदिशक्तीचे पूजन करून भक्तिमय वातावरणात श्रावणी शुक्रवार साजरा केला. श्रावणी शुक्रवारची कहाणी सांगण्यात आली तसेच देवीची आरती, गजर घेण्यात आला व प्रसाद वाटण्यात आला.
राखी पौर्णिमा (१२ ऑगस्ट २०१७)
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला श्रावण
लाख लाख शुभेच्छा
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण ||
अशाप्रकारे भाऊबहिण यांच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणजेच राखी पौर्णिमा. दि. १६ ऑगस्ट रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व काही विद्यार्थिनी पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे सकाळी ८.४५ वाजता उपस्थित राहिलो. शाळेतील कला शिक्षिका श्रीम. गजमल यांनी विद्यार्थिनींकडून सुरेख राख्या तयार करून घेतल्या होत्या. त्याच राख्या विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी पोलिसांना बांधल्या, औक्षण केले व प्रत्येकाचे तोंड गोड केले.
विद्यार्थिनी व शिक्षकांसाठी हा अनोखा अनुभव होता. तेथील श्री. श्रीकांत शिंदे यांनी आमच्या सर्व विद्यार्थिनींना पोलिस स्टेशनचे कामकाज कसे चालते ते सविस्तर सांगितले. वॉकी – टॉकीवरचे प्रत्यक्ष बोलणे एकून तर विद्यार्थिनी हरखूनच गेल्या. पोलिसांजवळ असलेल्या विविध बंदुकांची माहिती त्यांनी विद्यार्थिनींना दिली व त्या सर्व बंदुकी विद्यार्थिनींना पाहायला मिळाल्या. तसेच त्या स्टेशनच्या अखत्यारीत असलेल्या सर्व चौकातील रहदारी CCTV कॅमेऱ्याने तेथील स्क्रीनवर बघता आली. हा सर्व अनुभव विद्यार्थिनी व शिक्षकांसाठी खूपच छान व वेगळा होता.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे मुख्य पोलिस अधिकारी यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून सामाजिक भान प्रत्येक नागरीकाला येणं किती गरजेचे आहे हे पटवून दिले.
क्रांतिसप्ताह (८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट)
जनन – मरण हे तुझ्याचसाठी, टिळा मातीचा लावीन माथी |
सार्वभौमत्व हे भारतभूचे, अभंग आपण राखूया,
चला चला रे तिरंगा खांद्यावर मिरवू या !!
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्मृती मनात सतत तेवत राहाव्यात याच हेतूने हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत क्रांतिसप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशप्रेम, सांघिक भावना, सामाजिक भान इ. नीतिमुल्ये विद्यार्थिनींच्या मनात रुजविली जातात.
क्रांती सप्ताहाचे औचित्य साधून विद्यार्थिनींच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. इ. ३ ते ७ वी च्या विद्यार्थिनींची कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. तसेच इ. ७ वी च्या विद्यार्थिनींची निबंध स्पर्धा घेण्यात आली.
आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आपल्या भावना व्यक्त करणारे पत्रलेखन इ. ७ वी च्या विद्यार्थिनींनी केले, ही पत्रं व राख्या सीमेवरील सैनिक बांधवांना पाठविण्यात आल्या व त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला गेला.
बालसभा (१ ऑगस्ट २०१७)
विद्यार्थिनींना शालेय जीवनापासूनच देशभक्तीचे बाळकडू मिळावे व प्रत्येकीच्या मनात देशभक्ती जागृत रहावी, पूर्व सुरींनी केलेले बलिदान स्मरणात रहावे इ. उद्देशांसाठी महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करत असतो.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आक्रमक व जहाल नेतृत्व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनी दि. १ ऑगस्ट २०१७ हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत याच हेतूने बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील महत्त्वाचे नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही याच कार्यक्रमात साजरी करण्यात आली. बालसभेच्या या उपक्रमास प्रमुख पाहुणी म्हणून हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेच्या स्वराज्यसभेतील मंत्रिमंडळाची अध्यक्ष कु. यामिनी थेऊरकर उपस्थित होती. इयत्ता सातवीच्या काही विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक व काही विद्यार्थिनींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल, सामाजिक, राजकीय, कार्याबद्दल आपल्या भाषणातून माहिती सांगितली.
