महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा संस्थेचा १४० वा वर्धापन दिन दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी संस्थेच्या अमृत महोत्सव सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला सुरवात करण्यापूर्वी सन १८८४ मध्ये बसविलेल्या कोनशिलेचे पूजन करून त्यानंतर संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना हार घालून पूजन झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून न्यायमूर्ती मृदुला भाटकर, अध्यक्षा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शालिनी पाटील यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व नेहमीप्रमाणे शाला मे दैवतं मन्ये या शाळेच्या पारंपरिक श्लोकाने व शालामाता गीताने झाली. त्यानंतर महात्मा गांधी जयंतीनिमित्त वैष्णव जन तो .... हे भजन सर्व विभागातील गायन शिक्षकांनी गायले. महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून संस्थेच्या सचिव श्रीमती रेखा पळशीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेच्या सर्व देणगीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संस्थापकांनी किती कठीण प्रसंगांना तोंड देऊन शाळेची स्थापना तसेच पुढची वाटचाल केली याचा इतिहास थोडक्यात कथन केला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती मृदुला भाटकर यांनी आपले विचार मांडताना, 'मी या शाळेची विद्यार्थिनी का नाही' असे म्हणत हुजूरपागा शाळेबद्दल गौरवोद्गार काढले.
पुढे त्या म्हणाल्या, 'आपण ज्या भारत देशात राहतो त्याची मूलभूत चौकट धर्मनिरपेक्षता ही आहे. भारताचे संविधान प्रत्येकाला विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देते. आपल्या देशातील लोकशाही स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार देते. प्रत्येक धर्माच्या चांगल्या गोष्टींच्या देवाण घेवाणीची गरज आहे. आपल्या धर्मावरील प्रेम याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा अनादर असा होत नाही. माणूसपण हा खरा धर्म आहे. धर्मनिरपेक्षता पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे नेणारा पूल आहे. पुण्यातील ही शाळा ब्रिटिश काळापासून आहे, त्यामुळे पुणे हे कायम प्रगतिशील राहिले आहे, असेही त्या म्हणाल्या. भारतीय संविधानातील काही कलमांचे दाखले देत त्यांनी धर्मनिरपेक्ष देश म्हणजे काय हे प्रभावीपणे सांगितले.
कार्यक्रमामध्ये संस्थेतील गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेतील शिक्षिका श्रीमती शैलजा गोडांबे यांनी केले. संस्थेच्या मुख्य विश्वस्त श्रीमती उषा वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
"We wish to lead girls on the way of independent thoughts. They are the source of tremendous joy and hope of humanity."
The first ever school for girls in India by an Indian was established by a social reformist Mahatma Jyotirao Phule and his revolutionary wife Savitri-Bai Phule at Pune in 1848. The second such school was started in Pune by Maharashtra Girls Education Society "Huzurpaga". "Huzurpaga" opened the doors of secondary education for girls. Since then this educational institute has been working continuously for past 125 years offering quality education for girls.
So far girls in about 25000 families have availed of the K.G., Primary, Secondary and higher Secondary school run by this institute situated at Laxmi road, Pune.
The advocates of women's education and active social reformers like Justice Mahadeo Govind Ranade, Rao Bahadur Shankar Pandurang Modak, Dr. Sir, Ramkrishna Gopal Bhandarkar, Shri vaman abaji Modak have made the revolutionary start for womens education. We are delighted to mention that Honorable Indira Gandhi, the Ex. Prime Minister of India, has stayed in our Hostel for some time during her student time. Many of Our past students have reached high positions in the field of Medicine, Literature, Fine Arts, Sports, theater, Law, Education & Politics.
In 1848 Mahatma Jyotirao Phule and his wife Savitri-Bai Phule established the first ever girls school in India at Pune. Second such school exclusively for girls education was establish by Maharashtra Girls Education Society named "Huzurpaga". "Huzurpaga" was established on 2nd oct. 1884.
Our management seeks to achieve its goal of quality education for girls.
Girls are the backbone of our future families and ultimately of our society. We as an institute are aware that academic education should to be supported by various experiences which help them to develop their personalities with not just materialistic approach but with qualitative life.
... We are approaching you on behalf of the Maharashtra Girls Education Society's (MGE) 'Huzurpaga'. MGE Society has total eleven (11) schools under the umbrella at two different campuses - Laxmi Road and Katraj. The response from the local community especially at Katraj is overwhelming and we are forced to keep expanding our intake capacity. This naturally puts pressure on facilities and available space. Hence we have decided to expand our work...
