(सूचना व माहिती PDF स्वरूपात)

अर्ज / Forms :

अर्ज स्वीकारण्याची वेळ




सामाजिक परिवर्तनाचा प्रवास अर्थात हुजूरपागा उलगडताना

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिदिनानिमित्त, गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे "सामाजिक परिवर्तनाचा प्रवास अर्थात हुजूरपागा उलगडताना..." हा कार्यक्रम महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी(म ग ए), हुजूरपागा या पुण्यातल्या नामांकित शैक्षणिक संस्थेतर्फे शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी साजरा झाला.

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्था, हुजूरपागेच्या द्रष्ट्या संस्थापकांपैकी एक असलेले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे जानेवारी २०२६ हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्ष आहे. या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाचे प्रसंग समोर आणताना, हुजूरपागा शाळेचा इतिहास आणि म. ग. ए संस्थेची गेल्या १४१ वर्षांची ज्ञानदानाची यशस्वी वाटचाल अधोरेखित करणारा "सामाजिक परिवर्तनाचा प्रवास अर्थात हुजूरपागा उलगडताना" हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि भाषातज्ञ डॉ. श्रीमती नीलिमा गुंडी होत्या. संस्थेच्या मुख्य विश्वस्त उषा वाघ, सचिव रेखा पळशीकर यांच्या हस्ते व्यासपीठावरील सर्वांचा सत्कार केला गेला. संस्थेला भरघोस आर्थिक सहकार्य करणार्‍या शोभाताई धारिवाल, पुरुषोत्तम लोहिया, सुरेश डोळ, डॉ . अनिल गोगटे आणि प्रेमा गोगटे, गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी सुनील सुतवणे आणि संस्थेला कायदेशीर आणि आर्थिक सल्ला देणारे सर्व अॅडव्होकेट आणि वैधानिक आणि अंतर्गत लेखापाल यांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. .

Read more...

हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थिनी यांनी रेडीओ एफ एफ टी आय रेडीओ स्टेशन ९०.४ या ठिकाणी एक पाऊल व्यसनमुक्ती कडे आणि फतवा हि स्व:लिखित नाटके अभिवाचनातून सादर केली.

दैनिक लोकन्याय २७ फेब्रुवारी २०२६

सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड जुनिअर कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.

महाराष्ट्र टाईम्स पुणे | २४ डिसेंबर २५

आदर्श शिक्षक पुरस्कार - मोनाली तनपुरे. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळा.

लोकमत न्यूज नेटवर्क | १२ सप्टेंबर २५

हुजूरपागा सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल इंग्लिश मिडीयम शाळेत विज्ञान प्रकल्प

महाराष्ट्र टाईम्स पुणे | २९ ऑक्टोबर २५

२ ऑक्टोबर म. ग. ए. संस्थेचा १४१ वा वर्धापनदिन सोहळा दिमाखात साजरा

रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा

पुणे में राष्ट्रीय खेल दिवस का भव्य आयोजन

His Highness Chintamanrao Patwardhan Junior College for Girls | पुणे साप्ताहिक दायित्व | 30 ऑगस्ट २५

कात्रज शिशुमंदिर शाळेत गणेशोत्सव

सकाळ Today | 6 September 25

Maharashtra Girls’ Education Society, Huzurpaga’s

‘Bhasha’ The Institute of Foreign Languages and Sanskrit announces

Courses in German, Chinese, Japanese and Sanskrit

Certificate courses starting from June 2025

Key Features

  • Venture initiated by eminent educational institute in Maharashtra
  • Guidance from reputed and experienced experts
  • Admissions open to all, Age no bar (Eligibility 10th pass)
  • Timings suitable for all, especially for working professionals
  • Centrally located place with ample parking
  • Online and offline mode of teaching
  • Certification by internationally acclaimed institutes of the said languages

Contact no - 020 2445 5484 (11.30 AM to 5.30 PM)

88052 76200 (WhatsApp message only 11.30 AM to 5.30 PM)

Course Details

Sr. No.

Language

Hours

Fees

Exam Conducting Institutes

1.

German

90 Hours

20,000/- (Incl. GST)

 Goethe Institute

2.

Chinese

90 Hours

18,000/- (Incl. GST)

Yin Yang Institute

3.

Japanese

150 Hours

26,000/- (Incl. GST)

Aditi Academy 

4.

Sanskrit

90 Hours

14,150/- (Incl. GST)

‘Bhasha’ Language Institute

Reserve your place as a Global Citizen, Learn Indian as well as Foreign Languages



Maharashtra Girls Education Society's
HUZURPAGA

"We wish to lead girls on the way of independent thoughts. They are the source of tremendous joy and hope of humanity."

 

About School

The first ever school for girls in India by an Indian was established by a social reformist Mahatma Jyotirao Phule and his revolutionary wife Savitri-Bai Phule at Pune in 1848. The second such school was started in Pune by Maharashtra Girls Education Society "Huzurpaga". "Huzurpaga" opened the doors of secondary education for girls. Since then this educational institute has been working continuously for past 125 years offering quality education for girls.