उत्तम नियोजन, विद्यार्थिनींची उत्तम भाषणे व भारावलेल्या वातावरणात ही बालसभा यशस्वीपणे संपन्न झाली.
नागपंचमी (२६ जुलै २०१७)
नागपंचमी निमित्ताने पालक, विद्यार्थिनी व शिक्षक यांची मेंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी इ. १ ली च्या तसेच शिशुमंदिरच्या विद्यार्थिनींच्या हातावर मेंदी काढली.
स्वराज्यसभा शपथविधी समारंभ (२२ जुलै २०१७)
विद्यार्थिनींना लोकशाहीचे महत्त्व कळून जबाबदार नागरिकत्वाचे बाळकडू शालेय जीवनापासूनच मिळावे या हेतूने शालेय मंत्री - मंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते. १ ली ते ७ वी च्या निवडून आलेल्या विद्यार्थिनी मंत्र्यांना स्वराज्य सभा शपथविधी समारंभात शपथ देण्यात येते. या समारंभास राजकारणातील व्यक्तींना शाळा आमंत्रित करते. या वर्षी दि. २२ जुलै २०१७ रोजी स्वराज्य सभा शपथविधी समारंभास पुणे जिल्हा परिषदेच्या सभापती मा. श्रीम. सुजाता पवार ह्या प्रमुख पाहुण्या, तसेच म.ग.ए. संस्थेचे नियामक मंडळ सभासद मा. रविंद्र साळुंखे हे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थिनींना राजकारणातील अनुभवांचे मोलाचे मार्गदर्शन केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. गालिंदे व श्रीम. जवळेकर यांनी नवनिर्वाचित मंत्रिमंडळास गोपनियतेची व पदाची शपथ दिली. या कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम. उषाताई वाघ व सर्व विभागांचे मुख्याध्यापक, पत्रकार बंधू उपस्थित होते.
वृक्षारोपण (१ जुलै २०१७)
पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने राज्यशासनाने १ जुलै रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हुजूरपागा कात्रज विभागात सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पुणे म.न.पा. शिक्षण मंडळ माध्य. व तांत्रिक शिक्षणाधिकारी श्री. दीपक माळी, तसेच म.ग.ए.संस्थेच्या सचिव श्रीम. रेखाताई पळशीकर, माजी अध्यक्षा श्रीम. जयश्रीताई बापट, सहसचिव श्रीम. शालिनीताई पाटील, सभासद श्री. सुभाष महाजन व सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका या सर्वांनी विविध वृक्षांची लागवड केली. शाळेतील विद्यार्थिनींनी वृक्षारोपण केले.
डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा (१ जुलै २०१७)
अध्यापनात विविधता आणल्यास व त्याला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास अध्ययन सहज व प्रभावी होते. शिक्षण क्षेत्रातील स्पर्धात्मक युगात उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे. या धर्तीवर म.ग.ए. सोसायटीच्या हुजूरपागा कात्रज शाळेत दि. १ जुलै रोजी डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे म.न.पा. शिक्षण मंडळ माध्य. व तांत्रिक शिक्षणाधिकारी श्री. दीपक माळी यांना आमंत्रित करण्यात आले होते. सोहळ्यास म.ग.ए.संस्थेच्या सचिव श्रीम. रेखाताई पळशीकर, माजी अध्यक्षा श्रीम. जयश्रीताई बापट, सहसचिव श्रीम. शालिनीताई पाटील, सभासद श्री. सुभाष महाजन, श्री. सोनावणी, हिरामण बनकर शाळेचे माध्यमिक विभागाचे हरिचंद्र गायकवाड उपस्थित होते. सायबर नेटीक्स डिजिटल शाळा तयार करण्यासाठी संदीप गुंड यांचे मार्गदर्शन लाभले.