Complete Donation Appeal (PDF)
मराठी माध्यम
शिशुमंदिर ▸
रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे प्राथमिक शाळा ▸
एच. एच. सी. पी हायस्कूल फॉर गर्ल्स ▸
English Medium
Late Sou Ashwini Arun Deosthale Preprimary ▸
Primary School ▸
H.H.C.P. Junior College for Girls ▸
Huzurpaga Mahila Vanijya Mahavidyalaya ▸
मराठी माध्यम
शिशुमंदिर ▸
हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळा ▸
English Medium
Pre-primary School ▸
Primary School ▸
हुजूरपागा करंडकाचे हे दुसरे वर्ष. शिशुमंदिर पासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनी व शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हुजूरपागेने कला व क्रीडा करंडकाचे व्यासपीठ सन २०२३-२४ पासून सर्वांना खुले करून दिले आहे. कला करंडकामध्ये नाट्यछटा, कथाकथन, नाट्यगीत, भक्ती गीत, काव्यवाचन, नाट्यवाचन, समूहगीत, समूहनृत्य, लोकनृत्य अशा विविध स्पर्धांचे तर क्रीडा प्रकारांमध्ये रिले, चेंडूपास, अडथळा शर्यत, धावणे, लंगडी, कबड्डी, कॅरम, सूर्यनमस्कार असे त्या त्या वयोगटांनुसार आयोजन केले जाते.
शैक्षणिक वर्ष २३ - २४ मध्ये स्थापन केलेल्या या हुजूरपागा करंडकाचे दुसरे वर्ष. यावर्षीचा सर्वात महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे हुजूरपागा या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी न होता फक्त आयोजनाचे काम करणार. यावर्षी कला करंडक हा २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२४ या दरम्यान घ्यायचे ठरले. त्यानुसार २ सप्टेंबर २०२४ रोजी अमृत महोत्सव सभागृहात प्रसिद्ध लेखिका व शाळेच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती मृणालिनी चितळे यांच्या हस्ते हुजूरपागा करंडकाचे दिमाखदार पद्धतीने उद्घाटन झाले. अमृत महोत्सव सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात मृणालिनीताईंनी आपल्या हुजूरपागेच्या बालपणीच्या आठवणी सांगत या स्पर्धा कशा आणि किती महत्त्वाच्या आहेत? याचेही महत्त्व विशद केले.
उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर पुढे सलग तीन दिवस विविध कला स्पर्धा हुजूरपागेच्या विविध शाखांच्या हॉलमध्ये पार पडल्या. या मध्ये २६ शाळांसह १०८५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कला करंडकाचा बक्षीस समारंभ अमृत महोत्सव सभागृहामध्ये ४ सप्टेंबर २०२४ रोजी नाट्य कला अकादमीचे संस्थापक श्री प्रकाश पारखी यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात विविध गटांमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांच्या सादरीकरणाने झाली. या कार्यक्रमाला विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी त्यांचे पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बक्षीसपात्र प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
सर्व स्पर्धांचे सविस्तर वर्णन करता येणार नसले तरी छोट्या मुलींच्या नाटयछटेमधून नंबर काढणे अवघड गेले . तर नाट्यछटा , कथाकथन आणि एकपात्री प्रयोग यामध्ये अनेकांना फरक करता आला नाही . नाट्यवाचन , नाट्यछटा या लोप पावत चाललेल्या स्पर्धा पुन्हा सुरू केल्या बद्दल अनेकांनी कौतुक केले.समूहनृत्य आणि लोकनृत्याच्या वेळेस हॉलच काय पण ती इमारत व आजूबाजूच्या इमारती सर्व उत्साही मुलींनी दणाणून सोडल्या. उद्घाटनाच्या व बक्षीस समारंभाच्या दोन्ही कार्यक्रमास संस्थेच्या व करंडकाच्या मा. अध्यक्षा शालिनी पाटील या अध्यक्ष म्हणून तर संस्थेच्या मा. सचिव रेखा पळशीकर, मा. सभासद डॉ. अरुणा भांबरे, माजी विश्वस्त जयश्री बापट तसेच मुख्य विश्वस्त उषा वाघ संस्थेचे मा. सभासद सोनवणी सर तसेच मा. सभासद मुंदडा सर उपस्थित होते.
स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता! निवड करण्याची, स्वतःला मुक्त पणे अभिव्यक्त करण्याची आणि स्वच्छंदपणे जगण्याची स्वायत्तता.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा लक्ष्मी रोड येथील सर्व विभागांनी मिळून 15 ऑगस्ट 2024 रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा संस्थेच्या मुख्य विश्वस्त श्रीमती उषाताई वाघ तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती रेखा पळशीकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. श्रीमती प्रियदर्शनी पुरोहित (मुख्याध्यापिका :-सौ शोभाताई रसिकलाल धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल) यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले गेले. कार्यक्रमातील ध्वजगीत आणि समूहगीताने एक भारावलेले वातावरण तयार झाले.
NCC, NSS आणि सर्व विभागातील मंत्रिमंडळाच्या विद्यार्थिनींनी उत्तम संचलन केले.
तदनंतर सर्व विभागातील पंतप्रधानांनी आपल्या उत्स्फूर्त भाषणात स्वातंत्र्य या विषयावर स्वतःची मते विश्वासाने मांडली.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती उषाताई वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सूत्र संचालन ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर , लक्ष्मी रोड विभागातील अनुपमा पार्टे या शिक्षिकांनी केले.