Click here for more

 

Maharashtra Girls Education Soc., Huzurpaga

So far girls in about 25000 families have availed of the K.G., Primary, Secondary and higher Secondary school run by this institute situated at Laxmi road, Pune.

The advocates of women's education and active social reformers like Justice Mahadeo Govind Ranade, Rao Bahadur Shankar Pandurang Modak, Dr. Sir, Ramkrishna Gopal Bhandarkar, Shri vaman abaji Modak have made the revolutionary start for womens education. We are delighted to mention that Honorable Indira Gandhi, the Ex. Prime Minister of India, has stayed in our Hostel for some time during her student time. Many of Our past students have reached high positions in the field of Medicine, Literature, Fine Arts, Sports, theater, Law, Education & Politics.

 

History

In 1848 Mahatma Jyotirao Phule and his wife Savitri-Bai Phule established the first ever girls school in India at Pune. Second such school exclusively for girls education was establish by Maharashtra Girls Education Society named "Huzurpaga". "Huzurpaga" was established on 2nd oct. 1884.

Read about yesteryears

Management

Our management seeks to achieve its goal of quality education for girls.


Know Management Commitee

Vision & Mission

Girls are the backbone of our future families and ultimately of our society. We as an institute are aware that academic education should to be supported by various experiences which help them to develop their personalities with not just materialistic approach but with qualitative life.

Aims, Goals & Objectives

 

Donation Appeal

... We are approaching you on behalf of the Maharashtra Girls Education Society's (MGE) 'Huzurpaga'. MGE Society has total eleven (11) schools under the umbrella at two different campuses - Laxmi Road and Katraj. The response from the local community especially at Katraj is overwhelming and we are forced to keep expanding our intake capacity. This naturally puts pressure on facilities and available space. Hence we have decided to expand our work...

Complete Donation Appeal (PDF)

विविध शालेय उपक्रमांबाबत विद्यार्थिनी आणि पालकांचा अभिप्राय


शाळेतील काही ठळक निवडक उपक्रम व घडामोडी


सामाजिक परिवर्तनाचा प्रवास अर्थात हुजूरपागा उलगडताना

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिदिनानिमित्त, गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे "सामाजिक परिवर्तनाचा प्रवास अर्थात हुजूरपागा उलगडताना..." हा कार्यक्रम महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी(म ग ए), हुजूरपागा या पुण्यातल्या नामांकित शैक्षणिक संस्थेतर्फे शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी साजरा झाला.

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्था, हुजूरपागेच्या द्रष्ट्या संस्थापकांपैकी एक असलेले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे जानेवारी २०२६ हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्ष आहे. या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाचे प्रसंग समोर आणताना, हुजूरपागा शाळेचा इतिहास आणि म. ग. ए संस्थेची गेल्या १४१ वर्षांची ज्ञानदानाची यशस्वी वाटचाल अधोरेखित करणारा "सामाजिक परिवर्तनाचा प्रवास अर्थात हुजूरपागा उलगडताना" हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि भाषातज्ञ डॉ. श्रीमती नीलिमा गुंडी होत्या. संस्थेच्या मुख्य विश्वस्त उषा वाघ, सचिव रेखा पळशीकर यांच्या हस्ते व्यासपीठावरील सर्वांचा सत्कार केला गेला. संस्थेला भरघोस आर्थिक सहकार्य करणार्‍या शोभाताई धारिवाल, पुरुषोत्तम लोहिया, सुरेश डोळ, डॉ . अनिल गोगटे आणि प्रेमा गोगटे, गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी सुनील सुतवणे आणि संस्थेला कायदेशीर आणि आर्थिक सल्ला देणारे सर्व अॅडव्होकेट आणि वैधानिक आणि अंतर्गत लेखापाल यांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. .

कार्यक्रमाची सुरुवात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या सचिव रेखा पळशीकर यांनी केले. १४१ वर्षापूर्वी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, श्री शंकर पांडुरंग पंडित, श्री वामन आबाजी मोडक यांनी रोवलेल्या स्त्री-शिक्षणाच्या बीजाच्या आजवर झालेल्या देदीप्यमान विस्ताराचा त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून उहापोह केला. त्या म्हणाल्या, "केवळ १८ विद्यार्थिनींपासून सुरु झालेल्या हुजूरपागा संस्थेत आज १५ हजार विद्यार्थिनी पूर्वप्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण मराठी व इंग्रजी या दोन्हीही माध्यमातून घेत आहेत. आज सर्वत्र मराठी माध्यमाच्या शाळांमधील तुकड्या कमी होत असताना हुजूरपागेची मात्र मराठी माध्यमाची एकही तुकडी कमी झालेली नाही ही अत्यंत अभिमानाची बाब आहे."