रमझान ईद (२८ जून २०१७)
दान कर्माचा महिना म्हणजे रमजान
प्रेम अर्पिण्याचा महिना म्हणजे रमजान
असा हा मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र सण रमजान ईद बुधवार दि. २८ जून २०१७ रोजी कात्रज हुजूरपागा प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. या प्रसंगाचे औचित्य साधून मा. श्रीम. श्रीतमन्ना ईनामदार थोर समाजसेविका तसेच समुपदेशक यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. अत्यंत उत्साह पूर्वक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. मुस्लिम पालकांना देखील या प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते. मा. श्रीतमन्ना ईनामदार यांनी अत्यंत समर्पक शब्दांत रमजान ईद या सणाचे महत्त्व पटवून दिले, तसेच सर्वधर्मसमभावाची मुल्ये आपल्या मार्गदर्शनातून रुजविली. विद्यार्थिनी व पालकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
पालखी सोहळा (२४ जून २०१७)
शनिवार दिनांक २४ जून रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या पालखी सोहळ्यात स्वच्छता दिंडी, पर्यावरण दिंडी, वृक्ष दिंडी, जल दिंडी, ग्रंथ दिंडी, स्त्री भृणहत्या, वाहतूक दिंडी, डिजिटल दिंडी, यांसारख्या विविध प्रकारच्या दिंडींचे आयोजन करण्यात आले.
विठ्ठल नामाच्या गजरा बरोबर विद्यार्थिनींनी विविध घोष वाक्ये देऊन व पथनाट्य सादरीकरणातून सामाजिक जागृती केली. शाळेच्या जवळील परिसरातील लोकांना विद्यार्थिनींनी तयार केलेल्या कागदी व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेजवळील चौकात वाहतूक दिंडीतील विद्यार्थिनींनी वाहतूक कोंडी दूर करण्याचे काम केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी “डिजिटल पालखीचे” ही आयोजन करण्यात आले. अशाप्रकारे सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकून विद्यार्थिनींना सामाजिकतेचे भान येण्यासाठी प्रतिकात्मक दिंडींचे आयोजन करण्यात आले. पालखी नंतर सर्व विद्यार्थिनींना प्रसादचे वाटप करण्यात आले.
योग दिवस (२१ जून २०१७)
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शरीर आणि मन निरोगी रहाण्यासाठी योगासने, प्राणायाम करण्याची गरज असते.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये ताडासन, वृक्षासन, पद्मासन, भुजंगासन, नौकासन तसेच प्राणायाम इ. घेण्यात आले. त्यामध्ये साधारण १६१३ विद्यार्थिनी, शिक्षक सहभागी झालेले होते. मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक, क्रीडाशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योगदिन खुप उत्साहात, जोशात साजरा झाला.
ज्ञानांजन कृतज्ञता पुरस्कार
ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी तर्फे शिक्षण सेवेतील योगदानाबद्दल दिला जाणारा कृतज्ञता पुरस्कार या वर्षी ३६ वर्षाच्या शैक्षणिक सेवेत, १५ वर्षे शिष्यवृत्ती वर्गाला मार्गदर्शन करणाऱ्या हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागाच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती. रंजना नाईक यांना प्रदान करण्यात आला.
नवागतांचे स्वागत (१५ जून २०१७)
ही आवडते मज मनापासूनी शाळा
लाविते लळा ही बाळा
अतिशय प्रसन्न व उत्साही वातावरणात दि. १५ जून २०१७ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली. शाळेचा परिसर विद्यार्थिनी, पालक यांनी गजबजला होता. इयत्ता पहिली ते सातवीचे सर्व वर्ग, फळे सजविले होते.
इ. पहिलीच्या विद्यार्थिनींना पालक व शाळा यांच्या तर्फे गुलाबपुष्प व पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
नवागतांच्या स्वागतासाठी इयत्ता पहिली व दुसरीच्या शिक्षकांनी ‘बाहुली नाट्य’ चे सादरीकरण केले. इयत्ता ३ री ते ७ वी च्या सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गात विविध कार्यक्रम घेऊन विद्यार्थिनींचे स्वागत केले. नवीन वर्ग, नवीन पुस्तके, नव्या बाई, त्यांच्याशी साधलेला संवाद, गप्पा, गोष्टी यामुळे विद्यार्थिनी हरखून गेल्या.