वंदे मातरम या गीताने देशभक्तीने भारलेल्या वातावरणातच कार्यक्रमाची सांगता झाली.
सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा संस्थेचा गुरूपौर्णिमा कार्यक्रम संस्थेच्या अमृत महोत्सव सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शालिनी पाटील यांनी भूषविले, प्रमुख पाहुणे म्हणून नाट्य दिग्दर्शक श्री. अतुल पेठे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरू वंदनेने झाली. प्रास्ताविक संस्थेच्या सचिव श्रीमती रेखा पळशीकर यांनी केले. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांची ओळख पर्यवेक्षिका श्रीमती साधना घोडके यांनी केली.
कार्यक्रमामध्ये संस्थेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे व गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.
आपले विचार मांडताना श्री. अतुल पेठे म्हणाले , "हुजूरपागा या संस्थेला मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. परंपरा तेंव्हाच दाखवता येते जेंव्हा ती माहीत असते. त्यामुळे इथे येणं हा माझा सन्मान आहे. आपण जिथे बसलो ती रानडे भांडारकर यांची परंपरा आहे. प्रश्न विचारणाऱ्यांची परंपरा आहे. त्यामुळे निर्भिडपणे प्रश्न विचारले पाहिजेत. गुरू ही पदवी आहे, ती लोकांकडून मिळते. खरे गुरू रोज मिळत नाहीत, शतकातून एकदाच मिळतात. त्यामुळे आपण सगळे विद्यार्थी आहोत. खरं शिक्षण हे ज्ञान मिळवणं आहे, त्यामुळे आपण मरेपर्यंत शिकत राहिले पाहिजे. अनुभवजन्य ज्ञान नावाची गोष्ट असते, आपण काय बघतो, वाचतो याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. कला ही जीवनात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मला माझ्यापुरतं जगणं अर्थपूर्ण करायचंय म्हणून माझी कला आहे, असे मी समजतो. आत्ताच्या काळात शिक्षणाचे काम कठीण आहे" असेही ते म्हणाले. पुढच्या पिढीला महाभारत वाचून दाखवणे ही आपली जबाबदारी आहे. बहिणाबाई अशिक्षित होत्या परंतु त्या सुसंस्कृत होत्या हे सांगताना, बहिणाबाई म्हणायच्या, सगळी झाडं पोट भरण्यासाठी नसतात काही झाडं फक्त मन भरण्यासाठी देखील असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतून काही मिळतेय का हे पाहण्यापेक्षा काही गोष्टींचा फक्त आनंद घ्यावा हे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी माध्यम लक्ष्मी रोड विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियदर्शिनी पुरोहित यांनी केले. आभार संस्थेच्या मुख्य विश्वस्त श्रीमती उषा वाघ यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्था, हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे 30 येथील शिशुमंदिर विभागाचा नामकरण समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.
ठाणे येथील सुप्रसिद्ध उद्योगपती मा .श्री. सुरेश डोळ यांच्या दिवंगत पत्नी तसेच हुजूरपागेची माजी विद्यार्थिनी असलेल्या श्रीमती ज्योत्स्ना सुरेश डोळ यांच्या स्मरणार्थ शिशुमंदिर विभागाचे नाव 'ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशुमंदिर, हुजूरपागा' असे करण्यात आले.
या नामकरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट कमिशनर मा. श्री.माधवराव जगताप पुणे, महानगरपालिका यांना निमंत्रित केले होते. तसेच दुसरे पाहुणे ज्येष्ठ गांधीवादी नेते मा.उल्हास दादा पवार हे आम्हाला लाभले. या दोन्ही पाहुण्यांच्या शुभहस्ते शिशु मंदिरच्या नवीन नावाच्या ताम्रपटाचे व नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी मा. श्री. सुरेश डोळ व त्यांचे कुटुंबीय यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी मा .माधवराव जगताप, मा. उल्हास दादा पवार व मा. सुरेश डोळ यांनी मनोगत व्यक्त केले. शिशुमंदिरच्या विद्यार्थिनींनी नाट्यछटा सादर केल्या. संस्थेचे चॅरिटी कमिशनर कार्यालयाकरिताचे वकिल श्री. पराग एरंडे यांचा सत्कार या संमारंभात करण्यात आला.
संस्थेच्या सचिव मा. रेखा पळशीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कात्रज प्राथमिक येथील शिक्षिका श्रीमती मोनाली तनपुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेच्या अध्यक्ष मा. शालिनी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिशुमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती अनघा रानडे यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे माननीय पदाधिकारी,व नियामक मंडळ सदस्य, सर्व विभाग प्रमुख, शिशुमंदिरच्या माजी मुख्याध्यापिका व शिक्षिका तसेच सर्व विभागातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या मा.पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिशुमंदिर परिवाराच्या सहकार्याने हा नामकरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.