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि भाषातज्ञ डॉ. श्रीमती नीलिमा गुंडी यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना वंदन करून स्त्री-शिक्षणाच्या प्रवासाची गोष्ट ओघवत्या वाणीतून उपस्थितांना कथन केली. त्या म्हणल्या, "स्वातंत्र्यपूर्व काळातील विद्वान, संवेदनशील आणि विचारवंत सुधारक महात्मा फुले, गोपाळ कृष्ण आगरकर, गोपाळ जोशी, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे, बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाज सुधारकणी बदलत्या काळात स्त्रियांनीही आधुनिक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे हे ओळखले. अर्धा समाज अशिक्षित राहिल्याने कधीही सामाजिक उन्नती होऊ शकणार नाही व स्त्री-पुरुष समानता येणार नाही, हे जाणून स्त्री-शिक्षणाचे बीज रोवले. पुण्यात सुरु झालेल्या या स्त्री-शिक्षणाच्या क्रांतीनेच पुणे हे स्त्री-शिक्षणाचे केंद्र झाले. स्त्री-शिक्षणाचे पेव सर्वत्र पसरले आणि सामान्य कुटुंबातील स्त्री मोठ्या प्रमाणात शिकू लागली, आत्मोन्नती करू लागली." नीलिमाताईंनी शिक्षणाचा वसा घेतलेल्या अनेक स्त्रियांची तसेच समाजाचा आणि घरचाही विरोध पत्करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या समाजसुधारकांची समर्पक उदाहरणे दिली.

प्रथम सत्राचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल हुजूरपागा इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियदर्शनी पुरोहित यांनी तर आभार प्रदर्शन हुजूरपागा माध्यमिक शाळा, कात्रजच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुधा कांबळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात "सामाजिक परिवर्तनाचा प्रवास अर्थात हुजूरपागा उलगडताना..." हा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या जीवनातील ठळक घडामोडींचा आढावा घेणारा, निवेदन-संगीत-नृत्य-नाटिका स्वरूपातील दिमाखदार रंगमंचीय कार्यक्रम हुजूरपागेच्या सर्व विभागांच्या विद्यार्थिनी आणि शिक्षक यांनी सादर केला. या कार्यक्रमाची संकल्पना संस्थेच्या सचिव रेखा पळशीकर यांची होती. स्तवन, बंदिनी, संगीत शारदा, साऊ पेटती मशाल, रमाबाईंचे मनोगत, न्यायमूर्तींचे न्यायदानाचे नि:स्पृह कामकाज, न्यायमूर्ती व रमाबाई रानडे यांचा विवाह प्रसंग, पहिले मराठी साहित्य संमेलन, डॉ. विश्राम घोले व कन्या काशीबाई याचे बलिदान, टाऊन हॉल सभा, १९२६ साली मुंबई विश्वविद्यालयात प्रथम येऊन हुजूरपागेचे नाव वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या वेणूताई अभ्यंकर यांचे मनोगत, लोकहितवादी आगरकरांचे स्वागत, इ. प्रसंगातून १४१ वर्षांच्या देदीप्यमान इतिहासचे उत्तम आणि उठावदार आणि विचारप्रवर्तक सादरीकरण झाले. या नृत्य-नाटिकेचे संहितालेखन आणि दिग्दर्शन रॅं. र.पु परांजपे प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. केदार जोशी व हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. प्रसाद दीक्षित व शिक्षिका श्रीमती प्रिया गोगावले यांनी केले, तर निवेदन श्री. प्रसाद दीक्षित यांच्या बरोबरच एच. एच. सी.पी. हायस्कूलच्या शिक्षिका श्रीमती गायत्री साठे आणि श्रीमती सई नेर्लेकर यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेच्या अनेक आजी-माजी विद्यार्थिनी आणि शिक्षक तसेच संस्थेशी जोडलेले अनेक हितचिंतक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता शाला प्रशस्ति आणि शालामाता गीताने झाली.या गीताला हुजूरपागेच्या आजी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे स्वत: शालामाता गीत गाऊन प्रतिसाद दिला.

n-m-ranade-smruti-karyakram-1.jpgn-m-ranade-smruti-karyakram-2.jpgn-m-ranade-smruti-karyakram-3.jpgn-m-ranade-smruti-karyakram-4.jpgsamajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg


 


इतर उल्लेखनीय कार्यक्रम



बॅडमिंटनच्या एका प्रदर्शनीय सामन्याने आणि माजी बॅडमिंटन पटूंच्या कौतुक सोहळ्याने सौ. विमलाबाई गरवारे बॅटमिंटन हॉलचे अनोखे उद्घाटन

बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागेच्या सौ. विमलाबाई गरवारे क्रीडा संकुलाच्या झालेल्या नूतनीकरणाप्रीत्यर्थ उद्घाटन समारंभ अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक श्री. सुनील सुतवणे होते. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पटू श्रीमती मंजुषा सहस्त्रबुद्धे व श्रीमती राधिका इंगळहळळीकर यांच्यातील प्रदर्शनीय सामना झाला .

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवन तसेच शालामाता गीत याने अतिशय सुंदर व सुरेल झाली . श्रीमती आसावरी शंतनु गोरे यांनी सुरेल आवाजात ईशस्तवन सादर केले, एच एच सी पी मधील गायन शिक्षिका श्रीमती गायत्री साठे व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थिनींनी शाला माता गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव श्रीमती रेखा पळशीकर यांनी केले. यानंतर संस्थेच्या वतीने कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांची ओळख श्रीमती सई नेर्लेकर व बॅडमिंटन पटू यांची ओळख श्रीमती मोनाली तनपुरे यांनी करून दिली.

सौ. विमलाबाई गरवारे यांच्या छायाचित्राचे, ताम्रपटाचे अनावरण तसेच बॅडमिंटन कोर्टाचे पूजन व उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पटू श्रीमती मंजुषा सहस्त्रबुद्धे व श्रीमती राधिका इंगळहळळीकर यांनी प्रदर्शनीय सामना खेळला, यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सुनील सुतवणे यांनी आपले विचार मांडताना सौ. विमलाबाई गरवारे यांच्या स्मृतीला अभिवादन करून सौ. विमलाबाई गरवारे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले. ' सौ. विमलाबाई गरवारे यांचा शांत व संयमी स्वभाव श्री. आबासाहेब गरवारे यांच्या कर्तृत्वाला पूरक, प्रेरक ठरला. स्वातंत्र्योत्तर काळात गरवारे उद्योग समूहाचा विस्तार वेगाने होण्यामागे विमलाबाईंची आबासाहेबांना सर्वार्थाने साथ होती. विविध शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था यांना मदत करण्यात तसेच आबासाहेबांना सामाजिक कार्यातही सौ. विमलाबाईंनी मदत केली. आंतरराष्ट्रीय दर्जाचा बॅडमिंटन हॉल बांधण्यासाठी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा शाळेतील शिक्षकांनी मदत मागितल्यावर सौ. विमलाबाई गरवारे क्रीडा संकुल ही संकल्पना पुढे आली. शाळेच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या विमलाबाईंनी मुलींच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांना वाव देणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला. ' असे श्री. सुनील सुतवणे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती प्रियदर्शिनी पुरोहित यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शालिनी पाटील यांनी भूषविले. संस्थेच्या मुख्य विश्वस्त श्रीमती उषा वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे नियामक मंडळ सभासद व विश्वस्त उपस्थित होते.

गरवारे बॅटमिंटन हॉलचे अनोखे उद्घाटन गरवारे बॅटमिंटन हॉलचे अनोखे उद्घाटन गरवारे बॅटमिंटन हॉलचे अनोखे उद्घाटन गरवारे बॅटमिंटन हॉलचे अनोखे उद्घाटन गरवारे बॅटमिंटन हॉलचे अनोखे उद्घाटन

हुजुरपागेच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन साजरा - १ मे, २०२५

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सन्मान करण्यासाठी तसेच त्यासाठी लढणाऱ्यांच्या प्रयत्नांचे आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.

गुरुवार दिनांक १ मे, २०२५ रोजी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे ३० या संस्थेच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमात सर्वप्रथम कै. सौ .अश्विनी अरुण देवस्थळे प्री प्रायमरी इंग्रजी माध्यम शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सविता अंकईकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने ध्वजाला वंदन करण्यात आले आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत संपन्न झाले.

सदर कार्यक्रमास महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सभासद माननीय अॅड. सुधीर निरफराके तसेच सभासद माननीय डॉ. सुनील जगताप उपस्थित होते.

माननीय डॉ. सुनील जगताप यांनी सदर कार्यक्रमात आपले मार्गदर्शन केले आणि त्याद्वारे सर्वांना महाराष्ट्र दिनाचे महत्व समजावून दिले. महाराष्ट्र राज्याला खूप मोठा वैभवशाली इतिहास आहे आणि महाराष्ट्र राज्य हे सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. महाराष्ट्राचा हा इतिहास जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या संवादातून केले.

त्यानंतर माननीय अॅड. सुधीर निरफराके यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाचे महत्व समजावून सांगितले. यापुढे महाराष्ट्र प्रगतीपथावर जाण्याचे उद्दिष्ट प्रत्येकाने समोर ठेवावे आणि ते पूर्ण करण्याचा निश्चय करावा असे बहुमोल मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केले . नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर पहलगाम हल्यामधील मृत आणि जखमी पर्यटकांबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले आणि सदर गोष्टीचा विचार करता सर्व भारतीयांनी एकजुटीने आणि धैर्याने राहणे महत्वाचे आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास हुजूरपागा लक्ष्मी रोड येथील सर्व विभागांचे मा. मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय, हुजुरपागा या विभागातील डॉ. सुरसरिता तारळेकर यांनी केले तसेच त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची माहिती सर्वांना दिली.

म. ग. ए संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थेच्या सर्व विभागातील मा. मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाने तसेच हुजूरपागा, लक्ष्मी रोड वरील सर्व विभागांनी एकत्रितपणे सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.


हुजूरपागेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा

रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी म.ग.ए सोसायटीची हुजूरपागा प्रशाला लक्ष्मी रोड पुणे- ३०. या संस्थेच्या प्रांगणात आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या मा.सचिव श्रीम. रेखाताई पळशीकर यांनी भूषविले.

एच.एच.सी.पी. विभागाच्या मा.मुख्याध्यापिका श्रीम. माधुरी दोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, ध्वजप्रतिज्ञा, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत, संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन तसेच शासन आदेशानुसार तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली. ज्युनियर कॉलेजच्या NCC दलाचे, मराठी माध्यम शिशुमंदिर,प्राथमिक, माध्यमिक विभाग, इंग्रजी माध्यम- प्राथमिक, माध्यमिक या विविध विभागांचे संचलन अतिशय शिस्तबद्धरित्या सादर करण्यात आले.यानंतर सर्व विभागांतील शालेय मंत्रिमंडळाच्या पंतप्रधान असणाऱ्या विद्यार्थिनींनी सर्व उपस्थितांमध्ये देशाविषयी राष्ट्रभक्ती आणि निष्ठा जागृत ठेवणारी भाषणे सादर केली.

NCC दलामध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. एरोबिक्स, लेझीम, लोकनृत्य अशी नेत्रदीपक प्रात्यक्षिके पाहून सर्व उपस्थित भारावून गेले.

कार्यक्रमाच्या मा.अध्यक्ष श्रीम. रेखा पळशीकर यांनी ,"आपण म्हणजे देश आहोत, आपल्यात बदल झाला तर देशात नक्कीच बदल होईल ," अशा बहुमोल शब्दांत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

सर्व विभागांचे मा. मुख्याध्यापक, सर्व विभागाचे वरिष्ठ, शिक्षकवृंद, शिक्षकेतर , माजी विद्यार्थिनी तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीम. अश्विनी वीर यांनी केले .

खालील लिंक वर सर्व कार्यक्रम पाहता येईल.

https://youtu.be/b0sVCVhJvzs?si=C9Uz3xgHWff75qvJ

हुजूरपागा संस्थेचा १४० वा वर्धापन दिन

२ ऑक्टोबर २०२४

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा संस्थेचा १४० वा वर्धापन दिन दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी संस्थेच्या अमृत महोत्सव सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाला सुरवात करण्यापूर्वी सन १८८४ मध्ये बसविलेल्या कोनशिलेचे पूजन करून त्यानंतर संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना हार घालून पूजन झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून न्यायमूर्ती मृदुला भाटकर, अध्यक्षा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शालिनी पाटील यांनी भूषवले.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व नेहमीप्रमाणे शाला मे दैवतं मन्ये या शाळेच्या पारंपरिक श्लोकाने व शालामाता गीताने झाली. त्यानंतर महात्मा गांधी जयंतीनिमित्त वैष्णव जन तो .... हे भजन सर्व विभागातील गायन शिक्षकांनी गायले. महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून संस्थेच्या सचिव श्रीमती रेखा पळशीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेच्या सर्व देणगीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संस्थापकांनी किती कठीण प्रसंगांना तोंड देऊन शाळेची स्थापना तसेच पुढची वाटचाल केली याचा इतिहास थोडक्यात कथन केला.

140th Anniversary of Hujurpaga Institute

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती मृदुला भाटकर यांनी आपले विचार मांडताना, 'मी या शाळेची विद्यार्थिनी का नाही' असे म्हणत हुजूरपागा शाळेबद्दल गौरवोद्गार काढले.

पुढे त्या म्हणाल्या, 'आपण ज्या भारत देशात राहतो त्याची मूलभूत चौकट धर्मनिरपेक्षता ही आहे. भारताचे संविधान प्रत्येकाला विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देते. आपल्या देशातील लोकशाही स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार देते. प्रत्येक धर्माच्या चांगल्या गोष्टींच्या देवाण घेवाणीची गरज आहे. आपल्या धर्मावरील प्रेम याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा अनादर असा होत नाही. माणूसपण हा खरा धर्म आहे. धर्मनिरपेक्षता पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे नेणारा पूल आहे. पुण्यातील ही शाळा ब्रिटिश काळापासून आहे, त्यामुळे पुणे हे कायम प्रगतिशील राहिले आहे, असेही त्या म्हणाल्या. भारतीय संविधानातील काही कलमांचे दाखले देत त्यांनी धर्मनिरपेक्ष देश म्हणजे काय हे प्रभावीपणे सांगितले.

कार्यक्रमामध्ये संस्थेतील गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेतील शिक्षिका श्रीमती शैलजा गोडांबे यांनी केले. संस्थेच्या मुख्य विश्वस्त श्रीमती उषा वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

140th Anniversary of Hujurpaga Institute
140th Anniversary of Hujurpaga Institute
140th Anniversary of Hujurpaga Institute

हुजूरपागा करंडक


Huzurpaga Karandak 2024-25

हुजूरपागा करंडकाचे हे दुसरे वर्ष. शिशुमंदिर पासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनी व शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हुजूरपागेने कला व क्रीडा करंडकाचे व्यासपीठ सन २०२३-२४ पासून सर्वांना खुले करून दिले आहे. कला करंडकामध्ये नाट्यछटा, कथाकथन, नाट्यगीत, भक्ती गीत, काव्यवाचन, नाट्यवाचन, समूहगीत, समूहनृत्य, लोकनृत्य अशा विविध स्पर्धांचे तर क्रीडा प्रकारांमध्ये रिले, चेंडूपास, अडथळा शर्यत, धावणे, लंगडी, कबड्डी, कॅरम, सूर्यनमस्कार असे त्या त्या वयोगटांनुसार आयोजन केले जाते.

शैक्षणिक वर्ष २३ - २४ मध्ये स्थापन केलेल्या या हुजूरपागा करंडकाचे दुसरे वर्ष. यावर्षीचा सर्वात महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे हुजूरपागा या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी न होता फक्त आयोजनाचे काम करणार. यावर्षी कला करंडक हा २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२४ या दरम्यान घ्यायचे ठरले. त्यानुसार २ सप्टेंबर २०२४ रोजी अमृत महोत्सव सभागृहात प्रसिद्ध लेखिका व शाळेच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती मृणालिनी चितळे यांच्या हस्ते हुजूरपागा करंडकाचे दिमाखदार पद्धतीने उद्घाटन झाले. अमृत महोत्सव सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात मृणालिनीताईंनी आपल्या हुजूरपागेच्या बालपणीच्या आठवणी सांगत या स्पर्धा कशा आणि किती महत्त्वाच्या आहेत? याचेही महत्त्व विशद केले.

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर पुढे सलग तीन दिवस विविध कला स्पर्धा हुजूरपागेच्या विविध शाखांच्या हॉलमध्ये पार पडल्या. या मध्ये २६ शाळांसह १०८५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कला करंडकाचा बक्षीस समारंभ अमृत महोत्सव सभागृहामध्ये ४ सप्टेंबर २०२४ रोजी नाट्य कला अकादमीचे संस्थापक श्री प्रकाश पारखी यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात विविध गटांमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांच्या सादरीकरणाने झाली. या कार्यक्रमाला विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी त्यांचे पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बक्षीसपात्र प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

सर्व स्पर्धांचे सविस्तर वर्णन करता येणार नसले तरी छोट्या मुलींच्या नाटयछटेमधून नंबर काढणे अवघड गेले . तर नाट्यछटा , कथाकथन आणि एकपात्री प्रयोग यामध्ये अनेकांना फरक करता आला नाही . नाट्यवाचन , नाट्यछटा या लोप पावत चाललेल्या स्पर्धा पुन्हा सुरू केल्या बद्दल अनेकांनी कौतुक केले.समूहनृत्य आणि लोकनृत्याच्या वेळेस हॉलच काय पण ती इमारत व आजूबाजूच्या इमारती सर्व उत्साही मुलींनी दणाणून सोडल्या. उद्घाटनाच्या व बक्षीस समारंभाच्या दोन्ही कार्यक्रमास संस्थेच्या व करंडकाच्या मा. अध्यक्षा शालिनी पाटील या अध्यक्ष म्हणून तर संस्थेच्या मा. सचिव रेखा पळशीकर, मा. सभासद डॉ. अरुणा भांबरे, माजी विश्वस्त जयश्री बापट तसेच मुख्य विश्वस्त उषा वाघ संस्थेचे मा. सभासद सोनवणी सर तसेच मा. सभासद मुंदडा सर उपस्थित होते.

Huzurpaga Karandak 2024-25

१५ ऑगस्ट २०२४ गुरुवार

स्वातंत्र्य दिन- राष्ट्रीय सण

स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता! निवड करण्याची, स्वतःला मुक्त पणे अभिव्यक्त करण्याची आणि स्वच्छंदपणे जगण्याची स्वायत्तता.

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा लक्ष्मी रोड येथील सर्व विभागांनी मिळून 15 ऑगस्ट 2024 रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा संस्थेच्या मुख्य विश्वस्त श्रीमती उषाताई वाघ तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती रेखा पळशीकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. श्रीमती प्रियदर्शनी पुरोहित (मुख्याध्यापिका :-सौ शोभाताई रसिकलाल धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल) यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले गेले. कार्यक्रमातील ध्वजगीत आणि समूहगीताने एक भारावलेले वातावरण तयार झाले.

NCC, NSS आणि सर्व विभागातील मंत्रिमंडळाच्या विद्यार्थिनींनी उत्तम संचलन केले.

तदनंतर सर्व विभागातील पंतप्रधानांनी आपल्या उत्स्फूर्त भाषणात स्वातंत्र्य या विषयावर स्वतःची मते विश्वासाने मांडली.

अध्यक्षीय भाषणात श्रीमती उषाताई वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सूत्र संचालन ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर , लक्ष्मी रोड विभागातील अनुपमा पार्टे या शिक्षिकांनी केले.

वंदे मातरम या गीताने देशभक्तीने भारलेल्या वातावरणातच कार्यक्रमाची सांगता झाली.

78th-independence-day-India 78th-independence-day-India 78th-independence-day-India 78th-independence-day-India 78th-independence-day-India 78th-independence-day-India 78th-independence-day-India 78th-independence-day-India 78th-independence-day-India

गुरूपौर्णिमा कार्यक्रम

सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा संस्थेचा गुरूपौर्णिमा कार्यक्रम संस्थेच्या अमृत महोत्सव सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शालिनी पाटील यांनी भूषविले, प्रमुख पाहुणे म्हणून नाट्य दिग्दर्शक श्री. अतुल पेठे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरू वंदनेने झाली. प्रास्ताविक संस्थेच्या सचिव श्रीमती रेखा पळशीकर यांनी केले. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांची ओळख पर्यवेक्षिका श्रीमती साधना घोडके यांनी केली.

कार्यक्रमामध्ये संस्थेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे व गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.

आपले विचार मांडताना श्री. अतुल पेठे म्हणाले , "हुजूरपागा या संस्थेला मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. परंपरा तेंव्हाच दाखवता येते जेंव्हा ती माहीत असते. त्यामुळे इथे येणं हा माझा सन्मान आहे. आपण जिथे बसलो ती रानडे भांडारकर यांची परंपरा आहे. प्रश्न विचारणाऱ्यांची परंपरा आहे. त्यामुळे निर्भिडपणे प्रश्न विचारले पाहिजेत. गुरू ही पदवी आहे, ती लोकांकडून मिळते. खरे गुरू रोज मिळत नाहीत, शतकातून एकदाच मिळतात. त्यामुळे आपण सगळे विद्यार्थी आहोत. खरं शिक्षण हे ज्ञान मिळवणं आहे, त्यामुळे आपण मरेपर्यंत शिकत राहिले पाहिजे. अनुभवजन्य ज्ञान नावाची गोष्ट असते, आपण काय बघतो, वाचतो याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. कला ही जीवनात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मला माझ्यापुरतं जगणं अर्थपूर्ण करायचंय म्हणून माझी कला आहे, असे मी समजतो. आत्ताच्या काळात शिक्षणाचे काम कठीण आहे" असेही ते म्हणाले. पुढच्या पिढीला महाभारत वाचून दाखवणे ही आपली जबाबदारी आहे. बहिणाबाई अशिक्षित होत्या परंतु त्या सुसंस्कृत होत्या हे सांगताना, बहिणाबाई म्हणायच्या, सगळी झाडं पोट भरण्यासाठी नसतात काही झाडं फक्त मन भरण्यासाठी देखील असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतून काही मिळतेय का हे पाहण्यापेक्षा काही गोष्टींचा फक्त आनंद घ्यावा हे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी माध्यम लक्ष्मी रोड विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियदर्शिनी पुरोहित यांनी केले. आभार संस्थेच्या मुख्य विश्वस्त श्रीमती उषा वाघ यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Guru Pournima Guru Pournima Guru Pournima Guru Pournima

नामकरण समारंभ

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्था, हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे 30 येथील शिशुमंदिर विभागाचा नामकरण समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.

ठाणे येथील सुप्रसिद्ध उद्योगपती मा .श्री. सुरेश डोळ यांच्या दिवंगत पत्नी तसेच हुजूरपागेची माजी विद्यार्थिनी असलेल्या श्रीमती ज्योत्स्ना सुरेश डोळ यांच्या स्मरणार्थ शिशुमंदिर विभागाचे नाव 'ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर, हुजूरपागा' असे करण्यात आले.

या नामकरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट कमिशनर मा. श्री.माधवराव जगताप पुणे, महानगरपालिका यांना निमंत्रित केले होते. तसेच दुसरे पाहुणे ज्येष्ठ गांधीवादी नेते मा.उल्हास दादा पवार हे आम्हाला लाभले. या दोन्ही पाहुण्यांच्या शुभहस्ते शिशु मंदिरच्या नवीन नावाच्या ताम्रपटाचे व नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी मा. श्री. सुरेश डोळ व त्यांचे कुटुंबीय यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी मा .माधवराव जगताप, मा. उल्हास दादा पवार व मा. सुरेश डोळ यांनी मनोगत व्यक्त केले. शिशुमंदिरच्या विद्यार्थिनींनी नाट्यछटा सादर केल्या. संस्थेचे चॅरिटी कमिशनर कार्यालयाकरिताचे वकिल श्री. पराग एरंडे यांचा सत्कार या संमारंभात करण्यात आला.

संस्थेच्या सचिव मा. रेखा पळशीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कात्रज प्राथमिक येथील शिक्षिका श्रीमती मोनाली तनपुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेच्या अध्यक्ष मा. शालिनी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिशुमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती अनघा रानडे यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे माननीय पदाधिकारी,व नियामक मंडळ सदस्य, सर्व विभाग प्रमुख, शिशुमंदिरच्या माजी मुख्याध्यापिका व शिक्षिका तसेच सर्व विभागातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या मा.पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिशुमंदिर परिवाराच्या सहकार्याने हा नामकरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.



Huzurpaga in News

Click on the image to read the news

ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर हुजूरपागा

samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
डोळ शिशुमंदिर शाळेत विविध उपक्रम
सकाळ | 22 August 25
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
गणेशोत्सवानिमित्त गणपतीची गाणी
सकाळ | 28 August 25
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
महाराष्ट्र गर्ल्स एजुकेशनमध्ये स्वसंरक्षणाचे धडे देत राखीपौर्णिमा
प्रभात | 10 August 25
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
'हुजूरपागा' मध्ये शैक्षणिक प्रदर्शन
महाराष्ट्र टाइम्स 3 September 25
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त नाटुकले, बालसभा
महाराष्ट्र टाइम्स 6 August 25


रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा

samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
दि.०२/१०/२०२५ म.ग.ए. सोसायटी, हुजूरपागा पुणे. वर्धापनदिनाची बातमी
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजुरपागेत अवतरली निसर्ग पांढरी
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
रँगलर र. पु. परांजपे शाळेत आगळी वेगळी पुस्तक हंडी साजरी

एच.एच. सी. पी. हायस्कूल हुजूरपागा

samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
एच. एच. सी. पी. हायस्कुल, हुजूरपागा प्रशालेला स्वीडिश विद्यार्थ्यांची भेट
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
एच. एच. सी. पी. हायस्कुलमध्ये वर्गप्रतिनिधी निवडणूक
लोकमत
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजूरपागा शाळेच्या विद्यार्थिनींचा शपथविधी थाटात
सकाळ
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजूरपागा प्रशालेत
मंत्रिमंडळ शपथविधी
सकाळ
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजूरपागा कॉलेजमध्ये स्वराज्यसभा उत्साहात
सकाळ

Huzurpaga Sou. Shobhatai Rasiklal Dhariwal English Medium School & Huzurpaga Junior College

samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजूरपागा सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल इंग्लिश मिडीयम शाळेत विज्ञान प्रकल्प
महाराष्ट्र टाईम्स पुणे | २९ ऑक्टोबर २५
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड जुनिअर कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.
महाराष्ट्र टाईम्स पुणे | २४ डिसेंबर २५
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
पर्यावरणविषयक पुस्तक, कृती प्रदर्शन
महाराष्ट्र टाईम्स पुणे
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
रिंग टेनिस स्पर्धा
सकाळ
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
रिंग टेनिस स्पर्धा
सकाळ

His Highness Chintamanrao Patwardhan Junior College for Girls

samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
पुणे में राष्ट्रीय खेल दिवस का भव्य आयोजन
पुणे साप्ताहिक दायित्व | 30 ऑगस्ट २५
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
पारितोषिक वितरण
राष्ट्रसंचार । ऑगस्ट २५
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
'अमृतप्रभा समूहगान' स्पर्धेचा निकाल जाहीर
मुंबई तरुण भारत । ८ ऑगस्ट २५

 

हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर

samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजूरपागा शाळेत 'आरोग्य दिंडी'
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजूरपागा शाळेत 'आरोग्य दिंडी'
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
राखीपौर्णिमा उत्साहात
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजुरपागेत रक्षाबंधन उत्साहात साजरे
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजूरपागा शिशुमंदिरात राखीपौर्णिमा साजरी
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
कात्रज शिशुमंदिर शाळेत गणेशोत्सव

हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळा

samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
आदर्श शिक्षक पुरस्कार - मोनाली तनपुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजुरपागेत गणेशमूर्तींची कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजूरपागा शाळेत शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी
लोकमत न्यूज नेटवर्क
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
नाट्यवाचनातून हुजूरपागा कात्रज शाळेने केली जनजाग
दैनिक लोकन्याय २७ फेब्रुवारी २०२६
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
नाट्यवाचनातून हुजूरपागा कात्रज शाळेने केली जनजाग
महाराष्ट्राची भूमी २७ फेब्रुवारी २०२६

हुजूरपागा कात्रज उच्च माध्यामिक व्यवसाय अभ्यासक्रम आणि वाणिज्य विभाग

samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजुरपागेत मंत्रिमंडळाचा शपथवितही सोहळा
सकाळ पेपर २५ ऑगस्ट २०२५
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
संयमित और सही दिशा में हो मोबाईल का उपयोग
दैनिक भास्कर २९ ऑगस्ट २०२५
samajik-parivartan-huzurpagecha-prawas-2026.jpeg
हुजुरपागेचे विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
लोकमत पेपर ५ ऑगष्ट २०२५